कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
31 Jul 2020 - 12:15 pm
गाभा: 

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज.

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

4 Oct 2020 - 9:42 am | कुमार१

या महासाथीचे एक वैशिष्ट्य म्हणजे अधिकतर लोक लक्षणविरहित राहिले, पण त्यांच्यामार्फत बराच फैलाव झाला. हा संसर्ग लक्षणविरहित असण्यासंबंधी बरेच संशोधन होत आहे. त्यापैकी हे एक रोचक वाटले.

या प्रतिपादनानुसार सार्स २ चे जे टोकदार प्रथिन आहे ते शरीरातील वेदना जाणवण्याच्या संदेश यंत्रणेला दाबून टाकते. त्यामुळे जरी विषाणू शरीरात वाढत असले तरी संबंधितास वेदना/ त्रास जाणवत नाही.

ज्या बाधितांचे बाबतीत विषाणूला असे यश मिळते, ते लोक लक्षणविरहित राहतात. काहीच त्रास न जाणवल्यामुळे ते जरा जास्तच जनसंपर्कात राहतात आणि रोगप्रसार करतात.
या संशोधन चमूचे प्रमुख भूलतज्ञ आहेत.

कुमार१'s picture

5 Oct 2020 - 10:12 am | कुमार१

• अमेरिकी अध्यक्षांना कोविडचा उपचार म्हणून Regeneron कंपनीचे अद्याप रुग्णप्रयोग पूर्ण न झालेले औषध दिले गेले आहे. त्याबद्दल माहिती :

• हे औषध २ antibodies चे मिश्रण आहे. ते रक्तवाहिनीतून ‘ड्रीप’ पद्धतीने देतात.
• ते या विषाणूच्या टोकदार प्रथिनाशी संयोग करून त्याला कमकुवत करते.

• गेले चार महिने त्याचे ४ प्रकारच्या अभ्यासगटांवर प्रयोग चालू आहेत.
• त्याचे निष्कर्ष समाधानकारक आहेत.

सतीशम२७'s picture

7 Oct 2020 - 10:33 am | सतीशम२७

<<अमेरिकी अध्यक्षांना कोविडचा उपचार म्हणून Regeneron कंपनीचे अद्याप रुग्णप्रयोग पूर्ण न झालेले औषध दिले गेले आहे. + त्याचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. >>
अध्यक्ष back to white house , removed mask

==> सर, ह्या उदाहरणावरून positive निष्कर्ष वा नविन उपचारांची दिशा दिसू शकते का ?

जगातील सर्वांत प्रबळ व्यक्तीला दिली जाणारी treatment must tried somewhere with positive results.
Some other than scientific global indicator are already in positive trend.....

कुमार१'s picture

7 Oct 2020 - 11:14 am | कुमार१

ह्या उदाहरणावरून positive निष्कर्ष वा नविन उपचारांची दिशा दिसू शकते का ? >>

चांगला प्रश्न.
यानिमित्ताने Regeneron कंपनीच्या वरील विशेष औषधाबद्दल लिहितो.

हे औषध दोन ताकदवान अँटीबॉडीजचे मिश्रण आहे. शरीरात गेल्यावर या अँटीबॉडीज सार्स-२ च्या टोकदार प्रथिनाशी संयोग करतात. हा विषाणू दरमहा दोन जनुकीय बदल करतोय. मात्र त्या प्रक्रियेत हे प्रथिन टिकून राहते. त्यामुळे या प्रथिनावर आघात करणारी औषधे ही खूप उपयुक्त ठरणार आहेत, कारण ती बदलत्या विषाणूचाही समाचार घेतील.
त्यादृष्टीने हे मिश्रण वरदान ठरू शकेल.

डिसेंबर 2020 पर्यंत ते मान्यताप्राप्त होऊन बाजारात येण्याची अपेक्षा आहे.

सतीशम२७'s picture

7 Oct 2020 - 12:19 pm | सतीशम२७

डिसेंबर 2020 पर्यंत ते मान्यताप्राप्त होऊन बाजारात येण्याची अपेक्षा आहे. ==> ++11

दरमहा दोन जनुकीय बदल करतोय==> बहुतेक हा सर्वांत मोठा अड्थळा असावा .

कुमार१'s picture

9 Oct 2020 - 9:44 am | कुमार१

कोविडमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे बाबतीत गरज व आजार-तीव्रतेनुसार केल्या जाणाऱ्या रक्तचाचण्या :

ok

मराठी_माणूस's picture

9 Oct 2020 - 3:46 pm | मराठी_माणूस

आयुष मिनिस्ट्री कडुन

https://in.yahoo.com/style/prevent-treat-covid-19-ayurveda-142308644.html

गोंधळी's picture

11 Oct 2020 - 11:22 am | गोंधळी

एक धक्कादायक बातमी वाचनात आली की IAS सुधाकर शिंदे यांची covid -19 टेस्ट निगेटिव्ह असुनही त्यांच निधन झाल.
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/ias-officer-sudhakar-...

वरील बातमी covid -19 टेस्ट वर संदिग्धता दर्शवनारी आहे की अजुनही टेस्ट foolproof नाही आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Oct 2020 - 12:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज आठेकमहिने झाले तरी आपण नक्की अशा टेष्टकिटवर विश्वास ठेवावा यावर मन तयार नाही. साधं सर्दीपडसे वाले अंग कसकस करतात तेही पॉझीटीव येत असतील असे मला वाटते. सालं विश्वासच राहीला नाही.

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

11 Oct 2020 - 12:03 pm | कुमार१

गोंधळी,
बातमी वाचली.
Foolproof चा प्रश्न नाही. मुळात RT-PCR + येण्याच्या काही अंगभूत मर्यादा अशा आहेत:

नाकातील swab : सुमारे ६५ %
घशातील swab : ...... ४० %

श्वसनमार्गात खालपर्यंत खोलवर जाऊन नमुना घेतल्यास ते प्रमाण ९४% च्या आसपास असते. पण हे नियमित स्वरुपात करणे शक्य नसते. म्हणून काही वेळेस रुग्णाची प्रत्यक्ष तपासणी, CT इत्यादी प्रतिमाचाचण्या असे सर्व बघून निदान करावे लागते.

गामा पैलवान's picture

12 Oct 2020 - 3:18 am | गामा पैलवान

प्राडॉ,

कुणावरही विश्वास ठेवता येत नाही हे जे तुम्ही म्हणता ते अगदी खरंय. इथे अमेरिकी सरकारचं एक पीडीएफ कागदपत्र आहे : https://www.fda.gov/media/134922/download

यांत पान क्रमांक ३९ ( पीडीएफ क्रमांक ४०) वर खालील मजकूर आहे :
https://i.imgur.com/zBFVnlA.jpg

अधोरेखीत केलेलं वाक्य : Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available, ...

याचा अर्थ 'कोविद २०१९-एनसीओव्ही' हा विषाणू आजूनपर्यंत ( म्हणजे १३ जुलै २०२० पर्यंत) पूर्णपणे विलग केला गेला नाही. हे अमेरिकी सरकारचं अधिकृत विधान आहे.

तरीपण तो ओळखणाऱ्या चाचण्या मात्र बिनदिक्कीतपणे चालू आहेत. नंतर म्हणे त्यावर लस निघणार आहे.

यांस सामान्यजनांच्या भाषेत भंपकपणा म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Oct 2020 - 5:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या येथील, म्हणजे मिपावरील तज्ञ काय म्हणतात ? प्रतीक्षेत.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

15 Oct 2020 - 10:14 am | सुबोध खरे

गा पै

याचा अर्थ 'कोविद २०१९-एनसीओव्ही' हा विषाणू आजूनपर्यंत ( म्हणजे १३ जुलै २०२० पर्यंत) पूर्णपणे विलग केला गेला नाही. हे अमेरिकी सरकारचं अधिकृत विधान आहे.

तरीपण तो ओळखणाऱ्या चाचण्या मात्र बिनदिक्कीतपणे चालू आहेत. नंतर म्हणे त्यावर लस निघणार आहे.

यांस सामान्यजनांच्या भाषेत भंपकपणा म्हणतात.

आपण चुकीचा निष्कर्ष काढलेला आहे.

विलग केलेला सार्स कोव्ही २०१९ विषाणू हा कोणत्याही छोट्या मोठ्या प्रयोगशाळेत उपलब्ध नाही जेथे विषाणूची अत्यन्त काटेकोर अशी व्यवस्था नाही (कारण तेथून तो जनतेत पसरु शकतो)

परंतु मोठ्या प्रयोगशाळा उदा राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा पुणे (NIV) सारख्या प्रयोगशाळांमध्ये हा उपलब्ध आहे किंवा तेथून तो संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांसाठी उपलब्ध होऊ शकतो.

पहा

On January 22, 2020, CDC received a clinical specimen collected from the first reported U.S. patient infected with SARS-CoV-2. CDC immediately placed the specimen into cell culture to grow a sufficient amount of virus for study.

SARS-CoV-2, the virus that causes COVID-19, was isolated in the laboratory and is available for research by the scientific and medical community.

https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/lab/grows-virus-cell-culture.html

आणि हि ५ मे ची बातमी आहे.;

गामा पैलवान's picture

15 Oct 2020 - 8:30 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

तुम्ही दिलेला दुवा वाचला. यातनं आजूनेक प्रश्न उद्भवतो.

जर या विषाणूचा यथोचित नमुना उपलब्ध असेल तर विषाणूरोगविभागाने ( Division of Viral Diseases ) त्या पीडीएफ धारिकेत नकारार्थी उल्लेख का केला आहे? अमेरिकी सरकारच्या रोगनियंत्रण व प्रतिबंध खात्याच्याच दोन विभागांत समन्वय नाही, असा अर्थ निघतो.

ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये एक लेख आला आहे : https://www.bmj.com/content/371/bmj.m3925

हा लेख व्यावसायिक वैद्यकीय प्रकाशनात छापायच्या लायकीचा आजिबात नाही. ब्रिटीश मेडिकल जर्नल एक नाणावलेले प्रकाशन आहे. त्यांनी हे असले राजकीय लेख छापायला नकोत. मुरार येवलेकर या मुंबईच्या डॉक्टरने निषेध व्यक्त केला आहे. साहजिकच वैद्यकजगतातले अनेक डॉक्टर लोकं कोविडच्या अस्तित्वाविषयी शंका प्रदर्शित करीत आहेत.

वरील लेखाचे प्रतिसाद इथे आहेत : https://www.bmj.com/content/371/bmj.m3925/rapid-responses

प्रतिसादांत दोन डॉक्टरांनी 'Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available ....' या विधानाचं स्पष्टीकरण मागितलं आहे.

अशी वेळ ब्रिटीश मेडिकल जर्नल वर येणं हेच कोविड हे थोतांड असल्याचं प्रमुख लक्षण आहे. निदान मी तरी तसंच मानतो. बाकी वाचकांची आपापली मर्जी.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

16 Oct 2020 - 10:23 am | सुबोध खरे

दोन डॉक्टरांची राजकीय आणि पूर्वग्रहदूषित वक्तव्ये यापलीकडे त्याच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.

चौकस२१२'s picture

14 Oct 2020 - 9:48 am | चौकस२१२

करोना हे थोतांड आहे. टाळेबंदी हे महाथोतांड आहे.
ऐकून धन्य झालो परत एकदा
आता किती दिवस उगाळणार हे पैलवान ?
बास कि आता. एवढे मेले जगभर कि ते जिवंतच आहेत? आणि त्यांना मोहावी किंवा थर च्या वाळवंटात दडवून ठेवलाय !

गामा पैलवान's picture

14 Oct 2020 - 6:13 pm | गामा पैलवान

चौकस२१२,

१.

ऐकून धन्य झालो परत एकदा

तुम्हांस धन्य व्हायला इतका वेळ लागला हे पाहून अंमळ खेद झाला. पण काही हरकत नाहो. देरसे आये दुरुस्त आये, असं म्हणूया.

२.

आता किती दिवस उगाळणार हे पैलवान ?

2019-nCoV चे quantified virus isolates मिळेपर्यंत तरी हेच उगाळायचा बेत आहे. नंतरचं नंतर बघू.

३.

बास कि आता. एवढे मेले जगभर कि ते जिवंतच आहेत? आणि त्यांना मोहावी किंवा थर च्या वाळवंटात दडवून ठेवलाय !

मृत्यूच्या प्रमाणपत्रावर करोनाचा शिक्का मारायला काय थोर अक्कल लागते?

असो.

मी पहिल्यापासनं करोना हे थोतांड आहे व टाळेबंदी हे महाथोतांड आहे असं म्हणंत होतो. त्या भूमिकेपासनं मी तसूभरही ढळलेलो नाही. याबद्दल मी स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेत आहे.

धन्यवाद !

आ.न.,
-गा.पै.

आंबट चिंच's picture

16 Oct 2020 - 7:32 pm | आंबट चिंच

मी पहिल्यापासनं करोना हे थोतांड आहे>>>> ओ गा. पै मागे खफवर तुम्हाला मी जेव्हा सांगितले की तुम्ही करोना रुग्णांची देखभाल (थोडीशी सेवा) करणार का तेव्हा आठवडाभर इकडे फिरकलातच नाहीत.
आता सुध्दा तिथे परदेशात असलात तर कोणत्याही करोना सेंटरला भेट देवुन तिथल्या लोकांची तरी सेवा करा की बिनधास्त, घाबरयंचंच नाही. बोला आहात कबुल?

आपल्या विटेकर साहेबांना विचारा त्यांच्या मुलाने ती सेवा प्रत्यक्ष केली आहे.

आणि जर तुम्ही म्हणताय तर इथे साधी (जनरल) प्रक्टीस करणार्या डॉ. लोकांनी कशाला घाबरुन मुखवटा, पीपीई किट या गर्मीत घालण्याचा अट्टाहास केला असता. त्यात त्यांचा काय वैयक्तीक फायदा?

गामा पैलवान's picture

16 Oct 2020 - 10:13 pm | गामा पैलवान

आंबट चिंच,

सेवा करायला गेलो आणि मी मेलो म्हणजे? करोना हा फ्ल्यूसारखा आहे. त्याची भीती माझ्यासारख्या हृदयविकारी वा तत्सम पूर्वपीडित लोकांना आहे. बाकीच्यांना नाही. चाचण्या आणि मुखपट्टी यांचा सर्वसाधारण मनुष्यास फुटक्या कवडीइतकाही उपयोग नाही.

फ्ल्यूमुळे दरवर्षी हजारोंनी विकारप्रवण लोकांचे मृत्यू होतात. कधी फ्ल्यूची साथ आल्याचं ऐकलंय का? मग करोनाचीच साथ कशी काय आली?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

17 Oct 2020 - 12:02 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

यु.के.च्या दुव्यांबद्दल धन्यवाद.

हा एक दुवा उघडला : https://www.expressandstar.com/news/uk-news/2020/03/03/history-of-major-...

त्यात स्वाईन फ्ल्यू मुळे २००९/१० साली ४५९ मृत्यू झाल्याचं दिसलं. १९१८/१९ साली स्पॅनिश फ्ल्यू आला होता तेव्हा २,००,००० मृत्यू झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ४५९ हा अत्यंत किरकोळ आकडा आहे. तरीही स्वाईन फ्ल्यूची 'साथ आल्या'चं म्हंटलं जातं.

आता असं बघा की, इंग्लंड व वेल्स मध्ये साध्या फ्ल्यू मुळे दरवर्षी सुमारे १०,००० लोकं मरतात (संदर्भ : https://www.greenwichccg.nhs.uk/News-Publications/news/Pages/Around-10,0... ) . पण तरीही साध्या फ्ल्यूची 'साथ आल्या'चं मानीत नाहीत.

हा भेदभाव कशामुळे? 'करोनाची साथ आल्या'चं मानावं का?

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

17 Oct 2020 - 12:47 pm | सुबोध खरे

साध्या फ्ल्यूची 'साथ आल्या'चं मानीत नाहीत.

फ्ल्यू चा हंगाम/ सिझन असल्याचे मानले जाते. साथ नाही.

याचे कारण हे दरवर्षी थंडीच्या मोसमात तेथेच वातावरण असलेले विषाणू सक्रिय होतात आणि एकाच वेळेस फार मोठ्या लोकसंख्येला प्रादुर्भाव होत नाही.

( खरं तर साथ आणि हंगाम यातील रेषा फार धूसर आहे).

शिवाय विषाणूतील जनुकीय बदलामुळे दर वर्षी वेगळी लस तयार करावी लागते याचा खर्च मोठा आहे.

या साथीमध्ये साधारण निरोगी माणसांना काहीहि होत नसल्याने आणि रोज मरे त्याला कोण रडे या न्यायाने कायमच असलेल्या फ्ल्यू च्या सीझनकडे थोडे दुर्लक्ष होते हा वस्तुस्थिती.

कोव्हीड हा खरं तर एक फ्ल्यू सारखाच आजार आहे परंतु एकाच वेळेस लक्षावधी लोकांना लागण झाली, कोणतेही आजार नसलेले निरोगी तरुण याला बळी पडले आणि सार्वजनिक न्यासावर त्याच्या कहाण्या भडक स्वरूपात रंगवून सांगितल्यामुळे जनमानसात घबराट पसरली आहे.

मराठी_माणूस's picture

16 Oct 2020 - 10:16 am | मराठी_माणूस

https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/16102020/0/3/

रुग्णालयांची लोकांना भिती वाटते असे म्ह्टले आहे. इतके दिवस होउन ही लोकांच्या मनातील भिती दुर करता आली नाही हे एक अपयशच.

गामा पैलवान's picture

16 Oct 2020 - 6:52 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,


दोन डॉक्टरांची राजकीय आणि पूर्वग्रहदूषित वक्तव्ये यापलीकडे त्याच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.

मूळ प्रश्न तसाच आहे. 2019-nCoV खरोखरंच अस्तित्वात आहे का? अमेरिकी सरकारच्या रोगनियंत्रण खात्याचा एक विभाग हो म्हणतोय तर दुसरा नाही म्हणतोय.

शक्य झाल्यास तुमचं मत ऐकायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

16 Oct 2020 - 7:10 pm | सुबोध खरे

2019-nCoV खरोखरंच अस्तित्वात आहे का?

हो १०० % खात्रीने.

पण तो प्रयोगशाळेत मुद्दाम तयार केला (संकरित बियाणे सारखा दोन विषाणूंचे जनुकीय मिलन करून) जैविक शस्त्र म्हणून

कि

नैसर्गिक याबद्दल सांगता येणार नाही

पृथ्वी सपाट आहे याबद्दल तुमचं काय मत आहे ? ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2020 - 12:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा प्रतिसाद काढून टाका रे कोणीतरी......!

-दिलीप बिरुटे

गामा पैलवान's picture

16 Oct 2020 - 9:08 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

हा विषाणू अस्तित्वात असेल तर तो ओळखायची चाचणी नेमकी काय आहे? तिची विश्वासार्हता काय आहे? यावर एखादा लेख जमलं तर लिहा म्हणून सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

Ajit Gunjal's picture

16 Oct 2020 - 8:53 pm | Ajit Gunjal

Covid 19

मास्क वापरणे व सोशियाल अंतर पाळणे आवश्यक आहे.
कोव्हीडची रुग्णसंख्या लोकांच्या भयगंडामुळे नव्हे कोव्हीड पसरू न देण्यासाठी आवश्यक काळजी न घेतली गेल्यामुळे वाढली.

Ahmednagar News

माहितगार's picture

17 Oct 2020 - 3:05 pm | माहितगार

एकदम बरोबर

खालील दुवे संशोधनातील प्रगतीच्या एका दिशे संदर्भाने विषय तज्ञांसाठी आहेत, संशोधन अद्यापी अपुर्णावस्थेतील असल्याने सर्वसामान्यांनी डॉक्टरी सल्ल्यांशिवाय स्वयंप्रयोग करू नयेत हे वेगळे सांगणे न लगे.

* Until Covid-19 vaccine arrives, nitric oxide can cure patients, save lives | Study

* Harnessing nitric oxide for preventing, limiting and treating the severe pulmonary consequences of COVID-19

* Nitric oxide supplements: Benefits, effectiveness, and risks

citrulline सारखी काही संज्ञा दिसते आहे ज्या बद्दल सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने तज्ञांकडून अधिक जाणून घेणे आवडेल.

कुमार१'s picture

17 Oct 2020 - 4:41 pm | कुमार१

माहीतगार,
तुमचा NO याबद्दलचा प्रश्न खूप चांगला आहे.
सविस्तर उत्तर तयार करत आहे.
जरा वेळाने देईन

कुमार१'s picture

17 Oct 2020 - 5:39 pm | कुमार१

नायट्रिक ऑक्साईड (NO) हा वायू श्वसनाद्वारे उपचार म्हणून पूर्वीपासून वापरात आहे. ARDS यासम आजारांत जेव्हा रुग्ण तीव्र ऑक्सीजनन्यून होतात, तेव्हा तातडीचा उपचार (rescue) म्हणून त्याचे महत्त्व प्रस्थापित आहे.

कोविड संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून त्याचे रुग्णप्रयोग चालू आहेत. हा वायू जेव्हा श्वसनाद्वारे दिला जातो तेव्हा त्याचे शरीरातील गुणधर्म असे असतात :

१. फक्त फुप्फुसातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात
२. दाह प्रतिबंधक
३. रक्तगुठळी प्रतिबंधक
४. श्वासनलिकाना मोकळ्या करणे (bronchodilator)
५. त्याच्या प्रत्यक्ष सार्स-२ विषाणूविरोधी गुणधर्मबाबत अभ्यास चालू आहे.

गेल्याच महिन्यात त्याच्या उपचाराबाबत एक मर्यादित रुग्णप्रयोग गरोदर स्त्रियांवर करण्यात आला. या सर्व स्त्रियांना तीव्र कोविड झालेला होता. त्यांना कुठलेही अन्य विषाणूविरोधी औषध दिलेले नव्हते. थेट या वायूचे उपचार 22 दिवस दिले गेले. त्यातून त्यांचा श्वसनअवरोध आणि धाप खूपच सुधारले आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाणही चांगले झाले.

अजून मोठ्या प्रमाणावरील ट्रायलस (RCT) झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

पुढे चालू....

कुमार१'s picture

17 Oct 2020 - 5:40 pm | कुमार१

सर्व कोविड रुग्णांसाठी NO हा वायू उपचार म्हणून वापरण्यात मात्र काही महत्त्वाच्या अडचणी आहेत :

१. हा वायू शरीरात अत्यल्प काळ टिकतो
२. तो नाकाद्वारे देणे हे बरेच कटकटीचे काम असते
३. तो खूप महाग आहे.

येत्या काही महिन्यात याबाबतचे अधिक संशोधन होईल अशी आशा आहे

डॉ. कुमार, क्लिष्टता टाळून सोप्या शब्दात आकलन सुलभ माहिती देण्यासाठी अनेक आभार.

कुमार१'s picture

28 Oct 2020 - 11:56 am | कुमार१

कोविड विरोधी औषधशोध : घडामोडी

१. Remdesivir : एकमेव एफडीए मान्यताप्राप्त औषध. फक्त गंभीर आजाराने रूग्णालयात दाखल असलेल्यांसाठी (ठराविक) शिफारस. उपयुक्ततेबाबत अंतरराष्ट्रीय एकमत नाही.

२. Remdesivir + bamlanivimab ही antibody : रूग्णालयात दाखलच्या बाबतीत निष्कर्ष उपयुक्त न निघाल्याने प्रयोग थांबवले.

३. दोन antibodies चे मिश्रण : प्रयोग शेवटच्या टप्प्यात. निष्कर्ष बरेच आशादायक.

मराठी_माणूस's picture

28 Oct 2020 - 6:09 pm | मराठी_माणूस

हा विषाणू फुफ्फुसावर परीणाम करतो हे माहीत होतो. ह्या बातमीत , त्याचा मेंदुवर देखील परीणाम होतो असे म्हटले आहे. हे कसे काय होते

https://www.loksatta.com/desh-videsh-news/brains-of-patients-recovering-...

कुमार१'s picture

28 Oct 2020 - 7:40 pm | कुमार१

ममा,

या बातमीचा मूळ स्त्रोत पाहता सध्या ते संशोधन अन्य तज्ञांच्या परीक्षणातून गेलेले नाही. तथापि, कोविडचा मेंदूवर परिणाम यावर आतापर्यंत ज्या थिअरीज मांडल्या गेल्या आहेत त्या अशा :

१. विषाणूचा मेंदु पेशींवर थेट हल्ला
२. रक्त गुठळी >> मेंदूचा ऑक्सिजन पुरवठा कमी >> स्ट्रोक. मेंदूच्या शुभ्र भागास (white mater) इजा होणे.
३. या जोडीला जर फुफ्फुसे व यकृतावर देखील परिणाम झाला असेल तर त्याचाही अप्रत्यक्ष परिणाम मेंदूवर होतो.

या महत्त्वाच्या विषयावर अधिक संशोधनाची व तज्ञ परीक्षणाची गरज आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2020 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देशभर आणि महाराष्ट्रात एकूणच रुग्णसंख्या कमी होत आहे, असे दिसत आहे. नेमकं काय घडत असावे त्यामुले हे प्रमाण कमी दिसत आहे, त्याचबरोबर इतर काही देशात पुन्हा लॉकडाऊन केल्याचे बातम्या येतांना दिसत आहे. रुग्णसंख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे, तर आपल्या देशातील धोका टळत आहे काय ?

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

30 Oct 2020 - 10:20 am | कुमार१

प्राडॉ,

तर आपल्या देशातील धोका टळत आहे काय ?

एक मुद्दा ध्यानात घ्यावा.

महासाथ कधी एकदम जात नाही. सुरवातीस खूप जोर असतो. >> ओसरतो. >> पुन्हा डोके वर काढते >> पुन्हा ओसरते .
हे चक्र किमान २ वर्षे चालते. >>>> तो आजार सामान्य होतो.

म्हणजे सध्या आपण वरील चक्रात २ वर आहोत तर अन्य काही देश ३ वर आहेत.
सध्या निरीक्षण करूया. ठाम सांगता येत नाही.
संयम ठेवावा लागेल.

मराठी_माणूस's picture

30 Oct 2020 - 10:27 am | मराठी_माणूस

म्हणजे पुन्हा एकदा पुरेशा अवधी शिवाय टाळेबंदीची शक्यता आहे ? (खुप घाबरलेला चेहरा कल्पावा)

माहितगार's picture

30 Oct 2020 - 5:11 pm | माहितगार

डॉ.कुमार,
जिथे दुसरी किंवा तिसरी लाट येते आहे तिथे आधीच्याच म्युटेशनची लागण झालेल्यांची संख्या किती या बद्दल बातम्यात काही दिसत नाही त्याबद्दल काही अधिक माहिती आहे का?

कुमार१'s picture

30 Oct 2020 - 10:37 am | कुमार१

जोपर्यंत रुग्णसंख्या घटती/स्थिर आहे तोपर्यंत काळजी नसावी.

जर का थंडीत वाढ दिसली तर त्यानुसार यथायोग्य निर्णय होईल. नाही तसे झाले तर छानच.

माहितगार's picture

30 Oct 2020 - 5:07 pm | माहितगार

डॉ. कुमार, ड्युक विद्यापीठातील कुणी डॉ. पुरुषोत्तम टाटा म्हणून आहेत त्यांनी मानवी शरीराबाहेर मानवी फुफ्फुसावर प्रयोग करण्याची सक्षमता मिळवल्याचे मागच्या आठवड्यात हे एनडीटीव्ही वृत्त होते.

मुलाखतीतून हे मानवी फुफ्फुसावरील प्रयोग आहेत अथवा प्रतिकृतीवरील हे नीटसे लक्षात आले नाही प्रतिकृती असेलतर हुबेहुब पणा कसा साध्य केला आणि मानवी अवयवदानातील असेल तर शरीराबाहेर सक्रीय कसे ठेवले? आणि मानवी अवयवदानातून असेल तर प्रत्येक प्रयोगासाठी वेगळे अवयवदान मिळावयास हवे तेवढाच प्रयोगांचा वेग कमी राहील का? आणि आतापर्यंतच्या प्रयोगाचा आढावा इत्यादी बद्दल जिज्ञासा आहे .

एनडीटीव्ही वृत्त युट्यूब दुवा

https://www.youtube.com/watch?v=aDGwdHc8lc8

कुमार१'s picture

30 Oct 2020 - 5:13 pm | कुमार१

तुमचा दुवा फ्रांस व मुस्लीम ..... हे दाखवतोय !

माहितगार's picture

30 Oct 2020 - 5:16 pm | माहितगार

सॉरी, दुवा पुन्हा एकदा देतोय
https://www.youtube.com/watch?v=RCBmntVkZeg

कुमार१'s picture

30 Oct 2020 - 6:30 pm | कुमार१

मागा

दुवा पाहिला. सदर संशोधकांनी प्रयोगशाळेमध्ये मानवी फुप्फुसाच्या मूळ पेशींपासून शरीराबाहेर फुप्फुसपेशी तयार केल्या. या पेशी अगदी शरीरातील मानवी पेशी प्रमाणेच असतात. आता त्यांच्यावर प्रत्यक्ष विषाणूचा संसर्ग घडवला आणि ज्या काय रासायनिक घडामोडी होतात त्या अभ्यासल्या.
(अवयवदानाचा काहीही संबंध नाही. मानवी अवयव प्रत्यक्ष तयार केला आहे !)

हे एक सुंदर अभ्यास प्रारूप आहे. याचा अजून पुढे फायदा आहे. एकदा प्रयोगशाळेत आपल्या डोळ्यांसमोर शरीरातील रासायनिक घडामोडी दिसल्या, की मग तिथेच निरनिराळ्या औषधांचे प्रयोग देखील सुलभपणे करता येतात. सध्या मूळ पेशीच्या संशोधनाने खूपच मोठी मजल मारलेली आहे. हा त्याचा एक सुंदर आविष्कार म्हणता येईल.

इथे मिपावर मूळ पेशी या विषयांवर पूर्वी एक सुरेख चर्चा झालेली आहे त्याचा हा दुवा

माहितगार's picture

30 Oct 2020 - 7:38 pm | माहितगार

खरेच छान माहिती आहे. पेशींवरील परिणाम प्रत्यक्षात आणि जवळून अभ्यासता येणे हा मोठाच फायदा म्हणता येईल. त्यांच्या चाचण्यांना लौकर यश यावे अशी इच्छाकरूयात. प्राण्यांवरचे प्रयोगाची स्टेज टाळणे इत्यादी फायदे होतीलच.

वीषाणूंचे अस्तीत्व नाकारणारे महाभाग आहेत त्या मंडळींनाही संशोधक खोलात अभ्यास करून माहिती देताहेत याचाही विश्वास देता येईल.

कुमार१'s picture

31 Oct 2020 - 5:41 pm | कुमार१

नेहमीच्या ‘फ्लू’ विषाणूंच्या तुलनेत सध्याच्या विषाणू संदर्भात शरीराचा अँटीबॉडीज प्रतिसाद बराच वेगळा व काही वेळेस विचित्र आलेला आहे.
काही ठळक मुद्दे :

१. सहसा संसर्गनंतर तीन आठवड्यांनी अँटीबॉडीची पातळी चांगली असते. सध्याच्या संसर्गात अगदी 10 ते 12 व्या दिवसापासून देखील अँटीबॉडीची पातळी मोजण्याइतकी दिसून आली.

२. अँटीबॉडी चाचणी ++ असतानाही काही रुग्ण RT-PCR + दाखवत आहेत.

३. शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजपैकी काही ठराविकच विषाणूमारक प्रकारच्या आहेत. पण त्यामुळे प्रत्येक रुग्णाला भावी संरक्षण मिळेलच असे नाही. काहींच्या बाबतीत तर त्यांनी शरीराला अधिक इजा घडवली. त्यामुळेच मूळ आजार वाढत गेला.

४. एखाद्या व्यक्तीत अँटीबॉडीज असल्या तरीही तो इतरांसाठी रोगप्रसारक ठरू शकतो. त्यामुळे या चाचणीकडे ‘सुरक्षा चाचणी’ म्हणून पाहता येणार नाही. (काही लोक कामवाल्या व्यक्तींना बोलावण्यासाठी याचा आधार घेत आहेत). या चाचणीतून आपण सुरक्षेबाबत खात्रीशीर काही बोलू शकत नाही.

माहितगार's picture

31 Oct 2020 - 7:04 pm | माहितगार

डॉ. कुमार
क्र. २ आणि ४ महत्वाचे मुद्दे वाटतात, यांचा विचार मला वाटते डोळस स'तर्क'तेने व्हावयास हवा का. शरीरात अँटीबॉडी असल्या आणि त्यांनी वीषाणू विरोधी 'यशस्वी झूंज' दिली तरी झूंज चालू असतानाच्या कालावधीत शरीरात प्रयत्नरत वीषाणू असणारच आणि ते संक्रमित होऊ शकणार असेच काहीसे आपल्याला म्हणायचे आहे का?

या वरून आठवले, माननीय पंप्रच्यां एका सभेसाठी कोविड होऊन गेलेल्या पोलीसांना सुरक्षेसाठी वापरल्याची बातमी होती तेव्हा मला हाच प्रश्न पडला होता.

कुमार१'s picture

31 Oct 2020 - 7:42 pm | कुमार१

झूंज चालू असतानाच्या कालावधीत शरीरात प्रयत्नरत वीषाणू असणारच आणि ते संक्रमित होऊ शकणार

होय, बरोबर.

खास करून ज्यांच्यात अँटीबॉडीज लवकर निर्माण होताहेत ते तर बऱ्यापैकी विषाणू घेऊन असतात.

कुमार१'s picture

3 Nov 2020 - 9:23 pm | कुमार१

कोविडवरील प्रभावी औषधाचा शोध चालूच आहे. आज अखेर सुमारे तीनशे औषधांचे शास्त्रीय रुग्ण प्रयोग चालू आहेत. त्यापैकी एक रोचक असल्याने लिहितो.
या औषधाचे नाव आहे cannabidiol (CBD).

मुळात ते Cannabis sativa या वनस्पतीपासून मिळवले जाते. शुद्ध मराठीत ही आहे भांग !

ok

या औषधाला विषाणू विरोधी आणि दाहप्रतिबंधक गुणधर्म आहेत. हे औषध विशिष्ट मेंदू विकारांसाठी याआधीच वापरात आहे.
सध्याचे त्याचे प्रयोग आता शेवटच्या टप्प्यात आहेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2020 - 4:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. आभार.

-दिलीप बिरुटे

मराठी_माणूस's picture

4 Nov 2020 - 2:44 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/mumbai-news/suffering-from-sudden-deafness-due-...

आधी मेंदु बद्दल वाचले होते आता हे .

कुमार१'s picture

4 Nov 2020 - 4:29 pm | कुमार१

या विषाणूमुळे छोट्या रक्तवाहिन्यांच्या अस्तराला इजा होते. >>> दाह.
त्यातून संबंधित अवयवांना इजा पोहोचते, ही मूलभूत गोष्ट आहे.
काही तुरळक रुग्णांच्या बाबतीत कानाच्या आतील एका नाजूक भागाला इजा झाल्याचे आढळले आहे.
यावर अधिक अभ्यास चालू आहे.

अर्थात अजून दोन्ही गोष्टींचा कार्यकारणभाव पुरेसा सिद्ध झालेला नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2020 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजच्या लोकसत्ता नागपूर आवृत्तीत एक बातमी होती. गरम पाणी आणि काढ्याच्या अतिरेकामुळे धडधाकट व्यक्तींनाही नवे आजार. विषाणू शरीरात शिरल्यावर घशाच्या त्वचेवर फार काळ राहत नाही, लगेचच तो पेशीमधे प्रवेश करतो. त्यामूले काढा, गरमपाण्याची वाफ किंवा गरम पाणी घेतल्याने विषाणूपासून प्रतिबंध होण्याबाबत कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. तेव्हा या गैरसमजांना बळी पडू नये असा सल्ला डॉ.भूमकर यांनी दिला आहे.

खरं तर आता आठ महिन्यानंतर अशा बातम्या येणे म्हणजे फार उशीर झालेला असतो. करोनाचा प्रतिबंध म्हणून आत्तापर्यंत लोकांनी काय काय उपाय केले असतील हे त्यांना आणि देवांनाच ठाऊक. विषाणू प्रतिबंधासाठी मधे मधे मालेगावचा काढ्याबद्दल असेच बोलले जात होते, नंतर मूळव्याधाच्या बातम्या येऊ लागल्या. खरं तर लोकांची काहीही चूक नसते, आरोग्यासाठी महत्वाचे म्हणजे जीव वाचविण्यासाठी असे सर्व प्रयोग होत असतात आणि नव्या आजाराची सुरुवात झालेली असते.

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

5 Nov 2020 - 2:31 pm | कुमार१

वरील दोन्ही प्रतिसादांशी सहमत.

योग्य त्या सल्ल्याविन्या केलेले स्व-उपचार तापदायक ठरतात.

कुमार१'s picture

9 Nov 2020 - 9:05 pm | कुमार१

टाटा उद्योगाने तयार केलेली ‘फेलुदा’ ही कोविड निदानाची चाचणी (RT-PCR ला समकक्ष ) आता उपलब्ध झाली आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे 75 मिनिटात तिचा निकाल मिळतो. ती प्रयोगशाळेत करायला तुलनेने खूप सोपी आहे.
महिन्याला दहा लाख चाचण्या करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे.

बातमी
https://www.thehindu.com/news/national/tatamd-launches-new-test-for-covi...

कुमार१'s picture

12 Nov 2020 - 1:42 pm | कुमार१

फायझर कंपनीच्या अत्याधुनिक लशीसाठी पडद्यामागे राहून ज्यांनी काम केले ते वैज्ञानिक आहेत डॉ. उगुर साहीन व डॉ. उझ्लेम तुरेसी.
अल्प परिचय इथे :

मराठी_माणूस's picture

15 Nov 2020 - 10:15 am | मराठी_माणूस

कोवीड होउन गेलेल्या व्यक्तीला किती काळा नंतर भेटणे योग्य (म्हणजे संसर्गाची शक्यता शुन्य)

कुमार१'s picture

15 Nov 2020 - 1:53 pm | कुमार१

साधारण एक महिन्याने जरूर भेटा.
भेटताना सुरक्षित अंतर आणि दोघांनी मुख्यपट्ट्या लावायच्या, ही काळजी अधिक महत्त्वाची.

कुमार१'s picture

21 Nov 2020 - 7:52 pm | कुमार१

आताच सहयाद्री वाहिनीच्या बातम्या पाहिल्या. संपूर्ण बातम्या होईपर्यंत निवेदिकेचे तोंड पूर्ण मोकळे असते. बातम्या संपताना त्या कोविड विरोधी त्रिसूत्रीचे आवाहन करतात. ते करत असतानाच त्या तोंडावर पट्टी व्यवस्थित बांधून घेतात. मगच बातम्या संपतात.

सुरेख लोकशिक्षण !
अभिनंदन !

कुमारजी ह्या बातमी मध्ये किती तथ्य आहे असं वाटतं??

https://www.cnbc.com/2020/11/18/who-warns-vaccine-wont-help-countries-fend-off-current-wave-of-infections-.html

कुमार१'s picture

22 Nov 2020 - 10:01 am | कुमार१

होय, त्यात तथ्य आहे.

१. सध्या युरोप-अमेरिकेत दुसरी लाट तेजीत आहे

२. आजारी लोकांना लवकर रोगमुक्त करायला प्रभावी औषधाची गरज आहे; अजून ती भागलेली नाही

३. प्रतिबंध त्रिसूत्री अजूनही दीर्घकाळ महत्वाची आहे पण लोक बेफिकीर होताहेत

४. लसीकरण यशस्वी व व्यापक व्हायला बराच काळ जाईल. तोपर्यंत रोगप्रसार चालू राहतो

५. अंशतः रोगनियंत्रण होत राहिले तरी २०२१ देखील झगडण्यात जाईल हा अंदाज.

मराठी_माणूस's picture

22 Nov 2020 - 6:32 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/desh-videsh-news/who-suspends-remdesivir-from-l...

ज्या औषधाच एव्हढा बोलबला होता , काळाबाजार होत होता असेही ऐकले होते , त्या औषधा बद्दल आता ही बातमी. सामान्य लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा.

कुमार१'s picture

23 Nov 2020 - 8:44 pm | कुमार१

सौम्य ते मध्यम कोविड झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी Regeneron कंपनीच्या दुहेरी अँटिबॉडी उपचारास अमेरिकी औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे.

ही मान्यता 'तातडीचे उपचार' (EUA) या सदराखाली दिली आहे.

मराठी_माणूस's picture

24 Nov 2020 - 10:40 am | मराठी_माणूस

हर्ड इम्युनिटि बद्दल ची एक बातमी.

https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/23112020/0/0/ (ह्या पानावर सगळ्यात खाली)

कुमार१'s picture

24 Nov 2020 - 10:52 am | कुमार१

बातमी रोचक आहे. पण मुळात सामूहिक प्र-शक्ती कशी येईल यावर तज्ज्ञांचे उघड दोन गट पडलेत.

१. ती नैसर्गिक आजारातून येईल : इथे मग टक्केवारीचे विविध आकडे येतात

२. ती १ नुसार येणार नसून लसीकरणानेच येईल.

माहितगार's picture

24 Nov 2020 - 6:00 pm | माहितगार

डॉकजी, मला वाटते जर्मन लोकांचा मूळ रिपोर्ट बघणे श्रेयस्कर असावे कारण मराठी दैनिकाच्या वार्ताहराने कोणत्या आधारावर भारतातील वैविध्याशी संबंध जोडला ? महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत कमी वैविध्यता होती का की म्हणून मुबंईत बराच पसरला. वृत्तपत्रिय वार्तांकने हेडलाईन बनवण्याच्या नादात मूळ रिसर्च रिपोर्टचे तीन तेराही करू शकतात.

कुमार१'s picture

24 Nov 2020 - 6:08 pm | कुमार१

वृत्तपत्रिय वार्तांकने हेडलाईन बनवण्याच्या नादात मूळ रिसर्च रिपोर्टचे तीन तेराही करू शकतात.

>>> + ११२२
या विषयातल्या पेपरच्या बातम्या मी गांभीर्याने घेत नाही.
कोणी इथे विचारले तरच बघतो.

कुमार१'s picture

26 Nov 2020 - 12:17 pm | कुमार१

करोना रुग्णांची सेवा करण्यासाठी मृत्यूचाही पराभव करुन परतणारे डॉक्टर जलील पारकर

https://www.loksatta.com/mumbai-news/doctor-jalil-parkar-who-saw-death-a...

तेथे कर माझे जुळती !

कुमार१'s picture

29 Nov 2020 - 9:50 pm | कुमार१

कोविड निदानासाठी प्रचलित RT-PCR या पद्धतीपेक्षा एक नवीन तंत्रज्ञान (RT-LAMP) आता भारतात उपलब्ध झाले आहे.
पहिल्या पद्धतीपेक्षा त्याचे पुढील फायदे आहेत :

१. या तंत्रात महागडी उपकरणे लागत नाहीत
२. ३० मिनिटात निष्कर्ष हाती येतो.

३. संबंधित चाचणीची रसायने ४ डिग्री C तापमानात -म्हणजे साध्या फ्रिजमध्ये- ठेवता येतात.
४. यासाठी अतिकुशल तंत्रज्ञांची गरज नसते.

५. निष्कर्ष RT-PCR शी समकक्ष आहेत.

मराठी_माणूस's picture

30 Nov 2020 - 11:21 am | मराठी_माणूस

चाचणी बरोबर असण्याची टक्केवारी कीती आहे ?

कुमार१'s picture

30 Nov 2020 - 11:32 am | कुमार१

म मा,

ICMR च्या प्रमाणीकरणानुसार नव्या पद्धतीची :
१. सकारात्मक (+ve) निर्णयक्षमता १००%
आणि
२. नकारात्मक (-ve) निर्णयक्षमता ९९.३८%

अशी आहे. म्हणजेच उत्तम.

(https://www.thehindu.com/sci-tech/science/rt-lamp-a-new-technology-for-d...)

मराठी_माणूस's picture

1 Dec 2020 - 11:53 am | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/agralekh-news/serum-institute-files-rs-100-cror...

विचार करायला लावणारा लेख.

कुमार१'s picture

1 Dec 2020 - 9:12 pm | कुमार१

साखळी तुटली, तर प्रत्येकाला करोनाची लस देण्याची गरज नाही

-आयसीएमआर

बातमी

मराठी_माणूस's picture

2 Dec 2020 - 9:18 am | मराठी_माणूस

हे साखळी तुटणे म्हणजे नक्की काय होते ?

कुमार१'s picture

2 Dec 2020 - 10:46 am | कुमार१

ममा
संसर्ग साखळीचा अर्थ असा असतो:

समजा एक व्यक्ती बाधित आहे. तिच्यापासून दुसरी, पुढे दुसरी पासून तिसरी अशा तऱ्हेने साथ पसरत जाते. आता हे पसरण्याचे मार्ग आपल्याला माहित आहेतच. ते म्हणजे बाधित व्यक्तीच्या शिंकणे, खोकणे इत्यादीतून बाहेर पडलेले सूक्ष्मकण इतरांपर्यंत पोहोचणे.

जर आपण प्रतिबंध-त्रिसूत्री व्यवस्थित अमलात आणली तर ही साखळी तुटू शकते. म्हणजेच, आपल्या जवळपास जरी बाधित व्यक्ती असली तरी तिच्यापासून आपल्याला होणारा संसर्ग रोखता येतो.

मराठी_माणूस's picture

2 Dec 2020 - 11:09 am | मराठी_माणूस

पण मग ही प्रतिबंध-त्रिसूत्री कीती काळा पर्यंत अमलात आणायला हवी ?

कुमार१'s picture

2 Dec 2020 - 11:28 am | कुमार१

किती काळ याचे उत्तर तज्ञ समितीने अभ्यास करून द्यावयाचे असते.
सध्या तरी तसे काही मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध झालेले दिसत नाही.

माझ्या मते अजून पाच सहा महिने तरी ते पाळावे असे वाटते.

मराठी_माणूस's picture

2 Dec 2020 - 7:12 pm | मराठी_माणूस

एक शंका अशी आहे की, ज्या वेळेस कडक टाळेबंदी होती, म्हणजे लोक बाहेर फिरु शकत नव्हते, एक मेकांना भेटु शकत नव्हते तेंव्हाच का नाही ही साखळी तुटली.

आता टाळेबंदीत खुप शिथीलता आहे, दिवाळीत तर खुपच गर्दी झाली होती , त्याचे फोटोही वर्तमान पत्रात छापुन आले , पण रुग्णवाढ मात्र कमी आहे . असे का ?

कुमार१'s picture

2 Dec 2020 - 7:25 pm | कुमार१

आतापर्यंतच्या माझ्या अभ्यासानुसार काही शक्यता व्यक्त करतो. ( याला अंतिम उत्तर समजू नये)

१. कडक टाळेबंदीच्या काळात रोगजंतू ‘खूप जोरात’ होता. तेव्हा बहुसंख्य लोकांमध्ये त्याच्या विरोधी अँटीबॉडीज निर्माण झालेल्या नव्हत्या. तेव्हा अल्प संपर्कही रोग फैलावत राहिला.

२. पुढे जंतूमध्ये जनुकीय बदल झाले. त्याचा संसर्ग क्षमतेवर काही परिणाम झाला असावा.

३. अजून पुढच्या टप्प्यात लोकांमध्ये वाढत्या प्रमाणावर अँटीबॉडीज निर्माण होत राहिल्या. त्यातून समूह प्रतिकारशक्तीही वाढत राहिली.

बाप्पू's picture

2 Dec 2020 - 7:43 pm | बाप्पू

ओके.
म्हणजे हर्ड ईम्युनिटी काम करतेय असे तुम्हाला वाटते का??
आणखी एक प्रश्न. एकदा कोरोना होऊन गेल्यावर पून्हा होईल का??
आजवरची आकडेवारी काय सांगते?

मराठी_माणूस's picture

2 Dec 2020 - 8:18 pm | मराठी_माणूस

म्हणजे जर असेच चालु राहीले तर हा संपेल का ? (गृहीतकःजंतूमध्ये दुसरे काही जनुकीय बदल झाले नाहीत तर)

कुमार१'s picture

2 Dec 2020 - 9:13 pm | कुमार१

संपणार आहेच, फक्त किती काळाने याचे उत्तर काळच देईल !

(सुमारे २ वर्षांत आटोक्यात येणार हा अंदाज)

कुमार१'s picture

2 Dec 2020 - 7:57 pm | कुमार१


. म्हणजे हर्ड ईम्युनिटी काम करतेय असे तुम्हाला वाटते का?
>>>

होय काही प्रमाणात नक्की करते आहे.

२.

एकदा कोरोना होऊन गेल्यावर पून्हा होईल का??
>>>

होय, पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आकडेवारी बाजूला ठेवू.
मुद्दा असा आहे, की संसर्गनंतर ज्या अँटीबॉडीज शरीरात निर्माण होत आहेत, त्या किती काळ संरक्षण देतील यावर एकमत नाही.

जनुकीय बदल झालेल्या नव्या स्वरूपातील विषाणूने संसर्ग केल्याचे थोडेफार वृत्तांत वाचण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट येणार म्हणत panic केलं .आता म्हणत आहेत लवकर साखळी तुटू शकते.विश्वास कशावर ठेवावा? एवढ्या लवकर हर्ड इम्युनिटी येऊ शकते?
लंडन मधील लसीबद्दल माहिती असेल तर नक्की द्यावी

कुमार१'s picture

2 Dec 2020 - 9:10 pm | कुमार१

इंग्लंडमधील लस

ही लस Pfizer ची असून तिची वैशिष्ट्ये :

• शुद्ध लस; टिकाऊ
• RNA प्रकारची.

• साठवणीसाठी उणे ७० C तापमान आवश्यक
• २ डोस ; २१ दिवसांच्या अंतराने

• प्रयोगादरम्यान ती ६५ वयावरील गटात ९४% उपयुक्त ठरली आहे.
• लस देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरला आहे. त्यात वृद्धाश्रमातील लोक, ८० वयावरील लोक आणि नंतर आरोग्यसेवकांचा क्रम आहे.

मराठी_माणूस's picture

3 Dec 2020 - 9:27 am | मराठी_माणूस

प्रयोगादरम्यान ती ६५ वयावरील गटात ९४% उपयुक्त ठरली आहे.

ही टक्केवारी कशी ठरवली जाते ?

सुबोध खरे's picture

3 Dec 2020 - 10:19 am | सुबोध खरे

सोपे तर्कशास्त्र

आज भारतात ९0 लाख लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आहे. प्रत्येक सकारात्मक चाचणी केलेल्या प्रकरणामागे चाचणी न केलेले ९ लोक असतात.

म्हणजेच आपल्याकडे आतापर्यंत ९ कोटी व्यक्ती कोव्हीड झालेल्या आहेत.

लस येईपर्यंत हि संख्या 10 कोटीच्या वर असेल

लसीचा एक डोस फक्त २०० रुपये आहे असे गृहीत धरू (अंदाजे- कमीत कमी ) यात 100 / - रुपये शुद्ध नफा म्हणून देईल.

कल्पना करा की दर 3 महिन्यांनी हि लस परत परत द्यावी लागली तर दर तीन महिन्यांनी लस बनवणाऱ्या कंपन्यांना 1000 कोटी नफा आहे.

मग कोणती कंपनी असे रुग्ण सोडेल. तुम्हाला पुन्हा संसर्ग होउ शकतो अशी भीती घातली तर हे रुग्ण नक्की त्यांचे ग्राहक होणार आहेत.

म्हणूनच सर्व *अभ्यास * असे दर्शवितो की प्रतिपिंडे 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत.

सात महिने प्रतिपिंडे टिकतात अशा अभ्यास निबंधाना प्रसिद्धी मिळत नाही

The study revealed that 90 per cent of subjects have detectable antibodies up to seven months post contracting Covid-19.
https://www.cidrap.umn.edu/news-perspective/2020/10/studies-show-long-te....

https://health.economictimes.indiatimes.com/news/diagnostics/antibodies-....

Immunity to the Coronavirus May Last Years, New Data Hint
https://www.nytimes.com/2020/11/17/health/coronavirus-immunity.html

मी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व दिग्गज आणि मान्यवर लोकांना हा प्रश्न विचारला आहे की जर मूळ कोविड 19 विषाणूमुळे संसर्ग झाला असताना रोग प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही तर एक डीनेचर्ड किंवा लाइव्ह अटेन्युएटेड (लसीचा) व्हायरस यापासून तितकी चांगली रोगप्रतिकारक क्षमता कशी मिळू शकेल.

म्हणजेच ज्यांना कोव्हीड झाला आहे त्यांची प्रतिकारशक्ती लसी मुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्ती पेक्षा नक्क्कीच जास्त सरस असेल.

आणि जर हा विषाणू दर काही महिन्यात उत्क्रांत होत असेल तर लस अगदीच निरुपयोगी ठरेल कारण त्या विषाणूचे विश्लेषण करून लस बनावे पर्यंत त्याची परत उत्क्रांती झालेली असेल.

मुंबईतील सर्वच मोठ्या रुग्णालयांतील दिग्ग्ज वैद्यकीय तज्ञा कडून मला याचे उत्तर अजून मिळालेले नाही.

बहुसंख्य डॉक्टर की लस उत्पादकांनी विणलेल्या मानसिक जाळ्यात अनवधानाने ओढले गेले आहेत का असा प्रश्न निर्माण होतो आहे.

अशी वेळ आली आहे की डॉक्टरानी वेळेत जागृत होणे आवश्यक आहे.

आपल्या सर्वांना माहित आहे की क्षयरोग प्रतिपिंडे संसर्गापासून आपले संरक्षण करीत नाहीत परंतु आपण प्रतिकारशक्ती प्राप्त करतो. कसे?

सीएमआय cell mediated immunity (टी पेशींद्वारे पेशी द्वारे असणारी प्रतिकारशक्ती)
.
एकही लस उत्पादक सीएमआय बद्दल बोलत नाही.

का?

ते सीएमआयवर आधारित लस तयार करू शकत नाहीत.

डॉक्टर अनवधानाने कम्पन्यांच्या सूरात गाणे गात आहेत का अशी शंका येत आहे ?

आपण डॉक्टरांना एकदा कोव्हीड झाल्यानं पुन्हा संसर्ग होऊ शकेल अशी भीती पसरवत असलेले मी पहात आहे.

भारतात खात्रीलायक पुनसंसर्गाची (reinfection) किती प्रकरणे आहेत?

तीन

भारतात आतापर्यंत एकंदर संसर्ग झालेले रुग्ण किती

९० लाख.

म्हणजे पुनः संसर्गाची प्रकरणे किती

३० लाखात एक

रस्त्यावर मरण्याची आपली शक्यता किती आहे (अपघात)

1: 10000.

मग ही भीती मानसिक( भयगंड) नाही का ?.

सुबोध खरे's picture

3 Dec 2020 - 10:21 am | सुबोध खरे

ICMR: 3 cases of coronavirus re-infection in India, 24 globally

The Indian Council of Medical Research (ICMR) on Tuesday said at least three cases of Covid-19 re-infection have been reported from across the country so far, whereas 24 such cases have been found globally.

https://health.economictimes.indiatimes.com/news/diagnostics/icmr-3-case...