कच्च्या फणसाची बिर्याणी

केडी's picture
केडी in पाककृती
24 Mar 2020 - 3:50 pm

image1

मित्राच्या बागेत बरक्या फणसाचे झाड आहे। त्याची भाजी छान होते असे त्याची आई म्हणाली। मी पटकन "मग बिर्याणी पण छान होईल" असे बोलून गेलो! मग काय, दिला त्यांनी एक कच्चा फणस तोडून।

शेफ रणवीर ब्रार च्या फणसाच्या बिर्याणी वरून प्रेरणा घेऊन ही बनवली, आणि रीतसर पोरांनी आणि आमच्या शाकाहारी बायकोने चापली! एक डब्बा मित्राच्या घरी आवर्जून दिला, आणि त्याच्या आईने पसंती दर्शवली हे वेगळे सांगायला नको!

शेफ रणवीर ब्रार च्या पाककृतीचा हा दुवा. मी साधारण ३०० ते ३५० ग्राम कच्चा फणस वापरला, आणि मोजून ४०० ग्राम बासमती तांदूळ. त्याच्या रेसिपी मध्ये मी थोडे बदल केले, उदारणार्थ तळलेला काजू वापरणे, मिठा इत्तर, दुधात भिजवलेले केसर वापरणे वैगेरे.

रेसिपी दुवा आहे त्यामुळे वेगळी रेसिपी देत नाही. प्रेझेन्टेशन अर्थात डोक्यात होतेच, यामुळे पटकन जमले. कच्चा फणस शिजल्यावर अगदी मटणासारखा लागतो, त्यामुळे मांसाहारी लोकांना देखल आवडेल हि बिर्याणी.

IMAGE2

प्रतिक्रिया

रमेश आठवले's picture

24 Mar 2020 - 7:59 pm | रमेश आठवले

मीठा अत्तर म्हणजे काय ?
तयार झालेली बिर्याणी फणसाच्या ट्रे मध्ये ठेवण्याचीकल्पना भन्नाट आहे.

चौकस२१२'s picture

25 Mar 2020 - 5:38 am | चौकस२१२

छान, मस्त..

कंजूस's picture

25 Mar 2020 - 8:19 am | कंजूस

सादरीकरण छान.

प्राची अश्विनी's picture

25 Mar 2020 - 7:59 pm | प्राची अश्विनी

जिप्सीमध्ये खाल्लेली ही बिर्याणी. रेसिपीसाठी धन्यवाद.

उत्खनक's picture

30 Mar 2020 - 10:11 am | उत्खनक

भारी दिसतंय.. ! धन्यवाद. :-)

बादवे, फणस तयार कसा करतात? मला कल्पना नाही. सांगाल प्लीज?

आमच्याकडे तरी अजून फणस झाडावर तयार होतो....
:-))

उत्खनक's picture

30 Mar 2020 - 6:50 pm | उत्खनक

फणस तयार करणे भाजी साठी.. म्हंजे, त्याचा चिकटपणा असतोच. सोबत कठीण टरफलं असतात.. ते कसं हाताळायचं?
फणस शिजायला साधारण किती वेळ लागतो? त्याची काही वेगळी पद्धत आहे का? मला कल्पना नाही म्हणून विचारलं.

सुरीला आणि हाताला तेल लावले, मला प्लेटिंग साठी हवा होता म्हणून उभा चिरला मुद्दाम, देठ काढून टाकणे (कोबी चिरताना जसा काढतो तसा)। बाकीचा आठळ्या आणि गरे सदृश भागाचे मोठे तुकडे केले मुद्दाम कारण ते रिसिपी प्रमाणे तळून घायचे होते, छोटे तुकडे केले तर ते बिर्याणी मध्ये विरघळून जातील किंवा तुटतील।

बाकी फणस चिरायचे बरेच व्हिडिओ तुनळी वर आहेत

उत्खनक's picture

31 Mar 2020 - 10:19 am | उत्खनक

बघतो तिथे पण. :-)

प्रशांत's picture

30 Mar 2020 - 7:18 pm | प्रशांत

मस्त हो ....

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Apr 2020 - 12:49 pm | अनिरुद्ध.वैद्य

ट्राय कराव म्हणतो, लॉकडाऊनमध्ये फणास मिळाल्यास!