[कविता' २०२०] - चंद्र माझ्या कुशित आहे

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
9 May 2020 - 11:43 am

चंद्र माझ्या कुशित आहे

आरश्याला तू सखे
बिंदी तुझी लावू नको
असु दे केस मोकळेच
सारखे सावरू नको

सांग त्या पावसाआता
उगा असा बरसू नको
चुंबनांचा वर्षाव मजवर
तू असा जळू नको

वार्‍याला कोण सांगे ?
उगा पाचोळा उडवू नको
स्पर्शातल्या वादळात या
आणखी मला चेतवू नको

चांदण्यांनी वैर सारे
पाळणे सोडून द्यावे
चंद्र माझ्या कुशीत आहे
सांग नभास कळवू नको

सोड गजरा मोगर्‍याचा
आता पुन्हा माळू नको
पदर ढळला अलगद सखे
त्यास ही सावरू नको

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

मन्या ऽ's picture

9 May 2020 - 6:37 pm | मन्या ऽ

छानेय कविता!

तुषार काळभोर's picture

10 May 2020 - 9:57 am | तुषार काळभोर

लईच उत्कट, रोमँटिक, वगैरे, वगैरे..

जव्हेरगंज's picture

10 May 2020 - 12:11 pm | जव्हेरगंज

वाह! बहोत खूब!! क्या लिखेला है!!

+१

गणेशा's picture

10 May 2020 - 1:39 pm | गणेशा

चांदण्यांनी वैर सारे
पाळणे सोडून द्यावे
चंद्र माझ्या कुशीत आहे
सांग नभास कळवू नको

सर्वात जास्त आवडलेले कडवे
+१

प्रचेतस's picture

10 May 2020 - 9:49 pm | प्रचेतस

+१

क्या बात..!

मोगरा's picture

12 May 2020 - 12:05 am | मोगरा


आरश्याला तू सखे
बिंदी तुझी लावू नको
असु दे केस मोकळेच
सारखे सावरू नको

एक नंबर

आवडाबाई's picture

12 May 2020 - 1:41 pm | आवडाबाई

चुंबनांचा वर्षाव !
हिंट हिंट ;-)

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:40 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

चांदणे संदीप's picture

17 May 2020 - 12:17 pm | चांदणे संदीप

हिंट घेतलेली आहे. =))

हे तर मिपाचे लाडके... धीर धरा, निकाल लागल्यावर समजेलच. ;)

कवितेला +१

सं - दी - प

चांदणे संदीप's picture

25 May 2020 - 9:45 am | चांदणे संदीप

इथेही अंदाज चुकलाच!
चुंबनफेम... काका वाटलेले.

असो, भाऊ कविता उत्तम. मजा आली हे महत्वाचे!

सं - दी - प

गणेशा's picture

25 May 2020 - 5:26 pm | गणेशा

कोण ते?

अविनाश काका यांचे म्हणत असताल तर त्यांच्या इतके श्रुंगार काव्य नाही जमणार मला..

हे माझे पहिलेच श्रुंगार काव्य असेल..
वल्ली ने ओळखून दाखवायची पैज लावली होती.. म्हणजे त्या 2 दिवसांत दिली मी कविता त्यावरून त्या 4-5 कवितेत ओळखण्याची..
So वेगळीच लिहावे म्हंटले..

आणि ही कविता लिहिली... :-))

बरखा's picture

12 May 2020 - 8:47 pm | बरखा

+१ छान

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 1:25 pm | बिपीन सुरेश सांगळे

भाऊ ग्रेट
सुरेश भट यांची आठवण आली

गणेशा's picture

25 May 2020 - 5:29 pm | गणेशा

__^__