मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कच्च्या फणसाची बिर्याणी

केडी · · पाककृती
image1 मित्राच्या बागेत बरक्या फणसाचे झाड आहे। त्याची भाजी छान होते असे त्याची आई म्हणाली। मी पटकन "मग बिर्याणी पण छान होईल" असे बोलून गेलो! मग काय, दिला त्यांनी एक कच्चा फणस तोडून। शेफ रणवीर ब्रार च्या फणसाच्या बिर्याणी वरून प्रेरणा घेऊन ही बनवली, आणि रीतसर पोरांनी आणि आमच्या शाकाहारी बायकोने चापली! एक डब्बा मित्राच्या घरी आवर्जून दिला, आणि त्याच्या आईने पसंती दर्शवली हे वेगळे सांगायला नको! शेफ रणवीर ब्रार च्या पाककृतीचा हा दुवा. मी साधारण ३०० ते ३५० ग्राम कच्चा फणस वापरला, आणि मोजून ४०० ग्राम बासमती तांदूळ. त्याच्या रेसिपी मध्ये मी थोडे बदल केले, उदारणार्थ तळलेला काजू वापरणे, मिठा इत्तर, दुधात भिजवलेले केसर वापरणे वैगेरे. रेसिपी दुवा आहे त्यामुळे वेगळी रेसिपी देत नाही. प्रेझेन्टेशन अर्थात डोक्यात होतेच, यामुळे पटकन जमले. कच्चा फणस शिजल्यावर अगदी मटणासारखा लागतो, त्यामुळे मांसाहारी लोकांना देखल आवडेल हि बिर्याणी. IMAGE2

वाचने 8133 वाचनखूण प्रतिक्रिया 11

रमेश आठवले Tue, 03/24/2020 - 19:59
मीठा अत्तर म्हणजे काय ? तयार झालेली बिर्याणी फणसाच्या ट्रे मध्ये ठेवण्याचीकल्पना भन्नाट आहे.

In reply to by केडी

उत्खनक Mon, 03/30/2020 - 18:50
फणस तयार करणे भाजी साठी.. म्हंजे, त्याचा चिकटपणा असतोच. सोबत कठीण टरफलं असतात.. ते कसं हाताळायचं? फणस शिजायला साधारण किती वेळ लागतो? त्याची काही वेगळी पद्धत आहे का? मला कल्पना नाही म्हणून विचारलं.

In reply to by उत्खनक

केडी Mon, 03/30/2020 - 19:05
सुरीला आणि हाताला तेल लावले, मला प्लेटिंग साठी हवा होता म्हणून उभा चिरला मुद्दाम, देठ काढून टाकणे (कोबी चिरताना जसा काढतो तसा)। बाकीचा आठळ्या आणि गरे सदृश भागाचे मोठे तुकडे केले मुद्दाम कारण ते रिसिपी प्रमाणे तळून घायचे होते, छोटे तुकडे केले तर ते बिर्याणी मध्ये विरघळून जातील किंवा तुटतील। बाकी फणस चिरायचे बरेच व्हिडिओ तुनळी वर आहेत