आत्तापर्यंत काय केलं?
वेळ मिळालाच आहे अनायसे, तर संपवूया
कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं,
अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख.
असंच खूप काही, मनापासून ठरवलं.
धावपळीत रोजच्या, बरंच राहून गेलं.
डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं,
आत्तापर्यंत काय केलं?
अपूरी स्वप्नं दूरुनच खुणावत राहिली
दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली
वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली
झाडांची पानं गळून गेली,
धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली.
निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला,
आत्तापर्यंत काय केलं?
ज्यांच्या अंगा-खांद्यांवर खेळलो,
त्यांनाच खांदा देऊन आलो.
सरणावर थोडा, मीही जळून गेलो.
पोरकेपण नि पोक्तपण सोबत राहिले.
नकळत अशीच कित्येक वर्षं सरली.
थोडीफार उरलेली वर्षं आता खिजवतात,
आतापर्यंत काय केलं?
काय केलं आत्तापर्यंत?
स्पर्धेत लिहिलेली माझी कविता (क्या उखाड़ लिया?) हिंदी शीर्षक बदलून आणि थोडी सुधारून इथे सामविष्ट करतोय.
स्पर्धेत लिहिलेली माझी कविता (क्या उखाड़ लिया?) हिंदी शीर्षक बदलून आणि थोडी सुधारून इथे सामविष्ट करतोय.
हे उत्तमच!
मान्य!
छानच एकदम!
आणि -->
छान.
मुळ भावना कधी पण श्रेष्ठ..
+१
वाह
क्या उखाड लिया विचारण्यात एक
कवितेचे दोन्ही वर्जन आवडले!