India Deserves Better - ११. रेप कल्चर ? त्यावरुन निवडणुकीतले मुद्दे आणि राजकारण

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
19 Dec 2019 - 4:26 pm

नोटः रेप कल्चर होत चाललेल्या भारताबद्दल, मी आनखिन काय बोलू हेच कळत नाही. मन उद्विग्न होते हे असले सारे वाचुन , पाहुन. त्यात आपल्या देशात कायदा सुव्यवस्थीत असावा यासाठी, आणि राज्यकर्ते नक्की याला गांभिर्याने घेतायेत का फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात करतात ह्यावर हा सद्यपरिस्थीतीतील द्रुष्टीक्षेप.

According to the NCRB (National Crime Records Bureau ) 4,15,786 rape cases were reported across India between 2001 and 2017. On average, 67 women were raped every day across the country during these 17 years, or, in other words, about three women had been raped every hour.
While 16,075 cases of rape were reported in 2001 across India, this number rose drastically to 32,559 in 2017 - an increase of nearly 103 per cent.

now, Madhya Pradesh reported the highest number of rape crimes (4,882) followed by Uttar Pradesh (4,816), Maharashtra (4,189) and Rajasthan (3,656) .

ही सर्व परिस्थीती काय दाखवते आहे ? आपण रहात असलेल्या देशात आपणच सुरक्षित नाही ? आपण नक्की कोणती महासत्ता होण्याच्या मार्गावर आहोत ?
कोणत्याही टीव्ही , पेपर मध्ये पाहिल तिकडे अत्याचार, खुन बलात्कार याशिवाय दूसरे काही नाहीच..
फक्त बलात्कार हा शब्द गुगल वर टाकल्यावर कीती तरी घटना डोळ्यासमोर दिसतायेत.. हे नक्की कोणाचे अपयश आहे ? आपले, कायद्याचे की सरकारच्या निष्क्रियतेचे ?

ह्या असल्या बातम्या पाहिल्यावर मान नक्कीच शरमेने खाली जाते, एखाद्या परक्या देशाने ही असली परिस्थीती पाहुन भारतात जावू नका तेथे तुम्ही सुरक्षित नाहि असे जारी केले तर आपण जगाला नक्की कोणता संदेश देवू ?
या विषयावर काय लिहावे, काय करावे, उपाय काय असावे, कायदे काय असावे हे सगळे सगळ्यांकडून बोलून झाले आहे ... कठोर कायदा कदाचीत हाच यावर उपाय असू शकतो .. पण त्यासाठी लागणारा वेळ हा सुद्धा महत्वाचा ठरतो, त्यामुळे जलद गतीने न्याय प्रक्रिया ही असलीच पाहिजे असे वाटते.

झारखंड निवडणुकीतील वक्तव्य आणि पडसाद:

नुकत्याच झारखंड च्या निवडणुक प्रचारात राहुल गांधी यांचे Rape in India ह्या वक्तव्यावरुन , लोकसभेत स्म्रीती इरानी यांनी जोरदार टिकास्त्र वापरले.. पण हे करत असताना, आपण या गोष्टींकडे कश्या पद्धतीने पाहतो, आपले सरकार सध्य स्तिथीत ह्या असल्या केसेस चा आणि इतर वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवुत्तीला कसे कमी करणार आहोत, हे ना त्यांच्याकडुन, ना सरकारकडुन, ना कोणाकडुनच ठोस काही पहावयास मिळते..

या Rape in India ह्या वाक्यासाठी राहुल गांधी यांना माफी मागायला लावताना, जेंव्हा श्री नरेंद्र मोदी यांचा Delhi Rape Capital झाली आहे हा विडीओ फिरवण्यात आला. आणि त्याला उत्तर देता येत नसतानाच. राहुल गांधी यांनी दिल्लीतील सभेत, मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे हे भडक वक्तव्य केले.
खरे तर ह्या वक्ताव्याची गरज नव्हती.. मी माफी मागणार नाही हे येव्हडे वाक्य पुरेशे होते.
इंग्रजाविरुद्ध लढलेले महात्मा गांधी असुदेत,भारतरत्न बाबासाहेब आंबेंडकर असुद्यात, स्वातंत्र्यवीर सावरकर असुद्यात किंवा सुभाष चंद्र बोस असुद्यात किंवा इतर स्वातंत्र्य सेनानी असुद्यात, ह्या सर्वांप्रती आपण आदर बाळागलाच पाहिजे.. काही निर्णय त्या वेळेसच्या परिस्थीतीवर कोणी घेतले असले तरी ते चुक कसे किंवा बरोबर कसे ह्या वादात आता पडून आता असलेली परिस्थीती सुधारणार आहे का कोणी ? ह्या असल्या निष्फळ वादातून, वाक्यातून आपण नक्की काय दाखवतो आहे?
मागे ही हिंदूमहासभेच्या काही लोकांनी महात्मा गांधी यांच्या फोटो ला गोळ्या झाडल्या होत्या, नथुराम गोडसे जो हत्यारा आहेच त्याचे उधोउधो बरेच चाललेले आहे हे ही सर्वशी चुकीचेच.

मला एक कळत नाही, स्वातंत्र्य हे इंग्रजांविरुद्ध हवे होते, ना की कोणा एका जातीसाठी, धर्मासाठी कोणाला स्वातंत्र्य हवे होते. आपण या सर्व नेत्यांना धर्मात, जातीत का बांधतो आहोत. हे असे करुन आपण मुळ बलात्काराच्या उठलेला प्रश्नावर, नंतर ना संसदेत ना कुठल्या विधानसभेत काहीच बोलत नाही हे नेत्यांना कळत नाहियेका?
राहुल गांधीनी माफी Rape in India ह्या वाक्याची मागायची होती हे आपण सोयस्कर रीत्या विसरलो आहे का? आणि या वाक्या वर ना राहुल गांधी नी माफी मागितली पाहिजे ना Delhi Rape Capital झाली आहे या वाक्यावरुन नरेंद्र मोदींनी, त्यांनी या समस्येला आपण कसे थांबवणार आहोत, आपण हा देशाला लागलेला कलंक कसा मिटवणार आहे ह्याची उत्तरे दिली पाहिजेत.. ना की कुठल्या तरी सभेत मतांसाठी कोणाला तरी खुश करण्यासाठी असली वाक्य वापरली पाहिजेत. हे म्हणजे बलात्कराचा बलात्कार करण्यासारखेच नाही वाटत का ?

इकडे महाराष्ट्रात अधिवेशना मध्ये, विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरताना त्याआडुन शिवसेना कशी पुचाट झाली आहे, त्यांचे काही चालत नाही असे बोल लावण्याचा प्रयत्न केला , मला काय म्हणायचे आहे, बलात्कारावर, त्या Rape in India वरुन राज्यात , देशात बलात्कार घटवण्यासाठी काय पावले उचलली जावीत या साठी सभागृह हलवले पाहिजे, तुम्ही या विषयाला हाताळण्यात कमी पडता आहात या वरुन सभागृहात विरोधी पक्षांनी प्रश्न विचारुन उत्तरे मागितले पाहिजेत, ना की कोण कोणती भुमिका का घेत नाही यावर बोलले पाहिजे. तरीही श्री उद्ध्व ठाकरेंनी बलात्काराच्या केसेस २१ दिवसात फास्ट ट्रॅक वर सोडवण्याचा प्रयत्न चालवला आहे हे मला योग्य वाटते. आणि हे जर खरे असेल तर या संपुर्ण प्रकरणात सर्वात यशस्वी उत्तर कोणी काढले असेल तर ते श्री उद्धव ठाकरे यांनी असे मला आता वाटते आहे.

हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इन्काँटर

निर्भया झाले, कोपर्डी झाले, उन्नाव झाले आणि हे हैद्राबाद झाले हे देशाला काळीमा फासणारीच कृत्य आहेत. याबाबत कोणाच्या मनात दुमत नसणारच.. आणि ह्या सर्व लोकांना लवकारात लवकर कठोर शिक्षा झालीच पाहिजे..

हैद्राबाद पोलीस इन्काँटर वर येथे बोलण्याचे कारण की, वरती वरती हे खुप योग्य आणि तत्काळ शिक्षा दिसत असली तरी मात्र खोल विचार केल्यास यातील बर्याच गोष्टी पुढे घातक ठरू शकतील असे वाटते.

समजा ते ४ जन आरोपी मारले गेलेले आहेत हे मान्य, पण आनखिन एखादा मुख्य आरोपी त्यांच्यासोबत तेंव्हा तेथे असेल तर तो आता कसा पकडला जाईल?
पोलिसांवर संशय घेत नाहिये मी, पण न्यायप्रक्रिया पुर्ण करून मग शिक्षा किंवा इन्काँटर झाले असते तर वेगळे पण न्यायप्रक्रियाच नाही, हा उताविळ पणा वाटतो.
न्याय प्रक्रिया पूर्ण न होता, आधी बलात्कार झाल्यावर पोलिसांना जे लोक शिव्यांची लाखोली वाहत होते ते आता त्यांचे अभिनंदन करत आहेत, हा पोलिसांचा विजय समजायचा की समाजाची हतबलता ? की न्यायालयाची प्रतारणा ?
याला एकच उत्तर आहे, न्यायालयीन प्रक्रिया फास्ट करण्याचा, आणि यासाठी आपण सर्वांनीच याचा पाठपुरवठा केला पाहिजे
सर्वोच्च न्यायालयाला हि आपण supremecourt@nic.in ह्या मेल वर आपण न्याय व्यवस्था फास्ट होण्यासाठी विचारणा करु शकतो.
केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाला ला आपण अशी सूचना करु शकतो. तसेच आपण निवडून दिलेल्या नेत्यांना आपण जाब विचारु शकतो, असे काही हि न करता आपण मात्र भावना विवश होऊन हाना, मारा, तोडा असे म्हणत असू तर न्यायालयाचे अस्तित्व कश्यासाठी?
आणि मग इन्काँटर हाच जर न्याय असेल तर आता उन्नाव च्या सेंगर ला दोशी घोशित केले आहे, करा त्याचा ही एन्कांटर, आसाराम, रामरहीम, रामपाल करा यांचा ही इन्काँटर.

असो थांबतो ..
मुळ मुद्दा हा आहे की स्त्री प्रती आदर असणे ही माणुसकी आहे, पण त्या माणुसकीला काळिमा फासणार्‍या ह्या बलात्कार घटना आपण कश्या पद्धतीने अटोक्यात आणणार आहोत ? ह्या वर राज्यकर्ते, आपण ठोस काहीच करत नसलो तर फक्त राजकिय फायद्यासाठीच ह्या गोष्टी येथे वापरल्या जाणार असतील तर मला पुन्हा म्हणावे लागेल India Deserves Better.

-------- गणेश जगताप.

#India_Deserves_Better

प्रतिक्रिया

या उपशीर्षका नन्तर च्या लेखनाशी सहमत.

जॉनविक्क's picture

19 Dec 2019 - 5:30 pm | जॉनविक्क

मुळ मुद्दा हा आहे की आपली संस्कृती ही स्त्री प्रती आदर असणारी आहे, पण त्या संस्कृतीवर बलात्कार संस्कृती रुजती आहे काय ?

संस्कृती ही अत्यन्त व्यापक गोष्ट आहे. आणी ती चांगली असो की वाईट बदल अभिप्रेत असणार्याने सर्वप्रथम संस्कृती खड्ड्यात गाडली पाहिजे.

आणी प्रश्न माणुसकीच्या आणि फक्त माणुसकीच्या नजरेतून सोडवायला शिकले पाहिजे अन्यथा आपला वैचारिक गोंधळच संपणार नाही तर काही कृती घडणे दूरच.

अन्यथा एका धाग्यात स्पृश्यस्पृश्य विरोधी भाष्य अन दुसर्यात त्याच संस्कृती चा रेफरन्स देऊन स्त्रीच्या बाबतीत तिची महानता म्हणजे संस्कृतीचे सिलेक्टिव्ह रिडींग होते आणि मग ते ज्याचे त्याने त्याच्या मर्जीने करायला तर अजिबात आडकाठी करता येत नाही. शक्यतो यापुढील लेखात संस्कृती हा शब्दच नको तसेही संस्कृती आणि कृती यामध्ये काळानुसार फरक पडत जातोच. मानोयानामानो.

भारत हजारो वर्षातून पहिल्यांदाच कायद्याने मुक्त व्यवस्था अनुभवत आहे परंतु मनाने तो अजूनही यासाठी तयार नाही.

त्यामुळे या व्यवस्थेचे फायदे तोटे व जुन्या मानसिकतेचा उरलेला पगडा याचे विचित्र प्रतिबिंब समाजघटनात अनुभवायला मिळतं आहे, खरे तर उदात्त तत्वज्ञान असलेल्या देशाला लोकशाही हे स्वर्गसुख आहे पण आपली मानसिकता अजून सरावलेली नाही. आजही अमेरिका मला जर तुम्ही एक सुदृढ वैचारिक व्यक्ती असाल तर आयुष्य जगत रहायला सर्वोत्कृष्ट देश वाटतो, only sky is limit there for sane intelectual आणी भारत काही दशक अथवा शतकात तसा बनेलही

तो पर्यंत बलात्काराच्या मानसिकतेविरोधात तीव्र राजकीय इच्छाशक्ती वापरणे हाच एकमेव आसरा आहे भलेही तो पुरेसा नाही

गणेशा's picture

19 Dec 2019 - 5:55 pm | गणेशा

सर जॉन,
मलाच तुम्ही काय बोलताय ते लवकर कळेना, कदाचीत मी आता ऑफिस मधुन निघत आहे म्हणुन घायीत असेल .

स्त्री प्रती आदर असणारी आपली संस्कृती आहे, यात मी सिलेक्टीव्ह बोलत आहे असे वाटते आहे का? जी मराठी संस्कृती छ्त्रपतींच्या काळात स्वराज्य या भावनेनी एकवटली, तेथुनच स्त्री ही माता , भगिनी मानलेच जात होते.
असो संस्कृती या शब्दाला आक्षेप असेल तर दूसरा शब्द कुठला वापरला जावा जो व्यापक आहे. पण ही व्यापकताच मान्य नसेल तर मग तुमचे मत वेगळे आहे. असु शकते .

तो पर्यंत बलात्काराच्या मानसिकतेविरोधात तीव्र राजकीय इच्छाशक्ती वापरणे हाच एकमेव आसरा आहे भलेही तो पुरेसा नाही
+१ , बरोबर एकदम

आणि तो पुरेसा आहे.

जी मराठी संस्कृती छ्त्रपतींच्या काळात स्वराज्य या भावनेनी एकवटली, तेथुनच स्त्री ही माता , भगिनी मानलेच जात होते.

हाच तर प्रॉब्लेम येतो ना संस्कृती शब्दाने, आता तुमचा INDIA महाराष्ट्रापुरता मर्यादित झाला तेंव्हा प्रश्न व उकल संस्कृती च्या नजरेतून न्हवे माणुसकीच्या तराजुतून केली की त्याला सर्वसामावेशकता आपोआप येते :)

गणेशा's picture

19 Dec 2019 - 6:10 pm | गणेशा

एडिट करुन बदल केला आहे.
बाय फॉर नॉऊ

जॉनविक्क's picture

19 Dec 2019 - 6:31 pm | जॉनविक्क

संस्कृती ही पिढ्यान पिढ्या अंगवळणी पडलेली असल्याने बरेच काही हा शब्द वापरून वजनदार बनवता येते पण संस्कृती एका दिवसात रद्दही करता येत नाही कारण त्यातून तयार होणारी पोकळी कशी भरून काढावी हा प्रश्नही समोर येतो त्यामुळे हे ट्रानजीशन सावकाशच अपेक्षित आहे. अन्यथा लोक यडे होतील काय करावे म्हणत :)

म्हणून संस्कृती हा सगळ्यात जास्त अजाणतेपणी गैरवापर झालेला शब्द आजघडीला आहे असे मला सतत जाणवते म्हणूनच जेंव्हा विषय फलाना फलाना बदल हवा आशा चर्चेचा येतो मी संस्कृती या शब्दाच्या योजनेचा विरोधक बनतो कारण संस्कृती नामक हत्यार कधी बुमरँग बनेल सांगता येत नाही :)

धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

19 Dec 2019 - 5:38 pm | मुक्त विहारि

लेख वाचला. ..

गणेशा's picture

19 Dec 2019 - 6:12 pm | गणेशा

:)

मुक्त विहारि's picture

19 Dec 2019 - 6:44 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

कपिलमुनी's picture

19 Dec 2019 - 6:45 pm | कपिलमुनी

सुद्दलेक्णा कडे लक्श देत चला

मुक्त विहारि's picture

19 Dec 2019 - 6:59 pm | मुक्त विहारि

गणेशा, तळमळीने लिहीत आहे आणि तो खूपच कामात व्यस्त आहे.

मनातील विचार टाइप करतांना , ह्या चुका होतात. विचारांचा वेग जास्त असतो.

श्वेता२४'s picture

20 Dec 2019 - 10:56 am | श्वेता२४

गणेशा यांच्या लिखाणात प्रामाणीकपणा आहे. लिखाणात गांभिर्य आहे. होणाऱ्या चुका या काड्या टाकण्यासाठी मुद्दाम केलेल्या नाहीत (असेही धागे मिपाकरांनी सहन केले आहेत), इतकी बाब लक्षात घेतली पाहिजे. पण मुनीवर म्हणतात त्याप्रमाणे काळजी घेतली तर तुमच्या धागारुपी दुधात साखरच पडेल म्हणते मी.

कामात व्यस्त हा टोमणा तर नाही ना?

मुक्त विहारि's picture

21 Dec 2019 - 9:54 pm | मुक्त विहारि

अजिबात नाही. ..

गणेशा's picture

21 Dec 2019 - 9:36 am | गणेशा

प्रयत्न करतो...
परंतु, मराठी शब्द हि समस्या नाही माझी, पण व्याकरण आणि शुद्धलेखन हे शाळेपासून माझी डोकेदुखी ठरलेले आहेत. हे भांडवल नाही करत पण खरे आहे, 2011 पर्यंत येथे लिहिताना पण ते बऱ्याच जणांनी.. बऱ्याच ठिकाणी सांगितले आहे.. पण अजूनही नाही जमले.

विनोदाचा भाग असा कि, शुद्धलेखन च नाही मी बोलताना हि कोणी मला, पुण्यात राहूनही पुण्यातला समजत नाही.. असो
शुद्धलेखनाबद्दल प्रयत्न करतो पण अवघड आहे..

जॉनविक्क's picture

21 Dec 2019 - 1:33 pm | जॉनविक्क

विनोदाचा भाग असा कि, शुद्धलेखन च नाही मी बोलताना हि पुण्यात राहूनही पुण्यातला समजत नाही.. असो

का बरे ?

इरसाल's picture

21 Dec 2019 - 12:55 pm | इरसाल

समजा ते ४ जन आरोपी मारले गेलेले आहेत हे मान्य, पण आनखिन एखादा मुख्य आरोपी त्यांच्यासोबत तेंव्हा तेथे असेल तर तो आता कसा पकडला जाईल?
ते असं तर झालं नसेल ना, की इकडे बलात्कार झाला, तिकडे त्यांना उचलले, नेले परत केले एन्काउंटर. धरपकडीनंतरच्या काळात कसुन चौकशी झाली असणारच नं.
हं आता या पुढचा तुमचा मुद्दा ५ व्या, ६ व्याला, ७ व्याला ....वाचवण्यासाठी यांना मारुन टाकले असा असेल तर मग बोलणेच खुंटेल.

मुक्त विहारि's picture

21 Dec 2019 - 9:57 pm | मुक्त विहारि

धरपकड झाली की कसून चौकशी होतेच.

गणेशा's picture

23 Dec 2019 - 12:58 am | गणेशा

मुद्दा, 5व्या, 6व्या ला वाचवण्याचा नाही..
मुद्दा हा आहे कि धरपकडी नंतर सर्व चौकशी व्यवस्तीत पारदर्शक, लगेच लूपहोल नसलेली होत असेल तर न्यायालयाची गरजच काय?

जॉनविक्क's picture

23 Dec 2019 - 9:28 am | जॉनविक्क

षटकार!

इरसाल's picture

23 Dec 2019 - 1:11 pm | इरसाल

गणेशा,
झालय त्याला माझं समर्थन असेलच असं नाही. पण सध्या सुरु असलेल्या घडामोडी पाहिल्या की जे झाले ते ठीक झाले असा पुसटसा विचार आल्याशिवाय रहात नाही.
कधी कधी शांतपणे बसलो असताना वाटतं ते त्या दुर्दैवी जीवाबरोबर घडत असताना त्या जीवाला काय वाटत असेल. साधा इस्त्रीचा किंवा विझलेल्या आगकाडीचा चटका लागला तर कसं वाटतं बघा विचार करुन...आपण त्या जागी स्वतःला किंवा आपल्या कोणा आप्ताला कल्पुही शकत नाही.

भले ते पिक्चर मधलं दृश्य असेल पण तो माया डोळस वर असलेला पिक्चर आठवतो (शुट आउट अ‍ॅट लोखंडवाला) ज्यात अमिताभ वकील आहे. शेवटचा प्रश्न तो न्यायाधीशाला विचारतो की तुम्ही आता इथे बसलेले असताना तुमच्या घरासमोर एक व्यक्ती पिस्तुल घेवुन फिरतेय.......तुम्हाला काय वाटतं ती व्यक्ती कोण असावी इंस्पेक्टर खान की माया डोळस ????
हाच प्रश्न आपण प्रत्येकाने, दुसर्‍या काँटेक्स्ट मधे स्वतःला विचारुन पहावा.

गणेशा's picture

23 Dec 2019 - 10:27 pm | गणेशा

इरसाल जी,

तुमच्या भावना कळत आहेत, आणि तुम्ही म्हणता तसे वाटणे योग्य आहे.. जे झालं ते वाईट, त्याहूनही त्या जीवाचा तेंव्हा झालेला आर्त टाहो फक्त कल्पून ही शहारे येतात..

मला सुद्धा पहिल्यांदा ऐकल्या ऐकल्या तोच निर्णय योग्य वाटला.
पण असेच वाटण्यासाठीच हा खालील प्रश्न होता..

हा पोलिसांचा विजय समजायचा की समाजाची हतबलता ? की न्यायालयाची प्रतारणा ?

जिच्यावर बलात्कार झाला तीला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यात तीचा दोन नातेवाईक ठार झाले. वकील गंभीर जखमी झाला. कोर्टानेही खटला अलाहाबाद न्यायालयात न चालविता दिल्ली न्यायालयात चालविण्याचे निर्देश दिले. इतके करुन एक आरोपी निर्दोष सुटली व मुख्य आरोपीला केवळ जन्मठेप मिळाली (जन्मठेप जरी बारा वर्षे असली तरी तुरुगांत दिवस सोजण्याचे सूत्र वेगळे असल्याने आरोपी ७-८ वर्षेच शिक्षा भागत असतात). त्यामुळे ७-८ वर्षाने हा माणूस परत उजळ माथ्याने फिरेल. काय उपयोग?

मुक्त विहारि's picture

23 Dec 2019 - 3:15 pm | मुक्त विहारि

ज्याचे जळतं त्यालाच कळतं....

फक्त जन्मठेप मिळायला नको होती... फाशी किंवा क्रूर शिक्षाच झाली पाहिजे..
उलट जे न्यायालयीन प्रक्रिये आधीच एनकौंटर ला योग्य म्हणतात, त्यांनी तर आता, या दोषी व्यक्तीचा एनकौंटरच करा ही मागणी केली पाहिजे.
पण आपल्याकडे राजकीय आधार असणाऱ्या विरोधात कोणी काहीच करत नाही हे पण आहेच.. दोषी ठरवला गेला हेच अजूनही न्याय व्यवस्था अस्तित्वात आहे याचे उदाहरण..

जॉनविक्क's picture

23 Dec 2019 - 10:54 pm | जॉनविक्क

सोबत जे इतर गुन्हे जे घडले त्याची एकत्रित शिक्षा आहे ?

श्वेता२४'s picture

24 Dec 2019 - 11:39 am | श्वेता२४

जे न्यायालयीन प्रक्रिये आधीच एनकौंटर ला योग्य म्हणतात, त्यांनी तर आता, या दोषी व्यक्तीचा एनकौंटरच करा ही मागणी केली पाहिजे.
का बरं त्यांनीच का मक्ता घ्यावा याचा? आणि तुम्ही (त्याचबरोबर तुमच्यासारखे सगळे) काय अशी मागणी करणे कसे चुकीचे आहे यावर चर्चेचा धागा काढून चर्चेचे गुऱ्हाळ चालवत बसणार?
याआधीच्या धाग्यातही ज्यांनी ज्यांनी हैदराबाद एन्काऊंटरचे समर्थन केले त्यांनी व्यवस्थेतून मिळत असलेल्या न्यायातील फोलपणा लक्षात घेऊनच त्या घटनेचे समर्थन केले होते जेणेकरुन आतातरी व्यावस्थेमध्ये काही सुधारणा होईल व दोषींना कडक शासन केले जाईल तेही लवकरात लवकर. पण कसचे काय? समाजमन या घटनांबद्दल एवढे संवेदनशील झाले असतानाही असा बेरकीपणा न्यायव्यवस्था दाखवू शकते तर आता आशा कुणाकडून ठेवायची? व या परिस्थितीला हैदराबाद एन्काऊंटरवर तावातावाने पोलिसकारवाईविरोधी जनमत तयार करणारे पण निर्भया,उन्नाव व इतर बलात्कार प्रकरणात कमी शिक्षा मिळाली व तिची अंमलबजावणी होत नाही त्यावर तावातावाने व्यक्त न होणारे, धागासुद्धा काढण्याचे कष्ट न घेणारे, दुटप्पी लोक तितकेच कारणीभूत आहेत.

जालिम लोशन's picture

24 Dec 2019 - 1:39 pm | जालिम लोशन

ह्याला कारणीभूत भारतिय मानसिकता. आपल्यापैकी असेल तर पाठिंबा नसेल तर अन्याय.

गणेशा's picture

24 Dec 2019 - 10:08 pm | गणेशा

श्वेता जी ,

गुन्हा सिद्ध झाल्या नंतर एनकाँटर आणि गुन्हा सिद्ध होण्या अगोदर एनकाँटर यात काही फरक आहे का नाही ?
तरीही वरच्या रिप्लाय मध्ये मी ज्या ओळी लिहिल्या आहेत त्या तुम्हि म्हणाल्यावर पुन्हा वाचल्या.

त्यामध्ये तुम्ही म्हणता तसा अर्थ निघु शकतो हे मला आधी लक्षात आले नाही, ते वाक्य मी मागे घेतो आणि त्यामागचे म्हणणे असे होते

" गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला आणि नंतर एन्काँटर झाला तर त्याला कोणी विरोध केला नसता, परंतु गुन्हा सिद्ध होण्या अगोदर एन्काँटर ला समर्थन करताना आता उन्नाव केस मध्ये आरोपी ला फाशी झाली नाही तरी गुन्हा सिद्ध झाल्याने त्याचा एन्कॉंटर व्हावा अशी मागणी करायला हवी होती, विशेष करुन त्यांनी ज्यांनी गुन्हा न्यायालयात सिद्ध न होता ही एन्काँटर ला समर्थन केले होते त्यांनी.( येथे ज्यांनी आधी समर्थन केले नव्हते ते गुन्हा सिद्ध नाही झाला म्हणुन समर्थन नव्हते हे ध्यानात घ्यावे कृपया)

का बरं त्यांनीच का मक्ता घ्यावा याचा? आणि तुम्ही (त्याचबरोबर तुमच्यासारखे सगळे) काय अशी मागणी करणे कसे चुकीचे आहे यावर चर्चेचा धागा काढून चर्चेचे गुऱ्हाळ चालवत बसणार?

नाही , मला तसे फक्त त्यांनीच बोलायचे नव्हते, आणि माझ्या सारख्या किंवा मी हे चुकीचे ठरवले नसते, कारण गुन्हा सिद्ध झाल्यावर एन्काँटर झाले तर मला काही वाटले नसते उलट योग्य वाटले असते, कारण याउलट येथे मला राजकिय हस्तक्षेप वाटतो आहे.

याआधीच्या धाग्यातही ज्यांनी ज्यांनी हैदराबाद एन्काऊंटरचे समर्थन केले त्यांनी व्यवस्थेतून मिळत असलेल्या न्यायातील फोलपणा लक्षात घेऊनच त्या घटनेचे समर्थन केले होते जेणेकरुन आतातरी व्यावस्थेमध्ये काही सुधारणा होईल व दोषींना कडक शासन केले जाईल तेही लवकरात लवकर. पण कसचे काय? समाजमन या घटनांबद्दल एवढे संवेदनशील झाले असतानाही असा बेरकीपणा न्यायव्यवस्था दाखवू शकते तर आता आशा कुणाकडून ठेवायची? व या परिस्थितीला हैदराबाद एन्काऊंटरवर तावातावाने पोलिसकारवाईविरोधी जनमत तयार करणारे पण निर्भया,उन्नाव व इतर बलात्कार प्रकरणात कमी शिक्षा मिळाली व तिची अंमलबजावणी होत नाही त्यावर तावातावाने व्यक्त न होणारे, धागासुद्धा काढण्याचे कष्ट न घेणारे, दुटप्पी लोक तितकेच कारणीभूत आहेत.

कोण तावातावाने बोलत होते आधी ? आधीचा हैद्राबाद चा धागा पहा, माझा रिप्लाय हा खुप नंतर आणि तो ही एकच, आणि नंतर २ रिप्लाय , त्यात ही जे समर्थन करत होते त्यांना चुकीचे मी कुठे म्हणले आहे ? न्यायलायाची प्रक्रिया होण्या अगोदर गुन्हेगाराला संपवणे हे मला पुढील दृष्ट्या योग्य वाटत नाही.
समजा,हैद्राबाद एन्कांउटर योग्य म्हणु, पण उद्या ज्या ज्या वेळेस बलात्कार होतील तेंव्हा खरे बलात्कारी सोडुन जे दुसरेच आहेत त्यांनाच पोलिसांनी गोळ्या घातल्या तर ? आज तुम्ही न्यायलायीन प्रक्रियेवर अविश्वास दाखवता उद्या पोलिसांवर विश्वासच ठेवावा लागेल आणि त्यांनीच अविश्वास केला तर ?
आपली न्यायलयीन प्रक्रिया खुप स्लो आहे, मुळ धाग्यात हे लिहिले आहे,पण याचा अर्थ तीला न विचारताच गुन्हेगाराला शिक्षा करता येऊ शकते का?
त्या धाग्यावर मला वाटते मी तुम्हाला ही रिप्लाय केला नाहीच, कारण तुम्हीच काय,यशोधरा ताई काय, मुवि काय ह्यांचे विचार मला चुक वाटले नाही, कारण तुम्ही भावनेने बोलत होता परीस्थीती नुसार बोलत होता, आणि मी त्या सापेक्ष बोलत नव्हतो. येथे ही माझे तेच म्हणणे आहे.

बाकी हैद्राबाद वर धागा काढणारे, आणि उन्नाव व इतरां वर धागा न काढणे किण्वा न बोलणे म्हणजे बलात्कारीत लोकांना समर्थन किंवा दुटप्पी बोलणे होते का ? येथे धागा काढणे म्हणजेच समर्थन होते का?

तुम्ही जे लिहिले आहे त्या पाठीमागची भावना कळते आहे, त्या भावनेबद्दल आदर आहे आणि नक्कीच त्यात मला चुक वाट्त नाही. पण न्यायलायीन कामकाज न होता एन्कांटर केला हे मला योग्य वाटत नाही म्हणुन तुम्ही मला किंवा माझ्यासारख्या लोकांना डायरेक्ट अपराधीच केले असे वाटते आहे.

बाकी निर्भया बद्दल त्या बलात्कार प्रकरणी फाशीच होयील न्यायलायकडुन असेच आता दिसते आहे. उन्नाव मध्ये मात्र सेंगर ला फाशीच व्हायला हवी होती असे माझे वयक्तीक मत आहे आणि जी शिक्षा झाली मला आवडली नाही. म्हणुन माझे मत असे होते की,आता गुन्हा सिद्ध झाला आहे आणि आरोपी माहीत आहे तर आता एन्कांटर का केला गेला नाही ? का आता राजकीय हस्तक्षेप मध्ये आला ?

असो. थांबतो. अजुनही तुम्हाला माझे म्हणणे पटत नसेल किंवा मी काय, का म्हणत आहे हे कळाले नसेल , तर कृपया माफ करा , आणि या विषयावर आपण बोलणे थांबवु.

उन्नाव मधल्या बलात्काराबद्दल आणि माणुसकीला काळीमा फासणार्‍या त्यातील गोष्टींवर मी लिहिण्याचा प्रयत्न करतो . आणि ते बलात्कार आणि नंतर केलेल्या अपघात आणि इतर गोष्टींवर असेल हे नक्की. त्यावर बोललो नाही म्हणजे जे झाले ते योग्यच असे नाहीच.

असो..