चंद्र माझ्या कुशित आहे

आरश्याला तू सखे
बिंदी तुझी लावू नको
असु दे केस मोकळेच
सारखे सावरू नको
सांग त्या पावसाआता
उगा असा बरसू नको
चुंबनांचा वर्षाव मजवर
तू असा जळू नको
वार्याला कोण सांगे ?
उगा पाचोळा उडवू नको
स्पर्शातल्या वादळात या
आणखी मला चेतवू नको
चांदण्यांनी वैर सारे
पाळणे सोडून द्यावे
चंद्र माझ्या कुशीत आहे
सांग नभास कळवू नको
सोड गजरा मोगर्याचा
आता पुन्हा माळू नको
पदर ढळला अलगद सखे
त्यास ही सावरू नको

वाचने
11377
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
वाह! बहोत खूब!! क्या लिखेला
चांदण्यांनी वैर सारे
+१ क्या बात..!
+1
आरश्याला तू सखे बिंदी तुझी लावू नको असु दे केस मोकळेच सारखे सावरू नकोएक नंबरहिंट
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to हिंट by आवडाबाई
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
लोल
In reply to हिंट by आवडाबाई
हा..हा..
In reply to लोल by चांदणे संदीप
कोण ते?
In reply to हा..हा.. by चांदणे संदीप
सुरेख
भाऊ ग्रेट
__^__
In reply to भाऊ ग्रेट by बिपीन सुरेश सांगळे