भाजपचे दिल्लीत पानिपत ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
9 Feb 2020 - 12:14 pm
गाभा: 

राम राम मंडळी. गेली काही दिवस ज्या निवडणुकांचे बिगूल वाजत होते ज्याची अतिशय चर्चा होत होती अशा नवी दिल्लीतील भाजपने प्रतिष्ठेच्या केलेली लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पुन्हा विजयाकडे वाटचाल करतील असा मतदानोत्तर चाचण्यांचा कल दिसत आहे. भाजपचे केंद्रात सरकार असल्यामुळे साम दाम दंड भेद नितीचा वापर करुन या निवडणूकीत काही चमत्कार करता येईल का असा एक प्रयत्न झाल्याचे दिसून येते. तसेही इतर पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. एकही जागा नसलेली काँग्रेसपक्षाला अजूनही सावरता आलेले नाही. मात्र अनपेक्षितपणे दिल्लीच्या मोठ्या एका आंदोलनानंतर राजकीय प्रवेश केलेल्या आम आदमी पार्टीने दोनदा ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले आणि त्यांनी दिल्लीकरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, नवीन बदल केले एक आश्वस्त करणारा प्रचार केला. वीज,पाणी, शाळा, पर्यावरण, रस्ते शासकीय योजनांचा योग्य उपाययोजना सामान्य लोकांपर्यंत पोहचवल्या म्हणूनच तिसर्‍यांदा लोकांनी त्यांना निवडले आहे असे मतदानोत्तर चाचण्यांमधून दिसत आहेत.

दुसरीकडे भाजपने नेहमीप्रमाणे धार्मिक ध्र्वीकरण ज्यात हिंदु-मुस्लीम गट तट करुन पाहिले. काही राष्ट्रीय मुद्द्यांना दिल्लीत टाकून पाहिले. संघपरिवाराने सव्वालाख कार्यकर्त्यांना प्रचारात लावले. (संदर्भ दैनिकातल्या बातम्या) काही खासदारांना मतदारसंघ वाटून निव्वळ त्याच मतदारसंघावर फोकस करण्याचा सांगण्यात आले. साधन संपत्तीचा योग्य उपयोग करुन त्यांना प्रचाराला जुंपले तरीही दिल्लीकरांनी या सर्व गोष्टींना नाकारुन आपवरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीवर टीका करुनही त्यांच्या विकासाच्या मार्गाला कोणीही रोखू शकलेले नाहीत असे वाटायला लागले आहे.

मंडळी, राजकारणात सतत कोणीही आम्हीच सरकारात असू असे स्वप्न पाहू शकत नाही. जनतेचे प्रश्न कोणते, प्राधान्याने कोणते प्रश्न सोडवायला हवेत. यावर भर दिला की लोक योग्य पर्याय निवडतात असे वाटते. येत्या काळात जनता दिल्लीचा प्रवास कसा असेल ते बघणे रोचक असेल. अजूनही निश्चित कोणाची सत्ता येईल हे जरी गुलदस्त्यात असले तरी भाजपचे पानिपत होऊन मतदानोत्तर चाचण्या आपच्या पदरात कल टाकत आहेत असे दिसते.

मंडळी, या सर्व निवडणू़कीत अजून काय मुद्दे होते ? दिल्ली विधानसभेतील बलाबल काय असेल ? संभाव्य वाटचाल आणि इतर दिल्ली राजकारणा विषयी आपापली मतं संदर्भासहीत, कोणाचाही व्यक्तीगत द्वेष न करता, शांतपणे काही वैचारिक चर्चा पुढे घेऊन जाता येईल काय, त्यासाठीचा हा काथ्याकूट. आपलं स्वागत आहे.

प्रतिक्रिया

जनतेने जागरूकपणे मतदान करून कोणालाही निवडून आणले तरी आनंद आहे. मी लोकशाहीच्या बाजूने आहे. मोदी किंवा रागा किंवा अके यांच्या नव्हे.

'आप'चे स्वागत आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Feb 2020 - 1:13 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चांगल्या शाळा/रुग्णालये की हिंदू-मुस्लिम तणाव्,जिन्ना,सावरकर,पाकिस्तान.. दिल्लिकरानी विचारपुर्वक मत दिले असेल अशी अपेक्षा.
केजरीवाल ह्यानी मोदीविरोधात बोलावे, गोदी मिडियाने त्याचे भांडवल करावे व 'केजरीवाल कसे अहिंदू आहेत्,कसे सुडो-लिबरल आहेत' अशी मध्यम्वर्गात चर्चा व्हावी. आतापर्यण्तचा हा ठरलेला पॅटर्न होता. ह्यावेळी मात्र आम आदमी पक्षाने त्या समजास तडा दिला. हनुमान मंदिरात जाणे, हनुमान चालिसा म्हणण्याबरोबर बुनियादी मुद्द्यांवरच मतदारांचे लक्ष राहील हे 'आप'ने पाहिले. त्यामुळे आता अमित शहांची 'चाणक्य'निती किती यशस्वी होते ते मंगळवारी कळेल.

समजणे महत्वाचे आहे. माझ्या दिल्लीतील वासतव्यात आलेला अनुभव हे सांगतो मेजोरिटी दिल्लीकरांना फुकट हवे असते, तो झोपडीतला असु देत कि डिफेन्स काॅलनीतील, त्यामुळे केजरिवालने दाखवलेल्या फुकट बस, फुकट लाइट, फुकट औषधे, फुकट शाळा, यामागे मिनिओन्स गेले असतीलही, मंगळवारी नेमके कळेल.

ऋतुराज चित्रे's picture

9 Feb 2020 - 3:50 pm | ऋतुराज चित्रे

फुकट दिल्याने दिल्ली राज्य दिवाळखोरीत गेले आहे का? नसेल गेले तर वाईट काय आहे?

गवि's picture

9 Feb 2020 - 4:27 pm | गवि

सहमत

उलट त्याच राज्यातील लोकांनी भरलेला कर आणि अन्य रीतसर उत्पन्नाचे मार्ग / वाटा यांतून सर्वांना मोफत सुविधा देऊ शकत असतील तर भ्रष्टाचार / पैशाचे लीकेज अत्यंत आटोक्यात आणलं आहे असं म्हणावं लागेल.

सुबोध खरे's picture

10 Feb 2020 - 1:16 pm | सुबोध खरे

दिल्ली हि देशाची राजधानी असल्यामुळे तेथे मिळणाऱ्या करांचे प्रमाण (केंद्राचे आणि राज्यांचे) भरपूर आहे.शिवाय त्या राज्याचे क्षेत्रफळ फारच कमी आहे.

महारष्ट्रात गडचिरोली गावात रस्ता बांधण्यासाठी वीज पुरवण्यासाठी येणाऱा दरडोई खर्च हा दिल्लीतील एखाद्या वस्तीला रस्ता बांधण्यासाठी येणारा खर्चाच्या दसपट किंवा वीस पट आहे आणि त्यातून मिळणारा महसूल हा एक पंचमांश आहे. मग गडचिरोलीच्या खेड्यातील माणसांना एस टी चा किंवा विजेचा दर दहा पट लावणार का?
दिल्ली राज्याने बहुसंख्य पायाभूत सुविधा केंद्रशासित असल्यापासून आंदण म्हणून फुकटात मिळवल्या आहेत. त्या
मुळे कोणतेही कर्जाचे हप्ते नसताना भरपूर कर मिळवून आयजीच्या जीवावर बायजी उदार म्हणून मतांसाठी जनतेला फुकटेपणाची सवय लावण्याची हि वृत्ती शेवटी देशाच्या मुळावर येईल.

दिल्ली काही केजरीवाल यांनी उभी केलेली नाही. दिलीत विजेचा एक खाम्ब टाकायला दहा हजार रुपये खर्च येतो तर गडचिरोलीला २५ हजार येतो. आणि गडचिरोलीलाला एका वस्तीला वीज पुरवायची असेल तर १०० खांबांची गरज पडत असेल तर दिल्लीत दहा खांबात ते काम होतं.

गडचिरोलीला त्या वस्तीतून मिळणाऱ्या विजेच्या बिलातून पुढची १०० वर्षे तरी हा भांडवली खर्च निघणार नाही. मग गडचिरोलीला वीजच पुरवायची नाही का? हि वीज पुरवण्यासाठी महारष्ट्रातील जनतेच्या करातून हा पैसा पुरवावा लागेल

यामुळे दिल्ली "राज्याला" बरीच गोष्टी फुकट देणे परवडते.पण महावितरणला १४९०० कोटींचा तोटा असताना हे महाराष्ट्राला परवडेल का?

आता महाराष्ट्रात मतांसाठी पण १०० युनिट पर्यंत फुकट वीज द्यायचा बेत चालू आहे

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/maharashtr...

एकदा लोकांना फुकट मिळायची सवय लागली कि तो हक्क होऊन जातो आणि हि फुकट द्यायची सवय शेवटी जनतेच्या मुळावर येते.

धीरूभाई अंबानी याना भ्रष्टाचार बद्दल विचारले असता त्यांनी अशी मखलाशी केली होती कि माझे काम केल्याबद्दल मी त्या कर्मचाऱ्याला खुशीने चार पैसे दिले तर त्याच्या मुलाबाळांचे कल्याण होते.
याचा परिणाम म्हणजे ज्या माणसाला असे पैसे देणे परवडत नाही त्याचे काम होत नाही आणि सर्वात वाईट म्हणजे त्या कर्मचाऱ्याला पैसे मिळवण्याची सवय होते.

पण पण पण...... तुमचे सामान्य ज्ञान गेले चुलीत.. मला मोदी आवडत नाही... मी भाजप विरोध करणारच.मग ते देशविघातक असुदे नाहीतर इतर काही..

प्रचेतस's picture

11 Feb 2020 - 9:39 am | प्रचेतस

१००% सहमत.

रमेश आठवले's picture

9 Feb 2020 - 10:57 pm | रमेश आठवले

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांचं ट्विट वाचा.
सगळ्या एक्सिट पोल्स मध्ये आप चा विजय दर्शवल्या नन्तर तिवारींनी हे ट्विट केले आहे.
'ये सभी एग्ज़िट पोल होंगे fail.. मेरी ये ट्वीट सम्भाल के रखियेगा.. भाजपा दिल्ली में ४८ सीट ले कर सरकार बनायेगी .. कृपया EVM को दोष देने का अभी से बहाना ना ढूँढे.' ०८/०२/२०

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2020 - 8:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धाग्याचा आत्माच काढून घेतला तुमच्या प्रतिसादाने. आता मंगळवारची वाट पाहणे आले. इतरवेळी एक्झिट पोलवर विश्वास ठेवणारे किंवा जनतेच्या मनात योग्य कल भरणारे जेव्हा कल विरोधात जातोय असे वाटत आहे तेव्हा एक्झिट पोल फेल होईल अशी 'चमत्काराची' भाषा करू लागतात तेव्हा काही तरी 'झोल' आणि 'संभ्रम'करण्यात भाजपचा आणि त्यांच्या मिडियाचा कोणी हात धरु शकणार नाही. माझा अशा कोणत्याही 'झोल'वर विश्वास नाही. एकूण ही सर्व मते मतांतरे पाहता भाजप ०३ सीट्सवरुन १२ ते १५ सीट्सवर जाऊ शकेल कारण अरविन्द केजरीवाल आणि त्यांच्या वास्तवदर्शी विकासाच्या मुद्याला भाजपा पराभूत करू शकणार नाही अशी माझी धारणा आहे. उद्या काय होईल ते कळेलच.

-दिलीप बिरुटे

रमेश आठवले's picture

10 Feb 2020 - 10:53 am | रमेश आठवले

पंजाब मधील शेवटच्या विधानसभा निवडणुकीत एक्सिट पोल प्रमाणे आप ला १०० जागा मिळणार होत्या. पण प्रत्यक्षात मिळाल्या वीस. आप ने त्यामळे इ व्ही एम विरुद्ध खूप बोंबाबोंब केली. आता अकरा तारखेस काय होते ते पहायचे.

वगिश's picture

11 Feb 2020 - 8:15 am | वगिश

आपण काय विचार करून हा प्रतिसाद दिला आहे, 2019 लोकसभे चे exit पोल इतक्या लवकर विसरलात?? ( AAP हरणार असे मी म्हणत नाही पण तुमच्या मनातील भाजपा विरोधामुळे निर्माण झालेला भूलभुलैया सोपा करण्याचा प्रयत्न)

lakhu risbud's picture

10 Feb 2020 - 12:18 am | lakhu risbud

भाजपला बहुमत मिळणार.

४.३० नंतर मतदानात २८-३०% वाढले आहे.

एक्झिट पोल मध्ये ४.३० पर्यंतचेच आकडे विचारात घेतलेत.

त्यामुळेच भाजपा आणि शहा एवढे ठाम आहेत.

आणि सातही एक्झिट पोलमध्ये आप ला बहुमताचा अंदाज व्यक्त केला असतानाही केजरीवालने एक्झिट पोलवरती शंका व्यक्त केली आहे.

असे पहिल्यांदाच होत असेल.
विजयाचा अंदाज व्यक्त करुनही पक्षाचा नेता साशंक आहे.

आपच्या बहुमताचे अंदाज देणारे पोल काल ६.३० सुरु झाले.

७ वाजता आपची तातडीची बैठक बोलावली होती.

'हरणाऱ्या' भाजपाची बैठक मात्र रात्री १० वाजता सुरु झाली

ऋतुराज चित्रे's picture

10 Feb 2020 - 12:28 am | ऋतुराज चित्रे

केजरीवाल सरकारवर दिल्लीकर नाराज होण्याचे कारण कोणी सांगू शकेल का?

रमेश आठवले's picture

10 Feb 2020 - 10:44 am | रमेश आठवले

केजरीवाल यांच्यावर त्यांचे गुरु अण्णा हजारे आणि समाजात स्वच्छ प्रतिमा असलेले योगेंद्र यादव, प्रशांतभुषण आणि कुमार विश्वास यांच्या सारखे साथीदार हे का नाराज आहेत हे कोणी सांगू शकेल का ?
राज्यसभेतील आप च्या वाटेला आलेल्या तीन जागा पैकी दोन जागा राजकारणाशी सुतराम सम्बन्ध नसलेल्या आणि ख्याती नसलेल्या दोन गुप्तांना का दिल्या हे कोणी सांगू शकेल काय ?
त्यांनी अब्रुनुकसानीच्या किती खटल्यामध्ये माफी नामे लिहून तुरुंगात जाण्याचे टाळले हे कोणी सांगू शकेल का ?
हि यादी आणखी बरीच वाढवता येईल पण सध्या एवढे पुरे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Feb 2020 - 11:44 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"केजरीवाल सरकारवर दिल्लीकर नाराज होण्याचे कारण कोणी सांगू शकेल का?"
दिल्लिकर अनेक वर्गात विभागला गेला आहे रे ऋतुराजा. गरीब व निम्नमध्यम वर्गाचा पाठिंबा 'आप'ला नक्किच असेल. पण व्यापारी वर्ग्,लब्धप्रतिष्ठित्,उच्च मध्यम वर्ग.. ह्यातील अनेक लोकाना कथित राष्ट्रवादाचे आकर्षण असते. तर काहीना धर्माचे असते. आपल्या शहरातील सरकारी शाळा सुधारल्या ह्याचे ह्यावर्गाला कौतुक असेलच असे नाही. पण सरकारने रस्त्यावर नमाज पढायला बंदी केली ह्याचे त्या वर्गाला कौतुक असेल.
ह्यातील कोणत्या वर्गाने कसे मतदान केले आहे ते उद्या समजेल.

जोन's picture

10 Feb 2020 - 2:39 pm | जोन

कि पानपता नन्तर सुद्धा मराठा राज्य ५० वर्स भारतातिल सर्वात मोठे राज्य होते.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2020 - 8:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सकाळी सकाळी देशात एक चांगली बातमी जावी, देशभरात विकासाच्या वाटचालीचा पाया रचणारे, विधायक दृष्टी असणारे अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी राज्यभिषकाकड़े वाटचाल करी आहे असे सुरुवातीच्या अंदाजावरुन दिसत आहे.

आप ४९
भाजप १३
इतर

-दिलीप बिरुटे

अजूनही राजेशाही जपणारी गुलाम मानसिकता..
भक्त सगळेच असतात, प्रत्येकाचा देव वेगळा असतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2020 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंडळी, दिल्ली विधानसभेचे अंदाज पाहता अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीम ५० + पुढे जाईल असे दिसत आहे. आणि देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना प्रचारात उतरुनही १५ च्या पुढे जाता येत नै ये असे दिसते. लाजीरवाना पराभव नसला तरी आम आदमी पार्टी यांच्या विजयाची कारणे आणि भाजपंचं पानिपत यावर सविस्तर प्रतिसाद लिहिनच.

अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमला सत्तेसाठी शुभेच्छा देतो. आणि ज्यांचा पराभव होत आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असे सुचवायला हरकत नाही असे वाटते.

-दिलीप बिरुटे
(दिल्लीच्या जनतेचं कौतुक वाटलेला)

अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमला सत्तेसाठी शुभेच्छा देतो. आणि ज्यांचा पराभव होत आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असे सुचवायला हरकत नाही असे वाटते.

हेच आत्मपरिक्षण २०१४ आणि २०१९ च्या लोकसभेला का नाही केलंत म्हणे?

शेखर's picture

11 Feb 2020 - 10:32 am | शेखर

तुम्हाला सुसंगत उत्तर मिळो ही केजरीवाल चरणी प्रार्थना.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2020 - 11:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकसभेत का पराभव झाला त्याचं आत्मपरीक्षण केलंच असणार कारण लोकसभा दिल्लीकरांच्या विकासात काय हातभार लावू शकेल हा मनोमन विचार दिल्लीकरांनी नक्कीच केला असणार. तेव्हा वातावरण ढवळू निघालेले होते. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल असं ते युद्ध लढवले गेले. ''आप''ला दिल्लीकरांनी या लढाईत दूर ठेवलं. भाजपा नेतृत्वाने भावनिक आवाहान केले. पुलावामा अटॅक, ऊरी आणि बालकोट येथील घटनांचा राष्ट्रप्रेमाचा अर्थ असा लावला आहे की मोदी असतील तरच पाकिस्तान घाबरून राहील नाही तर पाकिस्तान आपल्यावर दहशत माजवेल. याबाबतीत काही लोक अशा विषयांच्या बाबतीत पूर्णपणे आहारी गेलेले दिसून येतात. निवडणूक काळात विविध सोशियल मिडियावर ट्रोलांनी केलेली वातावरण निर्मिती या धामधूमीतून आप बाहेर पडले. लोकांना वाटत असलेली भीती की जर पुन्हा भाजपा सत्तेवर नाही आले तर या देशाचं काय होईल या अनामिक भीतीने भाजपला लोकसभेत तारले आणि म्हणूनच ज्यांच्या बुद्धिचा काहीही सबंध नसलेले (अपवाद असतीलही) स्वामी,साध्वी, बाबा लोक निवडणुकी उभे राहतात आणि ते निवडून येतात. दिल्लीकरांनी बेगड्या देशप्रेमाला प्राधान्य देऊन विकास आणि तत्सम गोष्टीला वेटींंगवर ठेवलं आणि योग्य वेळ येताच त्यांच्या पदरात माप टाकलं असेल असं मला वाटतं.

सध्या आम आदमी पार्टीच्या विजयाचा सर्वांनी मनमुराद आनन्द घ्यावा कारण ही लोकशाही आहे, लोक योग्य वेळी योग्य बदल करत असतात असा तो ध्वन्यार्थ.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

11 Feb 2020 - 12:03 pm | प्रचेतस

दिल्लीकरांनी बेगड्या देशप्रेमाला प्राधान्य देऊन विकास आणि तत्सम गोष्टीला वेटींंगवर ठेवलं आणि योग्य वेळ येताच त्यांच्या पदरात माप टाकलं असेल असं मला वाटतं
दिल्लीकरांनी वीज, पाणी अशा फुकट मिळणार्‍या गोष्टींना भुलून केजरीवाल सरकारला तारलं असं मत आहे. दिल्लीचा खर्‍या अर्थाने विकास झाला तो शिला दिक्षित ह्यांच्या कारकिर्दित. आपण शिला दिक्षितांना ह्याचे श्रेय दिल्याचे कुठे आढळले नाही. सुदैवाने मला तेव्हा दिल्लीला जायची संधी मिळाली होती. स्वच्छ रस्ते, मेट्रोचे व्यापक जाळे. कुठूनही कुठेही सहज जाता येणे ही खासियत. बाकी दिल्लीचा काही भाग आजही गलिच्छ आहे हे सांगणे न लगे.

बाकी केजरीवालांना मनापासून शुभेच्छा आहेतच.

वगिश's picture

11 Feb 2020 - 10:08 am | वगिश

भाजप च कौतुक वाटत आहे, कुठलेही फुकट देण्याचे आमिष न दाखवता मागील (2015) 3 जागांवरून 20 वर घेतलेली झेप नक्कीच अभिनंदनीय आहे.

फुटूवाला's picture

11 Feb 2020 - 10:14 am | फुटूवाला

नैतिक विजय साजरा करायला मोकळे :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

11 Feb 2020 - 6:54 pm | अनिरुद्ध.वैद्य

मारली ओ मालक!100% घसघशीत वाढ आहे जागांमध्ये!
काय पानपत अन काय !!

:-D

सुबोध खरे's picture

11 Feb 2020 - 11:25 am | सुबोध खरे

मला गम्मत वाटते कि काँग्रेसी लोक स्वतःला एकही जागा मिळत नसताना केवळ भाजप निवडून येत नाही याचा आनन्द व्यक्त करत आहेत.

हे म्हणजे आपलं पोरगं नापास झालं तरी चालतंय पण शेजाऱ्याचा मुलगा पहिला न आल्याचा आनंद साजरा करत आहेत.

गम्मतच आहे.

सुबोध खरे's picture

11 Feb 2020 - 11:35 am | सुबोध खरे

आणि सध्या आपलं अपयश झाकून ठेवण्यासाठी बरेच काँग्रेसी "तात्पुरते" आपटार्ड झालेले आहेत.

म्हणजे कसं भाजपला हरवल्याबद्दल वाकुल्या दाखवता येतात आणि काँग्रेसी म्हणून टीका हि सहन करावी लागत नाही.

भंपक मनोवृत्ती.

फुटूवाला's picture

11 Feb 2020 - 12:11 pm | फुटूवाला

ईव्हीएम यंत्रणा सुटली :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Feb 2020 - 12:52 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

केजरीवाल व आम आदमी पक्षाचे मनापासुन अभिनंदन.
हिंदु-मुस्लिम, सुडो लिबरल,टुकडे टुकडे..अशा विविध पण बोगस मांडणी लोकप्रिय करणार्या भाजपाला हरवणे व सत्ता कायम ठेवणे सोपे नव्हते. "जे आम्हाला विरोध करतात ते सगळे देशद्रोही व पाकिस्तान पुरस्कृत" अशा धाटाची मांडणी मे २०१९ ला चालली पण ह्यावेळी दिल्लिकरानी भाजपाचा कावा ओळखलेला दिसतो.
आता पुढे बिहारमध्ये निवडणूक आहे. बिहारची सामाजिक परिस्थिती पाहिली तर 'हिंदू खतरे मे ' म्हणत हिंदू-मुस्लिम विभाजन करणे हा भाजपा-संघाचा पुढचा कार्यक्रम असेल.

गोंधळी's picture

11 Feb 2020 - 2:27 pm | गोंधळी

दिल्लि मे हिंदुत्व के भेजेमे गोलिमारि है देश्द्रोहियोने. हिंदुस्तान खतरेमे है. हिंदु के राजा मोदि जि को ईसे हल्केमे नहि लेना चाहिये. सिर्फ अयोध्यामे हि नहि अभि तो हर चौक पर प्रभु राम का मंदिर होना हि चाहिये. चाहे तो होस्पिटल,स्कुल मत बनाव लेकिन मंदिर होना हि चाहिये. चाहे तो विकस मत करो लेकिन ईन देश्द्रोहियो से हिंदुस्तान को बचाओ.

शाम भागवत's picture

11 Feb 2020 - 2:57 pm | शाम भागवत

३७०, ३५ए व सीएए च्या नंतर झालेली पहिलीच निवडणूक. जबरदस्त धृविकरण झालेले दिसून येतयं. आप व भाजपा दोघे मिळून ९२% मते मिळवत आहेत.

केजरीवालांना १% टक्काच मते कमी पडलेली म्हणजे त्यांनी गेल्यावेळची मते टिकवली असे म्हणता येईल. तसेच या धृविकरणाचा फारसा परिणाम केजरीवालांना मिळालेल्या मतांवर झालेला दिसून येत नाही.

मात्र १९९३ च्या अयोध्या यात्रेनंतर प्रथमच भाजपाची मत ३९% पर्यंत वाढलेली दिसत आहेत. मागच्या वेळेपेक्षा ७% जास्त मत मिळालेली दिसत आहेत. भाजपाला धृविकरणाचा जबरदस्त फायदा झालेला दिसून येत आहे. सरासरी ३४.५०% च्या भोवती फिरणारी मतांच्या संख्येतून भाजपा बाहेर पडलेली दिसतीय. धृवीकरणाचे फायदे असेच मिळायला लागले तर भाजपा समान नागरी कायदा आणण्याचे प्रयत्नपण करायला लागू शकेल.

पक्ष
१९७७
१९८३
१९९३
१९९८
२००३
२००८
२०१३
२०१५
२०२०

जनता दल
५२.६०
-
-
-
-
-
-
-
-

काँग्रेस
३६.१०
४७.०५
३४.०५
४७.०८
४८.०१
४०.०३
२४.०७
९.७०
-

भाजप
-
३७.००
४२.०८
३४.००
३५.०२
३६.०३
३३.०३
३२.०३
३९.००-

आप
*
-
-
-
-
-
-
५४.५
५३.००

mayu4u's picture

14 Feb 2020 - 12:49 pm | mayu4u

भारी विश्लेशण!

विकासाच्या मुद्दयांवर निवडणूक लढवून जिंकता येते हे आप ने दाखवून दिले आहे.
त्यांचे अभिनंदन.

बाकी आजकाल वेळ नसल्याने येथे येता येत नाही. नाहीतर जे फुकट दिले म्हणून वोटिंग केले गेले असे भासवत आहे त्यावर नक्कीच उत्तर देता आले असते.

बजेट, कर या वाढलेल्या पैस्यातुन जर कोणते सरकार त्याच लोकांना पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य यात हातभार लावत असेल तर आपण नावे ठेवायची काय?
असो. फुकट मला hi कधीच पसंद नाही.. परंतु कर्ज घेऊन फुकट आणि बजेट आणि कर रक्कम सुधारून फुकट यात फरक आहेच.

असो..

--अवांतर..

माझा 5 वर्षा पूर्वीच्या धाग्याला रिप्लाय देणार होतो. पण हा धागा दिसला सो येथेच रिप्लाय योग्य. पण जुने रिप्लाय वाचून मज्जा आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2020 - 4:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकार मीडिया पोसतंय हे माहिती होतं, पूर्वीही असल्या दूकानदा-या चालू असतील पण आज वार्तांंकन करतांना त्यांनी नेहमीप्रमाणे कळस गाठला. एकीकडे एक्सिट पोलने 'आप' ५५+ आकडे दाखविल्यानंतर ''आज जो रुझान आ रहे है उससे २१ सीटोपर भाजपा आगे चल रही है'' असे Abp न्यूज वाजवत होते. आणि भाजपच्या उमेदवारांपेक्षा त्या एंकरचा तेथील बीजेपी एक्सपर्टचा उत्साह बियरमधून बाहेर पडणा-या फेसाप्रमाणे फसफसत होता. ते पाहून हसायला येत होतं. आत्ता ६३ आप आणि भाजप ०७ दाखवल्यावर उसनी चर्चा बघुन गम्मत वाटत होती.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

11 Feb 2020 - 4:45 pm | माहितगार

इ.व्ही एम. अशीच भाजपा विरोधकांच्या सोयीने नीट काम करत राहोत

आजानुकर्ण's picture

11 Feb 2020 - 10:49 pm | आजानुकर्ण

गेल्या निवडणुकीपेक्षा दुपटीहून जास्त जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळालेल्या भाजपाचे आणि त्यांच्या समर्थकांचे हार्दिक अभिनंदन!
असेच यश निरंतर मिळत राहो ही मोटाभाई आणि नमोचरणी प्रार्थना!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2020 - 10:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खोडसाळपणा गेला नै तुमचा अजुन असे मत व्यक्त करून थांबतो. ;)(कपाळ ठोकणारी स्मायली)

-दिलीप बिरुटे
(आजानुकर्णाचा जालशाळा सोबती) ;)

विकास's picture

12 Feb 2020 - 1:36 am | विकास

(बिरुटे सरांच्या मैत्रिपुर्वक आग्रहा खातर एक पिंक टाकत आहे :) )

सर्वप्रथम "भाजपचे दिल्लीत पानिपत?" असे शिर्षक दिल्याने, त्यात अरविंदरावांचि तुलना नकळत अहमदशहा अब्दालीशी झाली आहे. हे सरांचे अभ्यासपूर्ण प्रामाणिक मत आहे का खोडसाळपणा आहे ते काही मला माहीत नाही... फक्त आमच्या लक्षात आले आहे इतके सांगू इच्छितो ;) 

आता माझी काही निरीक्षणे:

भले दिल्ली बाहेरच्या पब्लिकला काही वाटोत, पण आप ने काम केले आहे असे जर दिल्लीतल्या बहुमताला वाटत असेल तर आप ला बहुमत मिळाले हे योग्यच झाले. जसे मोदी सरकारला नुसते बहुमतच नाही तर आधी पेक्षा अधिक जागा भारतीय जनतेने दिल्या ते योग्य झाले तसेच. दोन्ही संदर्भात दोघांच्याही विरोधकांनी बोटे मोडत बसण्याचे काही कारण नाही... 

स्थानिक (म्हणजे राज्यस्तरीय) निवडणुकांसंदर्भात जर स्थानिक जनता राज्याच्या कारभार संदर्भात विचार करूनच सरकार निवडत असली तर उत्तम आहे. असेच झाले पाहिजे. आशा करतो की दिल्लीतल्या जनतेने केवळ फुकट मिळणाऱ्या सरकारी गोष्टींवर डोळा ठेवून हे केलेले नाही. कारण आज ना उद्या ते अर्थसंकल्पात दिसणार आहे. 

केजरीवाल आणि त्यांच्या चमूने "भारतमाता की जय", "वंदे मातरम" वगैरे घोषणा देऊन तसेच, देवळात जाऊन, हनुमान चालीसा वगैरे वाचून आपण हिंदू असणे कमी लेखत नाही आणि आपण कमी "भारतीय" नाही हे दाखवून दिले. त्याआधी त्यांनी राज्यसभेत ३७० काढून टाकण्यास पाठिंबा देखील दिला होता. मला वाटते आज जरी दिल्लीत भाजपचा पराभव झाला असला तरी भाजपने केलेल्या विचारमंथनामुळे काही माध्यमे/विचारवंत म्हणत आहेत त्याप्रमाणे स्वतःचे सॉफ्ट हिंदुत्व जाहीर दाखवणे आता कमीपणाचे वाटत नाही. किंबहुना बदलत्या काळाबरोबर आपण कधी हिंदू झालो हे देखील त्यांना कळले नसले तर तो भाजपचा मोठ्ठा वैचारिक विजय आहे. मेरा देश बदल रहा है! ;) 

दिल्लीत आज काँग्रेसने, जे गेल्या निवडणुकीत विश्वातून शून्य तयार केले होते त्यात भर म्हणून की काय, ६३ जागांवर अनामत रक्कम जप्त करायला लावून काँग्रेसने जनतेला खात्री करून दिली... "काळजी करू नका आम्ही नाही येत". त्याचबरोबर खोट्या धर्मनिरपेक्ष राजकारणाचा वापर करत वाढलेल्या काँग्रेसी वृत्तीला दिल्लीत स्थान मिळालेले नाही. त्या अर्थाने संख्या आणि विचार या दोन्हीसाठी दिल्ली काँग्रेसमुक्त झालेली आहे. त्यामुळे दिल्लीकरांचे अभिनंदन! यातून इतर पक्षांनी काही बोध घेतला तर ते त्यांच्यासाठी आणि जनतेसाठी चांगले ठरू शकेल... 

थोडक्यात नेतृत्वाचा चेहरा नसल्यास, असलेल्या नेतृत्वासच आम्ही स्थानिक प्रश्नांवरून परत निवडून देणार हा भाजपाला संदेश मिळाला. तर राष्ट्रप्रेम, हिंदूपणाची लाज न वाटून घेणे यातून काही राजकीय तोटा होत नाही हे आप ला समजले. म्हणून माझ्या लेखी समंजस होऊ पाहणाऱ्या आणि स्वतःच्या हिंदू  संस्कृतीशी नाळ न तोडणाऱ्या लोकशाहीचा हा विजय आहे. 

एकीकडे भाजपाला विचार करायला लावणारा आहे... आणि दुसरीकडे प्रमुख नेता, पक्षाध्यक्ष, मुख्यमंत्री अशी सगळी पदे स्वतःकडेच ठेवण्याच्या वृत्तीमधून दिल्लीच्या सीमा ह्या कुंपण करून रमणार्या "आप" ला जर त्या दिल्लीच्या विहिरीबाहेर विहार करायचा असेल तर संघटनात्मक दृष्टीने खूप विचार करायला लावणारा हा निकाल आहे. तो विचार केजरीवाल कसा करणार यावर त्यांचे आणि पक्षाचे पुढे कसे होणार ते ठरणार आहे... 

तूर्तास आप, भाजप आणि दिल्लीकरांना मन:पूर्वक शुभेच्छा! 

आजानुकर्ण's picture

12 Feb 2020 - 4:59 am | आजानुकर्ण

स्वतःचे सॉफ्ट हिंदुत्व जाहीर दाखवणे आता कमीपणाचे वाटत नाही. किंबहुना बदलत्या काळाबरोबर आपण कधी हिंदू झालो हे देखील त्यांना कळले नसले तर तो भाजपचा मोठ्ठा वैचारिक विजय आहे. मेरा देश बदल रहा है!

काय सांगता. गांधीजींना सांगायला पाहिजे! बिचाऱ्यांना कल्पनाही नसेल की त्यांच्या सॉफ्ट हिंदुत्वाचा विचार (त्यावेळी अर्ध्या चड्डीतही नसलेल्या) भाजपाच्या वैचारिक भूमिकेतून आला आहे ते. गेलाबाजार नेहरूंना सांगू की त्यांनी पंतप्रधान होताना काशीला केलेल्या पूजेची प्रेरणा (त्यावेळी अर्ध्या चड्डीतही नसलेल्या) भाजपाच्या वैचारिक भूमिकेतून आली होती ते. जाता जाता आजन्म काँग्रेसी राहिलेल्या सरदार पटेलांना सांगू की (त्यावेळी अर्ध्या चड्डीतही नसलेल्या) भाजपाच्या वैचारिक भूमिकेतून प्रेरणा घेऊन त्यांनी सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण करण्यात मोठा वाटा उचलला.

भाजपाचे जे काही आहे त्याचा हिंदुधर्मातील चांगल्या गोष्टींशी काही संबंध नाही. उगीच पडलो तरी नाक वर असा आव नको ब्वा.

वैष्णव जन तो तेने कहियेजे, पीड परायी जाने रे!

विकास's picture

12 Feb 2020 - 8:24 am | विकास

खरेच की! आणि जनेउधारी राहुल गांधिना पण विसरलो होतो! :D

विकास's picture

12 Feb 2020 - 7:46 pm | विकास

त्यावेळी अर्ध्या चड्डीतही नसलेल्या

या सतत आलेल्या वाक्प्रयोगातील "अर्धी चड्डी" म्हणजे काय? नक्की अर्धी चड्डी कोण घालयचे?

तेजस आठवले's picture

13 Feb 2020 - 2:22 pm | तेजस आठवले

आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधी बॅरिस्टर झाल्यावर पूर्ण पॅन्ट (पूर्ण चड्डी) घालत असत.नंतर मात्र ते फक्त पंचा नेसत. आता लांबून पाहिल्यानंतर काही जणांना ते अर्धी चड्डी घालत असल्याचा भास होत असावा कदाचित.

रमेश आठवले's picture

12 Feb 2020 - 9:29 pm | रमेश आठवले

जे नाही जो
वैष्णव जन तो तेने कहिये जो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Feb 2020 - 12:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास सर, राजकीय सामाजिक चर्चेत तुम्ही आले पाहिजे असे नेहमी मला वाटते, साधक बाधक चर्चेतून लवचिक असलेली मतं बदलायला, घट्ट करायल मदत होते. मॅच्युरीटी येते. वेगवेगळ्या अँगलने या सर्व गोष्टीकडे पाहता येते. आपण मैत्रीखातर प्रतिसाद लिहिण्यासाठी आलात. थँकू व्हेरी मच. बाकी, पानिपत शीर्षकाबद्दल काही मतं प्रामिणिक तर मिपाच्या स्वभावाला जागून काही खोडसाळपणा आहे, हेही नम्रपणे नमुद करतो. ;)

बाकी प्रतिसादात आपण आपचं पोटभर कौतुकही केलं नाही आणि भाजप चुकलं असेही म्हणाला नाहीत, असे एक निरिक्षण नोंदवतो. :)

-दिलीप बिरुटे

विकास's picture

13 Feb 2020 - 4:43 pm | विकास

तर मिपाच्या स्वभावाला जागून काही खोडसाळपणा आहे

वोरिजिनल मिपाकर आहे... ;)

बाकी प्रतिसादात आपण आपचं पोटभर कौतुकही केलं नाही आणि भाजप चुकलं असेही म्हणाला नाहीत, असे एक निरिक्षण नोंदवतो.

निवडणूक जिंकले म्हणून पोटभरून कौतुक मला वाटते मी कुणाचेच केलेले नाही. कोणी हरल्याचा अधिक आनंद झाला नक्की असेल (त्यातही विशेष करून डावे आणि डावे विचारवंत! ;) ). माझा प्रतिसाद परत वाचाल तर समजेल की माझ्या द्रुष्टीने भाजप ला कुठली चूक भोवली ते लिहिले आहे.

रमेश आठवले's picture

12 Feb 2020 - 2:08 am | रमेश आठवले

आप पक्षाच्या विजयावरून त्याच्या राष्ट्रीय पातळीव परिणामावर करणाऱ्यानी हे ध्यानात घ्यावे की अधिकाराच्या दृष्टीने पाहिले तर ही केवळ एक महानगरपालिका आहे. दिल्लीचे बजेट मुंबई महानगरपालिके पेक्षा कमी आहे. तेथील मुख्य मंत्री, मंत्री , विधानसभा सदस्य या नामकरणावर जाऊ नये.

आजानुकर्ण's picture

12 Feb 2020 - 5:04 am | आजानुकर्ण

तर ही केवळ एक महानगरपालिका आहे.

कोल्ह्याला द्राक्षे आंबट? अहो तुमच्या आमच्यासारख्याला जे कळतं ते देशाच्या पंतप्रधानपदी बसलेल्या आणि गृहमंत्री आलेल्या व्यक्तीला कळू नये? जरा फीडबॅक द्या! नाहीतर उद्या मंचर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला येतील प्रचाराला. त्या आदित्यनाथला घेऊन!

मराठी कथालेखक's picture

13 Feb 2020 - 1:21 pm | मराठी कथालेखक

अहो तुमच्या आमच्यासारख्याला जे कळतं ते देशाच्या पंतप्रधानपदी बसलेल्या आणि गृहमंत्री आलेल्या व्यक्तीला कळू नये?

बरोबर आहे..

नाहीतर उद्या मंचर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला येतील प्रचाराला. त्या आदित्यनाथला घेऊन!

याचीही शक्यता नाकारता येत नाही. देशाच्या पंतप्रधानाकडे निवडणूक प्रचाराकरिता भरपूर वेळ असतो.. कमाल आहे..

जोन's picture

12 Feb 2020 - 12:40 pm | जोन

निदान सर्व ठिकाणि फिरुन आणि काम करुन घेतायत ना....नुस्ते कामाचा दिखवा करत गान्धिन्चे नाव घेत २ २ महिने थायलन्ड मधे "ध्यान" तर करत नाहित!

डँबिस००७'s picture

12 Feb 2020 - 11:49 pm | डँबिस००७

वैष्णव जन तो तेने कहियेजे, पीड परायी जाने रे!

कमाल आहे !! आयुष्यभर हे भजन गाणार्या महात्म्याला फाळणीनंतर पाकिस्तानात मागे राहीलेल्या हिंदु समाजाची (ज्यात मोठा भाग "हरीजन" होता,) पीड कळली नाही !! पण मुर्ख समाज मात्र त्यांना महात्माच समजत राहीला !!

यावरून हे आठवले - हरीजनांचा भ्रमनिरास - नेते वाचले, अनुयायांचे काय? http://swatidurbin.blogspot.com/2019/12/blog-post_11.html?m=1

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Feb 2020 - 10:10 am | माईसाहेब कुरसूंदीकर

पाकिस्तानातील पीडीत हिंदुना भारतीय नागरिकत्व देण्यास विरोध नाही. मुस्लिमाना का वगळले हा मुद्दा आहे. तेथे खोजा मुस्लिम हेही पीडीत आहेत, शिया मुस्लिम पण पीडीत आहेत. हे लोक पण ७२ वर्षपुर्वी हिंदुस्तानीच होते ना ? आसाममधील मोजणीत बाहेरून आलेले हिंदू जास्त आढळले तर मुस्लिम कमी आढळले.
https://www.thehindu.com/news/national/over-19-lakh-excluded-from-assams...

Speculation had been rife that out of the 19 lakh people excluded from the NRC in Assam, as many as 14 lakh were Hindus.
https://www.telegraphindia.com/india/assam-final-nrc-boomerangs/cid/1720790
त्याना मग सामावुन घेण्यासाठी ही 'आधुनिक चाणक्यनीती"

पाकिस्तानातील पीडीत हिंदुना जबरदस्तीने मुस्लिम बनवत आहेत, त्यांना धार्मीक स्वातंत्र्य नाही, म्हणुन भारतात त्यांना अग्रकमाने नागरीकत्व देण्यात येणार आहे.

पाकीस्तानातील पीडीत मुसलमानांना धर्मबदल करावा लागत नाही, त्यामुळे त्यांना अग्रक्रम देण्यात आलेला नाही. कायदेशीर प्रक्रीया पार पाडुन ते भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज करु शकतात.

या कायद्याविरुद्ध भारतीय नागरीकानी दंगेधोपे करण्यासारखे काय आहे?

चौकस२१२'s picture

13 Feb 2020 - 11:14 am | चौकस२१२

मग तुमचा म्हण्णा काय? कि बांगलादेशातील सुन्नी मुसलमानांना पण द्यावा आश्रय ? आहे कि त्यांना जायला सौदी किंवा हिरवागार इंडोनेशिया ...जगात इतरत्र उघडपणे किंवा चतुर पद्धतीने विविध देश "आपल्या" माणसांना परत येण्यास मदत करतात मग भारताने जर जवळपासच्या आणि ते म्हणजे इस्लाम धर्मावर आधारित मुस्लिम बहुल देशातील हिंदू, शीख जैन (असतील तर) बुद्ध आणि ख्रिस्ती सुद्धा अल्पसंख्याकांना अश्या पद्धतीने मदत केली तर "भारतातील नकाश्रू ढोंगी सर्वधर्मवाद्यानं का एवढे झोंबते?
- सौदी सीरियातील लोका ना जर्मनी मध्ये मशीद बांधायला पैसे देतो ते चालत!
- मलेशिया आपल्या "उम्मा " तीळ मियांमार मधील रोहिंग्यांचं नावाने अश्रू गाळतो ते चालत !
- हाँग कोन्ग जेवहा चीन ला परत दिले गेले तेव्हा सिंगापोर , हाँग कोन्ग मधील ( प्रामुख्यने हान चिनी वंश ) लोकांना पायघड्या घालून बोलवते
- इस्राएल जगातील सर्व जु ना अवो जावो घर तुम्हारा असे म्हणते ते चालते
पण ग्यानबाची मेख अशी कि भाजप ने हे केलं म्हणून पोटशूळ ( कि जे करण्याची काँग्रेस ची हजार वषात धमक होणार नाही, )
दुसरे असे कि असा कांगावा केलं जातो कि जणू काही हे सरकार भारतीय नागरिक असलेल्या मुसलमानांना सुद्धा हाकलणार आहे? किती खोटं बोलार्णार हे अति डावे!
हिंदूंना . शिखांना , जैनांना भारत हाच एक मुख्य देश आहे मग केले असे नियम तर कोणाच्या पिताश्रींचे काय जाते?
भारत हा सर्वधर्मी संभावी राहावा हीच बहुसंख्यांक हिंदूंची इच्छा आहे .. पण डावे ज्या पद्धतीने विरोध
करीत आहेत तो खरंच किळसवाणा आहे ,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Feb 2020 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंडळी, चर्चेचा एक दर्जा राखल्याबद्दलम, संयमाने चर्चा केल्या, सहभाग नोंदवला त्या समस्त गट तट आणि विचारांचा आग्रह धरणार्‍या मिपा मंडळींचे आभार.

अरविंद केजरीवाल यांची आप टीम ज्या मुद्यांवर लढली ते मुद्दे शाळा, दवाखाने, वीज, पाणी, दिल्लीसाठीचं योग्य बजट, रस्ते, विकास यावर त्यांनी भर दिला आणि ते जिंकले. तीनशे सत्तर कलमाला पाठींबा देऊन, देशाचे पंतप्रधाने माझेही पंतप्रधान आहेत असे म्हणून विरोधी मुद्याची हवा काढून घेतली. हनुमान चालीसा, गोलीमारो या मुद्द्यांवरही ते शांत राहीले. केंद्र आणि मुद्यांना अरविंद केजरीवाल आणि टीमने बगल दिली. सुरुवातीची दोनेक वर्ष त्यात त्यांनी वाया घातली यात हाती काही लागणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून या प्रचारात त्यांच्यावरची टीका टाळली असे म्हणावे लागेल. आतंकवादी म्हणने, देशद्रोही म्हणने असा विखारी प्रचार भाजपाने केला तरी अरविंद आअणि टीमने विकासाच्या मुद्यावरुन फोकस हटू दिला नाही. हिंदु-मुस्लीम, पाकिस्तान, शाहीनबाग, मंदिर, मशीद या मुद्यांवर भाजपा लढली आणि त्यांच्या पदरात काय पडले ते आपण पाहतोच आहोत.

मंडळी, एक चर्चेत मुद्दा आला फूकटचा त्यात अरविंद आणि टीमने वीज, पाणी, आणि काही गोष्टी मोफत दिल्या. सरकारला झेपलं म्हणून त्यांनी ते केलं असं म्हणता येईल. भाजपनेही यंव फूकट देऊ आणि त्यंव फू़कट देऊच्या घोषणा केल्याच होत्या पण दिल्लीकरांनी त्यांच्या घोषणांना हवा दिली नाही आणि मतंही दिले नाही. वीज मोफत देऊ, पाणी मोफत देऊ या घोषणा भाजपच्या होत्याच पण अजून काय फ्री देऊच्या घोषणा केल्या हेही आपणास माहिती असेलच ज्यात नववी उत्तीर्ण झालेल्या मुलींना सायकली मोफत देऊ, कॉलेजला जाणार्‍या मुलींना स्कुटी देऊ अशा घोषणा होत्या. दिल्लीकरांनी या फूकटछाप घोषणा का स्वीकारल्या नाही त्याचाही विचार केला पाहिजे.

लालूच दाखवून दिल्लीकरांची मतं आपने मिळवली या मुद्द्यात तसा दम राहीला नाही असे वाटते. मा.मोदींनी शेतकर्‍याच्या खात्यात दहा हजार देऊ ही घोषणाही तशी होतीच आणि ते शेतकर्‍यांना मिळालेही होते तेव्हा ही लालूच होती असे म्हणायचं का, असा प्रश्नही उरतोच. दिल्लीकरांचे मोदीवरही प्रेम आहे, हे दिल्लीकरांनी लोकसभेतील सातही शीट्स देऊन ते सिद्ध केले. सातही खासदारांचा या निवडणूकीत किती इनव्हॉल्व होते त्यांचा किती प्रभाव पडला हेही दिसून आले. दिल्लीची निवडणूक ही हिंदूस्थान विरुद्ध पाकिस्तान अशी लढवायचा भाजपचा प्रयत्न होता तो सपशेल फसला. मनोज तीवारीसारखा सटकलेला भोजपूरी नेता दिल्लीत नेतृत्व करीत होते, त्यात अजिबात दम नाही, असं माझं व्यक्तीगत मत आहे. खरी दारोमदार होती ती शहा आणि मोदीयांच्यावरच. दोनशेच्या जवळ सभा घेणारे शहा यांचाही प्रभाव पडला नाही. भाजपाचा अजेंडा धर्म तर आपचा कर्म होता म्हणून आपला ही संख्या गाठता आली. अर्थात काँग्रेसचं निवडणूकीतून अर्ध्यातून माघार घेणे हेही आपच्या पथ्यावरच पडले. या निवडणूकीत काँग्रेसने अधिक तयारी केली असती तर नुकसान आपला झाले असते आणि भाजपचा फायदा झाला असता त्यामुळे शुन्यातली काँग्रेस शुन्यात राहिली मला वाटतं हा आपला सत्तेत राहण्यासाठी काँग्रेसने मदत केली पण एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाची धुळधान हाही विषय आहे. पण भाजपला रोखणे यात तेही यशस्वीच झाले असे म्हणावे लागेल.

अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीमने काही धार्मिक मुद्दे चातुर्याने इग्नोर केले तर काहींना बोल्ड केले. मला वाटतं सध्या तरी अरविंद केजरीवाल खर्‍या अर्थाने विकासाचा हिरो ठरले आहे. लोकशाही मजबूत होण्यासाठी ज्या काही मुद्द्यांची गरज असते त्या मुद्यांवर आधारित ही निवडणूक झाली म्हणून ही निवडणूक वेगळी वाटते. भाजपा या निवडणूकीतून काही शिकेल अशी अपेक्षा करुया आणि अरविंद केजरीवाल आणि टीमचं कौतुक करुन त्यांना दिल्लीच्या अधिकाधिक विकासासाठी शुभेच्छा देऊन थांबतो.

ता.क. : काही मुद्दे राहीले असतील तर वेळ मिळेल तसा प्रतिसाद टंकायला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. : )

-दिलीप बिरुटे

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Feb 2020 - 1:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम प्रतिसाद. आता तरी भाजपावाले बुनियादी मुद्द्यांवर निवडणूक लढवतील अशी अपेक्षा करूया.

चौकस२१२'s picture

13 Feb 2020 - 1:43 pm | चौकस२१२

काही वर्षांपूर्वी "आप" पक्ष शून्यातून निर्मण करून दिल्ली मध्ये काँग्रेस आणि भाजप ला एक पर्याय निर्माण केला हि खरंच भारतीय लोकशाहीत अभूतपूर्व घटना होती असे नक्कीच म्हणता येईल पुढील प्रवासात विकास आणि चांगले प्रशासन यावर खास करून दिल्ली शहरी माणसाला ज्यात स्थानिक पातळीवर ज्यात स्वारस्य आहे त्यावर केलेलं काम म्हणून यश मिळाले यात शंका नाही...अभिनंदन
या विजयाचया आनंदात पण काही मुद्दे "काहीही करा पण भाजप नको" ग्यांग नि लक्षात घेतले तर बरे होईल
१) दिल्ली ची निवडणूक म्हणजे कदाचित सर्वात छोट्या राज्याची निवडणूक असावी त्याचा वापर करून आता "भाजप किंवा काँग्रेस सारखया राष्ट्रीय पक्ष संपला आणि सगळी कडे आत आप निर्मण होईल असल्या संभ्रमात कोणी असेल तर गम्मत च आहे
२) इतर राज्यांप्रमाणे दिल्ली वर सत्ता करणाऱ्याला शेती, दळवलनाचे मोठे जाळे इत्यादी ला सामोरे फारसे जावे लागत नाही
३) दिली राजधानी असल्यामुळे तिथे बराचसा मूलभूत सोईं वर खर्च केंद्र सरकार करते तेव्हा तो बोजा कमी,
४) भाजपनं कदाचित राष्ट्रीय मुद्दे नको इतके ताणले असतील , ते त्यांना भोवले हे मान्य
५) काँग्रेस आणि भाजप पुढे राज्यस्तरीय पक्षांचे आव्हान कसे पेलायचे हा मात्र प्रश्न दिवसन्दिवस वाढत आहे त्यात काँग्रेस मरगळलेली .. भाजप शिखरावर जाऊन आता "फार पटकन खाली घसरणार कि काय?" या विवंचनेत .. एकूण काय फुटकळ पक्षांचे अच्छे दिवस

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Feb 2020 - 4:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"भाजप किंवा काँग्रेस सारखया राष्ट्रीय पक्ष संपला आणि सगळी कडे आत आप निर्मण होईल असल्या संभ्रमात कोणी असेल तर गम्मत च आहे"
तशा संभ्रमात कोणी असेल असे वाटत नाही. बुनियादी/कळीचे मुद्दे कधी चालतात तर कधी चालत नाहीत मात्र समाजात फूट पाडून धृविकरणाचे फायदे अनेक्वेळा यश देतात असे दिसुन आले आहे. फक्त भारतातच नाही तर अनेक देशात राजकीय पक्षाना धृविकरणाचा फायदा होतो.
creating minority complex in majority of people असल्या प्रयोगाना अनेकवेळा यश मिळते असे दिसुन आले आहे.
"मुसलमान जेव्हा तुमच्या घरात शिरुन काफिर म्हणून हाकलून देतील तेव्हा तुम्हाला मोदींचे महत्व समजेल" कालच वॉट्स अ‍ॅपवर फिरणारा संदेश होता.

गड्डा झब्बू's picture

13 Feb 2020 - 4:30 pm | गड्डा झब्बू

धागा आणि त्यावरची आप समर्थक, आप विरोधक, भाजप समर्थक, भाजप विरोधक, मोदि-शहा समर्थक व विरोधक अशा सर्वांची मते वाचली. एका महत्वाच्या मुद्द्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटले. तो म्हणजे मधल्या काही काळात सरकारने घेतलेले काही अति धाडसी व अंमलबजावणी करण्यास महाकठीण निर्णय ज्यांची सर्वसामान्य जनतेला झळ सोसावी लागली. उदा. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारला जाणारा भरमसाठ दंड आणि सर्व राष्टीय महामार्गांवरच्या टोलनाक्यांसाठी fast tag अनिवार्य.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारला जाणार्या भरमसाठ दंडाला तर खुद्द पंतप्रधानांच्या राज्यातहि विरोध झाला. त्यातून किती दंड वसूल होऊन सरकारी तिजोरीत जमा झाला व किती रक्कम वाहतूक पोलिसांच्या खिशात गेली असेल हा अभ्यासाचा विषय असला तरी नागरीकांच्या खिशाला भरपूर चाट लागली. fasttag चे हि तसेच! सरळमार्गी लोकांनी दिलेल्या मुदती आधी आगाऊ रक्कम जमा करून ते घेतले. नंतर मुदतवाढ झाल्यावर अनेकांनी घेतले पण अजूनही सर्व ठिकाणी रोख पैसे देऊन टोल स्वीकारला जातोच. fast tag अनिवार्य करण्या मागे टोल नाक्यांवर होणारा विलंब टाळण्यासाठीचे कारण सांगितले गेले होते पण अजूनही तिथे लागलेल्या लांब रांगांमुळे खोळंबा होत असल्याने ज्यांनी fast tag लावले आहेत त्यांना किती मनस्ताप होत असेल. मधल्या काळात दिल्लीला गेलेल्या लोकांनी हे बघितले असेल कि हे दोन्ही भयानक अनुभव उर्वरित देशातील जनतेपेक्षा दिल्लीकरांना जास्तच आले असल्याने त्यांनी आपला निषेध मतपेटीतून दाखवून दिला असावा.
बाकी चर्चा चालुद्या! मजा येत आहे वाचायला.

विकास's picture

13 Feb 2020 - 5:51 pm | विकास

दिल्लीत लहान मोठे व्यापारी हे पारंपारिक पणे भाजपा समर्थक आहेत. मात्र जी एस टी मुळे आता पूर्वी सारखा धंदा करणे शक्य नाही तसेच नवीन पद्धत अजून बदलत आहे परिणामी, त्यांनी आप ला मते दिली नसली तरी मते देण्यापासून दूर राहिलेले असू शकतात.

धर्मराजमुटके's picture

15 Feb 2020 - 11:18 am | धर्मराजमुटके

दिल्लीतील निकालांचे विश्लेषण माझ्या मते खालीलप्रमाणे !

१. भाजपाचा पराभव NRC, CAA ह्या मुद्यांमुळे नाही. तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत न करणे हे आहे. "मिनाक्षी लेखी" ह्यांच्यासारख्या एखाद्या स्त्रीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करणे गरजेचे होते. स्थानिक नेतृत्व कोण करणार हा मुद्दा लोकसभा वगळता अगदी सरपंच ते विधानसभा ह्या सगळ्या निवडणूकांना लागु होतो.
२. मोदी नको तर राहुल गांधी चालेल काय ? अशा प्रश्नाचे उत्तर जेव्हा तीव्रतेने नकारार्थी येते त्याचप्रमाणे केजरीवाल नकोत तर मग कोण चालेल ? याचे उत्तर दिल्लीतील जनतेला मिळाले नाही.
३. केजरीवालांनी अगोदर चुका केल्यात मात्र बर्‍याच बाबतीत त्यातून बोध आपला स्वभाव बदलला आहे किंवा बदलल्याचे भासवले आहे. पहिल्यांदा जेव्हा उठसूठ मिडीयात जाऊन बरळायचे ते कमी केल्यामुळे त्याचा फायदा प्रतिमा सुधारण्यात होतो. त्याउलट बीजेपी नेत्यांनी जी भडकाऊ भाषणे केली ती त्यांच्या विरोधात गेली. माणसाने / पक्षाने आपली विचारधारा सोडायची गरज नसते पण त्यावर सातत्याने आणि अति आक्रमक न होता काम करणे गरजेचे असते.
उथळ वक्तव्ये करणारे बोलभांड नेते भाजपा को ले डुबेंगे !

सध्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना देखील याची गरज आहे. रोज उठून ठाकरे सरकारवर निशाणेबाजी केल्यामुळे काहीही साध्य होणार नाही. फडणविसांनी पाच वर्षात जे काही कमावले ते माजी सौ. मुख्यमंत्री ट्विटरवरुन गमावत आहेत. शेलार, पाटील आणि फडविणांनी योग्य ठिकाणी तोंड उघडले तर जनता पाठींबा देईल नाहितर रोज मरे त्याला कोण रडे अशी गत होईल.
४. आता बरेचसे लोक केजरीवालांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवायला बघत असतील तर त्यांनी हुरळून त्या गाडीत बसू नये. दिल्लीत बसून अजून बरेच काही करण्यासारखे आहे. पंतप्रधान पदासाठी अजूनही मोदींची लोकप्रियता शाबूत आहे.
५. काँग्रेसने भोपळा फोडला नाहिच मात्र जवळजवळ ६३ ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे. तरीही बेगाने की शादी मे चिदंबरम दिवाना झाले होते. शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांना डोस दिला हे बरेच झाले. काँग्रेसची बरीचशी मते आपला गेली आहेत. मात्र टक्केवारीचे विश्लेषण पाहता दिल्लीत भाजपाची मतांची टक्केवारी बर्‍याच अंशी वाढली आहे. त्यांनी योग्य नियोजन केले तर ही टक्केवारी अजून वाढत राहण्याचा संभव आहे. मात्र स्थानिक नेतृत्त्व विकसीत होणे अतिशय गरजेचे.
६. केजरीवालांनी काही कामे केलीही असतील. मी तेथे राहत नाही त्यामुळे केवळ वर्तमानपत्रांवर अवलंबून मत बनविणे योग्य नाही. मात्र तेथील खराब हवा आणि ट्राफिक हे अत्यंत गंभीर मुद्दे आहेत त्यावर अजून उपाय निघाला नाहीये हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. किमान प्रदुषित हवेवर तरी तातडीची उपाय योजना झाली पाहिजे. केजरीवालांनी ऑड-इव्हन चा प्रयोग करुन पाहिला. त्याचे परीणाम काय होतील यावर बरेच जणांनी विरोध केला मात्र लोकांना काहीच निर्णय न घेणार्‍या उच्चविद्याविभुषित व्यक्तीपेक्षा चुकीचा का होईना निर्णय घेणारा व्यक्ती आवडतो. निर्णय चुकला तरी त्यात सुधारणेला वाव असतो मात्र समस्या अनिर्णित ठेवण्याने काहिच साध्य होत नाही.
७. शपथविधीला इतर राज्यांचा मुख्यमंत्र्यांना आमंत्रण न देणे हा केजरीवालांचा अतिशय योग्य निर्णय ! फालतूची नाटके टाळणे जमले ज्याला जमले तो माणूस नक्कीच पुढे जाणार !

केजरीवालांचे अभिनंदन ! भाजपासाठी पुढील निवडणूकीसाठी शुभेच्छा आणि कॉंग्रेसला सांत्वनाचे दोन शब्द (गरज आहे काय ?)

विनोदी ता.क. : भाजपाचा काँग्रेसमुक्त भारत चा अजेंडा राबवून केजरीवालांनी दिल्लीत काँग्रेसला नेस्तनाबूत केले त्यामुळे त्यांना भाजपाची बी टीम म्हणावे काय ?

इरसाल's picture

15 Feb 2020 - 1:26 pm | इरसाल

४. आता बरेचसे लोक केजरीवालांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवायला बघत असतील तर त्यांनी हुरळून त्या गाडीत बसू नये.

बारामतीवाल्या काकांचा नंबर यात सर्वात वर असणार. श्री. केजरीवाल यांचा खांदा यांची बंदुक आणी पंप्र पद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2020 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाजपाचा पराभव NRC, CAA ह्या मुद्यांमुळे नाही. तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत न करणे हे आहे

पटण्यासारखं आणि महत्वाचं. आपनेही प्रचार करतांना भाजपनेही मुख्यमंत्र्याचं नाव घोषित करावे असे म्हणाले. खासदारांची छायाचित्रे लावून यातलं मुख्यमंत्री कोण हे आपने विचारलं. आणि आपचा हा मुद्दा दिल्लीत चालला.

बाकी प्रतिसादात मते मतांतरे होतीतल पण तोही उत्तमच.

-दिलीप बिरुटे

दुर्गविहारी's picture

16 Feb 2020 - 1:49 pm | दुर्गविहारी

अंत्यत उत्तम विश्लेषण ! _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2020 - 11:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिल्लीच्या पराभवावर भाजपात काय चिंतन मंथन करते यावर काही दिवसापासून लक्ष ठेवून आहे, पण पराभवाचं विशेष कारण असे ठोसपणे पक्षाच्या वतीने सांगता येतांना दिसत नाही. जय पराजय निवडणूकीत होत असला तरी एवढ्यावरुन भाजपा संपला वगैरे असे समजायचे कारण नसते आणि एवढ्यावरुन अरविंद केजरीवाल आणि टीम देशभरात नव्या उत्साहात पदार्पण करेल असेही नसते.

अमित शहा अ म्हणाले की, भाजपाच्या नेत्यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे दिल्ली निवडणूकीत हानी झाले असे ते म्हणतांना दिसतात,एवढ्यावरुन दिल्लीत इतकी मोठी हार झाली असे मला वाटत नाही. बरं भाजपचं 'संकल्प पत्र' वाचल्यावर लक्षात येतं की त्यांचं संकल्प पत्रही जोरदार होतं. पाणी, वीज, (फूकट देऊ) मुद्दे होते त्याच बरोबर दहा नवे कॉलेजेस, २०० नव्या शाळा याबरोबर सायकल, स्कूटी (फूकट देऊ) हे मुद्दे असूनही, दिल्लीकरांनी त्या संकल्प पत्रावर दुर्लक्ष केलेले दिसते. सीएएच्या या मुद्द्याला हवा दिली नाही. मतदारांनी मतं का दिली नाहीत त्याचं मूळ कारण दिल्लीकरांनी आपवरच टाकलेला विश्वास हेच मूख्य कारण आहे, असे मला वाटते.

अजून काय काय भाजप पक्षाच्या वतीने समोर येतं, दिल्लीत पुढे त्यांची काय वाटचाल राहील हे पाहात राहू. आपचं काय धोरण राहील, ते येत्या काळातही जोखत राहू. तब तक के लिये. जय हिंद जय महाराष्ट्र.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Feb 2020 - 9:44 pm | अमरेंद्र बाहुबली

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष दारोदार चिठ्या वाटत होते. तरी सुद्धा दिल्लीवाल्यानी इतका जोरदार दणका दिला. सध्या आत्मपरीक्षणा पेक्षा मनस्थिती सावरण्यात सर्व गर्क आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Feb 2020 - 9:31 pm | अमरेंद्र बाहुबली

एकंदरीत मोदी सोडले तर भाजपचे नेतृत्व प्रत्येक राज्यात एक एक पप्पूच करतोय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

शा वि कु's picture

16 Feb 2020 - 9:46 pm | शा वि कु

रिंकिया के पापा हिहीहीही हांसदे

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Feb 2020 - 10:20 pm | अमरेंद्र बाहुबली

कच देनी मार देली खिचके तमाचा....

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Feb 2020 - 10:28 pm | अमरेंद्र बाहुबली

कच देनी मार देली खिचके तमाचा....

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Feb 2020 - 5:34 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"एकंदरीत मोदी सोडले तर भाजपचे नेतृत्व प्रत्येक राज्यात एक एक पप्पूच करतोय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले."
हल्लिच्या काळात "अमूक तमूक पदाचा चेहरा कोण? नेतृत्व द्या" अशा प्रकारची मागणी होताना दिसते. मतदार मत देतात ते फक्त चेहरा/नेत्रुत्व पाहून नाही तर सत्ताधारी पक्षाने/सरकारने केलेल्या कामाचा विचार करूनही. मे २०१९ मध्ये मोदी सरकार निवडून आले ते फक्त चेहरा व नेत्रुत्व नाही तर काही अंशी तळागाळात पोचलेले काम. विविध सरकारी योजनांचा लोकाना झालेला लाभ.. हे मुख्य कारण होते.
दिल्लीतही साधारण असेच झाले. 'आप'चा फोकस फक्त त्यानी केलेल्या कामांवरच होता.

जोन's picture

17 Feb 2020 - 8:04 am | जोन

बाकी तमाचे तमाशे, मिपा वर परत येइन वगैरे हरलेल्या मनोवृत्ती ची लक्शणे आहेत!"विघ्नसंतोशी" हा योग्य शब्द.

सुबोध खरे's picture

17 Feb 2020 - 10:48 am | सुबोध खरे

केजरीवाल यांच्या यशात श्री अरुण जेटली यांचा थोडासा तरी वाटा आहे.

बेफाट वक्तव्ये केल्याबद्दल न्यायालयात माफी मागायला लावून त्यांनी केजरीवालांना तोंड बंद ठेवण्याचे शहाणपण शिकवले.

ते झाले नसते तर केजरीवाल कदाचित अशीच बेफाट वक्तव्ये आणि माकडचेष्टा करत राहिले असते आणि कदाचित हरले असते.

न्यायालयातील माफी हा केजरीवाल यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण ठरले आणि त्यांनी त्यानंतर बडबडीपेक्षा विकासाकडे जास्त लक्ष दिले असे एकंदर इतिहास सांगतो.

बाकीच्या गोष्टी समोर आहेतच. उदा. मिपावरील काँग्रेसी लोक आपल्या ६३ जागी अनामत रक्कम जप्त झाली याबद्दल दुःख करायच्या ऐवजी भाजप हरला म्हणून आनंद व्यक्त करत आहेत (आपलं पोरगं नापास झालं तरी चालतंय पण शेजाऱ्याचा मुलगा पहिला न आल्याचा आनंद साजरा करत आहेत).

दुर्गविहारी's picture

17 Feb 2020 - 1:09 pm | दुर्गविहारी

केजरीवाल यांच्या यशात श्री अरुण जेटली यांचा थोडासा तरी वाटा आहे.

बेफाट वक्तव्ये केल्याबद्दल न्यायालयात माफी मागायला लावून त्यांनी केजरीवालांना तोंड बंद ठेवण्याचे शहाणपण शिकवले.

याच न्यायाने प्रधानसेवकांच्या यशात नेहरुंचा वाटा आहे असेही म्हणता येईल. निवडणुका आल्या की "पिछले साठ सालोंमे कुछ् नही हुआ"चा साक्षात्कार त्याना होतो.

न्यायालयातील माफी हा केजरीवाल यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण ठरले आणि त्यांनी त्यानंतर बडबडीपेक्षा विकासाकडे जास्त लक्ष दिले असे एकंदर इतिहास सांगतो.

जे शहाणपण केजरीवालाना सुचले तेच भाजप आणि तथाकथित प्रधानसेवकाना सुचले तर आगामी निवडणुकात काही धङगत आहे अन्यथा फक्त पराभवाचे विश्लेषण करणे आणि "अस बोलायला नको होत, ते वक्तव्य करायला नको होत" वगैरे कबुली देत बसायची वेळ येणार नाही.

बाकीच्या गोष्टी समोर आहेतच. उदा. मिपावरील काँग्रेसी लोक आपल्या ६३ जागी अनामत रक्कम जप्त झाली याबद्दल दुःख करायच्या ऐवजी भाजप हरला म्हणून आनंद व्यक्त करत आहेत (आपलं पोरगं नापास झालं तरी चालतंय पण शेजाऱ्याचा मुलगा पहिला न आल्याचा आनंद साजरा करत आहेत).

मजा आहे नाही ?भाजपने मार खाल्यानंतर लोकाना दिल्ली विधानसभा हि महानगरपालीकेच्या आकाराची आहे असे साक्षात्कार झाले.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2020 - 1:22 pm | अमरेंद्र बाहुबली

एकंदरित केजरीवलांचा विजय विकासकांमुळे झालेला नाही. हे सिद्ध करन्याचा आटोकाट प्रयत्न चाललाय. कारण उद्या इतर राज्यातील लोकांनी केजरीवालांच उदाहरण देऊन भाजपकडे पायाभूत सुविधा मागू नयेत. त्यांनी पाकिस्तान, कश्मीर, 370 हुतच व्यस्त रहावं.

चौकस२१२'s picture

17 Feb 2020 - 11:19 am | चौकस२१२

मनोवृत्तीतील फरक
खालील प्रश्न ३ जणांना विचारला tar
तुला कोणाची सत्ता चालेल?
१) संघ भक्त : कोणाची हि कारण कि "हंम रहे ना रहे भारत ये रहना चाहिये " आणि ते सुद्धा सत्ता आज नाही उदय नाही पर्वा .. मन वळवू ( म्हणजे जवळ जवळ गांधीवादीच , फटाके खाऊ पण आधी मन वळवू मन वळवू )
२) काँग्रेस भक्त : आमचीच ( आणि ते सुधाच नेहरू घराणे असेल तर उत्तम) पण नसले शक्य तर कोणाचीही फक्त संघ नको ( त्यांची मदत चालेल मात्र)
३) अति दावे : आमची कधीच येणार नाही पण कोणाचीही आलाय तरी आम्ही देशाला सुखी जगू देणार नाही काड्या घालत राहू मग देश गेला चुलीत...

चौकस२१२'s picture

17 Feb 2020 - 11:26 am | चौकस२१२

माफ करा "फटके" म्हणायचं होतं ( शिंचं मराठी चांगलं आहे पण टंकलेखन करताना गोंधळ आणि त्यात मिपावर एडिट नाही )