पानिपत आणि शेरलॉक होम्स अंतिम भाग ३

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
22 Jan 2021 - 1:16 pm
गाभा: 

1

पानिपत आणि शेरलॉक होम्स अंतिम भाग ३

1

शेरलॉक होम्स विचारात पडून एक सारख्या येरझाऱ्या घालत होते. डोअर बेल वाजली.
‘वॉटी! व्हेरी वेअर यू, माय ग्रेट फ्रेंड?’
‘इतकी काय अर्जन्सी होती?’ डॉ वॉटसननी विचारले.
‘यू नो वॉटी, विंग कमांडर ओक रिक्वेस्टेड् की मी त्या गाजलेल्या चित्रातील लोकांना शोधावे? सैन्य हालचालीतून काय कळते? ती वेळ काय असेल? पहाटे सुरवात झाली तेव्हा कि संध्याकाळी संपत आली तेंव्हा? अँड स्पेशली डाव्या बाजूला खाली हिरवट रंगाने वेगळेपण दाखवले आहे त्यातून ते चित्र काय सांगते?’

1

‘विंग कमांडर शशिकांत शेयर्ड हिज इंटर प्रिटेशन’.
‘आय मस्ट से, आय टेंड टू अ‍ॅग्री विथ हिम नॉट कंप्लीटली, बट टू ए ग्रेट एक्सटेंट!’
‘दॅट इज ग्रेट!’
‘लेट मी सी दी फोटोज्’.
‘फॉर इझी अंडरस्टँडिंग. त्यानी दहा पार्ट्स केले. त्या कोण व्यक्ती आणि घटना असतील यावर माहिती घेतली’.

1

1

1

1

1

1

1

1

1

1

‘शेरलॉक होस्म, सीम्स द बॉय हॅज डन वंडरफुल वर्क’ डॉ वॉटसन पुढची चित्रे बघयला ते उत्सुक होते.

हिरव्या रंगाच्या भागाला वेगळे केले.

1

‘ओक हॅज डन एक्सीडिंगली गुड जॉब. त्यांनी फोटो मोठे करून पाठवले आहेत’.

1

1

‘लेट्स एग्झामिन हा गोल करून वेगळा दाखवलेला कोण असेल?’

1

‘उंटावर बसवून काही मुलींना पळवले जात आहे. तो उंट किंवा घोड्यावरून पहाणी करत आहे. त्याचे नाव फारसीत अंधुक दिसते’.

1

1

‘एकमेकांना पाठ करून ६ हत्ती राजप्रासादाबाहेर कूच करायला तयार केले आहेत असे चित्रातील वरच्या भागात भासते’.

1

1

1

1

शेरलॉक होम्स अँड डॉ वॉटसन वेअर स्टन्न्ड! ग्रेट सर्च ऑफ मिडीव्हल पिक्चर.
चिरूट पेटवून दोघे बराच वेळ अबोल झाले.
मी या लढाईचा बारीक आढावा घेतला. पोस्ट धिस कँपेन, एका लफड्याने पेशवाज वेअर अंडर कन्फ्यूजन.
रिमेंबर सुभाष बोस? मोअर पॉप्युलर नेम - नेताजी. त्यांचे मरण ही एक मिस्ट्री होती. ते नंतर भारतात एक माँक बनून राहिले म्हणतात.
इट बीट्स मी डॉ वाटसन, ए मॅन ऑफ एक्शन लाईक नेताजी. ज्याने इंडियाची आर्मी तयार करून लढाईची तयारी केली होती तो गुमनामी बाबा म्हणून एकदम राजकारणापासून एकाकी राहायला पसंत करतो? वॉज ही रियल नेताजी? ऑर एन इंपोस्टर? इफ येस तर मग त्यांनी अज्ञातवास का धरला?
यू नो, वॉटी, त्या लढाई नंतर काही महिन्यानी ‘मीच सदाशिव भाऊ पेशवा’ म्हणून एक जण पुण्यात आला. त्याने असा धुमाकूळ घातला पुढची १५ वर्षे!
वी शुड आस्क ओक टू नो मोअर अबाऊट इंपोस्टर. व्हॉट दे कॉल एज “तोतया!”
...
एक नवा क्लायंट शेरलॉक होम्सची वाट पहात होता. एक्सक्यूज मी, म्हणून त्यांनी या कामातून आपल्याला मोकळे केले.

समाप्त

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

23 Jan 2021 - 12:35 am | गामा पैलवान

नमस्कार शशिकांत ओक,

तोतयावरनं नुकताच प्रकाशित झालेला हा लेख आठवला : पानिपतोत्तर भाऊसाहेब पेशवे – खरे की तोतया? खरे ते तोतया नि खोटे ते खरे!

आ.न.,
-गा.पै.

शशिकांत ओक's picture

23 Jan 2021 - 8:47 am | शशिकांत ओक

आपण संदर्भात दिलेल्या तोतया लेखामुळे ज्ञानात भर पडली...
लेख पुन्हा वाचून काढला की मग तो नीट समजावून घेता येईल.
आपल्या सारख्या विचक्षण सदस्यांकडून पानिपत फोटोतील तपशिलाचे विश्लेषण केले गेले की लेखनाची सार्थकता वाढेल.

शशिकांत ओक's picture

23 Jan 2021 - 8:48 am | शशिकांत ओक

आपण संदर्भात दिलेल्या तोतया लेखामुळे ज्ञानात भर पडली...
लेख पुन्हा वाचून काढला की मग तो नीट समजावून घेता येईल.
आपल्या सारख्या विचक्षण सदस्यांकडून पानिपत फोटोतील तपशिलाचे विश्लेषण केले गेले की लेखनाची सार्थकता वाढेल.

गामा पैलवान's picture

25 Jan 2021 - 4:06 pm | गामा पैलवान

शशिकांत ओक,

आपल्या सूचनेबद्दल आभार. पण मी काही विचक्षण वगैरे नाही हो. शिवाय चित्रातलं मला फारसं कळंतही नाही. श्री मनोज दाणींच्या अभ्यासावर मत प्रदर्शित करायला तितकाच तोलामोलाचा व्यासंग हवा.

आ.न.,
-गा.पै.

त्यातील वेचक भाग

हुकूमशहांचे तोतयाही त्यांच्या आदेशावर अनेक कामांसाठी उभे रहात असत. हे तोतया इतके हुबेहूब आपल्या मालकांसारखे दिसत, की खरा कोण आणि खोटा कोण हे भल्याभल्यांना ओळखता येत नसे. स्टालिनपासून किम-जोंग उन अशा अनेकांचे तोतये होते आणि आहेत अशा चर्चा अनेक वेळा अनेक वृत्तांकनानमधून आणि पुस्तकांमधून सतत कानावर पडत असतातच...फक्त त्यांच्या अस्तित्वाची पुष्टी होणं अशक्य असतं....असे तोतया एक तर आपल्या ' मालकांबरोबरच ' या इहलोकीची यात्रा संपवतात किंवा नशिबाने मालकांच्या पोलादी पकडीतून सुटण्यात यशस्वी झालेच तर कोणत्या ना कोणत्या अज्ञात स्थळी खोट्या नावाने नवं आयुष्य सुरु करतात.

या पुढच्या प्रकरणांमध्ये सद्दाम हुसेन याच्या थोरल्या चिरंजीवांच्या - उदे हुसेन याच्या तोतयाची कहाणी मांडायचा प्रयत्न केला आहे. या तोतयाबद्दल जगभरातल्या जाणकार लोकांमध्ये अनेक मतमतांतरं आहेत. काहींच्या मते हा तोतया मुळात प्रति - उदे म्हणून कधी इराकमध्ये वावरलाच नाही, तर काहींच्या मते त्याने त्याच्या खऱ्या कहाणीला अनेक कपोलकल्पित कहाण्या जोडून स्वतःला जगापुढे ' बळीचा बकरा ' म्हणून सादर केलं....त्याच्या स्वतःच्या कहाणीनुसार त्याने इराकमध्ये उदेबरोबर अनेक वर्षं त्याचा ' तोतया ' म्हणून वावरताना अतिशय वाईट अनुभव घेतले आहेत....आणि केवळ नशीब बलवत्तर म्हणून सद्दामच्या तावडीतून सुटून तो इराकबाहेर पळू शकलेला आहे.

लतीफ याह्या हे या तोतयाचं नाव. आज हा मायभूमी इराकपासून दूर आयर्लंडमध्ये राहतो आहे. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला इराकमध्येच कुर्दिस्तानच्या प्रांतात पकडलं गेलं होतं आणि तिथे सुरुवातीला त्याला उदे हुसेन समजून कुर्दिश लोकांनी ताब्यातही घेतलं होतं...पण पुढे हा उदे नाही हे समजल्यावर त्याला ऑस्ट्रिया देशामध्ये राजनैतिक आश्रय दिला गेला. तिथून हा लंडनमध्ये पळून गेला एका हल्ल्यातून वाचल्यावर. पुढे जर्मनीमध्ये काही काळ घालवून शेवटी तो आयर्लंडमध्ये स्थायिक झाला.

ही कहाणी आहे याह्याची...या कहाणीमध्ये खरं काय आणि खोटं काय, हे याह्याशिवाय कोणालाही माहित असणं अशक्य आहे.

सदाशिवराव भाऊंवरून आठवण झाली. त्यांचा तोतया राज्य हडपायला आला होता... म्हणून इथे सादर

दुर्गविहारी's picture

23 Jan 2021 - 6:11 pm | दुर्गविहारी

केसची भारी उकल झाली.

शशिकांत ओक's picture

24 Jan 2021 - 12:19 am | शशिकांत ओक

हिन्दी मधे केस म्हणजे बाल. बाल की खात उतारना म्हणजे अतिशय सूक्ष्मपणे निरीक्षण करून आपला निष्कर्ष सादर करणे...
या मागे मिसळपाव.कॉम वरील सदस्याचे सहकार्य लाभले म्हणून धन्यवाद.
इंग्रजी मराठी मिसळून शेरलॉक होम्स ना बोलायला लावले हे ही नसे थोडके!
मूळ लेखक श्री, मनोज दाणी यांनी पानिपत वर चित्रमय प्रकाश टाकला आहे त्यात त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले आहे, आपल्याला तसे नाही वाटतं?

चित्रगुप्त's picture

24 Jan 2021 - 9:44 pm | चित्रगुप्त

मनोरंजक आणि माहितीपूर्ण लेख.
या चित्रातील कोपर्‍यात दर्शवलेला राजवाडा पानिपत परिसरात अजून आहे का ? त्याचे सध्याचे नाव काय आहे ? याविषयी काही माहिती उपलब्ध आहे का ? मुलींना पळवून राजवाड्यात आणून वासनाकांड करणारे नेमके कोण असावेत ?

शशिकांत ओक's picture

24 Jan 2021 - 10:48 pm | शशिकांत ओक

अशा महापुरुषांच्या नावांची यादी इतक्या काळा नंतर समजावून घेऊन काय फरक पडतो? चित्रात एकेक विकृत मानसिकता दाखवून भीषण विषण्णता निर्माण करणारी दृश्ये दाखवली जावीत? अशी चित्रे शुजा उदौलाने मुद्दाम काढून घेतली असावीत असे म्हटले तर वावगे ठरू नये. या शिवाय काही चित्रे इंग्रजांनी, फ्रेंच लष्करी लोकांनी भारतीय चित्रकारांना पैसे देऊन विकत घेऊन कधी कधी त्यांची पुन्हा कॉपी करून आपापल्या देशात नेऊन प्रकाशित केली असल्याच्या घटना घडल्या होत्या. काळाच्या ओघात वेगवेगळ्या म्युझियम मधे, काहींच्या खाजगी संग्रहात काळजीपूर्वक टिकून आहेत. (भाग २ मध्ये याचा मुद्दाम उल्लेख केला आहे.)
मनोज दाणी, संकेत कुलकर्णी असे महाभाग भारतीय इतिहासातील घटना, नकाशे, पेंटींग्ज श्रमपूर्वक गोळा करून आपल्या समोर पुस्तक रूपाने सादर करतात.
त्यांच्या कष्टांना मानाचा मुजरा...

चित्रगुप्त यांनी हे अमानवी कृत्य करणारे कोण असावेत अशी विचारणा केली होती. मनोजजींचे पुस्तक वाचताना खालील वर्णन वाचून कळेल की ते कोण होते...

चित्रात एकेक विकृत मानसिकता दाखवून भीषण विषण्णता निर्माण करणारी दृश्ये दाखवली जावीत?

यावर

४

४

Husain Samin has recorded the case of a Muslim jeweller, who was robbed of his four thousand rupees and whose life was spared only when he disclosed his genitals to prove that he was a coreligionist of the Afghans. Then came another Afghan and slashed him on the stomach. He had then to flee for his life and hide in a corner.137
Jahan Khan marched away the same night from Mathura, leaving the Rohilla jackals to feast upon what had remained unconsumed by the Afghan tigers. Najib Khan stayed behind for three days, perhaps, to collect the levy of one lakh rupees imposed by Jahan Khan upon the remaining population; he plundered the wealth and hidden treasures of rich people and carried away a large number of beautiful women as captives. The Bairagis and Sanyasis (recluses) were cut down in their huts, says Samin, and "in each of these huts lay a severed (Bairagi's) head with the head of a dead cow placed its mouth and tied to it with a rope around its neck". Such was the havoc wrought in Mathura that, according to a Muslim jeweller’s statement, for seven days, following the general slaughter, the water (of the stream) flowed blood-red and then it turned yellow. 138
84
वरील वर्णन पान ८४वर आहे. त्या घटना मथुरेला १ मार्च १७५७च्या होळीच्या दिवशी घडलेल्या रक्ताच्या रंगांची होळी होती. त्या घटनांची आठवण म्हणून ती चित्रे मुख्य चित्राच्या कोपऱ्यात काढून चित्रकाराने आपल्या मालकाची शाबासकी मिळवली असेल का?

चित्रगुप्त's picture

26 Jan 2021 - 7:29 am | चित्रगुप्त

@ शशिकांत - तुम्ही जे लिहीले आहे, त्याचेशी सहमत आहे.
'मुद्दाम कढून घेतलेली चित्रे' हाच प्रकार पूर्वी जगभर सर्वत्र असायचा. अपवाद फक्त सराव म्हणून जी लहानशी रेखाटने /रंगीत चित्रे चित्रकार बनवत त्यांचा. हल्ली अगदी काल घडलेल्या घटनेबद्दल आजच्या विविध 'मिडिया' मधून परस्पर-विरोधी भूमिका 'आमचेच खरे' म्हणून रेटून मांडल्या जातात. त्याकाळी तर कुठेतरी-केंव्हातरी घडलेल्या घटनेच्या ऐकीव माहितीवरून चित्रे बनवली जात, तीही कुणाच्या तरी मर्जीप्रमाणे.

कुठेतरी-केंव्हातरी घडलेल्या घटनेच्या ऐकीव माहितीवरून चित्रे बनवली जात, तीही कुणाच्या तरी मर्जीप्रमाणे.

या पार्श्‍वभूमीवर काही चित्रे एकदम वेगळी वाटतात.
अशी काही चित्रे पानिपतवरील मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पुस्तकात आहेत. त्यावर सवडीने प्रकाश टाकावा असे वाटत आहे. आपले प्रतिसाद जरूर यावेत.

शशिकांत ओक's picture

28 Jan 2021 - 11:37 am | शशिकांत ओक

ज्यांनी हे पुस्तक लिहिले त्या लेखक महाशयांनी या 'पुस्तकाचे हृदय' अशा चित्रातील बारकाईने शोधून काढलेल्या, घटनांचा आढावा आपला शैलीत घेऊन त्यावर प्रकाश टाकला तर वाचकांना अधिक माहिती मिळाल्याचा आनंद होईल.

उत्तम !केस चांगली चालली.

त्यांना उद्देशून...

बऱ्याच जणांनी प्रयत्न केला असेल...
शेरलॉक होम्स यांच्या लोकप्रिय प्रतिमेचा संदर्भ घेऊन त्यांच्या सारखेच शोध कार्य हातात भिंग धरून निदान १० जणांनी केले असेल अशी माझी धारणा आहे...
होम्स यांच्या विनंतीला मान देऊन ओकांनी सादर केलेले स्पष्टीकरण मान्य करता येत नाही अथवा मला याबाबत जरा वेगळे वाटते किंवा त्यांचे निष्कर्ष एकंदरीत बरोबर आहेत. अशा तऱ्हेचे प्रतिसाद अपेक्षित होते. मनोज दाणीनी युट्यूबवर बोलताना म्हटले तसे 'बऱ्याच जणांना धागा कळला नाही' हे मत बरोबर आहे कि काय असे वाटून हे लेखन केले आहे.