तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

सुहास झेले's picture
सुहास झेले in काथ्याकूट
23 Nov 2012 - 4:30 pm
गाभा: 

१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.

असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.

अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत

अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)

सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!)

आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.

१. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.

२. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.

३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.

४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.

५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.

६. मराठीत टाईप करण्यासाठी -

अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन

ब) PaniniKeypad Marathi IME

क) AnySoftKeyBoard - Devanagari

ड) Lipikaar Hindi Keyboard Free

मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.

७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.

८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.

९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.

१०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.

११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.

१२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.

१३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)

१४. TED - Ideas worth spreading :) :)

बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.

- सुझे !!

प्रतिक्रिया

नया है वह's picture

17 May 2016 - 11:28 am | नया है वह

Walnut | Get Bank Balances. Track Expenses. Get Bank Balances.

छान अ‍ॅप!

arun jaykar's picture

19 Jun 2016 - 10:00 pm | arun jaykar

I am having moto x play with marshmallow version. My phone gives sound notification for sms, WhatsApp message , etc. Phone is OK in all the manner.
Mobile is also giving notification for open wifi in text. But there is "NO SOUND with OPEN WiFi NOTIFICATION" . And I want sound with wifi notification. By which app or system or settings, I can get it ?
Will you please guide me? On e-mail address - arunjaykar@gmail.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2016 - 7:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवीन वायफाय कुठे सापडलं तर (डिफॉल्ट तुम्ही जर वापरात असाल त्याचा आवाज येणार नै) आवाज येतो. नसेल तर येत तर तुम्हीसेटींग > साउंड अ‍ॅण्ड नोटीफिकेशन मधे जाऊन सर्व प्रकारचे साउंड्स ऑन केले आहेत काय ?
ते नसतील तर ते ऑन करा. नैच जमलं तर इथेच लिहा. मदत नक्की करतो. हाय काय अन नाय काय.

-दिलीप बिरुटे

बिरुटेसाहेब नमस्कार,
त्वरित प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व सेटिंग्स करुन पाहिलेले आहेत. परंतू काहीही फायदा झाला नाही. माझ्याकडे याआधी एक मायक्रोम्याक्स कँनव्हास A - 116 होता. त्यामधे ओपन वायफायच्या रेंजमधे आलो की फोन मधून आपोआप आवाज येत असे.परंतू त्यामधे लॉलीपॉप ऑपरेटींग सिस्टीम होती. परंतु या नव्यामोटो एक्स प्ले मधे मात्र मार्शमँलो आहे. मला वाटते प्रॉब्लम येथे च आहे.
कृपया मदत करावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2016 - 7:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Ok पाहुन सांगतो.

-दिलीप बिरुटे

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jun 2016 - 4:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

मोटो जी फर्स्ट जनरेशन करता सॉफ्टवेअर अपडेट आहेत का?? किटकॅट ला मार्शमेलो मध्ये अपग्रेड करण्यात फायदा तोटा काय असेल? सॉ अपडेट कुठे मिळतील ?? माझी सिस्टिम तरी सॉफ्टवेअर अपडेट म्हणते आहे पण व्हर्जन किटकॅटच दाखवते आहे

धन्यवाद.

आनंदी गोपाळ's picture

24 Jun 2016 - 8:05 am | आनंदी गोपाळ

ओव्हर द एयर अपग्रेड पेक्षा शोरूममधे न्या अन तिथून करून घ्या. डोक्याला ताण रहात नाही. ओटीएला अनेकदा बग्ज येतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jun 2016 - 9:15 am | कैलासवासी सोन्याबापु

Ok डॉक्टर साहेब! आपला अत्यंत आभारी आहे!

कंजूस's picture

25 Jun 2016 - 9:13 am | कंजूस

LeEcoच्या नवीन फोनात ( ३०ह) 3.5mm headphone jack काढून टाकलाय आणि "USB type C port "चार्जींग आणि हेडफोनसाठी दिलंय.नेहमीच्या हेडफोन वायरी चालणार नाहीत.अर्थात चार्जिंग करताना हेडफोन वापरता येणार नाहीत.

मला मोबाईल हॉट स्पॉट चे कनेक्शन मर्यादित ठेवायचे आहेत ..ते मी कसे करू शकतो? कारण हॉट स्पॉट चालू केले कि माझे बाकीचे फोन आणि टबलेट कनेक्ट होतात . माझे बाकीचे फोन कनेक्ट नको व्हावेत असं करता येईल का ? किन्वा कनेक्ट झालेले फोन मला डीसकनेक्ट करता येतील का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2016 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मर्यादेत ठेवता येते. सेटिंग मध्ये गेले की थेटरिंग, त्यात कन्फेगर मोबाईल हॉटस्पॉट असा पर्याय येतो त्यात सेक्युरिटी असा पर्याय आहे त्यात आपण 'नन' असं केलं आहे त्यामुळे आपल्या सौजन्याने सर्वांना मोफत वाय फाय मिळत आहे तिथे wpa2esk हा पर्याय निवडा आणि त्या खाली पासवर्ड टाका. म्हणजे मर्यादेत त्याचा वापर होईल.

नाही जमलं तर् पुन्हा विचारा. उगाच हो ला हो करू नका मी पूर्ण मदत करेन.

-दिलीप बिरुटे

मी wpa2esk हाच पर्याय निवडला आहे पण ते बाय डीफोल्ट सगळ्यांना अक्सेस देते . मला अक्सेस काही लीमिटेड devices नाच द्यायचा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2016 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पासवर्ड ऑप्शन दिसत नाही का ? आज घरी गेलो की फोटो टाकतो किंवा तुम्ही टाका, म्हणजे गडबड कुठे होत आहे हे लक्षात येईल.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2016 - 2:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Samsung j ७ साठी कोणी कस्टम रोम टाकला आहे का ? कसाय अनुभव. कस्टम रोम टाकून मला डिव्हाइसच्या मेमरीवरील एप्लिकेशन एस डी कार्डवर टाकायची आहेत.

शामशुंगचा हा मला मोठाच प्रॉब्लम वाटतो.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2016 - 8:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि ज्यांना स्टॉक रोम टाकता येते अशांनी शामशुंग जे ७ (२०१५) साठीचे हे कश्टम रोम टाकून पाहावेत.
मल्टी विंडोज, मिनीमाईज, आणि भरपूर फिचर्सचा आनंद घ्या. ( आपला फोन मेल्यास मी जवाबदार राहणार नाही)

-दिलीप बिरुटे

मराठी कथालेखक's picture

17 Nov 2016 - 5:31 pm | मराठी कथालेखक

Android Kitkar (Micromax) वर stock ROM flush करण्याची आहे. याची procedure मिळू शकेल काय ? काय काळजी घ्यावी लागेल ?

कंजूस's picture

19 Nov 2016 - 5:53 am | कंजूस

डॅाक्टरांनी android फोनावर बरीच तपश्चर्या केलेली दिसतेय."नोट्स" चे असे अॅप आहे का androidवर ज्यामध्ये offline बरीच मोठी नोट (५-१०हजार शब्द अथवा अधिक)हळूहळू वेळ मिळेल तशी लिहून सेव करता येईल. नंतर "copy all"बटण वापरून झटक्यात कॅापी झाले पाहिजे लेखन. (माझ्या विंडोजवरचे "Nimbus Note Web " एवढे पावरफुल आहे पण "copy all" ची सोय नसल्याने स्क्रोल-सिलेक्ट-कॅापी असे करावे लागते.लेख लिहिण्यास उपयुक्त सोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2016 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Samsung जे ७ ला 'स्यामसंग नोट्स' म्हणून एप्लिकेशन आहे, थोड़े थोड़े लेखन करून साठवता येते. सलेक्ट ऑल सेकंदात होते. लेखन चोप्य पस्ते करता येते.

-दिलीप बिरुटे

विशाल कुलकर्णी's picture

3 Dec 2016 - 8:33 am | विशाल कुलकर्णी

नोट्स साठी अँड्रॉइडवर गुगलचे Keep म्हणून एक ऍप आहे, जे या कामासाठी वापरता येते. त्यावर तुम्ही जे काही टाईप कराल ते आपोआप स्टोअर होते, सेव्ह करत बसायची गरज नाही.

//जे काही टाईप कराल ते आपोआप स्टोअर होते, सेव्ह करत बसायची गरज नाही.//

असे बय्राच अॅपमध्ये होते.

१)लिखाणावर मर्यादा - नोट हे नाव सार्थकी लावतात. दोन चारशे शब्दांवर हँग होतात.
२)५-६ हजार शब्दांवर सेव होऊन नंतर "कॅापी ओल" बटण असणारे अॅप एकच डॅाक्टरांनी दिलय पण माझ्याकडे अॅन्डाराइड/शामसंग नाही ही अडचण आहे॥

धन्यवाद । ते फक्त स्यामसंगलाच असावे.तरी उपयुक्तच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2016 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्ले स्टोअरवर 'नोट्स' नावाचे एप्लिकेशन दिसतात, त्यातलं ट्राय करा. माझ्याजवळ असता तुम्ही तर 'शेअर इट' ने सेंड केलं असतं. मेल करतो, नाय तर....!

-दिलीप बिरुटे

आपली ओएस वेगळी आहे पण असे काही कॅापी ओल वाले नोट्सअॅप आहे हे वाचून बरं वाटलं. विंडोजवरची सर्व तपासून झाली आहेत.

निनाद's picture

29 Nov 2016 - 7:11 am | निनाद

येथे काही भारतीय सरकारी अ‍ॅप्स आहेत ते ही उपयुक्त असावेत.
जसे
अ‍ॅग्री मार्केट
किसान सुवीधा
इ प्रमाण
खोया पाया
ट्रॅक युवर पोस्ट
रोड सेन्स
स्कॉलर्शिप्स

https://apps.mgov.gov.in/index.jsp

मी वापरून पाहिले नाहीत. पन नुभव वाचायला आवडतील.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Dec 2016 - 12:05 pm | प्रकाश घाटपांडे

माझ्याकडे सॅमसंग duos GT-S7562 android version is 4.0.4 ice cream sandwich आहे त्यावर युपीआय अ‍ॅप चालत नाही. अ‍ॅन्डॉईड व्हर्जन पुढचे हवे असल्यास काय करावे? मोबाईल दुकानदार म्हणतो त्याची अपडेट क्शमता संपली आहे. नवीन व्हर्जन लोड होणार नाही. आम्ही रुट करीत नाही. त्यात मोठी रिस्क असते.
काय करावे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Dec 2016 - 4:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकच पर्याय मोबाइल विकुन टाका. दुसरं असं की रुट केल्यावर व्हर्जन अपडेट होत नाही. फार तर ओएस (ऑपरेटिंग सिस्टीम) बदलता येते.

-दिलीप बीरूटे

अमोल मेंढे's picture

3 Dec 2016 - 9:10 pm | अमोल मेंढे

रूट केल्यावर अपडेट करायचा असल्यास अपडेट झिप फाइल डाउनलोड करा व मॅन्युअल अपडेट करा

मराठी कथालेखक's picture

1 Dec 2016 - 4:54 pm | मराठी कथालेखक

मोबाईल बराच जूना आहे असं दिसतंय. त्याची बाकी क्षमता (रॅम, रॉम , प्रोसेसर ई) सुद्धा आजच्या काळातील अ‍ॅप्स चालवण्यासाठी कमीच पडेल.
अशा परिस्थितीत मोबाईल बदलणेच योग्य.
रुट करुन दूसर्‍या ओ एस टाकता येतात का बघा. पण रिस्क आहे.. मोबाईल गेला तर गेला..शेवटचा प्रयत्न तर करु असा विचार करुन प्रयत्न करा.

कंजूस's picture

3 Dec 2016 - 5:50 am | कंजूस

या निमित्तानु युपिआइ न चालण्याची कारणे काय असतात? रॅम कमी पडते?

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Dec 2016 - 4:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

मोटो जी (प्रथम पिढी) लॉलीपॉप अपडेट केलाय, नोटिफिकेश टोन कस्टम टाकायची आहे, कसे साधावे. पार एफएक्स फाइल एक्स्प्लोरर मधून शोधले पण नोटिफिकेशन फोल्डरर सापडले नाही. आता कसं करावं??

रातराणी's picture

5 Dec 2016 - 4:53 pm | रातराणी

Com. android. phone process has stopped ही एरर कशी घालवायची? Online सापडलेले बरेच उपाय करून पाहिले पण नो लक :( factory reset करायचा नाहीये कारण खूप फोटो बेक अप नाही केलेले. बेक अप घ्यायचा प्रयत्न केला तर device not recognized असा मेसेज येतो आहे. काय करू? Factory reset नंतर उडालेला डेटा रिकव्हर करता येईल का?

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 7:05 pm | मराठी कथालेखक

कोणता फोन आहे हो ?
माझ्या फोनला (micromax) अशी error (किंवा अशा प्रकारच्या errors) येत होती. त्या errors घालवण्याचा खूप खटाटोप केला. factory reset पण होत नव्हते, factory reset केल्यावर फोन फक्त reboot व्हायचा. शेवटी boot व्हायचाही बंद झाला. service center ला दिला software टाकण्यासाठी. पण ते ही झाले नाही. service center ने चार दिवस ठेवून फोन परत केला.
अखेर फोनचे अकाली निधन झाले हे मान्य करुन , दुखवटा उरकून नवीन फोन घेतला.
अर्थात तुम्ही धीर सोडू नका :)
factory reset होत असेल तर करुन टाका. फोन वाचेल बहूधा. factory reset नंतर डेटा रिकवर करण्यासाठी काही मार्ग शोधता येतील (जसे format केलेल्या hard disk वरुन recover करता येतो). पण रिकवर नाही होणार असे धरुन चला हवं तर आणि फोन वाचवण्याचा प्रयत्न करा असंच मी सुचवेन.

तुमचा फोन वाचावा याकरिता शुभेच्छा.. !!

रातराणी's picture

6 Dec 2016 - 11:42 am | रातराणी

गॅलक्सि स6 आहे :(
डेटा डिलिट झाला तर होणारे नुकसानाची कल्पना पण करू शकत नाही :(

मराठी कथालेखक's picture

6 Dec 2016 - 12:18 pm | मराठी कथालेखक

कठीण आहे. सर्विस सेंटर वाले काय म्हणत आहेत ?

कंजूस's picture

6 Dec 2016 - 12:20 pm | कंजूस

एक सुचवतो-
डेटा मेमरी कार्डवर असला तर फोन स्विचओफ करून मेमरी कार्ड काढा॥

ते कार्ड एका जुन्या सॅमसंग फोनमध्येच टाका. ( दुसय्रा ब्रांडच्या फोनमध्ये बहुधा "? format memory card?" मेसेज झळकेल)जर हा फॅार्मॅट कार्ड?? हा मेसेज आला नाही तर मेमरी कार्डातल्या फाइल्स ब्लुटुथने दुसरीकडे पाठवून काढू शकाल.त्या पाठवल्यावर डिलीट करा.
हे झाल्यावर एकेक अॅप्स डिलिट करा.
आता परत मेमरी कार्ड मूळ फोनमध्ये टाका. काम होईल.

मराठी कथालेखक's picture

6 Dec 2016 - 12:22 pm | मराठी कथालेखक

त्या़ंचा डेटा मेमरी कार्डवर नसेल हो... नाहीतर त्यांनी उगाच टेन्शन घेतलं नसतं !!

फॅक्टरी रीसेट करून फोन सुरु केला. मेमरी कार्ड घातलं नव्हतं, काँटॅक्टस सुद्धा फोनच्या मेमरीमधेच सेव केले होते , जीमेल बरोबर सिंक ऑपशन बंद करून ठेवल्या मुळे आता नव्या कोऱ्या फोन सारखा फोन आहे . त्याला नवा कोरा म्हणावं का डबा हा प्रश्न पडलाय :( :)

कोणतेतरी अॅप लुडबुड करत असावे ते निघून गेल्याने प्रश्न सुटला असणार.

फोन नवीन विकत घेतल्यावर सेटिंग्जमधले पहिले प्रिसेट ओप्शन नोंद करून एका जागी लिहून ठेवले तर फॅक्ट्री रिसेटऐवजी एकेक फिक्स करता येतात.कॅान्टॅक्ट बॅकपचे कोणतेच अॅप वापरत धाही. ते कधीकधी लुपमध्ये फिरत राहातात व फोन स्लो होतो. सर्व सिन्क ओपरेशन बंदच ठेवतो.

मराठी कथालेखक's picture

6 Dec 2016 - 3:08 pm | मराठी कथालेखक

कोणत्याही यंत्रावर फार विश्वास ठेवू नये. बॅकअप घेत रहाणं योग्य,
galaxy s6 म्हणजे ३ GB RAM , Octa Core processor. म्हणजे sync मुळे फोन स्लो होण्याचं कारण नाही.
Internal Storage : 32 GB असल्याने वेगळा मेमरी कार्ड न घेणं समजू शकतो. पण मग महत्वाचे फोटोज /फाईल्स कॉम्प्युटरवर नियमितपणे घ्याव्यात.
sms चे सुद्धा ऑटो बॅकअप घेणारे अ‍ॅप मिळतात.

मी एखाद्या महत्वाच्या भेटीकरता जात असेल तर ज्याला भेटायचे आहे त्या व्यक्तीचा फोन क्रमांक एका चिठ्ठीवर लिहून सोबत ठेवतो :)
बाकी "recover data from factory reset phone" हे टाकून गुगल करत रहा.. कदाचित डेटा पुन्हा मिळेलही.,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Dec 2016 - 4:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एस डी कार्ड मधे फोटो सेव्ह केलेले असतील तर मग काही अड़चन नाही. रिसेट मधे वाट्सपचे फोटो ब-याचदा डिलीट होतात तेव्हा त्यातले हवे असलेले सलेक्ट करून मेमरी कार्ड ( एस डी कार्ड मधे घ्या) आपली सर्व एप्लिकेशन एस डी कार्डवर इंस्टॉल होतात असे समजतो.

प्ले स्टोअर वरुन sms ब्याकप नावाचे एप्लिकेशन इंस्टॉल करून कॉन्टेक्ट्स, एसमेस, कॉल लॉग, मोबाइलवरची एप्लिकेशनचा ब्याकप घेता येतो.

आणि मग आवश्यक असेलच तर रिसेट करा.

-दिलीप बिरुटे

सर्विससेंटरवाले फक्त फ्लॅश करून देतात ,त्यांना कोणत्या ओप्शनमुळे काय घडतं/नाही घडत हे अजिबात कळत नाही.

आनंदी गोपाळ's picture

5 Dec 2016 - 9:32 pm | आनंदी गोपाळ

च्याय्ला!
ह एमाययूआय नामक प्रकार भलताच इरिटेटिंग आहे. बिरुटे गुर्जी, रेडमी नोट ३ रूट्ला का तुम्ही? ऑफिशिअल रूट करायला चायनावरून पर्मिशन आणाया लागतेय म्हणे? बूटलोडर अनलॉकलाच जास्तीची प्रोटेक्शन्स आहेत म्हणे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Dec 2016 - 4:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण तुमचा फोन असा रुट होऊ शकतो.

https://devs-lab.com/root-xiaomi-redmi-note-3.html

मी सध्या शामशुंग जे ७ ला कस्टम रोम टाकू टाकू फोनचा पार चौथा केलाय सध्या. तरी मला समाधान नैच. :(

-दिलीप बिरुटे

vcdatrange's picture

5 Dec 2016 - 9:36 pm | vcdatrange

मार्शमेलो अपडेट केल्यानंतर मोटो G4 Plus सारखा hang होतोय. कधी call केल्यावर screen black होते....
मधेच स्पिकर चा hissss sound येतो. Call center सल्यानुसार format करुनही तोच issue आहे. Service centre फक्त पुण्यात आहेत.....

काय करु?

मार्शमेलो अपडेट केल्यानंतर मोटो G4 Plus---

हा फोन मार्शमेलो ओएस वर्शनवरच आहे ना?

vcdatrange's picture

10 Dec 2016 - 5:37 pm | vcdatrange

मला मिळाल्यानंतर update केला

मदनबाण's picture

9 Dec 2016 - 11:11 am | मदनबाण

आजचे अ‍ॅप...
Sleep Orbit: Relaxing 3D Sound<

हे अ‍ॅप सध्या ट्राय मारत आहे, यात तुम्ही तुमचा आवडता साउंड ट्रॅक तयार करु शकता, कस्टमाईझ करण्यासाठी वेगवेगळे साउंड प्रिसेट यात दिलेले आहेत. ज्यांचे विवध काँबिनेशन्स तयार करुन तुम्ही तुम्हाला हवा तसा साउंड ट्रॅक जनरेट करु शकता. ३डी ऑडियो हे याचे वैशिष्ठ ठरले असुन तुम्ही निवडलेला साउंड ट्रॅकचा आवाज हवा तसा कानाच्या जवळ किंवा लांब नेउ शकता. :)
P1
वरील फोटोत जी वर्तुळे दिसत आहेत, ती त्या साउंड ट्रॅकची आहेत, बोटाने ही वर्तुळे छोटी मोठी करता येतात ज्यामुळे त्या साउंडचा तुम्हाला हवा असलेला परिणाम साध्य करता येतो. :)
एकदा ट्राय मारुन पहाच...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DJ Snake (ft. Justin Bieber) - Let Me Love You | Tum Hi Ho (Vidya Vox Mashup Cover)

झोप येण्यासाठी अॅप आहे वाटतं!

तसं तर आहेच, पण त्याबरोबरच Binaural Beats, relaxation आणि थोडासा { अगदी थोडासाच } ASMR चा अनुभव घेण्यासाठी हे अ‍ॅप ट्राय मारु शकता. व्हर्चुअल बार्बर काही काळापूर्वी ज्यांनी ऐकलं असेल त्यांना हा अनुभव नक्कीच आवडेल. :)

अवांतर :- ये ASMR क्या हय ? :- Autonomous sensory meridian response
माझे आवडते २ ASMR व्हिडियो इथे देउन जातो... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiiara - Gold (Official Video)

मदनबाण's picture

2 Jul 2017 - 6:13 pm | मदनबाण

आजचे अ‍ॅप्स :-

१] System Repair for Android 2017
तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईड मध्ये काही दोष निर्माण झाला असेल तर तो घालवण्यासाठी उपयोगी अ‍ॅप.

२] Touchscreen Repair
तुमच्या टच स्क्रीनला रिकॅलिब्रेट करण्यासाठीचे उपयोगी अ‍ॅप.

३] Gaana
गाणी ऐकण्यासाठी सुंदर अ‍ॅप.

४] Tanpura Droid
तानपुर्‍याचे स्वर ऐकण्यासाठी,अगदी मेडिटेशन करण्यासाठी सुद्धा याचा वापर करु शकता. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasa

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jun 2020 - 1:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेल तर लिंका टाकाव्यात ही नम्र विनंती.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

2 Jun 2020 - 2:11 pm | कंजूस

सध्या एवढी देतो.
1) Jionews ( https://play.google.com/store/apps/details?id=com.jio.media.jioxpressnews )

यात भरपूर मासिके आहेत . जिओ'चे सिम नसले तरी एकदा ओटिपी कुणा जिओवाल्याकडून घेऊन चालू केल्यास वाइफाइ किंवा वोडाफोन/एरटेल डेटावर सुरू राहते.
---------------------------------
२) JioTv ( https://play.google.com/store/apps/details?id=com.jio.jioplay.tv )

वरीलप्रमाणेच एकदा स्टार्ट मारावा. बक्कळ टिवी चानेल्स आहेत.
---------------------------------
३) Best Camera ( https://play.google.com/store/apps/details?id=best.camera )

Timer लावून video सुरू /बंद करण्यासाठी.
---------------------------------
४) FotoPlay. ( https://play.google.com/store/apps/details?id=videoeditor.videomaker.sli... )

फोटो स्लाइड शो करणे + म्युझिक टाकणे + टेक्स्ट

---------------------------------

तुषार काळभोर's picture

2 Jun 2020 - 3:30 pm | तुषार काळभोर

https://play.google.com/store/apps/details?id=com.headfone.www.headfone

यात काही कार्यक्रम आहेत रेडिओ वरचे, जातील मला हवा महल, डर हे आवडतात. या दोन्ही मधील कथा / नाटिका चांगल्या आहेत.
संगीत पर्यायात काही चांगले स्टेशन आहेत. (लाइव्ह आहेत की कसे ते माहिती नाही. पण चांगले आहेत. उदा mirchi-९०, पुरानी जीन्स)

मदनबाण's picture

2 Jun 2020 - 6:20 pm | मदनबाण

वरती Tanpura Droid दिले होते, ते बदलुन त्याच्या जागेवर आता खालील अ‍ॅप वापरत आहे :-

१]Dhwani Tanpura :- तानपुर्‍याचे स्वर ऐकण्यासाठी,मेडिटेशनसाठी.

खालील दोन अ‍ॅप्स ही फाईल एक्स्प्लोरर आहेत.
२] Amaze File Manager :- सोपे आणि सुटसुटीत.
३] FX File Explorer :- चायनीच अ‍ॅप्सच्या वापरा बद्धल काही वर्षांपुर्वी भारतीय लष्कराकडुन सुचना आल्याचे स्मरते. त्यावेळीच सगळे चायनीज अ‍ॅप्स अनइस्टॉल केले आणि वरील अ‍ॅप चीनी फाईल अ‍ॅप्सला पर्याय म्हणुन वापरण्यास सुरुवात केली. [ ही दोन्ही अ‍ॅप्स चायनीज आहेत का ? ते पुन्हा तपासायला हवे. ]

४] BatteryGuru :- मी अत्ता पर्यंत वापरलेले बेस्ट बॅटरी सेव्हींग अ‍ॅप.

५] V3 Mobile Security :- अँटीव्हायरस + अ‍ॅप लॉक

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Malhar Magic : Hindustani Raga with Fusion Arrangement || IndianRaga Fellows

क्रमांक (५) अँटीव्हायरस + अ‍ॅप लॉक

● आपण apps ना क्याम्रा, स्टोरेज, माइक्रोफोन वापरण्याच्या परमिशन्स देतो त्यानंतर अँटीव्हायरस सॉफ्टवेर तिकडे ओथराइज्ड सॉफ्टवेर म्हणून बघते आणि काहीच उपयोग होत नाही अँटीव्हायरस ठेवण्याचा. शिवाय डेटा कुणाच्या सर्वरला जातो तेही कळत नाही. त्यासाठी साइबरवाले तपासणी करतात.
आता आपले सर्वांचे आवडते फेसबुक आणि वाटसपही ढिगाने माहिती गोळा करून विकते हे ओपन आहेच. अँटीव्हायरस बनवणाऱ्या कंपन्यांनीच जाहीर केले आहे की हे मोबाइलसाठी काही कामाचे नाही. शिवाय त्याही डेटा गोळा करू शकतात.

फोन कुणाला विकला किंवा वापरायला दिला तर अ‍ॅप लॉक अडचण ठरू शकते. ते app चालू राहायला हवे. अन्यथा apps उघडता येत नाहीत. त्याचा सिक्युरटी पिन नंबर बदलण्याची किल्ली इमेल अकाउंटला पाठवतात. तो इमेलही चालू असून वापरता आला पाहिजे. App upgrade करणेही खटाटोप असतो. थोडक्यात यात गोची आहे.

कंजूस's picture

4 Jun 2020 - 11:24 am | कंजूस

क्रमांक (४) बेस्ट बॅटरी सेव्हींग अ‍ॅप.

ब्याटरी पूर्ण चार्ज झाल्यावर करंट कटॉफ करण्याची व्यवस्था प्रत्येक डिवाइसमध्ये असते तरीही सोपा उपाय म्हणजे रात्री मोबाईलला चार्जर जोडून ठेवायचा पण चालू करायचे नाही. पहाटे उठण्याअगोदर चार्जिंग बटण ओन करायचे. जरा वेळाने जागे झाल्यावर कामाला निघेपर्यंत चार्जिंग झालेले असते आणि आपण फोन काढतोच. ओवरचार्जिंग होत नाही.

पहाटे उठण्याअगोदर चार्जिंग बटण ओन करायचे
Kase?

कंजूस's picture

4 Jun 2020 - 2:06 pm | कंजूस

हाहाहा

मदनबाण, apps चाईनीज आहेत का कसं कळणार? त्यांचा डिवेलपरचा पत्ता कार्लटन आणि हरयाना दिला आहे.
मला अजून ब्याटरी app आणि अँटीव्हायरस + ची गरज भासली नाही.

मी File Manager ( https://play.google.com/store/apps/details?id=com.alphainventor.filemanager ) हे वापरतो तीन वर्षे. ओटीजीसुद्धा म्यानेज करतो यातून. पावरबाज ओलराउंडर आहे.

---------------
वाईफाई फाईल ट्रानस्फरसाठी Dukto वापरत होतो. ते स्टोरमधून उडाले आहे.

गूगलचे Files app फाइल ट्रान्सफरशिवाय नको त्या जादा गोष्टी करते, काढलेले विडिओ चुकून यातून डिलिट होतात आणि सतत नोटिफिकेशन्स पाठवून हैराण करते.

त्यापेक्षा वाईफाई फाईल ट्रान्स्फरसाठी 'आपले'
JioSwitch ( https://play.google.com/store/apps/details?id=com.reliance.jio.jioswitch ) उत्तम आहे. Jio sim cardच पाहिजे असे नाही.

----------------------

लेख वाचण्यासाठी/ ऐकण्यासाठी app
T2S
( https://play.google.com/store/apps/details?id=hesoft.T2S )

मिपातला सध्याचा मोठा लेख शाम भागवतांचा स्तोत्राचा. तो कॉपी करून app च्या चौकटीत चिकटवला. ( १०३०० + शब्द आहेत. )
तो ऐकता येतो.
नेविगेशनमध्ये export as mp3 file आहे. त्यासाठी त्यांनी एक extension app डाउनलोड करायला सांगितले. तेही केले. मग लेखाची १०० एमबीची एमपी3 फाईल सेव झाली. मोठी असली तरी तांत्रीकदृष्ट्या यशस्वी. Android ची कमाल. मराठी आणि इंग्रजी एकाच वेळी वाचलं (ऐकवलं ) जातं.

शाम भागवत's picture

2 Jun 2020 - 9:48 pm | शाम भागवत

कंकाका,
तुम्ही काय काय शोधून काढाल काही सांगता येत नाही.
दंडवत घ्या.
_/\_

मराठी वाचून ऐकवणारी apps दोन वर्षांपूर्वी एकेक पान वाचायची. मग दुसरे पान कॉपी पेस्ट करावे लागायचे. पण आता दणक्यात एवढा मोठा लेख एमपी३ मध्ये!!

निनाद's picture

5 Jun 2020 - 4:44 am | निनाद

https://play.google.com/store/apps/details?id=org.hear2read.Marathi हा पर्याय अ-व्यावसायिक स्वरूपाचा आहे.

मदनबाण's picture

3 Jun 2020 - 10:50 am | मदनबाण

मदनबाण, apps चाईनीज आहेत का कसं कळणार? त्यांचा डिवेलपरचा पत्ता कार्लटन आणि हरयाना दिला आहे.
ओक्के.
मला अजून ब्याटरी app आणि अँटीव्हायरस + ची गरज भासली नाही.
बॅटरी अ‍ॅप खरेच सुंदर आहे, तुम्हाला हव्या असलेल्या टक्केवारी पर्यंत बॅटरी चार्ज झाल्यावर नोटिफिकेशन टोन वाजवण्याची सुविधा यात आहे, यामुळे फोनचे ओव्हर चार्जिंग वाचवता येउ शकते. अ‍ॅंटीव्हायर नेहमी सुरक्षा प्रदान करतो, त्यामुळे तो वापरावा या मताचा मी आहे.

File Manager मी इस्टॉल केले, फक्त याचे बँकग्रांउड डार्क करता येत नाहे, म्हणजे डार्क थिम नाही हीच काय ती उणीव मला जाणवली. बाकी कामास उपयोगी आहे.

वाईफाई फाईल ट्रानस्फरसाठी मी सध्या Send Anywhere वापरतोय.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मंत्रभूमीची बदलणारी ओळख

शाम भागवत's picture

3 Jun 2020 - 1:58 pm | शाम भागवत

फोनचं ओव्हरचार्जिंग म्हणजे?
१००% चार्जिंग झाल्यावर स्विच बंद केला नाहीतरी, चार्जिंग होतंच राहाते?

ओव्हरचार्जिंगमुळे बॅटरीतून पाणि येणे असे काही लक्षण आहे का?

फोनचं ओव्हरचार्जिंग म्हणजे?
फोन चालु ठेवला तरी चार्जिंग सुरु ठेवणे, बर्‍याचश्या स्मार्ट फोन आणि त्यांच्या बॅटरीजला असलेल्या सर्किट मध्ये १००% चार्ज झाले की अ‍ॅटोमॅटिक चार्जिंग बंद केले जाते, पण तसे करण्यापेक्षा फोन चार्ज झाल्यावर तो बंद करणे हे केव्हाही उत्तम !
How to Charge Your Phone Battery the Right Way
BU-409: Charging Lithium-ion
In fact, it is better not to fully charge because a high voltage stresses the battery.
ओव्हरचार्जिंगमुळे बॅटरीतून पाणि येणे असे काही लक्षण आहे का?
असे माझ्या पाहण्यात किंवा वाचनात अजुन तरी आलेले नाही.
साधरण ३०% खाली बॅटरी चार्ज जाउ देउ नये आणि ८०% वर चार्ज करु नये, असे केल्याने बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मंत्रभूमीची बदलणारी ओळख

फोन चालु ठेवला तरी चार्जिंग सुरु ठेवणे
हे फोन १००% चार्ज झाला तरी चार्जिंग सुरु ठेवणे असे वाचावे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मंत्रभूमीची बदलणारी ओळख

शाम भागवत's picture

4 Jun 2020 - 7:37 am | शाम भागवत

धन्यवाद.
_/\_

आणि महिन्यातून एकदा पुर्णपणे बॅटरी १/२ % पर्यंत नेउन मगच ९५%+ एवढी परत एकदा चार्ज करणे.
याने बॅटरीमध्ये हिस्टेरिसीस होत नाही. [ 'आत्ता तर ५०% दाखवत होता, काही मिनीटापूर्वी आता एकदम १०% कसा काय आला !' असे होत असेल तर ते बॅटरीच्या हिस्टेरिसिसमुळे होते ]

नवीन माहितीबद्दल धन्यवाद
असे पूर्वी व्हायचे बरेचदा

भारीच.

धन्यवाद !

प्रसाद_१९८२'s picture

4 Jun 2020 - 10:24 am | प्रसाद_१९८२

मोबाईल मधील चाईनज अ‍ॅप ओळखण्यासाठी व काढून टाकण्यासाठी भारतीय बनावटीचे "Remove China Apps" हे अ‍ॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर काहि दिवसापूर्वी उपलब्ध होते, मात्र गुगलने आता हे अ‍ॅप, प्ले स्टोअर वरुन काढून टाकले आहे.

--
Remove China Apps.apk

कंजूस's picture

4 Jun 2020 - 11:02 am | कंजूस

Apps चाईनाचे आहेत का नाहीत यापेक्षा ती वापरताना
१) फोन हँग होतो का,
२) कार्ड ,नेट बँकिंग डेटा चोरतात का?
हे अधिक महत्त्वाचे.

अनेक चीनी अ‍ॅप्स ही सुरक्षित नाहीत आणि डेटा देखील चोरतात ! आपल्या संरक्षण मंत्रालय आणि सरकारने वेळेवेळी या अ‍ॅप्स बद्धल सावधान केलेले आहे आणि अश्या अ‍ॅप्सची यादी देखील जाहीर केलेली आहे. चीनी अ‍ॅप्सला जर चांगला पर्याय असेल तर तो वापरावा या मताचा मी आहे. [ जसे आधी शेअर इट वापरायचो आता सेंड एनीव्हेअर वापरतो. ]तसेही इतर कोणतेही अ‍ॅप वापरताना वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे, तसेच अ‍ॅप्स परमिशन्स मध्ये जाउन कोणत्याही अ‍ॅप्सला जर अनावश्यक परमिशन्स असतील तर त्या काढुन टाकाव्यात.

संदर्भ :-
Defence Ministry to Indian armed forces: Uninstall these Chinese apps immediately
Government reportedly lists 42 Chinese apps as dangerous, including TrueCaller, UC Browser, Mi Store: Check if your phone has any of them

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Scientific Study on Chanting Gayatri Mantra - Benefits of Gayatri Mantra

मराठी कथालेखक's picture

2 Jun 2020 - 10:39 pm | मराठी कथालेखक

Countthings (https://play.google.com/store/apps/details?id=com.dyve.countthings) हे अ‍ॅप चांगले आहे

रागो's picture

3 Jun 2020 - 9:29 am | रागो

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2020 - 11:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चक्रीवादळ, पाऊस याच्यासाठी रेडरडार हे अ‍ॅप्लीकेशन चांगले वाटले. पावसाचा अंदाजासाठी AccuWeather, Weather forecast, हेही टाकून ठेवलेले आहे. त्यातल्या त्यात उत्तम जे असेल त्यातलं अनुभवांनी युक्त असेले सुचवा.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

3 Jun 2020 - 12:16 pm | तुषार काळभोर

आज https://www.windy.com/ ही एक साईट पाहिली. लाईव्ह नकाशा दिसतो वादळाचा अन वार्‍यांचा. पुढे काय कसं होणार ते पण दिसतं (अर्थात, कॅल्क्युलेटेड अंदाज)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2020 - 1:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

App पण आहे. चांगलं वाटलं. चक्रीवादळ पुढे कुठे सरकत आहे त्याची माहिती मिळत होती.

पण ज्या एप्लीकेशनला लोकेशन लागतं तेव्हा ब्याट्री ड्रेन व्हायला लागते हे नुकसान दिसले.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

5 Jun 2020 - 6:25 am | कंजूस

बिरुटे सर,

ज्या एप्लीकेशनला लोकेशन लागतं तेव्हा ब्याट्री ड्रेन व्हायला लागते हे नुकसान दिसले.

इथे एक उपाय असतो. Location ( GPS )
सेटिंग्ज >> location and security. >> Location >> इथे दोन/ तीन पर्याय असतात
१) high accuracy - AGPS - हा डिफॉल्ट असतो व ब्याटरी संपवतो, फास्ट लॉकींग असते.
२) low accuracy सटेलाईट , on device only.
ब्याटरी संपत नाही. डोंगरात भटकंतीसाठी उत्तम कारण तिथे रेंज नसते. दहा बारा तास रूट ट्रेसिंग अधिक फोटो काढता येतात.

पर्याय २ वापरा.
App वापरताना खात्री करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2020 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इमर्जन्सी लोकेशन सर्वीस. गुगल लोकेशन अ‍ॅक्युरसी आणि गुगल लोकेशन शेअरींग हे पर्याय आहेत.
यातलं कोणतं ट्राय करु. सध्या तरी मी बंद ठेवतो. बॅकप वाढलेला आहे अर्थात सॉट.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

6 Jun 2020 - 5:35 am | कंजूस

१) Location >>
२) mode / app permissions / scanning >>
३) mode >>>
४) High accuracy / battery saving / device only.

क्रमांक (२) मध्ये 'mode' पर्याय सिलेक्ट केल्यावर क्र (४) मधले तीन पर्याय उघडतात.

जर 'mode' नसेल तर फोनामध्ये फक्त AGPS आहे.
'AGPS + GPS' दिलेले नाही.

तुमच्या फोनचा मॉडेल नंबर पाहून gsmarena.com साईटवर specifications मध्ये AGPS + GPS दिलेले आहे का नाही ते बघता येईल.

कंजूस's picture

4 Jun 2020 - 2:11 pm | कंजूस

मला इथेच मिपावर
http://satellite.imd.gov.in/img/animation3d/3Dasiasec_ir1_3d.htm

ही साइट
Animation of INSAT Images
मिळाली होती. बुकमार्क करून अधूनमधून पाहात होतो. चांगली साइट होती. पण परवा उघडली तर लॉगिन मागत आहेत. आता आठवत नाही, आणि इमैललाही पासवर्ड सापडत नाही.

मदनबाण's picture

4 Jun 2020 - 2:41 pm | मदनबाण

https://mausam.imd.gov.in/imd_latest/contents/satellite.php
ही साईट पहा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Scientific Study on Chanting Gayatri Mantra - Benefits of Gayatri Mantra

Prajakta२१'s picture

4 Jun 2020 - 10:24 pm | Prajakta२१

storage space running out ऑफ space हा message सारखा येतो
cached डेटा ,app डेटा सारखा delete करते तरीपण हा msg सारखा येतो
ह्यावर काही करतया येईल का?
धन्यवाद

मदनबाण's picture

4 Jun 2020 - 11:38 pm | मदनबाण

१]तुम्ही तुमच्या मोबाइल कॅमेराने फोटो काढले असतील, व्हिडीयो बनवले असतील तर ते इंटर्नल मेमरी मध्येच स्टोअर होतात, तेव्हा जर मोबल्यात एसडी कार्ड असेल तर त्यात हे फोटो आणि व्हिडीयो मुव्ह केल्यास बरीच जागा मोकळी होइल.
२] तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल आणि चॅट हिस्ट्रीचा सोस नसेल तर व्हॉट्सअ‍ॅप च्या फोल्डर मध्ये डेटाबेस फोल्डर मध्ये असलेल्या फाईल्स डिलीट मारा, फक्त लेटेस्ट डेटची फाईल तशीच राहुध्या. याच प्रमाणे मिडिया फोल्डर मधील व्हिडियो, ऑडियो, इमेजेस,डॉक्युमेंट,व्हॉइस नोट्स्,स्टीकर्स, जीफ इ यांच्या हव्या असलेल्या गोष्टी कॉपी करुन नको असलेल्या सरळ डिलीट मारल्यास बरीच जागा रिकामी होइल.
३] वरील दोन्ही शक्य नसल्यास जास्त इंटर्ल स्टोअरेज चा नविन मोबल्या घ्या.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Scientific Study on Chanting Gayatri Mantra - Benefits of Gayatri Mantra

फोनच्या सेटिंगमध्ये >> about phone - इथे फोनचे मॉडेल आणि ओ एस ( android ४ /५ /६ /७ /८ /९ ) वगैरे दिलेले असते. किंवा दुसऱ्याला दाखवून हे मिळवा. ते द्या. त्यातून फोनची मेमरी, मॉडेल कळेल. वगैरे कळेल.

तुमचा फोन android / ५ असल्यास जरा खटपट आहे.

फोनमध्ये USB OTG support असल्यास वरती मदनबाण याने दिलेले काम करणे फारच सोपे होईल.

कोणी माहितगार आसपास असल्यास पटकन काम करून देईल.

काही फोनांत काढलेले फोटो , विडिओज प्रथम फोनमेमरीमध्ये जातात. नंतर ते आपल्याला मेमरी एसडी कार्डावर पाठवून जागा मोकळी करावी लागते. 'स्टोअर मिडिआ टु एसडी कार्ड हा पर्याय नसतो किंवा चालत नाही.

मराठी_माणूस's picture

5 Jun 2020 - 5:52 pm | मराठी_माणूस

एखाद्या अ‍ॅप्लिकेशनच्या सर्च फिल्ड मधे काहीतरी भरत असताना सजेशन येतात , ते कसे क्लीअर करावे ?

एखाद्या अ‍ॅप्लिकेशनच्या सर्च फिल्ड मधे काहीतरी भरत असताना सजेशन येतात , ते कसे क्लीअर करावे ?
Setting => Application=>तुम्हाला अपेक्षित असलेल अ‍ॅप्लिकेशन => storage and cache => Cleare Cache
Cleare Cache वर क्लीक केल्यावर तुम्हाला ज्या सजेशन येतात त्या निघुन जातील.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalte

@ मराठी_माणूस, उदाहरणार्थ?
----------
App घेण्याअगोदर खालचे रिव्यू पाहा. "Irritating ads " लिहिलं असेल तर डाउनलोड करायचं नाही. शेकड्याने apps असतात, प्रत्येक डाउनलोड करून तपासणे अवघड आहे. लिस्टीत वरती असणारीच बरी असं काही नसतं. किती डाउनलोड्स झालेत हे जुन्या apps ना जास्ती असतं. About app मध्ये "last update" कधी तेही पाहाणे.

आताचे app त्रासदायक असल्यास दुसरे शोधणे. Apps मध्ये जाहिराती असता पण खाली एखादी ओळ येते ती त्रासदायक नसते.

स्कोअर ४ किंवा अधिक असावा.

मराठी_माणूस's picture

7 Jun 2020 - 10:35 am | मराठी_माणूस

gutenberg ह्या पुस्तकाच्या साईट वर , "शोध" पर्यायात जुन्या शोधलेल्या पुस्तकांची/लेखकांची नावे येतात.

मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

फोन version ४.२.२ आहे (पुराणकाळातला)
GT -S ७५८२ -२०१४ सालातला अजून टिकवायची इच्छा आहे पण सध्या बदलावा लागेल ह्या प्रॉब्लेम मुळे
३ दा नवीन बॅटरी घालून चालवलाय (२०१७,२०१८,२०१९ मध्ये एकेक )
सध्याच्या नवीन फोन्स मध्ये बॅटरी चांगली असणारे कुठलेच नाहीयेत
सॅमसंगच घ्यायचाय
सध्या ऑफीस संवाद व्हाट्सएप्प वर बराच चालत असल्याने कदाचित स्टोरेज फुल्ल होत असावे

कंजूस's picture

6 Jun 2020 - 5:06 am | कंजूस

@ Prajakta२१,
Android ४ / ५ असणार वाटलंच होतं. यामध्ये गूगलने स्टोरेज प्राब्लेम करून ठेवलेला. लोक फोनला रूट करायच्या खटपटीत लागले.
सँमसंगचाच घेणार आहात तर लो बजेटमध्ये M series बरी आहे. सतत नवीन मॉडेल्स आणत आहेत. सध्या सर्व ठप्प आहे.
-----------
मागच्या मे महिन्यात मोटो इ५ प्लस ७८०० ला घेतला होता अमेझोनवर. ( नंतर दहा हजार केली किंमत.)
ब्याटरी ५००० एमेएच आणि स्टॉक android. ८.० compass सोडल्यास सर्व काही आहे.

मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2020 - 3:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि प्रोव्हर्जन फु़कट मिळत असतील तर लिंका डकवून ठेवाव्यात. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

18 Sep 2020 - 7:29 pm | मदनबाण

1.1.1.1: Faster & Safer Internet :- 1.1.1.1 w/ WARP makes your Internet more private and safer. No one should be able to snoop on what you do on the Internet. We’ve created 1.1.1.1 so that you can connect to the Internet securely anytime, anywhere.
याचे डेस्कटॉप क्लायंट अजुन यायचे आहे, ज्याची मी बरीच वाट पाहतोय. बाकी १.१.१.१ चे ब्राउजर कॉनफिगरेशन मी इथे देउन ठेवले आहे :-
https://www.misalpav.com/comment/1055522#comment-1055522
हॅपी एन्ड सेफ सर्फिग !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू

कंजूस's picture

19 Sep 2020 - 11:39 am | कंजूस

Faster?
DNS साइट्स म्हणजे काय माहीत नाही पण ( ब्राउजरमध्ये उघडणाऱ्या ,मिपा, पेपर साइट्स बहुतेक) यांचा लोडींग स्पीड कमीच असतो. नेट स्पीड फास्ट असला तर युट्युब डाउनलोड फास्ट होते परंतू या साइट्स मात्र उघडायला थोडा वेळ लागतोच. हे रेल्वे स्टेशनच्या वाइफाईवरही अनुभवले आहे. 30 एमबीपीस असला तरी. हे app रिव्युत लिहिलं आहे.

दुसरे म्हणजे safer? Private?
app रिव्युत लिहिलं आहे एकाने की आइपी अड्रेस हाइड होत नाही. मग काय प्राइवेट होतं?

आपल्याकडे दावा केलेल्या गोष्टी तपासणीची ग्याजेट्स नसतात. पण काही लोकांच्याकडे आहेत ते सांगतात.

थोडक्यात त्या app चा ट्राफिक वाढवणे हाच उद्देश असेल.

मदनबाण's picture

19 Sep 2020 - 1:19 pm | मदनबाण

app रिव्युत लिहिलं आहे एकाने की आइपी अड्रेस हाइड होत नाही. मग काय प्राइवेट होतं?
तुमची सर्च क्वेरी जी डीएनएसच्या माध्यमातुन होते. अ‍ॅपमुळे डीएनएस कनेक्शन एनक्रिप्ट होते.
अधिक माहितीसाठी :-
https://www.youtube.com/watch?v=TiWs9n4fhys
https://www.youtube.com/watch?v=mUEMCIVdvr8

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Video

कंजूस's picture

19 Sep 2020 - 7:19 pm | कंजूस

फास्टर म्हटले तर एवढीच अपेक्षा असते की विडिओ स्ट्रीमिंग बफरिंग न होता व्हावं, युट्युब विडिओ लगेच डाऊनलोड व्हावे. ते सध्याच्या एरटेल किंवा जिओच्या नेटवर सहज होतं.

सेफर म्हटलं तर या महिन्यात फायरफॉक्सने सिक्युरटी वाढवली आहे. पण सामान्य माणसाला यातलं काही कळणार नाही. मोठ्या लोकांच्या इमेलवर, कॉल्सवर फिशिंगवाले लक्ष ठेवतात. आपल्या अकाउंटसना कोणी उघडत नसेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2020 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

1.1.1.1: Faster & Safer Internet :- 1.1.1.1
फारसं उपयोगी आणि यूजर फ्रेंडली वाटलं नाही.

अजून काही App येऊ द्या....!

-दिलीप बिरुटे

सुमो's picture

22 Oct 2020 - 5:57 am | सुमो

मिपावर फोटो कसा चढवायचा हा सध्या कळीचा मुद्दा झालेला आहे. त्यासाठी हे ॲप.

https://play.google.com/store/apps/details?id=com.superyao.tuchuang

इमेजर (www.imgur.com) हे फोटो होस्टिंग साठीचं खूप जुनं आणि प्रसिद्ध संस्थळ आहे हे सर्वांना माहिती आहे. या संस्थळावर आपला फोटो चढवून तो मिपावर अगदी सहज प्रकाशित करणारं आजचं ॲप क्विकइमेजर.

३.२ mb इतकं छोटं असलेलं हे ॲप जास्तीच्या कोणत्याही परमिशन्स मागत नाही. www.imgur.com वर आपण खातं उघडणं गरजेचं आहे. म्हणजे आपले फोटो कायमकरता साठवले जातात.

खाते न उघडता सुद्धा या ॲपवरून फोटो imgur वर चढवू शकतो पण असा फोटो काही दिवसांनी काढून टाकल्या जातो आणि मग मिपावर दिसायचा बंद होतो.

ॲप इन्स्टॉल केल्यावर उजवीकडे वरच्या कोपर्‍यात तीन उभ्या रेषेतील बिंदूंवर स्पर्श करून copy format हा मेनू उघडा.

त्यात खालून तिसरा असलेला img src हा फॉरमॅट निवडा. म्हणजे तुम्ही अपलोड केलेल्या फोटोची मिपावर सरळ पेस्टवता येईल अशी लिंक कॉपी होईल.

Upload वर टिचकी मारली की तीन पर्याय उघडतील. योग्य तो पर्याय निवडून फोटो अपलोड करा.

अपलोड झालेल्या फोटोच्या थंबनेलच्या पुढे असलेल्या लिंकवर टिचकी मारली की लिंक कॉपी होईल.

मिपावर ही लिंक फक्त पेस्टवायची की बस्स. तुमचा फोटो मिपावर दिसायला लागेल.

पहा वापरून.

तुषार काळभोर's picture

22 Oct 2020 - 10:35 am | तुषार काळभोर

मोबाईल वरून इमेज पोस्ट करताना उपयोगी पडेल.
विशेषतः खफ वर. दोन दिवसांनी इमेज गायब झाली तरी चालेल.

कंजूस's picture

22 Oct 2020 - 5:04 pm | कंजूस

वापरून पाहतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2020 - 11:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त, उपयोगी अ‍ॅप दिसते. इन्स्टॉल केले. उपयोग करुन पाहतो.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2020 - 12:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कॉपी फॉर्मेट हा ऑप्शन मात्र मला येत नै ये.. त्यामुळे गडबड होत आहे.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

24 Oct 2020 - 1:24 pm | कंजूस

त्यावर क्लिक केल्यावर नवीन लिंक जेनरेट होते. मग कॉपी होते क्लिपबोर्डाला.

सुमो's picture

24 Oct 2020 - 1:40 pm | सुमो

इथे हळुवारपणे स्पर्श करा
.

.

म्हणजे हे गवाक्ष उघडेल.
.

.

इथेच तुम्हाला हवाहवासा पर्याय दिसेल !!!

.

.

मेन साइटवरच मिळतेय.
१) फोटो अपलोड केला,
२) public viewing - ok केलं, पोस्ट केला.
३) पब्लिश झालेल्या फोटोला क्लिक करून मोठा केला. याच फोटोवर 'open in new tab' पुन्हा केल्यावर त्यामधली address bar मधली लिंक कॉपी केली.
( याच लिंका आता नवीन लेखात - परवल की मिठाईवर वापरल्या. )

हे वापरल्यास गूगल फोटोज सोपं आहे.
शिवाय आणखी एक शुअर उपाय ब्लॉगचा आहेच. ( पण ओळख लपवायची असेल तर post images.
अर्थात गूगलला पर्याय नाहीच कारण इतर चांगल्या साइट्स कधीही paid होतात आणि फोटो दिसायचे बंद होतात.
उदाहरणार्थ tinypic.com ही साइट photo bucket ने विकत घातली. आणि तीही paid झाली.

कंजूस's picture

22 Oct 2020 - 6:37 pm | कंजूस

Imgur trial

जमलं.
-----------------

मदनबाण's picture

19 Feb 2022 - 1:58 pm | मदनबाण

बरेच दिवस माझी DNSCrypt वर डोकेफोड चालु होती, मग अचानक हे अगदी सोप्या पद्धतीने कसे वापरायचे ते समजले. यावर [ Encrypt DNS traffic ] / इतर जालावर वाचन करताना आणि इकडे-तिकडे माहिती शोधताना माझ्या वाचनात GitHub वरील एका पान आले होते जिथे मला या झकास अ‍ॅपचा संदर्भ दिसला.
personalDNSfilter
:- हे अ‍ॅप वापरण्यासाठी फोन रुट केलेला असणे गरजेचे नाही. यातील फिल्टर लिस्ट वापरुन जाहिरती आणि ट्रॅक्सर्स पासुन मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळते. तुम्हाला हवे ते डीएनस कॉनफिगरेशन DoH [ DNS over HTTPS ] किंवा DoT [ DNS over TLS ] देखील वापरता येते. जे मला सगळ्यात महत्वाचे आणि उपयुक्त वाटले. हे अ‍ॅप एकदम स्लिक, फास्ट आणि उत्तम चालणारे आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zoo Zoo Zoobie Zooby... :- Dance Dance

nandan's picture

17 Feb 2023 - 11:28 pm | nandan

https://t.me/pump_upp - best crypto pumps on telegram
Make 1000% and more within 1 day, join channel @pump_upp !

फीचर फोन पेक्षा बरा, रेग्यूलर स्मार्टफोनपेक्षा स्वस्त असा नवा स्मार्टफोन Motorola moto कडून बाजारात आला. रु सात हजार.
Android 13 Go version
प्रोसेसर unisoc t606 (175000 antutu score)
HD screen. 13mp,5mp cameras.

Androi 13 Goबद्दल https://blog.google/products/android/android-13-go-edition/
इथे.

तुषार काळभोर's picture

18 Feb 2023 - 9:48 pm | तुषार काळभोर

जवळपास स्टॉक अँड्रॉइड प्रणाली देणारे, चांगली बॅटरी असणारे फोन होते. ब्लोटवेर नसल्याने परफॉर्मन्स दोन वर्षांनीही चांगला असायचा. पण मागच्या वर्षी आलेल्या G82 and G52 या मॉडेल्सनी निराशा केली आहे. फेसबुक, कँडी क्रश, Netflix, अमेझॉन असे ढीगभर थर्ड पार्टी ॲप्स आहेत.
(किमान काढता तरी येतात! बाकी उत्पादकांच्या मोबाइलमधील अतिरिक्त ॲप्स काढताही येत नाहीत!)
अँड्रॉइड गो मध्ये असे ॲप्स असतील तर आधीच बेसिक असलेल्या प्रोसेसर आणि मेमरीवर अतिरिक्त ताण येईल.

धर्मराजमुटके's picture

18 Feb 2023 - 10:02 pm | धर्मराजमुटके

म्हणूनच मी नोकिया प्रेमी आहे. अजूनही स्टॉक अँड्राईड देतात. (एखाद दुसरे अ‍ॅप असते पण ते काढता येते). मात्र हार्डवेअर किंमतीच्या मानाने जुने असते. माझ्याकडे घरात नोकिया आणि मोटो दोन्ही आहेत पण मोटो आताशा जास्त गरम होतोय.

त्यात भारंभार apps नसतील.
4+64 memory चांगली वाटते. अवेलेबल मेमरीही बरीच असेल.
माझ्या इ५+ मध्ये २जिबीRAM (/3),२६जीबीROM(/32) Available आहे.

Gyroscope,compass नसतो. पण ते फिटनेस appसाठी लागतात.
_____________