हैदोस [18+]

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
11 Apr 2020 - 1:12 pm

बी.डी. चाळीच्या कोपऱ्यावरची शेवटची खोली आहे तिथे वारा खूप थंडगार सुटतो. म्हणूनच मालकाने आम्हांस तीच खोली देऊ केली. आणि विशेष म्हणजे भाडेही कमी घेतले. त्यांचे आभारच मानायला हवेत. तसंही त्या बाजूला जरा अंधारच असायचा. सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोज सकाळचा दिनक्रम असायचा. कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने 'आराम' सदासर्वकाळ ठरलेला असायचा. मोजून दोन अडीच तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याखेरीज अन्य काम नसल्याने मन विटाळून गेले होते. तसे दिवसभर चौपाटीवर भटकण्यातही मजा राहिली नव्हती.

तर त्या दिवशी भुर्जीचं पार्सल आणून खोलीवर निवांत आस्वाद घेत होतो. कुणी एक बाई आली आणि डोकावून गेली. हे तर नेहमी होतं. चाळीत जरा म्हणून प्रायव्हसी नाही. हि तीच शेजारची बाई असणार. आज चौथ्यांदा डोकावून गेली.
"काही हवंय का आपल्याला..?" ती दरवाज्यापाशीच ऊभी असणार या अंदाजाने म्हणलो.
मग साधारण दहा वीस सेकंदाने पदराशी चाळा करत तीने पुन्हा हळून डोकावून पाहिले.
"काही नाही सहज.." बहुतेक ती सुद्धा हवापाणी खायला बाहेर मोकळ्या जागेत आली असावी.
मग शेजारधर्माला जागत आम्ही विचारले, "झालं का जेवण?" हा खरंतर का कुणास ठाऊक पण फार लोकप्रिय प्रश्न आहे.
तर असा हा जबरदस्त प्रश्न विचारून मी बाहेर आलो आणि तांब्याभर पाण्याने चूळ भरून पिचकारी मारली. आणि उघड्यावरच हात धुतले. मोकळ्या जागी हात धुण्याची गंमतच वेगळी.
"तुम्ही सरकारी नोकरीत आहात असं कळलं.." ती म्हणाली. 'सरकारी' हा शब्द ऐकला की आम्हांस उत्साहाचे भरते येते. चांगलं तरतरीत वाटते.
"खरंय.." आम्ही दुसरी पिचकारी मारत तिच्याकडे बघितले.
बऱ्याच दिवसांपूर्वी 'हैदोस' नावाचं पुस्तक वाचलं होतं. अचानक त्याचीच आठवण झाली. सौदर्याचा आयटमबॉम्ब वगैरे म्हणतात ते हेच. गोरीपान आणि श्रुंगारास आतुर वगैरे असलेली ललना साक्षात पुढे ऊभी होती.

"आमच्या ह्यांच्या नोकरीचं काही बघता का?" तीनं लडिवाळपणे विचारलं. 'ह्यांच्या' म्हणजे तिच्या नवऱ्याबद्दल बोलत होती ती.

"नक्कीच, नक्कीच.. फक्त तेवढी कागदपत्रे वगैरे आणून द्या.. " आता माझ्यासारखा कारकून हिच्या दिडदमडीच्या नवऱ्याला सरकारी नोकरीत कसा काय चिकटवू शकतो हे एक मोठे कोडे होते.
हिचा नवरा वॉचमन आहे एवढे मला समजले.

मग ती गेली. पुन्हा सामसूम झाली. मी झाडलोट करून व्हरांड्यात विडी शिलगावून बसलो.
साधारण अकरा वाजता एक शिडशिडीत, गेला बाजार एक ठेऊन दिल्यास जमीनीवर कायमचा उताना पडेल असा एक इसम शेजारणीचं दार वाजवताना आढळला. च्यायला हा हिचा नवरा? याला ही असली आयटमबॉम्ब कशी भेटली बुवा? विडी जळत होती और अंदरसे कलेजा भी.

"मग झाली का ड्युटी?" आम्ही जळून खाक होत त्याला विचारलं.
"व्हय , हे काय आताच आलो." तो बोलला. दार उघडले. तो गेला. दार बंद झाले.
मी दुसरी विडी शिलगावली.

रात्री झोपेतून जाग आली. बाजूच्या खोलीतून दणादण आवाज येत होते. मी ते लक्षपूर्वक ऐकले. च्यायला.

सकाळ झाली. घमेलं घेऊन सार्वजनिक नळावर गेलो. पाणी भरलं. ते मरतुकडं व्हरांड्यावर दात घासत ऊभं होतं. आणि ती ललना आत कुठेतरी उलथली होती.

"सायेब, हुईल ना काम आपलं? या शिक्युरीटीत काय परवडत नाही हो." दात घासत घासत तो बोलला. सगळा फेस दाखवत. 'मॅनर्स' नावाची काय गोष्ट आहे का?
"झालं म्हणून समजा.. तेवढी कागदपत्रे द्या माझ्याकडे.." टॉवेल दोरीवर टाकत मी बोललो. नुकतीच आंघोळ झाली होती.
"काय घ्यायचं देयचं आसंल तरीबी सांगा.." तो म्हणाला. साला या असल्या लोकांमुळे भ्रष्टाचार वाढला आहे. आणि दोष आमच्यावर येतो.
"जास्त काही नाही, एक गावरान कोंबडी झणझणीत.." त्याच्या ईच्छेला मान देऊन आम्ही जिभेचे चोचले पुरविण्याचे ठरवले.

मग कचेरीत जाऊन खुर्चीवर बसून दोन अडीच तास नेहमीचेच काम केले. चौपाटीवर फिरलो. भेळपुरी खाल्ली. सहज आठवले तसे 'हैदोस' चा एक उत्तान अंक विकत घेतला. आणि घाईघाईने दुपारीच खोलीवर पोहोचलो. खाटेवर लवंडून पुस्तक हातात घेतले. मुखपृष्ठावरचे अर्धवट उघडे जंबो उरोज बारकाईने न्याहाळत असताना शेजारीण डोकावून गेली. गडबडीत पुस्तक लपवले.

"अहो सकाळी कागदपत्रे द्यायची राहिलीच." एकतर त्या पुस्तकाने आतमध्ये आग लावली होती. आणि समोर ही सुंदर चेहऱ्याची ललना आपल्या नाजूक ओठांच्या पाकळ्या फाकवत आपलं ते हे उलगडत मंजुळ बोलत होती.

"या कामाला खरंतर उशीर लागेल, पण मी मात्र लवकर करून देतो.." कागदपत्रे बघत मी म्हणालो. कुठलातरी पिंपळगाव बुद्रुकचा दहावीचा दाखला, बारावी नापासचे मार्कलिस्ट आणि ईतर भरमसाठ झेरॉक्स असे ती कागदपत्रे होती.

"किती धूळ झालीय हो खोलीत मी झाडून घेते.." ती बोलली.
"अहो नको.. कशाला.." उत्साह दाबत आम्ही म्हटले.
"तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, आम्ही एवढंही नाही करायचं?" एवढं म्हणजे नक्की केवढं? असा आम्हां स्वतःलाच प्रश्न पडला.

मग बाहेर जायचे सोडून 'हाच तो मौका' वगैरे विचारात आम्ही टेबले कपाटांची उगीचच ईकडून तिकडे सारासार केली. खिडक्यांच्या तावदानांवर फडकी वगैरे मारून झाली. जळमटे वाटली त्यापेक्षा कितीतरी जास्त होती. बाईच्या नजरेतून काहिही सुटत नाही. मग पांघरूने विस्कटून त्याच्याही घड्या घालने चालू झाले.
"काही गोष्टी दार बंद करून कराव्या माणसाने" पुस्तक लपवल्याच्या ठिकाणी ओझरतं बघत ती म्हणाली.

ललनेला सगळं काही माहित होतं तर. म्हणूनंच ती आत आली होती. रजई ठेवताना आम्ही उगीचच तिला पाठिमागून भिडलो. ललना काहिही बोलली नाही. चादरीची घडी घालत राहिली. मग हळूच तिच्या उरोजांवर हात ठेऊन अलगद मिठी मारली. आणि हात झटकून ती ताडताड बाहेर निघून गेली. आम्ही बघतच राहिलो.

आम्हाला स्वतःचीच बेहद शरम वगैरे वाटली. दार बंद करून ढसाढसा रडावे वाटले पण तसला बालिशपणा आम्ही कदापि केला नाही. खिडकीवरची स्वच्छ झालेली तावदाने निरखत जरा वेळ झोपलो.

संध्याकाळी दार वाजले. दारात मरतुकडा ऊभा होता. म्हणजे हा आता आमच्याशी झगडणार तर?
"कोंबडी शिजायला टाकलीय. या बाहेर बसू.." मरतुकडा चांगला मूड मध्ये येऊन सांगत होता. हे भलतंच.
"अहो नको आज मूड नाही" आम्ही त्यास सांगितले.
"तुमची ईच्छा म्हणूनच आणली आहे. नाही म्हणून कसं चालेल.." ललना स्वयंपाक खोलीतून बाहेर येत बोलली. अगदी लडिवाळपणे. मग मात्र आमचाही मूड परतला.

व्हरांड्यावर गार हवेत विडी शिलगावून आम्ही बसलो. कोंबडीचा सुगंध आसमंतात दरवळत होता. मरतुकडा आतून काहीतरी घेऊन आला.
"सायेब लोकांना लागतं, म्हणून तुमच्यासाठी ईंग्लिश आणलीय" मरतुकडा गिलास काढत बोलला.
हे बाकी भारी झालं.

मग आम्ही घोट घोट करत आख्खी बाटली रिचवली. मरतुकड्याला थोडी जास्त झाल्याने तो बाहेरच लवंडला.
मग ललना म्हणाली, आधी तुम्ही जेवून घ्या.

कोंबडी फर्मास होती. वादच नाही.
पण बनविणारी आतून खट्टू होती. मी म्हणालो, "आमचा राग आला का?"
ललना म्हणाली, "नाही, तुमची काय ईच्छा आहे मला चांगलंच ठाऊक आहे"

"तुमच्या ह्यांना नोकरी लावणं माझ्या हातात नाही. माफ करा.." दारून नशेत माणूस खरं बोलतो. म्हणून सांगून टाकलं.

"माहिती आहे.. " ती म्हणाली.
मी चमकून तिच्याकडे पाहिले.

"पण माझं प्रेम आहे तुमच्यावर " ललना आता मूड मध्ये येऊन गुलूगुलू बोलायला लागली.
मी रस्सा ताटात ओतून घेतला. आणि तंगडीचा घास घेऊन भाकरी कुस्करायला प्रारंभ केला.

"का बरं, असं काय आहे माझ्यात.. मी तर एक साधा कारकून" लिंबू पिळत मी कलेजीवरही ताव मारला.

"तुम्ही शेजारच्या खोलीत राहता ना म्हणून" ती म्हणाली. हे काही आम्हांस झेपले नाही. दाताखाली हाडूक आल्यागत. असो.

"म्हणजे"

"म्हणजे मी ठरवलं होतं, शेजारच्या खोलीत जो कोणी राहायला येईल, त्याच्याशी प्रेम करायचं" ती म्हणाली. म्हणजे योगायोगाने तिथे मी राहायला आलो. आणि ही माझ्या प्रेमात पडली. ते म्हणतात ना, सुंदर स्त्रियांचा मेंदू डुप्लिकेट असतो.

तेवढ्यात तो मरतुकडा डुलत डुलत आला. त्याने उगाचच हजारवेळा माफी मागितली. तसंही त्याच्याबरोबर जेवण्यास मला विशेष इंटरेस्ट नव्हता. मग कोपऱ्यात बसून त्याने कोंबडीचा फडशा पाडायला सुरुवात केली.

मी जेवण संपवून खोलीत जरा लवंडलो. पोट तर तृप्त झाले होते. पण बाकी? विचार करत पुस्तक काढले तेवढ्यात ललना आत आली. आणि आशा परत एकदा पल्लवित झाल्या. बाई आणि बाटली हे विचित्र समीकरण आज जुळून येणार तर.

ती खाटेवर बसली. आम्हांस फार थंड वाटले.
"तुमचंही माझ्यावर प्रेम आहे ना?" तिने माझा हात हातात घेऊन उरोजांवर ठेवत विचारले. मऊ मुलायम मांसल मखमली उत्तान उरोजांचा तो स्पर्श आम्हांस क्षणार्धात ढगात घेऊन गेला. मौके पे चौका साधत आम्ही दुसरा हात कमनीय कोमल गरगरीत वळणदार नितंबावरती दाबून धरला. आणि तारूण्याने मुसमुसलेल्या त्या यौवनेच्या गुलाबपाकळ्यांचे रसपान करत म्हटले "हो खूप.."
आम्ही आत प्रवेश करून त्या मदनिकेचा मदनमनी कुस्करन्याच्याच बेतात होतो की मदनिका स्वतःस माझ्या बाहुपाशातून सोडवत म्हणाली," घाई नको.. उद्या आमच्या ह्यांची रात्रपाळी आहे. मी ऊद्या येईन दोन वाजता. तयार राहा."

ओसंडून वाहणारे आमचे परमसुख आम्हांस नाईलाजास्तव कॅन्सल करावे लागले. या अशा स्त्रियांमुळेच KLPD नामक म्हण उगम पावली असावी.

हैदोस वाचण्यात आता तसा काही अर्थ नव्हता. एवढे सुख कदाचित आम्हांस झेपलेच नसते.

रंगरंगीली सकाळ झाली. घमेली आणि भगुणी पाण्याने भरून ठेवली. कचेरीत जाऊन खुर्चीचे दर्शन घेतले. चौपाटीवर भटकलो. आठवलं तसं मेडिकलमध्ये महत्त्वाचे सामान विकत घेतले. असावी म्हणून प्रगत देशातून आलेली जपानी तेलाची एक बाटलीही घेऊन ठेवली. रात्री सामसूम झाल्यावर खोलीवर परतलो.

वाटेत घरमालक भेटला. म्हणाला, "रात्री दार उघडं ठेऊन झोपत जाऊ नका हो.. आणि आवाज कसले येतात तुमच्या खोलीतून?"
"माझ्या, अहो ते तर या शेजारच्या खोलीतून येतात.." आम्ही विस्मयाने म्हणाले.
"अहो कसं शक्य आहे? ही खोली तर सहा महिने झाले बंदच आहे." मालक आश्चर्याने म्हणाला.
"काहीतरीच काय, ईथे एक बाई आणि तिचा नवरा राहतो ना? रात्री आम्ही सोबत जेवण केलं" मी त्याला समजावलं.
"काय सांगता? खरंच की काय? अहो तुमच्या अगोदर इथं एक वॉचमन राहायचा. तो पण असाच सांगायचा.. पण अचानक एक दिवस तो गायब झाला"

आता मात्र चिडीचूप शांतता पसरली. मी पुरता टरकून गेलो.

मग मालक समजावण्याच्या सुरात म्हणाला, "हे बघा, तुमच्यापासून काम लपवायचं, तुम्ही सरकारी नोकर, या खोलीत एका बाईनं आत्महत्या केली आहे हे खरं आहे. तिच्या नवऱ्याचे बाहेर संबंध होते म्हणे.. पण मला काय हे लपवायचं नव्हतं. पण दुसऱ्यांदा तिच्याविषयी कुणीतरी सांगतंय म्हटल्यावर मला तुमची चिंता वाटली."
हे ऐकून मी सुन्न झालो.
"पाहिजे तर तुम्हाला उद्या खोली बदलून देतो. आजची रात्र काढा" म्हणत मालक निघून गेला.

हातभर फाटल्यावर जी काही स्थिती होती तश्या स्थितीत आम्ही खोलीत प्रवेश केला. दरवाजा घट्ट बंद केला. जपानी तेल टेबलावर शांतपणे ठेऊन दिले. खिडक्यांवरची जळमटे तशीच होती. म्हणजे काल त्यांना कुणीच साफ केले नाही. ते कागदपत्रेही कुठे दिसेनात. हैदोस नावाच्या पुस्तकाकडे आता बघवत नव्हते. पण तसं घाबरण्याचे काही कारण नव्हते. रोजच्यासारखी ही पण एक रात्र सरेल. शेवटी कशीबशी झोप लागली.

रात्री कधीतरी दरवाज्यावर थाप पडली. आणि पडतच राहिली. "अहो उघडा ना. आज दार का बंद केलंय. दोन वाजले. मी आलेय."

भितीने माझी गाळण उडाली. पण होतंय तरी काय बघू म्हणून मी शेवटी दरवाजा उघडलाच.

लोकं म्हणतात, त्या रात्री खोलीमध्ये एवढे दणके बसत होते की आख्खी बिल्डिंगच दणाणून गेली होती.

&#9997 यांचे सर्व लेखन

कथामांसाहारीक्रीडामौजमजाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Apr 2020 - 1:31 pm | प्रचेतस

ह्या गोष्टीला अशीही कलाटणी मिळेल असं वाटलं नव्हतं. जबरदस्त एकदम.

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2020 - 1:35 pm | चौथा कोनाडा

बाबौ !

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2020 - 1:37 pm | चौथा कोनाडा

बाबौ !

चांदणे संदीप's picture

11 Apr 2020 - 1:47 pm | चांदणे संदीप

जव्हेरभाऊ अ‍ॅट हीज बेश्ट... कीपीटप!

सं - दी - प

ट्रम्प's picture

11 Apr 2020 - 1:55 pm | ट्रम्प

वाचताना मला प्रश्न पडला होता की नक्की मिपा ओपन केलंय का ?
पण ,
आई शप्पथ !! शेवटी जबरी धक्का .

विजुभाऊ's picture

11 Apr 2020 - 4:57 pm | विजुभाऊ

कसल्ले खतरी आहे हे . लै भारी.
जव्हेरभाउ

नावातकायआहे's picture

11 Apr 2020 - 5:20 pm | नावातकायआहे

मस्त ..

सतिश गावडे's picture

11 Apr 2020 - 5:21 pm | सतिश गावडे

मिपा वयात आलंय. पण कथेची कलाटणी अगदीच टिपिकल आहे. :)

प्रमोद देर्देकर's picture

11 Apr 2020 - 5:37 pm | प्रमोद देर्देकर

होय सगा,

आता जव्हेरभाऊंच्या कथा वाचुन शेवट काय होणार याचा थोडा अंदाज येतो.

अभिजीत अवलिया's picture

11 Apr 2020 - 5:38 pm | अभिजीत अवलिया

जबरदस्त !

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2020 - 8:42 pm | चौथा कोनाडा

लॉक डाऊन सार्थकी लागला !
जव्हेर भौ _/\_

वामन देशमुख's picture

11 Apr 2020 - 8:55 pm | वामन देशमुख

खास जव्हेरगंज कलाटणी!
अप्रतिम!

चाणक्य's picture

12 Apr 2020 - 12:19 am | चाणक्य

बाकी हिचं नाव शितली ठेवायला पाहिजे होतं. लई याद येते शितलीची.

तुषार काळभोर's picture

12 Apr 2020 - 12:30 am | तुषार काळभोर

मिपावर हैदोस नावाचा धागा पाहून जरा गडबडलो, पण लेखकाचे नाव वाचून सावरलो.
कथा वाचायला सुरुवात केल्यावर परत हडबडलो.
पण शेवटची गुगली पार दोन पाय अन् ब्याटच्या मधून स्टंपवर बॉल आदळावा तशी...

अत्रुप्त आत्मा's picture

12 Apr 2020 - 1:40 am | अत्रुप्त आत्मा

+++१११... दणकाच एकदम!

पाषाणभेद's picture

12 Apr 2020 - 10:45 am | पाषाणभेद

हा हा हा
दणका अन धुरळा संगटच.

पिंगू's picture

12 Apr 2020 - 10:50 am | पिंगू

जव्हेरशेठ जबरी कथा..

धर्मराजमुटके's picture

12 Apr 2020 - 12:16 pm | धर्मराजमुटके

ह्यामुळेच मला भुतकथा आणि भुतसिनेमे आवडत नाहित. नायक नायकिणीचा प्रेमालाप रंगात यायच्या अगोदरच रसभंग करुन टाकते मेले भुत. थोडं उशीरा स्वत:च्या असण्याची जाणिव करुन दिली असती तर अनेक शक्यतांचा जन्म होऊ शकत होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2020 - 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लॉकडाऊनच्या काळात जरा अशी कथा बरे वाटते. चांगली कथा. आवडली.

-दिलीप बिरुटे

सरनौबत's picture

12 Apr 2020 - 3:13 pm | सरनौबत

जबरदस्त जव्हेरभाई! ललना डोळ्यांसमोर उभी राहिली

जेम्स वांड's picture

12 Apr 2020 - 3:20 pm | जेम्स वांड

काय ती शब्दसंपदा अन काय ते अश्लील तरीही बीभत्स न वाटणारे लिहायची कला

कलीजा खल्लास भाई!.

भागो's picture

13 Apr 2020 - 10:49 am | भागो

त्या घरमालकाने थोडी घाईच केली. काही महिने थांबला असता तर आपल्याला, द मा मिरासदारांना टांंग मारून झालेला भुताचा जन्म बघायला मिळाला असता.

भागो's picture

13 Apr 2020 - 10:49 am | भागो

त्या घरमालकाने थोडी घाईच केली. काही महिने थांबला असता तर आपल्याला, द मा मिरासदारांना टांंग मारून झालेला भुताचा जन्म बघायला मिळाला असता.

भागो's picture

13 Apr 2020 - 10:49 am | भागो

त्या घरमालकाने थोडी घाईच केली. काही महिने थांबला असता तर आपल्याला, द मा मिरासदारांना टांंग मारून झालेला भुताचा जन्म बघायला मिळाला असता.

राघव's picture

13 Apr 2020 - 11:52 am | राघव

_/\_

मित्रहो's picture

14 Apr 2020 - 6:54 pm | मित्रहो

कितीतरी दिवसानंतर हैदोस आठवले. होस्टेल संपल्यापासून बंदच झाले होते.
शेवटी काहीतरी भूताचा मामला असणार याचा अंदाज आला होता. नक्की भूत कोण असेल हे समजत नव्हते. पुढच्या वेळेला तुमच्या अशाच एखाद्या कथेत पुरुषाला भूत बनवा.

कानडाऊ योगेशु's picture

14 Apr 2020 - 7:02 pm | कानडाऊ योगेशु

जव्हेरभौ स्टाईल कथा. आवडली.
एक निरिक्षण आहे. एकाही स्त्री आयडीने प्रतिसाद दिला नाही आहे कथेला.!

लई भारी's picture

17 Apr 2020 - 4:42 pm | लई भारी

कलाटणी तर भारी आहेच! पण मधले पंचेस पण जबरी!

_/\_

Nitin Palkar's picture

17 Apr 2020 - 8:03 pm | Nitin Palkar

मस्त कथा!

निओ's picture

18 Apr 2020 - 3:39 pm | निओ

भारी लिहिली आहे...जव्हेरभाऊ मस्त लिखाण!