आशा भोसले – जीवेत शरद: शतम्

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
8 Sep 2021 - 10:53 am


आशा भोसले

मिसरूड फुटण्याच्या काळात, सतरा अठरा वर्षाच्या उंबरठ्यावर असताना बाजीगर सिनेमा बघण्याचा योग आला. नाही... नाही... शाहरुख खान बद्दल काही म्हणायचं नाहीयेय. त्या सिनेमामध्ये एक गाणं होतं, 'किताबे बहुत सी पढी होगी तुमने, कही कोई चेहरा भी तुमने पढा है '. ते गाणं तेव्हा ऐकलं त्यावेळी त्या गायिकेचा धारदार आवाज काळीज चिरत खोलवर गेला. त्या आवाजाची इतकी भुरळ पडली होती की ते गाणे अक्षरशः लूपवर लावून ऐकत होतो. पण तो आवाज कोणाचा आहे हे त्यावेळी माहिती नव्हत कारण त्या वयात तोपर्यंत किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि के. एल. सैगल सोडून यांच्या पलीकडे संगीत जास्त ऐकल नव्हत. (गाण / संगीत ऐकण्याची साधन तेव्हा परवडणारी नव्हती.) तेव्हा त्या गाण्याच्या गायिकेचा आवाज कोणाचा आहे हे माहिती नसल्याने सहाजिकच कोणाचा आवाज आहे याचा शोध घेतला. तेव्हा तो आवाज आशा भोसले यांचा आहे असं कळलं! ते कळलं आणि चाटच पडलो कारण त्या वर्षी आशाबाईंचं वय साठ (६०) वर्ष होतं. सतरा - अठरा वर्षांच्या अल्लड तरुणीला तो साठ वर्षाच्या गायिकेचा आवाज चपखल बसला होता!

आशाबाईंचा आवाज आहे कळल्यावर झपाटून गेलो आणि त्यांच्या गाण्यांची शोधमोहीम हाती घेतली. आणि, त्या शोधामोहिमेत जे काही हाती लागल त्याने आयुष्यच बदलून गेल. आशाबाईंच्या गाण्यांचा मग जो काही खजिना हाती लागला आणि त्यांच्या आवाजाची मोहिनी अशी काही मनावर पडली त्यातून आजही बाहेर येता येत नाहीयेय. त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडून, त्यांचा फॅन होऊन, 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हि भाग घेण्याची सुरसुरी येऊन बऱ्याच ठिकाणी त्या वादामध्ये भाग घेऊन आशाबाईंची बाजू हिरीरीने मांडण्यात प्रचंड मजा होती, एक वेगळीच धुंदी होती त्यात त्या अल्लड वयामध्ये. आणि, त्या गाण्याच्या आवाजाच्या मोहिनी मुळे हे असले वाद कसे निरर्थक आणि पोकळ आहेत याची जाणीवही नसायची पण ते भारावलेपणच तितक तीव्र होतं.आशाबाई - आर डी बर्मन, आशाबाई - ओ पी नय्यर, आशाबाई - कॅब्रे सॉंग्स, आशाबाई - मादक गाणी अशी अनेक समीकरण झाली होती. पण ह्या सगळ्या समीकरणांच्या पलीकडे जाउन त्यांच्या आवाजावरची भक्ती उत्तरोत्तर वाढतच गेली.

मध्यंतरी कुठल्यातरी एका गाण्याच्या रियालिटी शोमध्ये त्या आणि सुनिधी चौहान दोघीही एकत्र होत्या. (सुनिधी चौहान ही माझी आत्ताच्या काळातली आवडती गायिका) त्यावेळी आशाबाईंनी गायकाला (स्पर्धकाला) काहीतरी सल्ला दिला आणि खाण्यापिण्याची काळजी गेट आवाजाची निगा कशी राखायची या बद्दल काहीतरी सांगत होत्या. त्यावेळेस सुनिधीने, "मी तर चॉकलेट, आईसक्रीम मनमुराद खाते, जीवन मुक्त जगल पाहिजे" असल्या टायपाची काहीतरी अल्लड विधान करून आशाताईंना प्रतिवाद करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खरंच हसू आलं, ज्या वयामध्ये आशाबाई तिच्या समोर बसून त्यांच्या आवाजाच्या ताकदीने स्टेजला आग लावता होत्या त्या पुढे अशी काहीतरी वक्तव्य करणं म्हणजे बालिशपणाचा काळसा होता. असो!

अशा या हरहुन्नरी गायिका, आशाबाई आज वयाच्या 88 व्या वर्षी वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा आवाज असाच धारदार, बहारदार आणि मधाळ राहो आणि त्या पुढची अनेक वर्षे गात राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

समाजजीवनमानप्रकटनसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

यश राज's picture

8 Sep 2021 - 11:03 am | यश राज

आशाबाईंबद्दल भावना मस्त व्यक्त केल्यात तुम्ही.
अस्मादिक पण लता-आशाचे खुप मोठे फॅन. तुम्ही म्हणता त्यप्रमाणे मी सुद्धा 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हीरीरीने भाग घेतलाय. माझ्यामते लताताईंचे पारडे थोडे जड असेल पण त्यामुळे आशाताई कुठे कमी पडल्यात असे वाटत नाही किंवा त्यांच्या गाण्यावर आमचे प्रेम कमी झाले असेल असेही नाही.
बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आशा भोसले त्वम जीवेत शरद: शतम्

बाजीगर's picture

8 Sep 2021 - 12:06 pm | बाजीगर

जर कधी स्ट्रेस आला असेल, खिन्नतेचे ढग दाटले असतील तर फक्त,

'मदनमस्त हरिणी,
मी मदनमस्त हरिणी...'

है गाणं ऐकावं.
गाण्याच्या सुरवाती आशाजीं नी जे मनमुक्त हसणं दिल आहे ना....बस तिथेच तुम्ही जिंकले जाता !!

जगात इतक्या समस्या असतांना कुणी इतकं गोड कसे हसू शकतो या विचारात तुम्ही हरवून जाता, आणि दुनाया ही वाईट जागा नाही या वर तुमचा पुन्हा विश्वास बसतो.

धन्यवाद सोत्रि .

सुजित जाधव's picture

8 Sep 2021 - 9:16 pm | सुजित जाधव

कोणत्या चित्रपटातील गान आहे आहे हे..YouTube वरती सापडत नाहीये

गोरगावलेकर's picture

8 Sep 2021 - 10:14 pm | गोरगावलेकर

चुकीचा शब्द आहे यु ट्यूबच्या शीर्षकात
Madan Mast Karani असं लिहिले आहे त्यांनी
चित्रपट : भामटा
लिंक
https://youtu.be/qERaAYK58Vo

hrkorde's picture

12 Sep 2021 - 8:58 pm | hrkorde

दुर्गा रागात आहे का ?

आशाताईंचा दुर्गा राग म्हणजे केण्व्हा तरी पहाटे

मराठी_माणूस's picture

8 Sep 2021 - 12:12 pm | मराठी_माणूस

आजचे गुगल डुडल आशाताइंचे असायला हवे होते.

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2021 - 1:02 pm | चौथा कोनाडा

आज संगीतकार टिम बर्गलिंग उर्फ "​​एविसी" याचा ३२ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त गुगल०डूडल मुळे आशाताईंना तिथे स्थान मिळालेले नाही.
३ वर्षापुर्वी ​​एविसीचा आकस्मिक मृत्यू झाला होता.

मराठी_माणूस's picture

8 Sep 2021 - 4:01 pm | मराठी_माणूस

हा कोण आहे ते माहीत नाही.
भारतासाठी त्यांनी हे करायला हवे होते. पुर्वी त्यांनी असे केले आहे म्हणुन असे वाटले.

आशाताईंना मी पहिल्यांदा pop गाण्यातून ऐकलं होतं "जानम समजा करो." हरहुन्नरी कलाकार...आशा एक मानवाला वरदान आहे.. समस्त मंगेशकर _/\_

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2021 - 12:57 pm | चौथा कोनाडा

वॉव, सुंदर लेख !

तिचा आवाज ऐकणे म्हंजे आमच्या साठी "चांदण्यात फिरताना"चा च अनुभव !
हॅप्पी बर्थडे आशाताई !

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Sep 2021 - 2:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

आशाताईंची गाणी इथे ऐका

https://www.aathavanitli-gani.com/Swar/Asha_Bhosle

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 3:06 pm | कुमार१

त्यांचा आवाज असाच धारदार, बहारदार आणि मधाळ राहो आणि त्या पुढची अनेक वर्षे गात राहोत

+११

मित्रहो's picture

8 Sep 2021 - 6:57 pm | मित्रहो

वाह मस्त खूप मस्त लेख
बरीच वर्षे लता मंगेशकर यांची भरपूर गाणी ऐकली आणि एक दिवस अच्छा जी मै हारी गाणे बघितले, त्यातला मधुबालाचा अभिनय आशा भोसले यांचा आवाज वाह क्या बात है. त्यानंतर हिंदीत खास आशा भोसले छापाची खूप गाणी ऐकली म्हणजे आगे भी जाने ना तू वगैरे. पण ओ मेरे सोना रे सोना, पान खायो सैया हमारो गाण प्रचंड आवडले. एक दिवस मराठीत कधी रे येशील तू ऐकले विश्वास बसत नव्हता याच गायिकेने हिंदीतली आहा हा आजा वगैरे गाणी म्हटली आहेत. नंतर मग ऋतु हिरवा, मागे उभा मंगेश, हि वाट दूर जाते अशी कितीतरी गाणी वेड लावतात.
आज हे जाणवते की आपण मराठी माणसं भाग्यवाण आहोत लता मंगेशकर यांनी हिंदीत अजरामर केलेली खूप मेलोडी गाणी आपण ऐकली. त्याप्रकारची गाणी आशा भोसले यांना हिंदीत मिळत नव्हती म्हणून त्यांनी वेगळी गाणी हिंदीत गायली तर मराठीत मेलोडी गायली. त्याचमुळे आपल्याला आशा भोसले यांच्या आवाजात सर्व प्रकारची गाणी ऐकता आली.
यु ट्युबवर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी आपआपल्या पद्धतीने गायलेले ये नयन डरे डरे गाणे आहे. अप्रतिम विडियो आहे.

तुषार काळभोर's picture

9 Sep 2021 - 7:47 am | तुषार काळभोर

आशा भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

लता-आशा ही तुलना लांब ठेवून एकच वेळी 'सख्या रे घायाळ मी हरिणी' आणि 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' यांचा आनंद घेता आला याबद्दल विधात्याचे आभार मानायचे.
:)

लहानपणापासून तिची गाणी ऐकत आलो आहे. त्या वेळी साधारण रोज एकदातरी ती रेडिओ वर भेटायचीच. पेपर मधे तिच्या बद्दल कधीमधी छापुन यायचे, त्या वरुन तिच्या बद्दल मनात एक कल्पना तयार झाली होती.

बहूतेक ज्ञानप्रबोधिनीच्या मदतीसाठी पुण्यात तिचा एक जाहिर कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला आवर्जून गेलो होतो, तिथे तिला प्रत्यक्ष पहाता... अनुभवता आले. आणि मी तिच्या अजूनच प्रेमात पडलो.

मग आमच्या कडे कॅसेट प्लेयर घेतल्यावर त्याच्या बरोबर ज्या कॅसेट आल्या त्यात भिमसेन जोशींची इंद्रायणी काठी, लताबाईंची ज्ञानेश्वर माउली आणि आशाची चांदणे शिंपित जाशी या होत्या.

हळुहळू टिव्ही आला, मग नव नवी चॅनेल आली आणि आता तर काय बटन दाबले की आशाची भेट होते.

काळाबरोबर स्वत:ला वेगाने बदलणार्‍या आशाला दिर्घायुष्य लाभो आणि ती आता आहे तशीच हसरी खेळती आनंदी राहो या मन:पूर्वक शुभेच्छा.

पैजारबुवा,

रुपी's picture

10 Sep 2021 - 5:50 am | रुपी

छान लेख! कमी शब्दांतही समर्पकपणे मांडला आहे.
पण आशाताईंवर कितीही लिहिले तरी कमीच आहे. एके वर्षी शाळेत आम्ही आशाताईंवर अख्खे हस्तलिखित बनवले होते. तेव्हा पहिल्यांदाच गाणी आणि गायक यांचा मेळ घालायला शिकले. आणि तेव्हापासून दर ८ सप्टेंबरला आशाताई आठवतातच.

'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हि भाग घेण्याची सुरसुरी येऊन बऱ्याच ठिकाणी त्या वादामध्ये भाग घेऊन आशाबाईंची बाजू हिरीरीने मांडण्यात प्रचंड मजा होती, >> अगदी अगदी.. हेही खूप करुन झालंय. :)

आशाताईंना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

जाता जाता... तुम्ही लिहिलाय तो सुनिधीबरोबरचा शो चा भाग माझाही पाहण्यात आला होता (मी टी व्ही क्वचितच बघते तरी!)..पण तिने प्रतिवाद केला किअंवा अल्लडपणा असा काही वाटला नाही.. मला तरी फक्त तिने ते एखादी खोडसाळपणा केलेली गोष्ट मान्य करावी असे वाटले.. असो..

लेखासाठी धन्यवाद. आज खूप दिवसांनी लॉग इन करुन प्रतिसाद लिहित आहे.

मदनबाण's picture

10 Sep 2021 - 12:54 pm | मदनबाण

आशा ताईंना वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा !
त्यांनी इतकी आणि अनेक प्रकारची गाणी गायली आहेत की येणार्‍या कित्येक पिढ्या त्यांच्या गाण्यांचा आनंद घेत राहतील.
त्यांनी रिमिक्स गाणी देखील गायलेली आहेत. त्यांनी गायलेलं आणि माझं आवडत एक ओरिजिनल आणि एक रिमिक्स गाणं इथं देऊन जातो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

सुनीता करमरकर's picture

11 Sep 2021 - 2:24 pm | सुनीता करमरकर

दूर दूर तक मेरी आवाज़ चली आएगी...
आशाजींना गाण्यातून संदेश दिला आहे.
जाईये आप कहाँ जाएंगे...
देश-विदेश... कधीही, केंव्हाही
माझ्या आवाजात मी तुम्हाला भेटत राहीन...

hrkorde's picture

12 Sep 2021 - 7:22 pm | hrkorde

छान

सुनिल पाटकर's picture

12 Sep 2021 - 8:50 pm | सुनिल पाटकर

खूप छान लेख,आपल्या वैविध्यपूर्ण धाटणीमुळे त्यांची गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी अशी असतात.