Skip to main content

[कविता' २०२०] - चंद्र माझ्या कुशित आहे

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/05/2020 11:43 या दिवशी प्रकाशित केले.

चंद्र माझ्या कुशित आहे




आरश्याला तू सखे बिंदी तुझी लावू नको असु दे केस मोकळेच सारखे सावरू नको सांग त्या पावसाआता उगा असा बरसू नको चुंबनांचा वर्षाव मजवर तू असा जळू नको वार्‍याला कोण सांगे ? उगा पाचोळा उडवू नको स्पर्शातल्या वादळात या आणखी मला चेतवू नको चांदण्यांनी वैर सारे पाळणे सोडून द्यावे चंद्र माझ्या कुशीत आहे सांग नभास कळवू नको सोड गजरा मोगर्‍याचा आता पुन्हा माळू नको पदर ढळला अलगद सखे त्यास ही सावरू नको


वाचने 11377
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

छानेय कविता!

लईच उत्कट, रोमँटिक, वगैरे, वगैरे..

चांदण्यांनी वैर सारे पाळणे सोडून द्यावे चंद्र माझ्या कुशीत आहे सांग नभास कळवू नको सर्वात जास्त आवडलेले कडवे +१

आरश्याला तू सखे बिंदी तुझी लावू नको असु दे केस मोकळेच सारखे सावरू नको एक नंबर

चुंबनांचा वर्षाव ! हिंट हिंट ;-)

In reply to by आवडाबाई

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


In reply to by आवडाबाई

हिंट घेतलेली आहे. =)) हे तर मिपाचे लाडके... धीर धरा, निकाल लागल्यावर समजेलच. ;) कवितेला +१ सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

इथेही अंदाज चुकलाच! चुंबनफेम... काका वाटलेले. असो, भाऊ कविता उत्तम. मजा आली हे महत्वाचे! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

कोण ते? अविनाश काका यांचे म्हणत असताल तर त्यांच्या इतके श्रुंगार काव्य नाही जमणार मला.. हे माझे पहिलेच श्रुंगार काव्य असेल.. वल्ली ने ओळखून दाखवायची पैज लावली होती.. म्हणजे त्या 2 दिवसांत दिली मी कविता त्यावरून त्या 4-5 कवितेत ओळखण्याची.. So वेगळीच लिहावे म्हंटले.. आणि ही कविता लिहिली... :-))

भाऊ ग्रेट सुरेश भट यांची आठवण आली