तंबिटाचे लाडू

मनस्विता's picture
मनस्विता in पाककृती
14 Sep 2021 - 6:04 pm

खरं तर हा कर्नाटकातील पदार्थ. रोटी-बेटी व्यवहाराने कित्येकदा सीमा धूसर होतात. आमच्याकडे माझी आई माहेरची कानडी आणि मोठी बहीण लग्नानंतर कानडी. पण सीमाभागातील त्यांची गावं. त्यामुळे कित्येक कर्नाटकी पदार्थ माहितीतील आणि आवडीचे. मागच्या महिन्यात मोठ्या बहिणीकडे गेले तेव्हा तंबिटाच्या लाडूचं प्रमाणा आणि पद्धत विचारली. त्यांच्याकडे हा लाडू नागपंचमीच्या वेळी करतात. नागपंचमीला हे लाडू करायचा माझाही बेत होता पण तेव्हा जमले नाही. मग बाप्पाला नैवेद्य म्हणून हे लाडू केले. ह्या लाडवांचा आकारही विशिष्ट असतो - पेढ्यांसारखा दोन्ही बाजूंनी चपटा. मला काही तो आकार जमला नाही. पण चव मात्र जमली.

साहित्य:
डाळं ४ वाट्या
सुकं खोबरे - १ वाटी किसलेले
जाड पोहे १/२ वाटी
तीळ - १/२ वाटी
डिंक - ३ मोठे चमचेगूळ - ३ वाट्या चिरून
वेलदोडे - ८ ते १० पूड करून
बेदाणे
काजू-बदाम पूड - १/२ वाटी (ऐच्छिक)
तूप - ४ वाट्या

मी केलेले लाडू

कृती:

१. डाळं गरम करून घ्यावी, जेणेकरून मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतील.
२. डाळ्यांचे पीठ करून ठेवावे.
३. तूपात डिंक तळून घ्यावा. डिंक छान फुलून आला पाहिजे.
४. तळलेला डिंक गार होण्यासाठी बाजूला ठेवावा.
५. त्याच तूपात जाड पोहे तळून घ्यावेत.
६. किसलेले खोबरे गुलाबीसर भाजून घ्यावे.
७. तीळ पण भाजून घेणे.
८. तळलेले पोहे, डिंक व भाजलेले तीळ मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यावे.
१०. वरील साहित्य, काजू-बदाम पूड, वेलदोड्याची पूड, बेदाणे हे सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्यावे.
११. जाड बुडाच्या कढईत चिरलेला गूळ व तूप गरम करायला ठेवावे.
१२. गूळ जेमतेम विरघळला की गॅस बंद करावा.
१३. क्रमांक १० मध्ये एकत्र केलेले मिश्रण आणि तुपात विरघळलेला गूळ नीट एकत्र करून घ्यावे.
१४. सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर लाडू वळायला घ्यावे.
१५. हे लाडू आकाराने जरा लहान असतात. तसेच त्यांना खालून व वरून दाबून चपटे करायचे असतात.

टीप:
१. मी ह्याचं निम्मे प्रमाण घेऊन अंदाजे ३२ लाडू केले.
२. २ फोटो इथे डकवत आहे. गोलाकार असलेले लाडू मी केले आहेत. तर चपटे लाडू बहिणीने केले आहेत.

बहिणीने केलेले लाडू

प्रतिक्रिया

मनस्विता's picture

14 Sep 2021 - 6:06 pm | मनस्विता

इथे फोटो डकवण्याचा प्रयत्न फसला आहे. काय चुकले आणि काय करायला हवे कळेल का?

मी मदतीचे पान वाचले आहे. पण काही तरी चुकत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2021 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो लिंकची गडबड दिसते आणि गूगल ड्राइव्ह वरुन फोटो शेयर होतात का हे माहिती नाही. छायाचित्रास आवश्यक असलेला कोड गंडला आहे.

फ्लिकरवर फोटो अपलोड करावा तेथून तो कोड आणावा किंवा तात्पुरते फोटो दिसावे म्हणून मोबाइलवर Quickimgur हे एप्लीकेशन डाऊन लोड करा आणि तिथे फोटो अपलोड करून लिंककोड टाकावे असे सुचवतो. (मिपावर त्याची माहिती)

-दिलीप बिरुटे

मनस्विता's picture

15 Sep 2021 - 5:15 pm | मनस्विता

तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिसादाने मला चूक लक्षात आली. गूगल ड्राईव्ह वरून पण फोटो अपलोड होतील हे माझं गृहीतक चुकीचं होतं.

पुढच्या वेळी लक्षात ठेवून काम करेन.

धन्यवाद!

मनस्विता's picture

19 Sep 2021 - 11:17 pm | मनस्विता

नवीन पाककृतीमधे फोटो डकवू शकले.

hrkorde's picture

14 Sep 2021 - 7:44 pm | hrkorde

छान

कंजूस's picture

14 Sep 2021 - 8:15 pm | कंजूस

छान झालेत. फोटो दिसतो आहे.
------------------
डाळ्याऐवजी मूगडाळ घातलेले इथे
https://youtu.be/BzjOcSQThRA
कानडी विडिओ, इंग्रजी सबटाइटल्स. Bhat'N Bhat channel. पुत्तुर ,बेद्रादि.

मनस्विता's picture

15 Sep 2021 - 5:22 pm | मनस्विता

व्हिडिओ नक्की बघेन.

साधी पण पौष्टिक लाडू रेसिपी.
छान !

मदनबाण's picture

14 Sep 2021 - 8:58 pm | मदनबाण

मस्त !

[ लाडू प्रेमी ] :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - India displays military might at ZAPAD-21; China & Pakistan watch

सुक्या's picture

14 Sep 2021 - 9:51 pm | सुक्या

मस्त !!!

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Sep 2021 - 8:41 am | रावसाहेब चिंगभूतकर

डाळं म्हणजे काय? खाल्लेलं आहे, पण ते कशाचं असतं आणि दुकानदाराला काय द्या म्हणून विचारायचं?

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2021 - 1:02 pm | चौथा कोनाडा

डाळं हरबर्‍याचंच असतं, फुटाण्याचा पुढचा प्रकार.
tryfg54

दुकानदाराकडे "पंढरपुरी डाळं" मागायचं.
JHYDRt23

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Sep 2021 - 2:24 pm | रावसाहेब चिंगभूतकर

धन्यवाद.

मनस्विता's picture

15 Sep 2021 - 5:17 pm | मनस्विता

डाळं म्हणजे पंढरपुरी डाळं किंवा फुटण्याची डाळ

धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2021 - 12:59 pm | चौथा कोनाडा

झकास आहे पाकॄ आणि लाडू देखील.
माझ्या वहिनी कर्नाटकातल्या आहेत त्यामुळे तंबिटाचे लाडू खायचे बर्‍याच वेळा योग आलेले आहेत.

सुरुवातीला तंबिट्टू असा उच्चार करायला मजा वाटत असे !
तंबिट्टू .... तंबिट्टू...... तंबिट्टू :-)

मनस्विता's picture

15 Sep 2021 - 5:19 pm | मनस्विता

तंबिट्टू म्हणायला मजेशीर वाटतं.

मनस्विता's picture

15 Sep 2021 - 5:13 pm | मनस्विता

मिपा admin /संपादकांचे,

आभार. त्यांनी फोटो अपलोड केल्याने ह्या पाककृतीला पूर्णत्व आले.

पुढच्या वेळी फोटो अपलोड करताना नक्की काळजी घेईन.

धन्यवाद.

मनस्विता's picture

15 Sep 2021 - 5:25 pm | मनस्विता

hrkorde, सस्नेह, मदनबाण, सुक्या, चौथा कोनाडा,

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

अनिंद्य's picture

16 Sep 2021 - 1:17 pm | अनिंद्य

तंबिट म्हणजे हे लाडू असतात होय ! मी हे खाल्ले आहेत (मायनस द पोहे, खोबरे) पण यालाच 'तंबीटाचे लाडू' म्हणतात हे मला माहित नव्हते ! घरी भाद्रपदात हमखास करतात.

हैद्राबादेतला स्थायिक आमच्या एक आजी बेसनलाडू तसे 'चपटे' / डमरूच्या आकाराचे करत,अगदी एकसारखे... एक मिलिमीटरचा पण फरक नाही.. त्याचे खूप अप्रूप आणि कौतुक होते :-)

तुमच्या सोप्या क्रमवार पाककृतीमुळे हे सगळे आठवले, आभार.

तुषार काळभोर's picture

17 Sep 2021 - 8:53 pm | तुषार काळभोर

एका बॉर्डरनजीकच्या गावातील सहकाऱ्याने आणले होते, एकदम मस्त खुसखुशीत असतात. त्याला सांगता नव्हतं आलं की कसे बनवतात.
पाककृतीसाठी खूप धन्यवाद.
डाळं म्हणजे फुटाण्याची डाळ अशी शंका आली होती, वरील प्रतिसादातून ते स्पष्ट झाले.

जुइ's picture

18 Sep 2021 - 12:21 am | जुइ

खमंग लागतील हे लाडू! नावही आवडले तंबिटाचे लाडू. सिमेलगत भागाच्या अजुनही पाकृ येऊद्यात.

मनस्विता's picture

19 Sep 2021 - 11:15 pm | मनस्विता

अनिंद्य, तुषार काळभोर, जुइ

आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल आपली आभारी आहे.