बोध कथा – Revisited

Primary tabs

शेर भाई's picture
शेर भाई in जनातलं, मनातलं
1 May 2020 - 6:07 pm

फार फार वर्षांपूर्वी इसापनीती का पंचतंत्र आता नक्की आठवत नाही, पण एक गोष्ट ऐकली होती. त्याच हे एक remix.

एका राज्यात एक राजा असतो आणि त्याला अचानक एक दिवस दोन शिंग येतात. त्याच ते गुपित कोणालाच माहित नसते कारण शिंग तो आपल्या मुकुटाखाली दडवत असतो. मग थोड्या दिवसानी जेव्हा राजाचे केस वाढतात तेव्हा शाही हजामाला बोलावले जाते. आता त्या शाही हजामाला आपण नाव देऊ “बंडू”. कारण शाही हजाम पेक्षा बंडू छोटुस बर. तर बंडू राजाचे केस कापायला येतो, आणि बघतो तर काय......................... ते आपल्या सगळ्यांना आधीच माहित आहे त्यामुळे ते नक्की काय त्यावर आता परत Copy – paste न करता आपण पुढे जाऊया.

तर राजाचे केस कापल्यावर राजा बंडूला तम्बी देतो, (दम देतो. डोसा इडली नाही) कि बाबा माझ शिक्रेट कुणालाच कळले नाही पाहिजे वगैरे आणि वर त्याला १०, नको आपण ५० करू, कारण तो राजा आहे. तर ४० सोन्याची नाणी पण extra देतो. (Deducting Taxes and all).

आता नाणी घेतल्यामुळे बंडू त्याचा शब्द पाळायचा ठरवतो. पण त्या दिवसापासून बंडूच्या पोटात खूप दुखायला लागते, एव्हढे कि सगळी नाणी खर्च होणार कि काय अशी परिस्थिती येते. मग आधी बंडूची बायको त्याला विचारते कि “अहो, तुम्ही गाडीवाल्याचा वडापाव खायच्या ऐवजी Jumbo वडापाव नाही ना खाल्लात?” तर बंडू म्हणतो कि “अग, तु घरात KFC चिकन करायला लागल्यापासून मैने वडापाव छोड दिया है.” मग नंतर बंडूची आई त्याला म्हणते “बंड्या, तुझ्या पोटात कोणाच तरी गुपित दडवले आहेस ना. तर दाट जंगलात जा आणि एखाद्या झाडासमोर ते गुपित ओकून टाक.”

तर बंडू जंगलात जातो आणि अस झाड निवडतो कि ज्यापासून संगीताची वाद्ये बनवितात. (आता संगीताच का? कळल असेलच) आणि जोरात ओरडतो कि........................ आता तो काय ओरडला असेल ते आपल्या सगळ्यांना माहित आहेच. आणि अहो आश्चर्यम पोटदुखी गायब. मग बंडू प्रशांत कॉर्नर मधून कॉर्न पकोडे घेतो, पण मग त्याला आठवते कि तो बुधवार आहे मग तो लगेच कोरम मध्ये जाऊन दीड किलो बोनलेस कोंबडी घेतो (आता बोनलेसच का? तुम्ही फारच हुश्शार) आणि आनंदाने घरी जातो.

मग लगेच थोड्या दिवसांनी Rio 2 मधले जंगल के दुष्मन राजाच्या विनंतीमुळे / आदेशामुळे (ज्याला जे आवडेल ते ठेवून घ्याल) त्या जंगलात येतात. आणि तेच झाड बरोब्बर तोडतात ज्याच्या समोर बंडू ओरडला असतो. आणि राजाच्या आज्ञेनुसार त्याचा एक Piano बनवतात. आता Piano च का? कारण राजा अदनान समीचा नंबर १ शिष्य असतो. मग राजा त्या Piano च्या उद्घाटनाला एक मोठा समारंभ करायचा ठरवतो. बरेच नामांकित पाहुण्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली असते.
समारंभ सुरू होतो, आणि तो जंगली झाडवाला Piano अचानक वाजायला लागतो आणि चक्क आवाज येऊ लागतो “राजाच्या डोक्यावर शिंग दोन, सांगा बघणार कोण?”

आणि अशा पद्धतीने राजाचे गुपित शेवटी सगळ्यांना कळते.

या गोष्टीचे तात्पर्य काय असावे? कारण काय होत ते आता नक्की आठवत नाही.

कथाबालकथा

प्रतिक्रिया

शेर भाई's picture

1 May 2020 - 6:08 pm | शेर भाई

बोध कथा – Revisited

जव्हेरगंज's picture

1 May 2020 - 6:30 pm | जव्हेरगंज

जाम भारी रंगवलीय हो... =)))
कडक!!

चांदणे संदीप's picture

1 May 2020 - 7:35 pm | चांदणे संदीप

ही कथा वेगळ्या स्वरूपात माहिती आहे. बोधही घ्यायचा तो घेतलाच आहे पण इथे ज्या पद्धतीने मांडली आहे त्यातून लेखकाला तात्पर्य हवे आहे की आणखी काही?
नक्की कसला डोस द्यायचाय का घ्यायचाय? जरा इस्कटून सांगावे ही विनंती.

सं - दी - प

शेर भाई's picture

1 May 2020 - 10:11 pm | शेर भाई

@ जव्हेरगंज G धन्यवाद
@ चांदणे संदीप G तात्पर्य खरच आठवत नाही आहे. आणि तात्पर्य is not equal to बोध अस काही आहे का ?
तुम्हाला जे काही देईन अस वाटत ते खुश्शाल द्या.
फक्त घेण्यासाठी पोत घेऊन येऊ का झोळीत मावेल ते सांगा.

चांदणे संदीप's picture

2 May 2020 - 7:14 am | चांदणे संदीप

दोन्हीमध्ये तुम्ही शिकणे अभिप्रेत असते. असो, कथेचे तात्पर्य हेच आहे की, सत्य हे लपून राहू शकत नाही. कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते जगासमोर येणारच!

मी ही गोष्ट माझ्या मुलींना नेहमी सांगतो त्यात राजाला शिंगाऐवजी गाढवासारखे कान असतात.

सं - दी - प

अर्धवटराव's picture

1 May 2020 - 10:18 pm | अर्धवटराव

मिपावर अजुन एक आयटम सदस्य अ‍ॅडवला :ड
वेलकम टु मिपा :)

कानडाऊ योगेशु's picture

1 May 2020 - 10:21 pm | कानडाऊ योगेशु

दूरदर्शनवर रामायण महाभारताच्या मधल्या काळात काही मालिका होत्या त्यातील एकात ह्या कथेवर आधारित एक भाग होता. बहुदा "पोटली बाबा कि" ही ती मालिका असावी. (ती मालिका ही दाखवतील लॉकडाऊन अजुन वाढवला गेला तर.. राम चाहे लिला चाहे ह्या गाण्याची चाल ह्या मालिकेच्या शीर्षक गीताच्या चालीशी तंतोतंत जुळते.) त्यात ही कथा पाहिल्याचे आठवते आहे. म्हणजे बाकिचे काही आठवत नाही पण त्या न्हाव्याच्या पात्राचे जंगलात गेल्यानंतरचे "राजा के सर पे सिंग राजा के सर पे सिंग" हे रिपिटेड वाक्य आणि त्याच्या चेहर्यावरचे प्रत्येक वाक्यानंतरचे हलके होणारे हावभाव अजुन लक्षात आहेत.

आंबट चिंच's picture

2 Jun 2020 - 10:17 am | आंबट चिंच

आताच तुमचा बेचव बकवास लेख वाचला अणि इकडे आलो.

तुमची लेखनशैली खरच खुशखुशीत आहे.

बाकी प्रशांत कोर्नरचा उल्लेख केला म्हणजे तुम्ही ठाण्याचे असणार.

शेर भाई's picture

3 Jun 2020 - 2:39 pm | शेर भाई

ठाण्यात नाही, पण ठाण्याजवळच्याच मुंबईत. (मुलुंड नाही)
तस बघाल तर चांगल्या आणि चवदार पदार्थांसाठी कुठेही, कितीही लांब जायची आपली तयारी असते. मागे एकदा असच "आगरी काळ्या मसाल्यातील कोंबडी" अर्नाळयाच्या जवळ कुठल्या तरी धाब्यावर मिळते अस कळले तेव्हा लगेच आमचा रणगाडा काढून अर्नाळयाला गेलो होतो, पण तेव्हा आमची स्वारी वाया गेली.
नाही म्हणायला तिथे अर्नाळयाचे पक्षी अभयारण्य बघण्यात वेळ मात्र छान गेला
तुमच्या प्रतिसादासाठी दिल से धन्यवाद.

सोत्रि's picture

3 Jun 2020 - 3:04 pm | सोत्रि

पक्षी अभयारण्य कर्नाळ्याला आहे हो अर्नाळयाला नाही. २७ वर्ष अर्नाळ्याजवळ राहून पक्षी अभयारण्य कसं माहिती नाही म्हणून गंडलो ना दोन मिनीटं!

- (आगास्कर) सोकाजी

शेर भाई's picture

3 Jun 2020 - 3:45 pm | शेर भाई

मला नेरूळ आणि नेरळ पण असच फसवत असत.
पण खरच थांकू, आता लक्षात राहील

तसं असल्यास तो ढाबा खरच असावा अर्नाळ्याला... ट्राय करा.
तुमची कोंबडी मिस् होऊ नये हिच सदिच्छा :)

शेर भाई's picture

3 Jun 2020 - 11:34 pm | शेर भाई

नाही तो कर्नाळाच होता, लिहताना चुकून अर्नाळा झाला.
पण कोंबडी नंतर मिळाली कारण पुढच्या वेळेस स्थानिक जाणकारांना घेऊन गेलो होतो.

अर्धवटराव's picture

4 Jun 2020 - 12:04 am | अर्धवटराव

वॉज इट वर्थ ? असल्यास कृपया ढाब्याचा पत्ता द्या.

शेर भाई's picture

4 Jun 2020 - 5:45 pm | शेर भाई

पण आता ढाब्याचे नाव नाही आठवत कारण तेव्हा आम्ही single होतो.
नंतर आमच्या Better-half ने तिच्या खास आगरी मैत्रिणीकडून तो आगरी काळामसाला घरातच मागवून "घरगुती काळ्या मसाल्यातील कोंबडी-भाकरी" खिलवली.
तसंपण आता तिथले बरेच ढाबे रस्ते रुंदीकरणात इतिहास जमा झालेत.

हि गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वी चांदोबा मध्ये वाचल्यासारखी वाटत्ये. परत वाचून मजा अली :)