शिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया
मुख्यमंत्री जर आपलाच करायचा होता तर प्रचार का तसा केला नाही व निकाल लागल्यावरच डरकाळी फुटली ?
मते युतीला ला होती आता युती फुटली तर निवडणूक परत घेणे रास्त
जर ठरले होते तर अमित शाह यांना एकदा पण जाब का नाही विचारला ?
दर वेळी शहा आणि मोदी मातोश्रीवर येतात मग आता दिल्ली जनपथ येथे जाऊन पाठिंबा मागण्यात स्वाभिमान आहे ?
पुढे काय
अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला अर्थात भाजप पाठिंबा देणार नाही
काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा देतील पण अटी घालून ( मराठी माणूस युद्धात जिंकता पण तहात हरतो )
मुख्यमंत्री आपला वरून एवढे रणकंदन झाले त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल पण सरकार डळमळीत असणारच
विखे आधी पण विरोधी पक्ष नेते होते बहुतेक आता पण तेच असणार
९० मध्ये सत्तेवर आल्यावर शिव सेने ने दररोज घोषणा करायचा सपाट लावला तसे काही करायचा मूर्खपणा करणार नाही हि आशा व दररोज सकाळी उठून मोदी वर तोंड सुख घेणार नाही हि अपेक्षा
केंद्रात सरकार आता यांचा केजरीवाल करणार हे नक्की
ओला दुष्काळ व बाकी ह्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत ,चूक कोणाचीही असो नाव शिव सेनेचेच दिसतेय त्यामुळे त्यानं मत कमी पडणार ह्यापुढे
आमदार फुटणे अशक्य नसले तरी खूप अवघड असणार ,राष्ट्रवादी वाले जसा उदयनराजे ह्यांचे फोटो दाखवत आहेत तसे हे राणे ह्यांचा दाखवतील
शिव सेनेच्या त्रागाची करणे माझ्या मते
१) राणे :- तसा पण युती असूनही ह्यांच्या पुढे उमेदवार उभा केला होता
२) सापक्ष वागणूक
३) बारामती :- ५ वर्ष आधी यांनी भाजप ला पाठिंबा देऊन काडी टाकली , आत्ता त्यांनाच फडणवीस यांनी अंगावर घेतले म्हणून हा गेम
४) मुख्यमंत्री बनायचे वय निघून चाललेय
प्रतिक्रिया
11 Nov 2019 - 8:40 pm | हस्तर
जेवढी मजा बाहुबलि , वार , रेस बघताना नाहि आलि तेवढी ह्या १० दिव्सत आलि
11 Nov 2019 - 9:05 pm | जॉनविक्क
जे फोडायचे होते ते मेगाभर्तीतच फोडले म्हणून आता फोडाफोडीचे राजकारण करणार नाही म्हणायची वेळ आली. सत्तेत सहभागी न होता भाजपाने शिवसेनेला बिनशर्त पाठींबा द्यावा मग मानलं.
12 Nov 2019 - 12:07 am | गड्डा झब्बू
अजिबात देऊ नये.... अशीही सो कॉल्ड मंदी आहे ती हटवण्या साठी फेर निवडणूक होणे गरजेचे आहे (कृपया ज्यांना अर्थशास्त्रातील ओ का ठो कळत नसेल त्यांनी ह्या मुद्द्यावर काही बोलू नये ही विनंती ) बाकी ज्यांना ज्यांना उघडे पाडायचे होते त्यांना उघडे उघडे पाडून झाले आहें, जेवढे दल बदलू आले होते त्यांचा pationce टेस्ट करता येईल आणि फेर निवडणूक झाली तर सर्व ठिकाणी गाळीव उमेदवार उभे करता येण्यासारखी परिस्थिती निर्माण करणे.... मान गये उस्ताद.... अमित शहा तुसी ग्रेट हो....
12 Nov 2019 - 12:56 am | जॉनविक्क
अजूनही 2.5 वर्षांच्या बोलीवर राष्ट्रवादी-शिवसेना सरकार येऊ शकते परंतु त्यावेळी काँग्रेस काय भूमिका घेईल ?
12 Nov 2019 - 1:15 am | गड्डा झब्बू
कोणी काय भूमिका घ्यायची ते त्यांना बरोब्बर माहित आहे.
ज्यांच्याकडे आजच्या तारखेला गमवायला काहीच नाही तिथे काँग्रेस आहे. आणि ज्यांना सर्व पूर्वपुण्याई गमवायची तयारी आहे अशा जागी राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे.
कोणीही कसाही वागला तरी मतदारांपर्यंत जो संदेश जायचा तो जाणारच आहे....
12 Nov 2019 - 1:46 am | जॉनविक्क
आता पर्यंत मतदारात अंधारात होते म्हणाकी, सेना-भाजपा चे काय ठरल होते या बाबत ? आणी अंधारातच मतदान झाले ना त्यांचे कडून ? वाह रे वा.
12 Nov 2019 - 2:12 am | गड्डा झब्बू
तिथेच तर मेख आहे "आमचं ठरलंय".....अरे पण काय ठरलंय? जनता 'चू' आहे हे गृहीत धरूनच चाललं होतं ना सगळं... :-)
12 Nov 2019 - 1:25 pm | जॉनविक्क
काय ठरलंय हेच माहीत नाही तर 'चू' सारखे मतदान केलेच कोणाला ?
11 Nov 2019 - 10:31 pm | शशिकांत ओक
राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पाणी जोखायला उद्या ८।।पर्यंत बोलावले आहे...
आता शिवसेनेने बाहेरून पाठिंबा जाहीर करण्यात शान आहे... पाहू ते काय करतात ते...
11 Nov 2019 - 10:52 pm | जॉनविक्क
बघू राष्ट्रवादी काय करेल ते ? भाजपा इतका सत्तेसाठी जुळवाजुळव करायला शिवसेनेला वेळ तर दिला नाहीच, आणी भोळ्या जनतेची सेनेचे स्वप्न भंगले म्हणायची सोयही केली, आता जाणता राजा ती करामत करणार काय याची उत्सुकता आहे.
12 Nov 2019 - 9:26 am | सुबोध खरे
शिवसेनेला वेळ तर दिला नाहीच.
मग मागचे १५ दिवस काय गोट्या खेळत होते?
एवढं न समजायला राज्यपालांना हे काय दुधखुळे समजतात?
निकालाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे "आमचे दुसरे विचार चालू आहेत" असे म्हणतात ते जनतेला समजतंय आणि राज्यपालांना समजत नाही?
राष्ट्रवादीने "कात्रज" केला आणि काँग्रेसने "हाड हाड" केलंय त्याबद्दल अजून सत्तेचा लोण्याचा गोळा दिसतोय त्यामुळे बोलत नाहीत.
मग "वड्याचं तेल वांग्यावर" या न्यायाने राज्यपालांना लक्ष्य बनवत आहेत हे लोकांना समजत नाही का?
कर्नाटकात सर्वोच्च न्यायालयाने घोडे बाजार होऊ नये म्हणून फक्त ४८ तास मुदत दिली होती ते विसरले का?
14 Nov 2019 - 3:57 pm | जॉनविक्क
मागचे 15 दिवस ते भाजप गोट्या खेळण्यात कसा वेळ घालवतय ते बघत होते आणी हे ही समजायला राज्यपाल दूधखुळे नाहीत.
इंशाला हे अगदी खरेच असो, आनंद आहे. जय श्रीराम.
आत्ता घोडेबाजारात पैसे ओतायची क्षमता व स्थान फक्त भाजपाकडे आहे हे न समजण्याइतकी जनताही दुधखुळी नाही, 50 खोके एका नगाला भावही लागला आहे असे म्हणतात पण याबाबत ऐकीव गोष्ट हा भाग सोडला तर इतर कोणताही पुरावा नसल्याने ते खरे आहे असे माझे म्हणणे वा समजूत नाही आणी कोणी करून घेऊही नये. बाकी कर्नाटकाच्या धर्तीवर गोष्टी घडत असतील तर 48 तास म्हणजे नेमके किती हे राज्यपाल विसरले असावेत असे मानायला जागा आहे, नाही ?
12 Nov 2019 - 12:43 pm | विजुभाऊ
ज्या पवारांना सेनेने भ्र्ष्टवादी , चोर , बारामतीचा म्हमद्या , मैद्याचं पोते, मुतर्या तोंडाचे अजित पवार , अशा अनेक पदव्याम्नी भूषवले.
काँग्रेसला इटलीची किटली, युवराज , ही बाई अशी अनेक बिरुदे बहाल केली.
काँग्रेस ही देशाला लागलेली कीड आहे. असे म्हणून झाले.
अर्थात भाज्पलाही अफजहलखान वगैरे म्हणून झालेय.
त्या शिवसेनेला कशासाठी पाट्।इंबा द्यायचा.
मोडेन पण झुकणार नाही म्हणणारी शिवसेना सोनीया गांधींच्या दाराशी लाचार पणे वात पहात बसले होती.
सेनेमधे जराजरी पाठीचा कणा उरला असेल तर त्यानी मुंबई महापालीकेतील भाजपसोबतची सत्ता सोडून दाखवावी.
अर्थात सेना हे करणार नाहीच. तशीही ती नेहमीच अपॉर्च्युनिस्ट सेना राहिलेली आहे.
पवारांनी सेनेला बरोब्बर वात दाखवली आहे.
सेना या नंतर किती टिकेल हाच प्रश्न आहे.
12 Nov 2019 - 2:16 pm | Rajesh188
पूर्ण बहुमतातील bjp राज्याला हानिकारक ठरेल असे मत असणारी लोक सुधा आहेत.
ज्यांनी पूर्ण विचार करूनच असे मत बनवले आहे.
सेना संपेल हा उथळ विचार आहे.
विरोधी मत असलेल्या स्व पक्षातील किंवा विरोधी पक्षातील आमदारांची काम न करणे.
त्यांचा विभागात विकासकामात अडथळा निर्माण करणे .
असले प्रताप bjp नी केले आहेत.
त्या मुळे किती तरी महत्वाची काम अडकून पडली आहेत.
फक्त मोठ्या dikhavu
योजनांचे ढोल बडवयचे
काम फक्त bjp नी केले आहे.
ते बरीच जनता जाणून आहे.
आणि फक्त त्याच करणं
मुळे सेना मुख्य मंत्री पदाचा हट्ट धरून बसली आहे.
सेना संपेल,राष्ट्रवादी संपेल आणि bjp वाढेल तर अस काही मोठ्या प्रमाणात इथे महाराष्ट्र मध्ये तरी घडणार नाही
14 Nov 2019 - 3:33 pm | रणजित चितळे
त्यांचा विभागात विकासकामात अडथळा निर्माण करणे .
असले प्रताप bjp नी केले आहेत.
त्या मुळे किती तरी महत्वाची काम अडकून पडली आहेत.
*************************
जरा उदाहरण द्या
15 Nov 2019 - 10:40 am | सुबोध खरे
अशी उदाहरणे देण्यात ते सेना नेतृत्वासारखेच बांधील नाहीत.
आरोप कुणीही कसाही करावा. पुरावा देण्याची आवश्यकता नाही.
कारण आई भवानी चा आशीर्वाद असलेला आणि क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधिश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा चालवणारा मराठी माणूस कधीही खोटं बोलत नाही.
12 Nov 2019 - 3:34 pm | चौकस२१२
सारांश
- जनतेने काँग्रेस + राष्ट्रवादी ला कौल दिला नाहीये, १०५+५६ असाच मूळ कौल आहे . का लोक विसरतात कळत नाही !
- ५६/१०५ असताना ५६ वाल्या "ढ" मुलाने मी वर्गाचा नायक होणार असा हट्ट धरून सेनेने हातचं घालवलं ( एक नेटकरी प्रतिक्रिया वाचलेली)
- "सेनेचा वाघ कधी शेपूट घाले ते सांगता येत नाही" असे खूप पूर्वी ऐकले होते ते आज परत दिसले
- जरी सेना संपणार नसली तरी तिने मराठी माणसाच्याच नव्हे तर एकूण महाराष्ट्रातील मतदारांच्या मनातून उतरेल असे वर्तन केले आहे ( हे झाली सॊउम्या शब्दातील प्रतिक्रिया)
12 Nov 2019 - 5:35 pm | हस्तर
कोणाला अँजिओप्लास्टी चा अनुभव आहे ? icu मध्ये फोने पण चालत नाही,रक्तात ब्लॉक असल्यावर मांडी पण घालून देत नाही आणि एक आठवडा विश्रांती घ्यायचीच लागते हे संपादकीय कसे लिहितात
12 Nov 2019 - 8:30 pm | गामा पैलवान
अवांतर :
हस्तर,
रक्तात ब्लॉक म्हणजे नक्की काय? हृदयातला अडथळा ऐकला होता.
आ.न.,
-गा.पै.
13 Nov 2019 - 1:19 pm | हस्तर
हा चेष्टे चा विषय नाहीये ,मला पण ब्लॉक आहे ,dvt म्हणतात ह्याला
13 Nov 2019 - 1:50 pm | गामा पैलवान
हस्तर,
राऊतांचा ब्लॉक नेमका हाच असेल असं नाही. पण अर्थात ते सोंग वठवंत असू शकतात.
आ.न.,
-गा.पै.
13 Nov 2019 - 3:38 pm | हस्तर
मान्य
पण सोन्ग फस्ले
13 Nov 2019 - 7:21 pm | सुबोध खरे
श्री राऊत यांच्या हृदयाची रक्तवाहिनी अरुंद झाली आहे.
जेंव्हा हृदयाचे काम वाढते (शारीरीक श्रमाने किंवा मानसिक ताणामुळे) तेंव्हा हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. यामुळे त्यांना छातीत दुखू लागले. त्यांची अँजियो ग्राफी केली तेंव्हा त्यात असे तीन ठिकाणी अडथळे आढळून आले त्यामुळे त्या तीन ठिकाणी मांडीच्या रक्तवाहिनीतुन नळी नेऊन फुगा फुगवून ती रक्तवाहिनी रुंद करण्यात आली आणि त्यानंतर त्यात धातूची प्रसारण पावणारी नळकांडी( स्टेण्ट) बसवली आहेत.
मांडीच्या रक्तवाहिनीतुन नळी नेताना होणाऱ्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ नये म्हणून १२-२४ तास मांडी हलवता येत नाही. यानंतर साधारण ४८ तास पर्यंत हृदयाचे काम ठीक चालते आहे हे अतिदक्षता विभागात सतत तपासले जाते( इ सी जी मॉनिटरिंग). सर्व काही ठीक असेल कि रुग्णाला घरी पाठवले जाते आणि एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो.
श्री राऊत यांचा आजार खरा आहे सोंग नाही हे विश्वसनीय सूत्रांतर्फे मी सांगू शकतो. अतिताणामुळे हा मूलतः असणारा आजार बळावला आहे.
श्री उद्धव ठाकरे यांची दोन वेळेस अँजियोपलॅस्टी होऊन त्यांना एकंदर १०-१२ स्टेण्ट बसवलेले आहेत.
https://www.thehindu.com/news/national/other-states/uddhav-undergoes-ang...
https://www.hindustantimes.com/mumbai/uddhav-thackeray-undergoes-angiopl...
२०१६ मध्ये त्यांची परत तपासणी झाली होती
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/uddhav-tha...
DVT हा आजार पायाच्या नीलामध्ये रक्ताची गुठळी झाल्यामुळे होतो. त्याचा या आजाराशी थेट संबंध नाही.
13 Nov 2019 - 7:58 pm | हस्तर
dvt मध्ये पण ब्लॉक येतो ,मला आहे ,कलर डॉप्लर टेस्ट
dr ने अँजिओप्लास्टी चा सांगितली व हयीच पद्धत सांगितली
राऊत ह्यांना ब्लॉक असेल पण काल ऑपेरेशन झाले ह्याची शक्यात धूसर आहे
13 Nov 2019 - 8:01 pm | सुबोध खरे
श्री राऊत यांचा आजार खरा आहे सोंग नाही हे विश्वसनीय सूत्रांतर्फे मी सांगू शकतो.
14 Nov 2019 - 12:46 pm | हस्तर
पण ऑपेरेशन खरे आहे कि नाही हा मुद्दा आहे
एका दिवसात discharge द्याल हे काय सलमान खान आहेत ?
15 Nov 2019 - 10:28 am | सुबोध खरे
MUMBAI: Nearly two days after he underwent angioplasty to remove two blockages in his heart at Lilavati Hospital in Mumbai, senior Shiv Sena leader Sanjay Raut was discharged on Wednesday noon.
https://www.ndtv.com/india-news/sanjay-raut-after-getting-discharged-fro...
12 Nov 2019 - 5:59 pm | हस्तर
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट ...
14 Nov 2019 - 1:24 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
जंघारोहिणीस (फीमोरल आर्टरीस) भोक पाडले असेल तर हे विधान बरोबर आहे. दुसरा पर्याय म्हणजे मनगटावरील हस्तरोहिणीस छिद्र पाडणे. हल्ली हा पर्याय अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, असं ऐकून आहे. राऊतांच्या हस्तरोहिणीस छिद्र पाडलेले असावे.
आ.न.,
-गा.पै.
14 Nov 2019 - 1:32 pm | हस्तर
मग लगेच डिस्चार्जय मिळेल का ? मला पण आज ना उद्या अँजिओ करावीच लागणार आहे ,महत्वाचे आहे
आणि राऊत ह्यांच्या हॉस्पिटल मधून बाहेर येण्याच्या फोटो मध्ये बॅंडेज तर दिसत नाहीये
14 Nov 2019 - 8:35 pm | गामा पैलवान
हस्तर,
जर तुमच्या हस्तरोहिणीस छिद्र पाडले तर हो, तुम्ही चारेक तासांत घरी जाऊ शकता.
आ.न.,
-गा.पै.
14 Nov 2019 - 9:42 pm | हस्तर
धन्य वाद
14 Nov 2019 - 8:30 pm | हस्तर
शिव्सेनेवर मस्त विदेओ
https://youtu.be/nc1TjTdk4EQ
शिव्सेने ने भजप शी युति क तोड्लि
https://youtu.be/cWboGq8Qh0c
15 Nov 2019 - 5:26 pm | कंजूस
शग्गलं सोलनाल ,लालु नै सोलनाल.