शब्द

Primary tabs

पाटिल's picture
पाटिल in जे न देखे रवी...
24 Jun 2020 - 10:07 am

बोलणं जे जिवंत
कागदावर त्याचं प्रेत

बोलणं जे भाबडं मुक्त
कागदावर तेच अडचणीचं

बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं
कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर

बोलणं गरमागरम लालबुंद
कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत

बोलणं, वार्‍यावर विरून जाणारं
कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं

बोलणं, अगदी वैयक्तिक, थेट ओंजळभर.
कागदावरचं, वाचणाराच्या मूडनुसार हरवणारं गवसणारं.

बोलताना जे गाणं,
त्याचं कागदावर संदर्भासहीत स्पष्टीकरण.

एकेकाळी, बोलणं, प्रपोज करायला घाबरणारं.
त्याचकाळी, लिहिणं, चिठ्ठी पाठवायची सोय असणारं.

बोलणं, मनस्वी, हळवं, जखडून टाकणारं.
कागदावर तेच, तुफान विनोदी रडगाणं.

बोलणं, माझ्यासारखं, आधी.
लिहिणं, तुझ्यासारखं, नंतर.

बोलणं, मौनातून, शक्य आहे.
लिहिणं, मौनातून, जमलं पाहिजे..!

कैच्याकैकविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

24 Jun 2020 - 11:57 am | चांदणे संदीप

बोलणं, मौनातून, शक्य आहे.
लिहिणं, मौनातून, जमलं पाहिजे..!

क्या बात है!

सं - दी - प

रातराणी's picture

24 Jun 2020 - 12:01 pm | रातराणी

मुक्तक आवडले!! सुरेख !

पाटिल's picture

24 Jun 2020 - 12:09 pm | पाटिल

@चांदणे संदीप, @ रातराणी.. .धन्यवाद..! :-)

गणेशा's picture

24 Jun 2020 - 12:36 pm | गणेशा

बोलणं, माझ्यासारखं, आधी.
लिहिणं, तुझ्यासारखं, नंतर.

बोलणं जे जिवंत
कागदावर त्याचं प्रेत

ह्या चार ओळी उत्तुंग.. खुप आवडल्या..

पाटिल's picture

26 Jun 2020 - 11:29 am | पाटिल

@गणेशा... धन्यवाद .. :-)