(विरह - एक वेगळा दृष्टीकोन X शब्दकथा) -

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
12 Dec 2019 - 2:43 pm

पेरणा

रात्रीचे तीन वाजले होते, त्याच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती.
बायकोची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला....., अजून का बरे फोन नाही आला?
नक्कीच फ्लाईट डिले असणार.... कारण आपली बायको आपल्यावर किती जास्त प्रेम करते हे त्याला माहीत होते.
किती काळजी करतो आपण? काही नाही येईल नक्की फोन..... त्याने स्वतःलाच समजावले.
विचार करत करत किती वेळ गेला त्यालाही कळले नाही.
अचानक 4 वाजता अलार्म वाजू लागला.
बेडवरून उजव्या साईडला तो वळाला,
तेवढ्यात शेजारी त्याला घट्ट मिठी मारुन झोपलेली ती अचानक उठून बसली
आणि फ्रॉक वर करुन घाईघाईने चड्डी काढत काढत त्याला म्हणाली-
.
.
.
.


बाबा लवकर उठ घाईची शी लागलीय.

पैजारबुवा,

इतिहासकृष्णमुर्तीसंदर्भआरोग्य

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

12 Dec 2019 - 8:05 pm | आनन्दा

__/\__

श्वेता२४'s picture

12 Dec 2019 - 9:45 pm | श्वेता२४

मस्त निरागस

पाषाणभेद's picture

13 Dec 2019 - 10:21 am | पाषाणभेद

हा नवरा नक्की आयटीतल्या बायकोचा असावा.
कारण ती ऑनसाईट गेलीय.
हा बाबा तिची जास्त काळजी करतोय. ( म्हणजेच ती बिनधास्त आहे. करीअरबाबत)
हा घरचे कामे करतोय.