फेंगशुई,कासव आणि चिरंजीव

Cuty's picture
Cuty in जनातलं, मनातलं
16 Jan 2020 - 4:26 pm

D mart मध्ये खरेदी करत असताना चिरंजीवांची भुणभुण सुरू होती. त्याला एक काचेचे पारदर्शक रंगाचे कासव आवडले होते. ते त्याला खेळायला हवे होते. मी पाहिले, त्या ठिकाणी फेंगशुईच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या. त्यातच ते कासवपण होते. मी नाक मुरडूनच तिथून पुढे निघून गेले. माझा अश्या गोष्टींवर विश्वास नाही मात्र नवरोबांचा आहे. घरी आल्यावर सामान भरून ठेवताना पाहते तो काय! चक्क ते कासव सामानाच्या पिशवीत दिसले. मग लक्षात आले,हा उद्योग चिरंजीव आणि त्याच्या पप्पांचा आहे. दोघांनी मला नकळत खरेदी करून ते घरी आणले होते.
मग दोन दिवस ते कासव कुठे ठेवायचे यावर बापलेकांत वाद सुरू होता. लेकाला ते सर्वांना दिसेल अश्या जागी ठेवून मित्रांना दाखवायचे होते, तर त्याच्या पप्पांना ते फेंगशुईनुसार 'योग्य' जागी, 'योग्य' दिशेला ठेवायचे होते. मात्र 'योग्य' जागा कोणती हे पप्पालाही ठाऊक नव्हते. मग नंतर सांगतो, विचारून सांगतो असे करतकरत अजून दोन दिवस गेले.
अजून दोनएक दिवसांनी मी सकाळी बाथरूममध्ये पाण्याची भांडी साफ करत होते. अचानक एका पांढरया रंगाच्या ड्रममध्ये काहितरी जोरात खाडखाड वाजले. दिसत मात्र काहिच नव्हते. मग पूर्ण ड्रम खाली केला, तर चक्क पाण्याच्या रंगात बेमालूमपणे मिसळून गेलेले ते कासव दिसले. लख्खकन डोक्यात बल्ब पेटला ! अन मी एकटीच खोःखोः हसू लागले. 'योग्य' जागेची वाट पाहून कंटाळून चिरंजीवांनी त्या कासवाला पोहण्यासाठी 'योग्य' जागा शोधली होती.
आता मी रोज तो ड्रम साफ करून, परत ये कासव हळूच पोहायला सोडते. रोज चिरंजीव शाळेतून आल्यावर, ते कासव 'योग्य' जागी पोहतेय ना, ते चेक करतात आणि त्याचे पप्पा कासवाला कधीच विसरलेत !!

बालकथाविनोदअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

परिंदा's picture

17 Jan 2020 - 12:52 pm | परिंदा

मस्त किस्सा!

Cuty's picture

17 Jan 2020 - 2:44 pm | Cuty

धन्यवाद !

ट्रम्प's picture

17 Jan 2020 - 3:29 pm | ट्रम्प

:):):):):):)

Cuty's picture

18 Jan 2020 - 4:12 pm | Cuty

धन्यवाद

तुषार काळभोर's picture

18 Jan 2020 - 4:24 pm | तुषार काळभोर

धन्यवाद

एकेका वस्तूत काय मजा लपलेली असते ते मोठ्यांना काही कळत नाही.
---
दुसरे एक कासव(डिजिटल घड्याळ) आणि पिल्लू(रिमोट) मिळतात. पिल्लाची पाठ चेपली की मोठ्या कासवाचा ओडिओ चालू होतो आणि वेळ सांगते. नंतर ते बंद पडले तरी ती जोडी होती आकर्षक.

बरोबर आहे. आपण मोठे होतो अन लहानपणीच्या गमतीजमती विसरून जातो. मात्र आपल्या मुलांमुळे कधीकधी हे बालपण पुन्हा अनुभवायला मिळते.

शा वि कु's picture

19 Jan 2020 - 10:01 am | शा वि कु

आमच आणून फोडून सुद्धा झालं :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2020 - 10:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ़्यांगशुई, ताडे-तोडे, लिंबू, गंडेदोरे स्वयंपाकाच्या जागा, पाण्याच्या जागा, वगैरे बदलून पाहणे, करुन पाहणे अशा गोष्टींचा माणसांना मोह होतो. बदलांनी काही फ़रक पडतो का म्हणून अशा विविध गोष्टी करायला माणूस नावाच्या चंचल प्रवृत्तीला आवडते. अर्थात होत काही नसतं. मनाचं समाधान फ़क्त.

आपण कासवाला योग्य जागी ठेवलं. :)

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

धन्यवाद , कंजूस, शा वि कू, डाॅ. बिरूटे !

फेंगशुईला जलसमाधि देणाऱ्या बबड्याचं कौतुक करण्यत येत आहे.

गड्डा झब्बू's picture

20 Jan 2020 - 12:30 pm | गड्डा झब्बू

:-) :-) :-)

कपिलमुनी's picture

20 Jan 2020 - 9:46 pm | कपिलमुनी

लिहीत रहा याच शुभेच्छा

Cuty's picture

23 Jan 2020 - 4:08 pm | Cuty

धन्यवाद, गड्डाझब्बू, कपिलमुनी