वाट..

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
7 May 2020 - 3:38 am

वाट..

जुन्याच एका वाटेवर
वाट चुकले होते मी
आज पुन्हा मी
त्याच वळणावर
नवी वाट शोधते आहे मी

भांबावलेली आहे मी
गोंधळले ही आहे मी
पुन्हा पुन्हा वाट ती
शोधुन दमले आहे मी

अशी कशी मी ही वेडी
इतकी कशी मी
बावरलेली;
वाट स्पष्ट समोर असुनही
वाट शोधत भटकणारी मी

वाट हरवली आहे
म्हणुन जीवनात माझ्या
निराशेचा हा काळोख
देईल का मज करून कोणी
माझ्या नव्या वाटेची ओळख

अखेरीस कोणीतरी
हाक मजला दिली
हिच आहे ती वाट तुझी
अशी खात्री मजला दिली

ती हाक ऐकुन
धीर आता मजला आला
हाक देणारा तो आवाज
मला आता ओळखीचा वाटला

उमजले मला नंतर
ही हाक तर आहे
माझ्याच अंर्तमनाची
त्यानेच तर शोधली आहे
वाट माझ्या नव्या प्रवासाची

पुन्हा जुन्याच
त्या वळणावर
मी मजला नव्याने भेटले
माझी मलाच मी आता
नव्याने ओळखु लागले

एकदा वाटले
माझे मलाच
हा तर आहे;
परतीचा प्रवास
तेव्हा अंर्तमनाने
दिला आवाज
हा तर आहे
तुझ्या आयुष्याचा
नव्याने घडणारा प्रवास!

- Dipti Bhagat
(पुर्वप्रकाशित)

मुक्तकवाटजीवनआशादायक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 May 2020 - 6:32 am | प्रचेतस

मस्त.
आवडली.

गणेशा's picture

7 May 2020 - 8:07 am | गणेशा

पुन्हा जुन्याच
त्या वळणावर
मी मजला नव्याने भेटले
माझी मलाच मी आता
नव्याने ओळखु लागले

एकदम खरच लिहिलंय.. नायिकेची सकारात्मकता दिसते आहे..

आणि तुमच्या या सुरेख कविते मुळे.. मला माझ्या विस्मरनात गेलेले गाणे आठवले.. आज ऐकतो पुन्हा नक्की.. तुम्ही पण ऐका, सुधीर मोघे लिखित, आशा भोसले यांनी गायलेले गाणे..

गाणे
एकाच या जन्मी जणू
फिरुनी, नवी जन्मेन मी

धन्यवाद..

मन्या ऽ's picture

7 May 2020 - 4:26 pm | मन्या ऽ

सुंदर आहे ते गाणं! खुप दिवस झाले ऐकुन.. नक्की ऐकेन.. :)

जव्हेरगंज's picture

7 May 2020 - 9:25 am | जव्हेरगंज

छान. लिहित राहा. कथा वगैरे!

@प्रचेतस, मनापासुन धन्यवाद! :)

@जव्हेरगंज, कथा लिहीण्याचा मानस आहेच.. बघु कस जमतंय ते.. :)

Prajakta२१'s picture

7 May 2020 - 8:41 pm | Prajakta२१

कवितेतले काही कळत नाही
तरी पण हि चांगली वाटतेय
+१

मन्या ऽ's picture

9 May 2020 - 9:13 am | मन्या ऽ

प्राजक्ता प्रतिसादासाठी मनापासुन धन्यवाद! :)