✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया

ह
हस्तर यांनी
Mon, 11/11/2019 - 15:02  ·  लेख
लेख
शिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया मुख्यमंत्री जर आपलाच करायचा होता तर प्रचार का तसा केला नाही व निकाल लागल्यावरच डरकाळी फुटली ? मते युतीला ला होती आता युती फुटली तर निवडणूक परत घेणे रास्त जर ठरले होते तर अमित शाह यांना एकदा पण जाब का नाही विचारला ? दर वेळी शहा आणि मोदी मातोश्रीवर येतात मग आता दिल्ली जनपथ येथे जाऊन पाठिंबा मागण्यात स्वाभिमान आहे ? पुढे काय अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला अर्थात भाजप पाठिंबा देणार नाही काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा देतील पण अटी घालून ( मराठी माणूस युद्धात जिंकता पण तहात हरतो ) मुख्यमंत्री आपला वरून एवढे रणकंदन झाले त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल पण सरकार डळमळीत असणारच विखे आधी पण विरोधी पक्ष नेते होते बहुतेक आता पण तेच असणार ९० मध्ये सत्तेवर आल्यावर शिव सेने ने दररोज घोषणा करायचा सपाट लावला तसे काही करायचा मूर्खपणा करणार नाही हि आशा व दररोज सकाळी उठून मोदी वर तोंड सुख घेणार नाही हि अपेक्षा केंद्रात सरकार आता यांचा केजरीवाल करणार हे नक्की ओला दुष्काळ व बाकी ह्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत ,चूक कोणाचीही असो नाव शिव सेनेचेच दिसतेय त्यामुळे त्यानं मत कमी पडणार ह्यापुढे आमदार फुटणे अशक्य नसले तरी खूप अवघड असणार ,राष्ट्रवादी वाले जसा उदयनराजे ह्यांचे फोटो दाखवत आहेत तसे हे राणे ह्यांचा दाखवतील शिव सेनेच्या त्रागाची करणे माझ्या मते १) राणे :- तसा पण युती असूनही ह्यांच्या पुढे उमेदवार उभा केला होता २) सापक्ष वागणूक ३) बारामती :- ५ वर्ष आधी यांनी भाजप ला पाठिंबा देऊन काडी टाकली , आत्ता त्यांनाच फडणवीस यांनी अंगावर घेतले म्हणून हा गेम ४) मुख्यमंत्री बनायचे वय निघून चाललेय
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
45750 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

जेवढी मजा बाहुबलि , वार ,

हस्तर
Mon, 11/11/2019 - 20:40 नवीन
जेवढी मजा बाहुबलि , वार , रेस बघताना नाहि आलि तेवढी ह्या १० दिव्सत आलि
  • Log in or register to post comments

द्यावा भाजपाने पाठींबा बाहेरून, जनतेच्या भल्यासाठी.

जॉनविक्क
Mon, 11/11/2019 - 21:05 नवीन
जे फोडायचे होते ते मेगाभर्तीतच फोडले म्हणून आता फोडाफोडीचे राजकारण करणार नाही म्हणायची वेळ आली. सत्तेत सहभागी न होता भाजपाने शिवसेनेला बिनशर्त पाठींबा द्यावा मग मानलं.
  • Log in or register to post comments

अजिबात देऊ नये.... अशीही सो कॉल्ड मंदी आहे

गड्डा झब्बू
Tue, 11/12/2019 - 00:07 नवीन
अजिबात देऊ नये.... अशीही सो कॉल्ड मंदी आहे ती हटवण्या साठी फेर निवडणूक होणे गरजेचे आहे (कृपया ज्यांना अर्थशास्त्रातील ओ का ठो कळत नसेल त्यांनी ह्या मुद्द्यावर काही बोलू नये ही विनंती ) बाकी ज्यांना ज्यांना उघडे पाडायचे होते त्यांना उघडे उघडे पाडून झाले आहें, जेवढे दल बदलू आले होते त्यांचा pationce टेस्ट करता येईल आणि फेर निवडणूक झाली तर सर्व ठिकाणी गाळीव उमेदवार उभे करता येण्यासारखी परिस्थिती निर्माण करणे.... मान गये उस्ताद.... अमित शहा तुसी ग्रेट हो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

Hmmm....

जॉनविक्क
Tue, 11/12/2019 - 00:56 नवीन
अजूनही 2.5 वर्षांच्या बोलीवर राष्ट्रवादी-शिवसेना सरकार येऊ शकते परंतु त्यावेळी काँग्रेस काय भूमिका घेईल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गड्डा झब्बू

कोणी काय भूमिका घ्यायची ते त्यांना बरोब्बर माहित आहे.

गड्डा झब्बू
Tue, 11/12/2019 - 01:15 नवीन
कोणी काय भूमिका घ्यायची ते त्यांना बरोब्बर माहित आहे. ज्यांच्याकडे आजच्या तारखेला गमवायला काहीच नाही तिथे काँग्रेस आहे. आणि ज्यांना सर्व पूर्वपुण्याई गमवायची तयारी आहे अशा जागी राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. कोणीही कसाही वागला तरी मतदारांपर्यंत जो संदेश जायचा तो जाणारच आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

म्हणजे ?

जॉनविक्क
Tue, 11/12/2019 - 01:46 नवीन
मतदारांपर्यंत जो संदेश जायचा तो जाणारच आहे....
आता पर्यंत मतदारात अंधारात होते म्हणाकी, सेना-भाजपा चे काय ठरल होते या बाबत ? आणी अंधारातच मतदान झाले ना त्यांचे कडून ? वाह रे वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गड्डा झब्बू

हा हा हा

गड्डा झब्बू
Tue, 11/12/2019 - 02:12 नवीन
आता पर्यंत मतदारात अंधारात होते म्हणाकी, सेना-भाजपा चे काय ठरल होते या बाबत ? आणी अंधारातच मतदान झाले ना त्यांचे कडून ? वाह रे वा.
तिथेच तर मेख आहे "आमचं ठरलंय".....अरे पण काय ठरलंय? जनता 'चू' आहे हे गृहीत धरूनच चाललं होतं ना सगळं... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

तिथेच तर मेख आहे जर

जॉनविक्क
Tue, 11/12/2019 - 13:25 नवीन
काय ठरलंय हेच माहीत नाही तर 'चू' सारखे मतदान केलेच कोणाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गड्डा झब्बू

ठणठणगोपाळ

शशिकांत ओक
Mon, 11/11/2019 - 22:31 नवीन
राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पाणी जोखायला उद्या ८।।पर्यंत बोलावले आहे... आता शिवसेनेने बाहेरून पाठिंबा जाहीर करण्यात शान आहे... पाहू ते काय करतात ते...
  • Log in or register to post comments

वा, राज्यपाल एकदम भारी आहेत.

जॉनविक्क
Mon, 11/11/2019 - 22:52 नवीन
बघू राष्ट्रवादी काय करेल ते ? भाजपा इतका सत्तेसाठी जुळवाजुळव करायला शिवसेनेला वेळ तर दिला नाहीच, आणी भोळ्या जनतेची सेनेचे स्वप्न भंगले म्हणायची सोयही केली, आता जाणता राजा ती करामत करणार काय याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

शिवसेनेला वेळ तर दिला नाहीच.

सुबोध खरे
Tue, 11/12/2019 - 09:26 नवीन
शिवसेनेला वेळ तर दिला नाहीच. मग मागचे १५ दिवस काय गोट्या खेळत होते? एवढं न समजायला राज्यपालांना हे काय दुधखुळे समजतात? निकालाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे "आमचे दुसरे विचार चालू आहेत" असे म्हणतात ते जनतेला समजतंय आणि राज्यपालांना समजत नाही? राष्ट्रवादीने "कात्रज" केला आणि काँग्रेसने "हाड हाड" केलंय त्याबद्दल अजून सत्तेचा लोण्याचा गोळा दिसतोय त्यामुळे बोलत नाहीत. मग "वड्याचं तेल वांग्यावर" या न्यायाने राज्यपालांना लक्ष्य बनवत आहेत हे लोकांना समजत नाही का? कर्नाटकात सर्वोच्च न्यायालयाने घोडे बाजार होऊ नये म्हणून फक्त ४८ तास मुदत दिली होती ते विसरले का?
  • Log in or register to post comments

शिवसेनेला वेळ तर दिला नाहीच.

जॉनविक्क
गुरुवार, 11/14/2019 - 15:57 नवीन
शिवसेनेला वेळ तर दिला नाहीच. मग मागचे १५ दिवस काय गोट्या खेळत होते?
मागचे 15 दिवस ते भाजप गोट्या खेळण्यात कसा वेळ घालवतय ते बघत होते आणी हे ही समजायला राज्यपाल दूधखुळे नाहीत.
राष्ट्रवादीने "कात्रज" केला आणि काँग्रेसने "हाड हाड" केलंय त्याबद्दल अजून सत्तेचा लोण्याचा गोळा दिसतोय त्यामुळे बोलत नाहीत.
इंशाला हे अगदी खरेच असो, आनंद आहे. जय श्रीराम.
कर्नाटकात सर्वोच्च न्यायालयाने घोडे बाजार होऊ नये म्हणून फक्त ४८ तास मुदत दिली होती ते विसरले का?
आत्ता घोडेबाजारात पैसे ओतायची क्षमता व स्थान फक्त भाजपाकडे आहे हे न समजण्याइतकी जनताही दुधखुळी नाही, 50 खोके एका नगाला भावही लागला आहे असे म्हणतात पण याबाबत ऐकीव गोष्ट हा भाग सोडला तर इतर कोणताही पुरावा नसल्याने ते खरे आहे असे माझे म्हणणे वा समजूत नाही आणी कोणी करून घेऊही नये. बाकी कर्नाटकाच्या धर्तीवर गोष्टी घडत असतील तर 48 तास म्हणजे नेमके किती हे राज्यपाल विसरले असावेत असे मानायला जागा आहे, नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ज्या पवारांना सेनेने

विजुभाऊ
Tue, 11/12/2019 - 12:43 नवीन
ज्या पवारांना सेनेने भ्र्ष्टवादी , चोर , बारामतीचा म्हमद्या , मैद्याचं पोते, मुतर्‍या तोंडाचे अजित पवार , अशा अनेक पदव्याम्नी भूषवले. काँग्रेसला इटलीची किटली, युवराज , ही बाई अशी अनेक बिरुदे बहाल केली. काँग्रेस ही देशाला लागलेली कीड आहे. असे म्हणून झाले. अर्थात भाज्पलाही अफजहलखान वगैरे म्हणून झालेय. त्या शिवसेनेला कशासाठी पाट्।इंबा द्यायचा. मोडेन पण झुकणार नाही म्हणणारी शिवसेना सोनीया गांधींच्या दाराशी लाचार पणे वात पहात बसले होती. सेनेमधे जराजरी पाठीचा कणा उरला असेल तर त्यानी मुंबई महापालीकेतील भाजपसोबतची सत्ता सोडून दाखवावी. अर्थात सेना हे करणार नाहीच. तशीही ती नेहमीच अपॉर्च्युनिस्ट सेना राहिलेली आहे. पवारांनी सेनेला बरोब्बर वात दाखवली आहे. सेना या नंतर किती टिकेल हाच प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

पूर्ण बहुमतातील bjp राज्याला हानिकारक ठरेल

Rajesh188
Tue, 11/12/2019 - 14:16 नवीन
पूर्ण बहुमतातील bjp राज्याला हानिकारक ठरेल असे मत असणारी लोक सुधा आहेत. ज्यांनी पूर्ण विचार करूनच असे मत बनवले आहे. सेना संपेल हा उथळ विचार आहे. विरोधी मत असलेल्या स्व पक्षातील किंवा विरोधी पक्षातील आमदारांची काम न करणे. त्यांचा विभागात विकासकामात अडथळा निर्माण करणे . असले प्रताप bjp नी केले आहेत. त्या मुळे किती तरी महत्वाची काम अडकून पडली आहेत. फक्त मोठ्या dikhavu योजनांचे ढोल बडवयचे काम फक्त bjp नी केले आहे. ते बरीच जनता जाणून आहे. आणि फक्त त्याच करणं मुळे सेना मुख्य मंत्री पदाचा हट्ट धरून बसली आहे. सेना संपेल,राष्ट्रवादी संपेल आणि bjp वाढेल तर अस काही मोठ्या प्रमाणात इथे महाराष्ट्र मध्ये तरी घडणार नाही
  • Log in or register to post comments

उदाहरण द्या

रणजित चितळे
गुरुवार, 11/14/2019 - 15:33 नवीन
त्यांचा विभागात विकासकामात अडथळा निर्माण करणे . असले प्रताप bjp नी केले आहेत. त्या मुळे किती तरी महत्वाची काम अडकून पडली आहेत. ************************* जरा उदाहरण द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अशी उदाहरणे देण्यात ते सेना

सुबोध खरे
Fri, 11/15/2019 - 10:40 नवीन
अशी उदाहरणे देण्यात ते सेना नेतृत्वासारखेच बांधील नाहीत. आरोप कुणीही कसाही करावा. पुरावा देण्याची आवश्यकता नाही. कारण आई भवानी चा आशीर्वाद असलेला आणि क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधिश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा चालवणारा मराठी माणूस कधीही खोटं बोलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

जनतेने

चौकस२१२
Tue, 11/12/2019 - 15:34 नवीन
सारांश - जनतेने काँग्रेस + राष्ट्रवादी ला कौल दिला नाहीये, १०५+५६ असाच मूळ कौल आहे . का लोक विसरतात कळत नाही ! - ५६/१०५ असताना ५६ वाल्या "ढ" मुलाने मी वर्गाचा नायक होणार असा हट्ट धरून सेनेने हातचं घालवलं ( एक नेटकरी प्रतिक्रिया वाचलेली) - "सेनेचा वाघ कधी शेपूट घाले ते सांगता येत नाही" असे खूप पूर्वी ऐकले होते ते आज परत दिसले - जरी सेना संपणार नसली तरी तिने मराठी माणसाच्याच नव्हे तर एकूण महाराष्ट्रातील मतदारांच्या मनातून उतरेल असे वर्तन केले आहे ( हे झाली सॊउम्या शब्दातील प्रतिक्रिया)
  • Log in or register to post comments

कोणाला अँजिओप्लास्टी चा अनुभव

हस्तर
Tue, 11/12/2019 - 17:35 नवीन
कोणाला अँजिओप्लास्टी चा अनुभव आहे ? icu मध्ये फोने पण चालत नाही,रक्तात ब्लॉक असल्यावर मांडी पण घालून देत नाही आणि एक आठवडा विश्रांती घ्यायचीच लागते हे संपादकीय कसे लिहितात
  • Log in or register to post comments

अवांतर : रक्तात ब्लॉक = ?

गामा पैलवान
Tue, 11/12/2019 - 20:30 नवीन
अवांतर : हस्तर, रक्तात ब्लॉक म्हणजे नक्की काय? हृदयातला अडथळा ऐकला होता. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

हा चेष्टे चा विषय नाहीये ,मला

हस्तर
Wed, 11/13/2019 - 13:19 नवीन
हा चेष्टे चा विषय नाहीये ,मला पण ब्लॉक आहे ,dvt म्हणतात ह्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

राऊतांचा ब्लॉक

गामा पैलवान
Wed, 11/13/2019 - 13:50 नवीन
हस्तर, राऊतांचा ब्लॉक नेमका हाच असेल असं नाही. पण अर्थात ते सोंग वठवंत असू शकतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

मान्य पण सोन्ग फस्ले

हस्तर
Wed, 11/13/2019 - 15:38 नवीन
मान्य पण सोन्ग फस्ले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

श्री राऊत यांच्या हृदयाची

सुबोध खरे
Wed, 11/13/2019 - 19:21 नवीन
श्री राऊत यांच्या हृदयाची रक्तवाहिनी अरुंद झाली आहे. जेंव्हा हृदयाचे काम वाढते (शारीरीक श्रमाने किंवा मानसिक ताणामुळे) तेंव्हा हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. यामुळे त्यांना छातीत दुखू लागले. त्यांची अँजियो ग्राफी केली तेंव्हा त्यात असे तीन ठिकाणी अडथळे आढळून आले त्यामुळे त्या तीन ठिकाणी मांडीच्या रक्तवाहिनीतुन नळी नेऊन फुगा फुगवून ती रक्तवाहिनी रुंद करण्यात आली आणि त्यानंतर त्यात धातूची प्रसारण पावणारी नळकांडी( स्टेण्ट) बसवली आहेत. मांडीच्या रक्तवाहिनीतुन नळी नेताना होणाऱ्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ नये म्हणून १२-२४ तास मांडी हलवता येत नाही. यानंतर साधारण ४८ तास पर्यंत हृदयाचे काम ठीक चालते आहे हे अतिदक्षता विभागात सतत तपासले जाते( इ सी जी मॉनिटरिंग). सर्व काही ठीक असेल कि रुग्णाला घरी पाठवले जाते आणि एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. श्री राऊत यांचा आजार खरा आहे सोंग नाही हे विश्वसनीय सूत्रांतर्फे मी सांगू शकतो. अतिताणामुळे हा मूलतः असणारा आजार बळावला आहे. श्री उद्धव ठाकरे यांची दोन वेळेस अँजियोपलॅस्टी होऊन त्यांना एकंदर १०-१२ स्टेण्ट बसवलेले आहेत. https://www.thehindu.com/news/national/other-states/uddhav-undergoes-angioplasty-procedure/article4064604.ece https://www.hindustantimes.com/mumbai/uddhav-thackeray-undergoes-angioplasty-docs-say-he-is-fine/story-2ISxotzn5GD6j3qq9BPNvL.html २०१६ मध्ये त्यांची परत तपासणी झाली होती https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/uddhav-thackeray-discharged-after-undergoing-angiography/articleshow/52243730.cms DVT हा आजार पायाच्या नीलामध्ये रक्ताची गुठळी झाल्यामुळे होतो. त्याचा या आजाराशी थेट संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

dvt मध्ये पण ब्लॉक येतो

हस्तर
Wed, 11/13/2019 - 19:58 नवीन
dvt मध्ये पण ब्लॉक येतो ,मला आहे ,कलर डॉप्लर टेस्ट dr ने अँजिओप्लास्टी चा सांगितली व हयीच पद्धत सांगितली राऊत ह्यांना ब्लॉक असेल पण काल ऑपेरेशन झाले ह्याची शक्यात धूसर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

श्री राऊत यांचा आजार खरा आहे

सुबोध खरे
Wed, 11/13/2019 - 20:01 नवीन
श्री राऊत यांचा आजार खरा आहे सोंग नाही हे विश्वसनीय सूत्रांतर्फे मी सांगू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

पण ऑपेरेशन खरे आहे कि नाही

हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 12:46 नवीन
पण ऑपेरेशन खरे आहे कि नाही हा मुद्दा आहे एका दिवसात discharge द्याल हे काय सलमान खान आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

MUMBAI: Nearly two days after

सुबोध खरे
Fri, 11/15/2019 - 10:28 नवीन
MUMBAI: Nearly two days after he underwent angioplasty to remove two blockages in his heart at Lilavati Hospital in Mumbai, senior Shiv Sena leader Sanjay Raut was discharged on Wednesday noon. https://www.ndtv.com/india-news/sanjay-raut-after-getting-discharged-from-lilavati-hospital-mumbai-next-chief-minister-from-shiv-sen-2131915
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट

हस्तर
Tue, 11/12/2019 - 17:59 नवीन
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट ...
  • Log in or register to post comments

जंघारोहिणी व हस्तरोहिणी

गामा पैलवान
गुरुवार, 11/14/2019 - 13:24 नवीन
खरे डॉक्टर,
मांडीच्या रक्तवाहिनीतुन नळी नेताना होणाऱ्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ नये म्हणून १२-२४ तास मांडी हलवता येत नाही.
जंघारोहिणीस (फीमोरल आर्टरीस) भोक पाडले असेल तर हे विधान बरोबर आहे. दुसरा पर्याय म्हणजे मनगटावरील हस्तरोहिणीस छिद्र पाडणे. हल्ली हा पर्याय अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, असं ऐकून आहे. राऊतांच्या हस्तरोहिणीस छिद्र पाडलेले असावे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मग लगेच डिस्चार्जय मिळेल का ?

हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 13:32 नवीन
मग लगेच डिस्चार्जय मिळेल का ? मला पण आज ना उद्या अँजिओ करावीच लागणार आहे ,महत्वाचे आहे आणि राऊत ह्यांच्या हॉस्पिटल मधून बाहेर येण्याच्या फोटो मध्ये बॅंडेज तर दिसत नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हस्तरोहिणीमार्गे असल्यास हो

गामा पैलवान
गुरुवार, 11/14/2019 - 20:35 नवीन
हस्तर, जर तुमच्या हस्तरोहिणीस छिद्र पाडले तर हो, तुम्ही चारेक तासांत घरी जाऊ शकता. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

धन्य वाद

हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 21:42 नवीन
धन्य वाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

शिव्सेनेवर मस्त विदेओ

हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 20:30 नवीन
शिव्सेनेवर मस्त विदेओ https://youtu.be/nc1TjTdk4EQ शिव्सेने ने भजप शी युति क तोड्लि https://youtu.be/cWboGq8Qh0c
  • Log in or register to post comments

शग्गलं सोलनाल ,लालु नै सोलनाल

कंजूस
Fri, 11/15/2019 - 17:26 नवीन
शग्गलं सोलनाल ,लालु नै सोलनाल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा