लघुसिद्धान्तकौमुदी

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
25 Sep 2020 - 12:27 pm

संस्कृत भाषेच्या अभ्यासाच्या निमित्ताने `लघुसिद्धान्तकौमुदी` ह्या पुस्तकाची ओळख झाली. इथे ओळख ह्या शब्दाचा अर्थ अक्षरशः मी पुस्तकाचे फक्त बाह्यपृष्ठ आणि प्रथम पान पहिले असा होतो.

भाषाशास्त्राची मला फार आवड आणि त्यातल्या त्यांत शब्दांचे इतिहास जाणून घ्यायची फार इच्छा. पुस्तक उघडून ते वाचण्याआधी मी आधी लघुसिद्धान्तकौमुदी ह्या शब्दाचा अर्थ जाणून घेतला.

लघुसिद्धान्तकौमुदी हे पुस्तक पाणिनी महर्षींच्या अष्ठाध्यायी ह्या पुस्तकाचे एक छोटे स्वरूप आहे. भट्टोजीदीक्षित (कदाचित मराठी असावेत) ह्यांनी पाणिनीच्या व्याकरणाची सूत्रे एका वेगळ्या अनुक्रमांक मांडून ३ पुस्तके लिहिली त्यातील हे सर्वांत छोटे (१५०० श्लोक) .

अश्या ग्रंथांवर भाष्य करायचा अधिकार फक्त मोठे पंडित आणि विदुषी ह्यांना आहे मला नाही त्यामुळे मी फक्त नावाचा अर्थ इथे माझ्या पद्धतीने देत आहे, विद्वानांनी काही चूक झाल्यास अज्ञानी म्हणून माफ करावे.

लघु हा शब्द लाघविक ह्या संस्कृत शब्दावरून येतो. संस्कृत मध्ये ह्याचा अर्थ छोटा, संक्षिप्त असा होतो.

सिद्धांत ह्याचा अर्थ आपण नंतर बघू.

कौमुदी म्हणजे काय ? तर हा शब्द कु आणि मोद ह्यापासून बनला आहे. कु म्हणजे पृथ्वी. मोद म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा उल्हास. मराठी भाषेंत हाय शब्दाचा प्रयोग "आनंदी आनंद गडे ..". ह्या काव्यांत झाला आहे. पृथ्वीवर मोद कोण पसरवतो तो "कुमुद" म्हणजे चंद्र. कौमुदी म्हणजे चंद्राप्रमाणे शीतल आणि उल्हासमय प्रकाश टाकणारा.

हा प्रकाश कोणावर टाकला जातोय ? तर "सिद्धांत" वर. सिद्धांत ह्याचा अर्थ "बेसिक principles" असा होतो. पण त्यांत सुद्धा "सिद्ध आणि अंत" ह्या दोन शब्दांपासून हा शब्द बनला आहे. जी गोष्ट पूर्ण पणे सिद्ध झाली आहे तो सिद्धांत. खरे तर इंग्रजी शब्द जो इथे लागू पडतो तो म्हणजे "axioms".

संस्कृत भाषेवर भाष्य करणाऱ्या पुस्तकाचे नाव "लघु सिद्धांत कौमुदी" असे का ?

कारण कुठलेही ज्ञान अर्जित करायचे असेल तर भाषा हि त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भाषा आणि व्याकरण हे सर्व ज्ञानाचा पाया आहे आणि सिद्धांत आहे. त्यावर शीतल प्रकाश टाकणारे पुस्तक ते "सिद्धांत कौमुदी" आणि ते संक्षिप्त असल्याने लघुसुद्धांतकौमुदी.

https://www.youtube.com/watch?v=wjv2oP0KA-Q&t=1973s

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

25 Sep 2020 - 1:06 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही तुमचं ग्रंथाचं आकलन बिनधास्त इथे लिहा.

फक्त गुण वाढतात शालान्त परीक्षेत म्हणून घेतलेला विषय संस्कृत. पण त्याचा पुढे घाबरवणारा वाघोबा होईल हे माहिती नंतर झालं. किती त्या उपमा, समास,आणि क्लिष्टता.
तरी सोपे करून सांगताय मग वाचू.

चौथा कोनाडा's picture

25 Sep 2020 - 5:47 pm | चौथा कोनाडा

व्वा, छान ओळख !
आणखी तपशिलवार वाचायला आवडेल !
(लेख-माला चालेल)
सोपं सुबोध लिहा म्हणजे वाचन सुलभ होईल !

पुभाप्र !

दिगोचि's picture

27 Sep 2020 - 6:12 pm | दिगोचि

माझ्या माहितीप्रमाणे हे तेलगु होते. हे व अप्पय्या दिक्षित हे पन्डितराज जगन्नाथ यान्चे समकालीन. जगन्नाथ हे औरन्गजेबाचा भाउ दारा शिकोहचे मित्र होते. पन्डितराजानी गन्गालहरी लिहायला अप्पय्या दिक्षित कारणीभूत होते. भट्टोजी दिक्षितामुळे गतानुगतिक हा शब्द प्रचारात आला आहे.