"रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध" - पुस्तक परिचय

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in जनातलं, मनातलं
19 Dec 2020 - 10:16 pm

साल १९९८, पेपर मध्ये सगळी कडे बातमी आली होती कि "रानपिंगळा" हा पक्षी ११३ वर्षांनी सापडला आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे साधारण माझ्या मूळ गावाच्या प्रदेशात म्हणजेच खान्देशात सापडला होता. ह्याचा पुनर्शोध अमेरिकन स्त्री पक्षी संशोधक पामेला रासमुसेन ह्यानी लावला होता.

कट २ - अचानक काही दिवसापूर्वी "रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध" ह्या डॉ. जयंत वडतकर लिखित पुस्तकाबद्दल वाचण्यात आलं. बरेच दिवस झालेले नवीन पुस्तक घेऊन, म्हणून पटकन हे पुस्तक मागवलं . ३ दिवसात पुस्तक घरपोच आलं आणि एका बैठकीमध्ये वाचून काढलं . आता पक्षी हा माझा सगळ्यात आवडता विषय आणि त्यातून हा पक्षी विशेष म्हणजे ११३ वर्षांनी सापडलेला .. तर ह्या पुस्तका बद्दल थोडी माहिती. ह्या पुस्तकाला वनऋषी मारुती चितमपल्ली, नितीनजी काकोडकर आणि असाद रहमानी ह्यांची प्रस्तावना आहे. ह्या पुस्तकात रानपिंगळा ह्या पक्ष्या बद्दल सगळी माहिती आहे. तो पूर्वी कसा सापडला होता (१८७२ साली), त्याचे नामकरण आणि प्रजाती कशी ठरवली गेली होती पासून ते ११३ वर्षां नंतर कसा शोध घेण्यात आला पासून सद्यस्थिती ह्या बद्दल जयंतजींनी विस्तृत माहिती दिली आहे. ह्या पक्षासाठी कशाप्रकारे शोध मोहीम आखण्यात आल्या ह्या बद्दल वाचतांना त्यांच्या बद्दलचा आदर खूपच वाढतो.
साधारण ३ पिंगळा प्रजाती आहेत. ठिपकेवाला पिंगळा (Spotted Owlet), जंगल पिंगळा (Jungle Owlet ) आणि रानपिंगळा (Forest Owlet ). त्यातला पहिला (ठिपकेदार) सगळी कडे दिसतात (मोठ्या शहरात पण), रान आणि जंगल पिंगळा साधारण जंगलात आढळतात . इतर दोन आणि रान पिंगळ्या मध्ये महत्वाचा फरक म्हणजे रान पिंगळा हा दिवसा शिकार करतो. रान पिंगळा आणि ठिपकेवाला पिंगळा मध्ये बऱ्यापैकी साधर्म्य तरी काही खास फरक म्हणजे रान पिंगळ्याचा पोटाकडचा भाग हा पांढरट असतो आणि ठिपके कमी असतात. तसेच त्याचे डोके ठिपकेवाल्या पिंगळा पेक्षा थोडे चपटे असते . अजून एक महत्वाचा फरक म्हणजे रान पिंगळ्याच्या डोक्यावरील तपकिरी भाग जास्त दिसतो. साधारण विरळ शुष्क जंगलात रान पिंगळा आढळतो आणि पूर्णतः मांसाहारी असतो. सध्या २०० च्या आसपास संख्या आहे आणि मेळघाट मध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे. इतर वन्यजीवासारखे ह्याची पण संख्या अधिवास नष्ट झाल्यामुळे कमी होत आहे. तसेच वणवे, शेती साठी जंगलावर झालेले आक्रमण, विकासाच्या नावाखाली रस्ते ह्या मुळे पण परिणाम झाला आहे. ह्या पुस्तकात अशा प्रकारच्या खूप माहितीपूर्ण नोंदी आहेत. ह्या मध्ये असलेले फोटो पण अप्रतिम आहेत. तर असे हे सुंदर पुस्तक सगळ्यांनी नक्की घेऊन वाचा.
पुस्तकाचे नाव - "रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध"
लेखक - डॉ. जयंत वडतकर
किंमत - १४० /- (५ पुस्तकांचा संच ५५०) (१० पुस्तकांचा संच - १००० /-)
प्रकाशक - सातपुडा बुक्स
संपर्क - वर्षा वडतकर - 7522945749 (गुगल पे )

कलालेख

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

20 Dec 2020 - 12:44 am | चित्रगुप्त

रानपिंगळा हा पंचाक्षरी शब्द, आणि रान-पिंगळा ही फोड यावरून हे जीएंचे एकादे अप्रकाशित पुस्तक असावे असे वाटून धागा उघडला. अर्थात रानपिंगळा याविषयीची महत्वपूर्ण माहिती वाचून छान वाटले. याचा फोटो अवश्य द्यावा. माझ्या इंदौरमधील काही पक्षीमित्रांना फोटो आणि माहिती कळवेन. अनेक आभार.

MipaPremiYogesh's picture

21 Dec 2020 - 7:55 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद चित्रगुप्त

https://en.wikipedia.org/wiki/Forest_owlet

कपिलमुनी's picture

17 Sep 2021 - 4:07 pm | कपिलमुनी

जी ए च्या पुस्तकाच्या अपेक्षेने धागा उघडला होता

माहिती उत्तम

कंजूस's picture

20 Dec 2020 - 5:56 am | कंजूस

रान - शेत आणि थोडी झाडे.
वन - ऊच झाडे, वेली,झुडपे.
घुबड -owl
पिंगळा -छोटी घुबडे, owlet.
फोटो birdsofindia website वर आहेत.
१) Spotted owlet
२). Jungle owlet वन पिंगळा?

३) .Forest spotted owlet? रानपिंगळा? एकूण हा पक्षी पुन्हा दिसू लागला आहे. मध्य प्रदेशातले इकडे जळगाव, पालघर भागात स्थलांतरित झाले असतील का?
पिकांवर रासायनिक फवारे मारले की कीटक मरतात आणि त्यांवर अवलंबून असणाऱ्या मोठ्या प्राण्यांचे भक्ष्य नष्ट होते. बेडुक, पिंगळा,कोतवाल वगैरे.

MipaPremiYogesh's picture

21 Dec 2020 - 9:05 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद कंजूसजी. जळगाव भागात होतेच आधी पासून .

प्रचेतस's picture

22 Dec 2020 - 9:51 am | प्रचेतस

सुरेख परिचय.
ठिपकेवाला पिंगळा शहरात खूपदा पाहिलाय.
आत्ता गतवर्षी मेळघाटात गेलो होतो तेव्हा रानपिंगळ्याला साइट करायचा पुष्कळ प्रयत्न केला होता पण त्याचा माग काही काढता आला नाही.

MipaPremiYogesh's picture

22 Dec 2020 - 2:37 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद वल्ली जी . हो तुमची मेळघाट ची सिरीज वाचली होती . तुम्ही भेटले का फालतू, नंदराम ह्या गाईडस ना?

प्रचेतस's picture

22 Dec 2020 - 2:54 pm | प्रचेतस

नाही, ते नव्हते दुसरे होते.

अगोदरच लेख / पुस्तकातली माहिती वाचून जाणे उत्तम.

पराग कोकणे's picture

17 Sep 2021 - 1:13 pm | पराग कोकणे

नमस्कार, मी एक पक्षीनिरीक्षक आहे. घुबडांवर काही माहिती शोधता शोधता मला हा धागा सापडला. घुबड म्हटलं कि लोक नाक मुरडतात पण घुबडं हा माझा अत्यंत आवडता पक्षी. भारतात, ३० पेक्षा जास्त घुबडांच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतात ज्यात पिंगळ्याच्या (owlets) च्या ५ प्रजाती आहेत. त्या सर्व खालील प्रमाणे (सोबत मी माझ्या वेबसाईट ची लिंक देत आहे).
१. Spotted Owlet
२. Jungle Owlet
३. Forest Owlet
४. Collared Owlet
५. Asian Barred Owlet

Asian Barred Owlet आणि Collared Owlet ह्या दोन्ही North east मध्ये दिसणाऱ्या प्रजाती आहेत. बाकी तीनही प्रजाती महाराष्ट्रात दिसू शकतात.

सतिश गावडे's picture

17 Sep 2021 - 1:49 pm | सतिश गावडे

माहितीही छान आहे.