आंद्रेचं खुलं आयुष्य अर्थात 'ओपन'

मीअपर्णा's picture
मीअपर्णा in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

आंद्रेचं खुलं आयुष्य अर्थात 'ओपन'

मी कोणताही खेळ कधीही न खेळल्यामुळे खेळाडूंचं आयुष्य कसं असेल त्याबद्दल मला एक सुप्त आकर्षण आहे. विशेषतः टेनिस खेळाडूंचं. तुम्ही डबल्स खेळणारे नसल्यास हा प्रवास प्रेक्षकांसाठी तरी तुमचा एकट्याचा. त्यातही निदान खेळाच्या मैदानावर तर नक्कीच एकट्याचा. यश, अपयश तुमच्या माथी. कुठून आणतात ही जिद्द आणि कसे सांभाळतात यातले चढ-उतार? हे सर्व जाणून घेण्यासाठी 'ओपन' वाचलं आणि माझ्या टेनिस पाहायच्या सुरुवातीच्या काळात मला आवडणाऱ्या स्टेफीशी त्याचं लग्न झालंय म्हणूनही असेल, अगास्सी काय चीज आहे हे वाचायला सुरुवात केली.

पुस्तक सुरू होतं त्याच्या २००६च्या यूएस ओपनच्या सामन्याच्या दिवशी आणि मग ते आपल्याला मागे घेऊन त्याच्या तिथवरचा सगळा जीवनप्रवास उलगडून दाखवतं.

जन्मापासून स्पॉण्डीलोलिस्थेसिस - म्हणजे एक मणका साधारण निसटलेला असा दोष - असलेला हा अगास्सी पिजन टोड का चालतो, त्याचं हे उत्तर आहे. त्याच्याच शब्दात सांगायचं तर, "Throw in two herniated discs and a bone that won't stop growing in a futile effort to protect the damaged area, and those nerves start to feel downright claustrophobic." यामुळे येणारी जीवघेणी कळ सामना सुरू असतानाही येऊ शकते, नव्हे, ती येतेच. अशा वेळी खेळी फक्त बदलू शकतो. शेवटच्या मॅचआधी कॉर्टिझोन घेऊन त्याने या वेदनेला विसरायचा प्रयत्न केला. शेवटच्या सामन्याचा त्याने स्वतः वर्णिलेला आँखो देखा हाल पुस्तकाचं पहिलं प्रकरण आहे. मी तर तशीही टेनिस फॅन आहे, पण कुणाही वाचकाच्या मनाचा ठाव घेईल. हे पुस्तक नंतर हातातून काढून घेणं अशक्य. खरंच कसं असतं टेनिस लाइफ?

कट टू - आंद्रे वय वर्ष सात. तो मनातल्या मनात अनेक वेळा I hate Tennis म्हणत होता. त्याच्या टेनिसच्या तिरस्काराचा उल्लेख नाही असं प्रकरण नसेल आणि तरीही ही व्यक्ती जागतिक टेनिसपटू होती याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. असो. तर या सुरुवातीच्या काळात त्याचा टेनिसचा तिरस्कार त्याच्या बाबांनी बनवलेल्या ड्रॅगनवर - अर्थात चेंडू फेकायच्या मशीनवर फोकस्ड आहे. त्याच्या मते त्याच्या बाबांनी या ड्रॅगनला थोडी जास्त लांबुळकी मान आणि निमुळतं अ‍ॅल्युमिनियम डोकं असं डिझाईन करून थोडं भीतिदायक बनवलं आहे. त्याच्यापुढे आंद्रे एकदम छोटा, असाहाय दिसतो. चेंडू लवकर (अर्ली) आणि जोरात मारायला हवा म्हणून बाबा अनेकदा त्याच्यावर ओरडत होते. त्याने कितीही आणि कसाही चेंडू मारला तरी बाबांचा ओरडा थांबत नव्हता. त्याच्या बाबांच्या दहशतीचा नमुना मजेत सांगायचं तर तो म्हणतो, Step on one of my father's tennis balls and he'll howl as if you stepped on his eyeball. आंद्रेने या चेंडूंना तडाखेबंद मारून ड्रॅगनला हरवावं हे त्याच्या बाबांनी ठरवून दिलेलं एक टार्गेट होत. अर्थात वर्षाला १ मिलियन (१० लाख) चेंडू मारणं हेही. म्हणजे पाहा, जर त्याने दिवसाला २५०० म्हणजे आठवड्याला साधारण १७,५०० चेंडू मारले, तर वर्षाला १० लाख चेंडू मरणारा हा मुलगा अजिंक्य तर होणारच. त्याच्या टेनिसच्या तिरस्काराचं बीज बहुधा इथे पेरलं गेलं असावं आणि अर्थात यशही :) सारखे सारखे बॅकहँड मारून दुखावलेल्या हातांबद्दल बाबांकडे तक्रार करण्यात काही अर्थच नव्हता. मग त्यावर उपाय काय, तर त्यात सुख शोधणं. तो म्हणतो On one swing, I surprised myself by how hard I hit, how cleanly. Though I hate Tennis, I like the feeling of hitting a ball dead perfect. Its the only peace.

आंद्रेचे बाबा, ज्यांचं स्वतःचं बालपण तेहरानमध्ये गेलं होतं, लास वेगासच्या एका कॅसिनोमध्ये कॅप्टन होते. कामाच्या जागेपासून दूर त्यांनी हे घर घेऊन तिथे आपल्या मुलाला टेनिसचा सराव करता येईल अशी सोय केली होती. जसा ड्रॅगन तसंच एका ब्लोअरला आंद्रे पाच वर्षांचा असताना एका मेकॅनिककडे नेऊन त्याने चेंडू उचलता येतील अशी रचना करून घेतली होती. आता दिवसाला २५०० चेंडू मारायचे म्हणजे इतकी सोय तर हवीच ना? तर घर घेतानाच मागे टेनिस कोर्ट बनवता येईल अशी जागा असणारं घर बनवून घेऊन सामान आणायच्या आधीच ते कोर्ट बनवायच्या तयारीला लागले. यासाठी काम करणाऱ्या कामगारांना जेवण आणून द्यायला आंद्रेला फार आवडायचं. Suddenly my father had this backyard tennis court, which meant I had my prison. I'd helped feed the chain gang that build my cell. तो त्याची विनोदबुद्धी शाबूत ठेवून लिहितो. आपण इथे फक्त दिङमूढ होऊन त्याच्याबरोबर पुढच्या प्रवासाला लागतो.

अगदी लहान वयाचा असल्यापासून वेगासमध्ये आलेल्या दिग्ग्ज टेनिस खेळाडूंबरोबर आंद्रेला त्यांनी टेनिस खेळायला लावलं आहे. जिमी कॉनर्सच्या रॅकेट्स तो वेगासला आला की त्याचे बाबा स्ट्रिंग करत. त्याच्याही सुरुवातीच्या रॅकेट्स बाबांनीच स्ट्रिंग केल्यात. अर्थात "बाबांशिवाय कोण तो ताण बनवून टिकवणार म्हणा?"- इति आंद्रे. आपल्या या आत्मचरित्रात त्याने दिलखुलासपणे आपल्या बाबांच्या लहानपणापासून ते त्याच्या आई-बाबांची भेट, प्रेम, पळून जाऊन वेगासला स्थायिक होणं याचा प्रवास रंगवला आहे. मला सर्वात आवडलं ते या पुस्तकातील इंग्लिश भाषेवरचं प्रभुत्व. हे पुस्तक त्यातल्या भाषेच्या वेगामुळे, तसंच त्याच्या वर्णनांमुळे आपल्याला खिळवून ठेवतं.

दहा आणि आतील ज्युनियर लेव्हलच्या टेनिस स्पर्धा खेळल्यावर दहाच्या पुढे तो नॅशनल लेव्हलचे सामने खेळला. अशा वेळी त्याला जास्त टेन्शन होतं, कारण हे सामने अमेरिकेत कुठेही होतात आणि त्याचा खर्च त्याचं कुटुंब करत होतं. सामना हरला की त्यांची इन्व्हेस्टमेंट फुकट जाणार! तसं तर त्याच्या बाबांनी त्यांच्या सर्व भावंडांना टेनिससाठी प्रवृत्त केलेलं होतं, पण आपला धाकटा मुलगा आंद्रे हाच 'चोजन वन' आहे यावर त्यांचा विश्वास होता. त्याच्या भावाला 'फिली'ला ते बरंच हिणवायचे. तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर भांडत नसे किंवा त्यांनी चुकीचा गूण दिला तरी काही बोलत नसे. तो टेनिसशी संबंधित राहिला, पण आंद्रेप्रमाणे खेळला नाही; पण त्याची आणि आंद्रेची गट्टी होती. आंद्रे नॅशनल्स खेळू लागला, तेव्हा सामन्याच्या आधी बाबांनी जर एक छोटी पांढरी गोळी दिली, तर ती घेऊ नकोस म्हणून त्याने आधीच बजावलं. पण मग बाबांपासून सुटका कशी करायची? तर गोळी घेऊन वाईट खेळ, म्हणजे पुन्हा घ्यायला नको, ही युक्ती सुचून त्याने तीच अमलात आणायचा प्रसंग आपल्याला पालकांचं वेगळं रूप दाखवतात.

घराजवळच्या केम्ब्रिज नावाच्या क्लबमध्ये आणि या टूर्नामेंट्स खेळून फार मोठं होता येत नाही, हे जाणून आंद्रेला फ्लोरिडाला तीन महिन्यांसाठी निक बोलेटरीच्या अ‍ॅकॅडमीमध्ये पाठवायचं ठरलं. त्याला अर्थात इतक्या लांब जायचं नव्हतं. त्याचा जिवलग मित्र पेरी त्याला सोडायला आला. या पेरीबद्दल जवळजवळ एक प्रकरण या पुस्तकात आहे.

तर इथल्या प्रवासाचं सुरुवातीचं वर्णन म्हणजे People like to call it a Boot Camp, but it is really a glorified prison camp. Like most prisoners, we do nothing but sleep and work, and our main rock pile is drills. Serve drills, net drills, backhand drills, forehand drills, with occasional match play to establish the pecking order, strong to weak. इथे गॅब्रिएल नावाचा ट्रेनर त्याला प्रत्यक्ष निकसमोर आणतो. त्याचा खेळ पाहून त्याचे तीन महिने अर्थातच वाढतात आणि निक त्याच्या बाबांशी बोलून त्याच्या फुकट ट्रेनींगची सोय करतो. The warden has tacked several years to my sentence, and there is nothing to be done but pick up my hammer and return to the rock pile. त्याचा टेनिसबद्दलचा तिरस्कार शब्दाशब्दांतून डोकावतो.

बोलेटरीमध्ये शिकणारी मुलं टेनिसवर लक्ष देताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून जवळच्या शाळेत पाठवली जात. इथे आंद्रेची प्रगती यथातथाच होती. बोलेटरीमध्ये निदान टेनिस तरी शिकलं जायचं, पण इथे मात्र इंग्लिश सोडलं तर त्याची प्रगती शून्य होती. त्याने लिहिलेले छोटे परिच्छेद इंग्लिशच्या तासाला वाचून दाखवले जायचे. त्याचं आत्मचरित्र इतकं वाचनीय का आहे, त्याच्या भाषेचं रहस्य मला इथे उलगडलं. बाकी काही नाही तरी अतिशय सुलभ तरीही समृद्ध इंग्लिश वाचनासाठी हे पुस्तक नक्की संग्रही असावं. आणि लगेच पुस्तक आपल्या मुलांच्या हातात द्यायच्या आधी त्यात वाईट शब्द/प्रसंगाचा 'फ'काणाही भरला आहे, हेही लक्षात असू द्या.

शाळेबद्दल एकंदरीत रस वाटत नसल्यामुळे सुटकेचा एक प्रयत्न म्हणून एके दिवशी अचानक आंद्रेने त्याच्या केसाचा गुलाबी मोहॉक कट केला. त्यानंतरच्या खिसमसमध्ये जेव्हा तो घरी गेला, त्याच्या बाबांना अर्थातच त्याचे हे केस, कानात बाळी वगैरे अवतार आवडला नाही, पण त्याचा भाऊ फिलीने मात्र त्याचं कौतुक केलं. त्याच्याकडे फार कपडे नव्हते, म्हणून जुगारात जिंकलेले सहाशेपैकी तीनशे डॉलर्स खर्च करायलाही दिले..

पुन्हा एकदा बोलेटरीचा वनवास सुरू झाला आणि एका टूर्नामेंटला आंद्रेमधला बंडखोर जागा झाला. तिथे तो चक्क जीन्समध्ये खेळला आणि इथेच निकची सटकली. त्याने दिलेल्या जबरी शिक्षा आणि अपमान यातून सुटका म्हणून आंद्रेने पळून जायचा प्रयत्न केला, पण मध्येच रस्त्यात त्याच्यामागे त्या अकादमीमधला गॅब्रिएल आला आणि त्याचबरोबर बाबांचा फोन, त्यामुळे आंद्रेची इच्छा सहजी पूर्ण झाली नाही. निकच्या लेखी असलेलं आपलं महत्त्व त्यालाही कळलं, पण त्याने निकशी बोलणं टाळलं. त्यानंतर त्याने युक्तिचातुर्याने त्याचा मित्र पेरीला तिथे बोलवून घेतलं आणि योगायोगाने त्यांनी खेळात जिंकलेल्या पांडावर निकच्या मुलीचा जीव जडल्यामुळे त्याच्या बदल्यात आपली काही तहाची कलमं मांडून आंद्रेने निदान शाळा नावाच्या जाचातून आपली सुटका करून घेतली. तसंच थोड्या मोठ्या टूर्नामेंट्समध्ये सहभागी होण्याचीही सोय केली.

त्यांनतर तो 'ला किंता' खेळताना दुसऱ्या राउंडपर्यंत पोहोचला. तो जर प्रो असता, तर त्याला दोन हजार सहाशे डॉलर्स मिळाले असते, पण तो नवखा (अमॅच्युअर) असल्याने त्याला ते दिले गेले नाहीत. पण त्याला स्पर्धेला यायचा खर्च मिळू शकला. खरं तो त्याच्या भावाकडे लॉस एंजल्सला राहून त्याच्याच गाडीतून आलेला होता, पण मग भावाच्या मदतीने त्याने काही खर्चाचा हिशेब मांडला, जो योगायोगाने दोन हजार सहाशेच निघाला. पण मग त्याला दोन हजार मिळाले. त्याने त्यातले हजार भावाला सहजपणे दिले.

इथून पुढे निकचे आणि त्याचे संबंध थोडे सुधारले आणि वयाच्या १६व्या वर्षी त्याला प्रो व्हायची संधी मिळाली. आता मात्र त्याला कळत नव्हतं काय निर्णय घ्यायचा, कारण एकदा तुम्ही प्रोफेशनल स्टेटला आलात की मग मागे पाहायचं नाही. तेव्हा त्याने सल्ल्यासाठी बाबांना फोन केला.You've dropped out of school! You have an eighth-grade education. What are your choices? Be a doctor? त्यानंतर त्याच्या बाबांनी त्याचा भाऊ फिलीला त्याच्याबरोबर पाठवलं. त्याची बाकीची कामं सांभाळायला. तो प्रो झाल्याच्या दिवशी फिलीला नाइकीचा फोन आला. त्यांचं दोन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट मिळलं. फिली आणि आंद्रे दोघांना स्वर्ग दोन बोटे उरला!

आता फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचं (आणि नाइकीचे कपडे इ. वापरायचे). तो पहिली न्यूयॉर्कची एक टूर्नामेंट रमेश कृष्णनबरोबर हरला आणि त्यानंतर व्हरमाँटला जॉन मॅकेन्रोबरोबर हरला. पण तरीही त्याची टेनिसमधली क्रमवारी सुधारण्यास मदत झाली. १९८६मध्ये आपल्या पहिल्या यू.एस. ओपनमध्ये पहिल्याच राउंडला हरला. हा हरण्याचा सिलसिला जारी राहण्याच्या काळात एकदा त्याने वॉशिंग्टन डीसीच्या भागातल्या बेघर लोकांना आपल्या सर्व रॅकेट्स वाटून टाकल्या आणि कायमचं टेनिस सोडायचं पक्क केलं. नाइकीने दिलेले पैसेही काहीशेच उरले होते. योगायोगाने दुसऱ्या एका टूर्नामेंटमधल्या एका खेळाडूने आधीच माघार घेतल्याने त्याला बोलावलं गेलं आणि त्याला निदान दोन हजार डॉलर्स मिळतील हेही नक्की होतं. जाताजाता थोडे पैसे कमवून निघू, म्हणून त्याने पुन्हा खेळायला सुरुवात केली आणि आणखी एका टूर्नामेंटमध्ये पॅट कॅशला हरवलं, ज्याच्याकडून तो विम्बल्डनला हरला होता. त्यानंतरच्या वर्षी जेव्हा त्याला नव्वद हजाराचा चेक बक्षीस म्हणून मिळाला, तेव्हा बाबांच्या परवानगीने त्याने त्याची तेव्हाची ड्रीम कार कोर्व्हे घेतली. त्याच्या बाबांच्या वादग्रस्त स्वभावाची आणखी एक चुणूक दाखवणार्‍या या प्रसंगाने आंद्रेला अंतर्मुख केले. अर्थात तेव्हा तो अवघा सतरा वर्षांचा होता, त्यामुळे अजून घर सोडायची वेळ आलेली नव्हती, पण त्याला घोडामैदान जवळ दिसत होतं.

images-8

आता मात्र तो सतत खेळत राहिला. त्याचबरोबर त्याच्या फिटनेसकडे - मुख्यतः पायाच्या फिटनेसवरही लक्ष केंद्रित केलं. त्यासाठी त्याच्याबरोबर काम केलं ते पॅटने. हे दोघे वेगसच्या त्याच्या घराजवळची एक टेकडी चढून जायचे. आंद्रे दमून जाई. याच दरम्यान तो जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आला. अशा वेळी यूएस ओपनच्या क्वार्टरफायनलला जिमी कॉनर्सशी त्याचा सामना होता. सामन्याआधी तो त्याला आपली पूर्वीची वेगसची ओळख, त्याच्या बाबांनी रॅकेट्स विणल्या वगैरे संदर्भ द्यायला गेला, पण कॉनर्सने अजिबात ओळख दाखवली नाही. मग त्याने जिद्दीने कॉनर्सला हरवलं. त्यानंतरच्या लेंडलबरोबरच्या सामन्यात मात्र तो हरला.

अजूनही त्याचे पंक केस, जीन्स घालणं यामुळे मीडियामधली इमेज फार छान नव्हतीच. या आणि इतर नकारात्मक प्रसंगातून स्वतःला शोधण्याचा त्याचाही प्रयत्न सुरू होता. त्या वेळी त्याच्या मित्राच्या सल्ल्याने जे.पी. नावाच्या एका पास्टरशी त्याने मैत्री केली. त्याला तो डेव्हिस कप पाहायला घेऊन गेला. इथे त्याची कामगिरी मनासारखी होत नव्हती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याला आपल्या या अपयशाचं एक कारण मिळालं. निकने स्वार्थासाठी एका दुसऱ्या रॅकेट कपंनीशी करार करून त्याला वेगळी रॅकेट खेळायला दिली होती. तू आरामात खेळू शकशील हा विश्वास दाखवून. पण पुन्हा जुनी रॅकेट ट्राय करताना आंद्रेला आपली ती चूक कळून आली.

त्यानंतर त्याने फ्रेंच ओपनसाठी पुन्हा प्रयत्न केला, पण मायकल चँग ती जिंकला. खरं तर चँगला आंद्रेने याआधी इतर टूर्नामेंट्समध्ये हरवलं होतं, पण आपल्याला एकही स्लॅम मिळण्याआधी चँगला ते मिळतं याचा त्याला आणखी वैताग आला होता. मग पुन्हा एकदा तो विम्बल्डन खेळायला गेला नाही. अशा प्रकारे पत्रकारांच्या आणखी टीकेचा धनी झाला.

जिल या त्याच्या ट्रेनर + मित्र + पितासमान व्यक्ती याबद्दल लिहिलं नसतं, तर आंद्रे आपल्याला कळला नसता. जिलबरोबरचं त्याचं बोलणं वाचलं तर त्या काळात आंद्रे किती एकटा होता आणि त्याचबरोबर त्याचा स्वतःचा शोध कसा सुरू होता, याची कल्पना येते. जिलने त्याला कुणा इतरांसारखं नाही, तर तो त्या खेळात जे करू इच्छितो त्यासाठी त्याचं शरीर तयार केलं. जिल वॉटर नावाने जी वेगवेगळ्या रंगांची पेयं तो आंद्रेसाठी बनवत असे, त्याचा फॉर्मुला खुद्द आंद्रेलाही माहीत नसेल. जिलसारखा सखा प्रत्येक खेळाडूला मिळाला तर खरंच त्यांचा एकदंरीत फिटनेस राखून खेळाचा स्टॅमिना वाढायला मदत होईल. तुम्ही टेनिस पाहणारे असाल तर आंद्रेच्या स्टँडमध्ये या सहा फुटी आंद्रेच्याच भाषेत भल्या मोठ्या माणसाला नक्की पाहिलं असेल आणि त्याचा आंद्रेच्या आयुष्यात/करियरमध्ये काय सहभाग होता, हे पुस्तक वाचून कळेल. त्याच्या एका एकत्र ट्रिपनंतर आंद्रे म्हणतो Outside, we stand in the parking lot and look at the stars. I feel such overwhelming love, and gratitude, for Gil. I thank him for all he's done, and he tells me I never need to thank him again.

ग्रँड स्लॅमच्या यशाने जवळजवळ दोन वर्षं हुलकावणी दिल्यानंतर ९२चा विम्बल्डन जिंकला, त्या सामन्याचं अगास्सीच्या भाषेतलं आणि खरं तर इतरही त्याच्या यशापयशाची त्याच्या शब्दात वर्णनं वाचणं ही वाचकांसाठी आणि मुख्यतः टेनिस कळणाऱ्या वाचकांसाठी मोठी पर्वणी आहे. अर्थात जसं यश येतं तसंच पुढच्या वर्षात इतरही काही गोष्टी होतात. त्यावेळी तो त्याच्या वेन्डी नावाच्या मैत्रिणीबरोबर असतो ती त्याला सोडून जाते. त्याच्या पुढच्या विम्बल्डनला तो पीट सॅम्प्रास कडून हरतो आणि मग परत वेगासला आल्यावर निक त्याची बोलेटरी ऍकॅडमी बंद करून बसला होता, तो आंद्रेला आपण सोडल्याचं जाहीर करतो. जिलच्या शब्दात Well I say , I guess it's Break-Up-With_Andre time. First Wendy, now Nick. त्याच वेळी त्याला टेण्डनायटिससुद्धा झाला होता.

या शस्त्रक्रियेमधून बरं होण्याच्या काळात त्याच्या आयुष्यात ब्रूक शील्ड आली - किंवा तिला आणलं गेलं. त्यांची सुरुवातीची कोर्टशिप फॅक्सने सुरू झाली, कारण त्या वेळी आंद्रे वेगसमध्ये आणि ती द. आफ्रिकेत एका तंबूत राहून शूटिंग करत होती. त्यानंतर ती परत आल्यावर एकमेकांना भेटणं, डेटिंग आणि एकंदरीत ब्रूकबरोबरचा त्याचा इतिहास बराच माहीत आहे.

याच दरम्यान त्याने आपल्या टीममध्ये काही बदल केले आणि त्याने जुना मित्र 'पेरी'ला मॅनेजर म्हणून नेमले. पेरीच्या सल्ल्याने मग ब्रॅड गिलबर्ट त्याचा ट्रेनर म्हणून नेमला गेला. ब्रॅड सुरुवातीला त्याच्या बॅकहॅन्डवर - विशेषतः ज्याला backhand up the line म्हणतात त्यावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. आंद्रेला पहिल्याच भेटीत त्याने सांगितलं होतं की "तुझा मुख्य प्रश्न तुझं स्वतःला परफेक्ट करण्यात आहे, ते सोड" आणि त्यालाही ब्रॅडबरोबर काम करताना ते पटलं. आंद्रे म्हणतो, I've always assumed perfectionism was like my thinning hair or my thickened spinal cord. An inborn part of me. त्यानंतर आंद्रेच्या शब्दात सांगायचं तर THEN THE TEAM goes on an epic losing streak. Adopting Brad's concepts is like learning to write with my left hand. He calls his philosophy Bradtennis. I call it Bratitude.

त्याच्या जवळजवळ प्रत्येक पराजयानंतर ब्रॅड त्याला म्हणायचा - "तुला एक निसटता विजय मिळेल आणि तिथून पुढे तू सतत जिंकत जाशील." अर्थात त्यासाठी जवळजवळ १९९४ची कॅनेडियन ओपन उजाडली. त्यानंतर होणाऱ्या यूएस ओपनला तो अनसीडेड गेला. फायनलला त्याचा मुकाबला मार्टिनविरुद्ध होता, ज्याने त्याला आधीच्या विम्बल्डनमध्ये हरवलं होतं. १९६६नंतर तो पहिलाच अनसीडेड विजेता होता. योगायोगाने ६६चा विजेता फ्रँक शील्ड्स हा त्याच्या तेव्हाच्या गर्लफ्रेंड ब्रूक शिल्ड्सचा आजोबा होता.

त्याचं एकदंरीत वागणं आणि त्याला सामना आयोजकांकडून मिळणारी वागणूक याबद्दल बोरिस बेकरने रान उठवलं होतं. त्यामुळे त्याची बेकरला हरवण्याची चुरस होती, जी त्याने ९५च्या उन्हाळ्यात यूएस ओपनच्या सेमीफायनलला पूर्ण केली. मला हे पुस्तक वाचेपर्यंत बेकरचा खेळ आणि एकंदरीत त्याच्याबद्दल जे काही चांगलं वाटत होतं, ते मत हे पुस्तक वाचून बदललं. या सामन्यात दोघेही आपली चुरस दाखवणार होते हे निश्चित. आंद्रे म्हणतो He tries to play my mind. He's seen me lose my cool before, so he does what he thinks will make me loose my cool again, the most emasculating thing one tennis player can do to another: He blows kisses at my box. At Brooke. मला वाटतं पुढचं काही लिहायची गरजच नाही. बेकरला तो हरवतो पण या सामन्यानंतरची फायनल तो त्याचं शरीर साथ देत नसल्याने पीट विरोधात हरतो.

त्याच्या प्रवासात साथ देणारी त्याची मैत्रीण ब्रूक शील्डशी त्याचं लग्न झालं, पण याच दरम्यान त्यांच्यात दुरावा येऊन दोन वर्षांत ते विभक्त झाले. त्याच वेळी स्टेफीने त्याच्या आयुष्यात येणं जास्त योग्य ठरेल, असं ब्रॅडचं म्हणणं ठरलं. खरं तर आंद्रेच्या टेनिसच्या सुरुवातीच्या काळातलं अगदी वेन्डी त्याच्या आयुष्यात असतानाही असणारं क्रश म्हणजे स्टेफी. त्याच्या पहिल्या विम्ब्लडन विजयाच्या वेळी स्टेफीही विजयी झाली होती आणि त्या वेळी तिच्याबरोबर त्या सेलिब्रेशन बॉलला नाचायला मिळेल म्हणून तो फार उत्सुकही होता. नेमका त्या वर्षी तो नाच रद्द केला होता. आता त्याने पुन्हा आपल्या जुन्या आवडीकडे जरा सिरियसली लक्ष दिलं.

त्याच वेळी त्याने पुढची फ्रेंच ओपन जिंकून ग्रँड स्लॅम जिंकायचा मनाचा तुरा आपल्या मुकुटात खोचला. स्टेफीच्या येण्याबरोबर पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत त्याने पहिल्या क्रमांकावर मुसंडी मारली. स्टेफीही रिटायर होऊन त्यांच्याबरोबरचे आपले संबंध जाहीर झाले तरी चालतील या मताला आली आणि पुन्हा एकदा आंद्रे आणि टेनिस सुरू राहिलं.

या ठिकाणी असं वाटणं साहजिक आहे की आता त्याला टेनिस आवडायला लागलं आहे. पण तोवर त्याने गरजू मुलांसाठी शाळा सुरू करणं हे त्याचा भाऊ आणि तो याचं जुनं स्वप्न सत्यात आणलं होतं आणि आंद्रेने ते वयाच्या चोविसाव्या वर्षीच सुरु केलं. त्यामुळे त्याची कमाई आता जास्त महत्त्वाची ठरत होती. त्याचं टेनिसमध्ये असणं, त्यामुळे होणार्‍या मोठ्या लोकांशी ओळखी याचा फायदा देणग्या मिळवण्यासाठी होत होता. तो खेळत राहायचं हे एक महत्त्वाचं कारण ठरलं. त्याच्या अर्ध्या वयाची मुलं म्हणजे अँडी रॉडिक आणि फेडरर येईपर्यंतही तो खेळत होता. त्याने एका एटीपीमध्ये फेडररला हरवलंही आहे. त्यांनतर मात्र फेडरर नेहमीच अव्वल ठरला आणि त्याने फेडररबद्दल अतिशय चांगले मुद्दे नमूद केले आहेत. ते सर्व मुळातूनच वाचलं पाहिजे.

दरम्यान २००२मध्ये त्याने आणि ब्रॅडने एकमेकांना अलविदा म्हणून डॅरेनचं कोचिंग घेतलं. डॅरेनने त्याच्या रॅकेटचा स्ट्रिंग बदलली. त्यामुळे कधी न जिंकलेली इटालियन ओपन आपण जिंकू शकलो, असं त्याला वाटतं. तरीही पुढचे काही सामने तो वाईट हरला. मग डॅरेनने पुन्हा काही बदल केलेली स्ट्रिंग त्याच्यासाठी निवडली. २००३च्या ऑस्ट्रेलियन ओपनला त्याचं सीडींग दुसरं होतं. तिथे त्याने वयाच्या ३२व्या वर्षी त्याचं शेवटचं स्लॅम जिंकलं, हे खरं तर तेव्हाच्या काळी आश्चर्यच.

त्यांनतर जेव्हा त्याने आपलं शेवटचं विम्बल्डन आणि यूएस ओपन असण्याची म्हणजेच निवृत्ती जाहीर केली, त्या वेळी नदालबरोबर तो विम्बल्डन हरला, त्या वेळी शिस्तप्रिय स्पर्धाआयोजकांनी त्यांची रीत बदलून मैदानावर त्याची मुलाखत घेतली. त्यांनतर तो यूएस ओपनसाठी गेला आणि बगदातिसला हरवल्यावर त्याची खरं तर उभं राहायचीही ताकद नव्हती. तो ज्यातून जात होता, ते पाहून पहिल्यांदी त्याच्या बाबांनीदेखील त्याने आताच बाहेर व्हावं म्हणून सांगून पाहिलं, पण अशा प्रकारे जाण्यापेक्षा त्यापुढचा सामना लढून तो निवृत्त झाला.

पुस्तक इथे सुरू होतं. त्याची तयारी, त्याच्या भावना यात आपण गुंतत जातो आणि त्यामुळे त्याचं थोडं उद्दाम वागणं, ड्रग्जचा आधार घेणं हे सारं काही आपण त्याला माफ करतो. आपल्याला दिसलेला आंद्रे आणि प्रत्यक्षातला आंद्रे यातला फरक आपल्याला त्याच्या जवळ आणतो. तो सारखा स्वतःला शोधत होता आणि कुठलाही सामान्य माणूस करेल त्याच चुका त्यानेही केल्या. त्याच्या आयुष्यात आलेली तीन महत्त्वाची माणसं म्हणजे त्याचे बाबा, जिल आणि स्टेफी यांच्याबरोबर तो घडत गेला. पण त्याबरोबर तो माणुसकी विसरला नाही. त्यामुळे त्याच्या फाउंडेशनला लागणाऱ्या पैशासाठी फक्त दानशूर लोकांवर अवलंबून न राहता तो खेळत राहिला. आपला खेळ मुलांनी पुढे नाही नेला तर बरं, विचाराने त्या दोघांनी आपल्या घराला टेनिस कोर्ट नसावं याची काळजी घेतली आहे. त्याने आणि स्टेफीने तळागाळातील मुलांना शिक्षण द्यायचं कार्य सुरू केलं आहे, हेही कदाचित मला त्याचे बाकी इतर गुन्हे माफ करायला वाटायचं कारण असू शकेल. पण व्यक्तिगत लिहिताना त्याच्याबरोबर त्याच्या अगदी एटीपीचे आपण न पाहिलेलं सामनेही आपण त्याच्याबरोबर जगत जातो. त्याच्या फिटनेस रुटीनची वर्णनं वाचून त्याची मेहनत आपण समजून घेतो. एखाद्याने आत्मचरित्र लिहिताना किती 'ओपन' लिहावं याचं हे उत्तम उदाहरण.

हे पुस्तक संपवताना, त्याने त्याच्या मुलांसाठी लिहिलेलं वाक्य वाचताना मला वाटतं त्याचा पुस्तक लिहायचा आणखी एक हेतू आपल्याला कळेल. तो म्हणतो - I was late in discovering the magic of books. Of all my many mistakes that I want my children to avoid, I put that one near the top of the list.

पुस्तकाचे नाव:Open
लेखक: Andre Agassi
प्रकाशक: Knopf (first published November 9th 2009)
ISBN 0307268195 (ISBN13: 9780307268198)

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 2:50 pm | यशोधरा

सुरेख लिहिलंय. लहान असतानाच्या आंद्रेची तडफड, मोठेपणीचा मानसिक संघर्ष लिखाणातून पोचतोय. आवडलं रसग्रहण.

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 12:02 am | मीअपर्णा

यशोधरा, पहिल्या प्रतिसादाबद्द्ल आणि मागे आपला विषय झाला होता तेव्हा पुस्तकाबद्द्ल लिहावं हे सुचवल्याबद्द्ल अनेक आभार. :)
या निमित्ताने साताठ वर्षानंतर पुन्हा एकदा पुस्तक बर्यापैकी चाळलं. नक्की वाच.

दीपावलीच्या शुभेच्छा.

यशोधरा's picture

7 Nov 2019 - 9:23 am | यशोधरा

अपर्णा, _/\_

पुस्तकाचा सारांश आवडला, पण शब्दांकन मात्र अनुवादित केल्यासारखे वाटले!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 12:06 am | मीअपर्णा

धन्यवाद गड्डा झब्बू. मी केवळ याच कारणासाठी गेले कित्येक वर्षे या पुस्तकावर लिहायचं टाळ्त होते. अजूनही कसं काय ते अनुवादित न वाटू देता लिहिता येईल हे लक्षात येत नाही. मला वाटतं निव्वळ पुस्तक इंग्रजी आहे असं नाही तर टेनिसबद्द्ल एकंदरित इंग्रजीतच ऐकलं आणि वाचलं असल्यामुळे असेल मराठीत विचार न करता केलेलं लेखन आहे. संभाळून घ्या.
अवांतर - जर खरंच चांगला अनुवाद होत असेल तर मला निदान या पुस्तकाचा अनुवाद करायला नक्की आवडेल :)

आपल्यालाही शुभेछा.

तुमचा लेख मला मनापासून आवडला आहे. माझ्या प्रतिसादाचा हेतू तुम्हाला नाउमेद करण्याचा नव्हता. चांगला लेख सदोष शब्दांकनाने कसा खटकू शकतो हे सांगायचे होते, अनेक गोष्टींपैकी एक उदा. controversial nature हे इंग्रजीत वाचताना ठीक वाटते पण त्याचा शब्द्शः मराठीत अनुवाद "वादग्रस्त स्वभाव" असे वाचताना खटकते.
तुम्हाला मनापासून आवडलेल्या या पुस्तकाचे भाषांतर मराठीत जरूर करा, नक्कीच यशस्वी होईल. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा!

मीअपर्णा's picture

31 Oct 2019 - 3:07 am | मीअपर्णा

मला ते लक्षात आल.
तुम्ही नेमकं चुकीचं उदा. दिलंत.ते “वादग्रस्त” मात्र त्यानी खराच वाद घातला होता (ते पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळेल )त्याबद्दल होतं. मी नंतर ब्लाॅगवर टाकताना काही बदल करीन.
पुन्हा आवर्जून लिहिल्याबद्दल आभार. :)

टर्मीनेटर's picture

28 Oct 2019 - 11:47 am | टर्मीनेटर

पुस्तक परिचय आवडला!
मला टेनिस बघण्यात रुची निर्माण झाली होती तीच मुळात स्टेफी ग्राफ मुळे. तीने आंद्रे आगासीशी लग्न केल्याचा खूप रागही आला होता तेव्हा 😀.

असो तुमच्या लेखात आलेल्या त्याच्या आयुष्यातील चढ-उतरां बद्दल वाचल्यावर एवढ्या वर्षांनी का होईना त्या रागाची धार थोडी बोथट झाली 👍

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 12:07 am | मीअपर्णा

हा हा हा टर्मिनेटर. मस्त प्रतिसाद. अगदी दिलसे. पण या लेखाने तुमच्या रागाची धार बोथट तरी झाली. आता पुस्तकही वेळ मिळाल्यास वाचून घ्या.

गामा पैलवान's picture

28 Oct 2019 - 2:04 pm | गामा पैलवान

मीअपर्णा,

लेखाबद्दल धन्यवाद. आंद्रे आगासीची व त्याच्या पुस्तकाची करवून दिलेली ओळख आवडली. :-)

आंद्रे आगासी जेव्हा १९९९ साली फ्रेंच ओपन जिंकला तेव्हा तो हा चार वेगवेगळ्या पृष्ठभागांवर चार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेला पहिला खेळाडू ठरला. पुढे फेडरर (२००९) व नादाल (२०१०) यांनीही असाच पराक्रम केला. चौपृष्ठी विजेता बनणं अतिशय कठीण काम आहे.

आ.न.,
-गा.पै.

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 12:08 am | मीअपर्णा

तुमचं चौपृष्ठी विजेता बद्दलचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तो उल्लेख राहिला.

प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

सोत्रि's picture

28 Oct 2019 - 4:24 pm | सोत्रि

रग्रहण वाचताना, पुस्तकच वाचतोय अस फिलीन्ग येत होत इतक ते प्रवाही झाल आहे, आणि पुस्तक विकत घ्यायच्या निर्णयाप्रत घेऊन जाते.

- (आन्द्रे अगास्सीचा फुल स्पीड पन्खा) सोकाजी

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 12:11 am | मीअपर्णा

आभार सोत्रि. तुम्ही अगदी दिलखुश प्रतिसाद दिला आहे. मला हा लेख लिहिताना खरा उद्देश कुणीतरी प्रत्यक्ष पुस्तक वाचायचा विचार करेल तर किती बरं होईल, हा होता. (कारण मला ते खरंच तितकं सगळं एका लेखात उतरवणं अशक्यच आहे).
तुम्ही फुल स्पीड पंखा असेल तर अगदी जरुर वाचा.

काय सुरेख परिक्षण ल्हीलंय हो.
अगदी थेट समोर बसून बोलल्यासारखं वाटलं

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 12:12 am | मीअपर्णा

खूप खूप आभार विजुभाऊ. हे लिहिल्यावर घरी मुलांना वाचून दाखवलं होतं त्याची आठवण झाली. मी फक्त पुस्तक जसं आंद्रेने लिहिलंय तशाच वेगाने लेखाची गती ठेवायचा प्रयत्न केला.

तुषार काळभोर's picture

28 Oct 2019 - 7:49 pm | तुषार काळभोर

आंद्रे आगासी पेक्षा पीट संप्रास जास्त आवडायचा. खेळातलं काही कळत नव्हतं, पण पेपरात येणाऱ्या फोटोत पीट सम्प्रास जास्त देखणा असायचा.
शाळकरी वयात स्टेफी ग्राफ वर लै जीव होता. वह्यांवर तिचा नाहीतर प्रिन्सेस डाईनाचा फोटो असल्यावर असा आनंद व्हायचा.
पाचवी का सहावीला बोरिस बेकर वर एक इंग्रजी धडा होता, त्याची पण आठवण झाली.

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 12:15 am | मीअपर्णा

अच्छा तुम्हाला पीट जास्त आवडला का? मला तो जीभ बाहेर काढत बसतो म्हणून फार आवडला नव्हता. एनीवे ते वय वेगळं होतं. पीट्ने आंद्रेला बरेचदा हरवलं आहे. "ईट हॅज टु बी पीट" हे वाक्य तुम्हाला पुस्तकात बरेचदा आढळेल. बोरिस बेकरचा धडा आम्हाला नव्हता वाटतं. कसा असेल तो तेव्हा खेळत होता :)

प्रतिक्रियेबद्द्ल आभार.

वाघमारेरोहिनी's picture

6 Nov 2019 - 7:49 pm | वाघमारेरोहिनी

६ वी इंग्लिश पुस्तकात होता. बोरिस बेकर हरतो तरीही तो किती शांत असतो असे त्याचे घरमालक वर्णन करीत असतात.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Oct 2019 - 12:06 am | मिसळलेला काव्यप्रेमी

माझं देखिल असचं झालयः I was late in discovering the magic of books.
पण तुमच्या या सुरेख लिखाणाने, पुस्तकाबद्दलची उत्सुकता वाढलिये.

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 12:17 am | मीअपर्णा

मिसळलेला काव्यप्रेमी, मी नेहमीच आधी पुस्तकं वाचलीत. मुलांनाही सुरुवातीला आधी पुस्तक मग चित्रपट व्गैरे असं केलं आहे. बेटर लेट दॅन नेव्हर.
पुस्तक नक्की वाचा.
अवांतर - आंद्रेची कमेंट तो शिकला नाही म्हणून आली असावी असं मला वाटतं :)

आभार.

मित्रहो's picture

29 Oct 2019 - 11:06 am | मित्रहो

खूप सुंदर रसग्रहण. आंद्रे आगासी सुरवातीला उगाचच वाया गेलेला मुलगा वाटायचा. त्याचा खेळ कधी आवडायचा कधी नाही. खर म्हणजे त्या वयात मला स्टेफी, सॅबतिनी यांच्या मॅचेसमधेच जास्त रस होता. पुरुषांमधे बहुतेका वेळा पीट सॅम्प्रसच जिंकायचा. तो फक्त जीभ काढायचा त्यामुळे त्याची मॅच फारसी आवडायची नाही. आंद्रेची वेगळ्या प्रकारे ओळख या पुस्तकातून आणि या रसग्रहणातून झाली आहे. याची अजिबात कल्पना नव्हती. विल्यम्स बहिणींचे वडील सुद्धा असेच मागे लागायचे असेही कुठेतरी वाचले होते.

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 9:15 pm | मीअपर्णा

मित्रहो, मलाही त्याची वेगळी ओळख झाली असंच वाटलं.
विल्यम्स भगिनींना वडिलांनी शिकवलं पण सरिनाने अगदी आंद्रेच्या वडिलांसारखं त्यांनी छळलं असं म्हटलं नाही. मी तिच्याबद्द्ल लिहिलं आहे. जमल्यास वाचा.
http://majhiyamana.blogspot.com/search/label/Serena%20Williams

मुलींमध्ये मी वाचलेल्या पुस्तकांमध्ये मला मरिया शेरापोव्हाचं आत्मचरित्र, जे तिच्याच आवाजात ध्व्निमुद्रितही आहे ते जास्त आवडलं. तिचं एक वेगळं आयुष्य कळलं. असो.
आभार :)

सुधीर कांदळकर's picture

29 Oct 2019 - 11:54 am | सुधीर कांदळकर

खेळन्याची सक्ती केली जाऊ शकते हे वाचूनच नवल वाटते. अंशुमान गायकवाडला पाय बांधून तेज गोलंदाजीचा सामना करण्याची सक्ती केली गेली होती ते आठवले. पण खेळायची सक्ती नव्हती. तो आपणहूनच खेळे. ग्रेग चॅपेलवर मोठा भाऊ इयान दादागिरी करून ताकदीवर पिदवायचा पण.

फ्रेन्च ओपन जिंकणारा, झिपर्‍या अगासी मला कधी आवडला नाही. कारण त्याच्याकडे जादुई सर्व्हिस नव्हती. अचूकतेवर भर देणे आणि अनपेक्षित केलेले दोन हातांनी खेळलेले बॅकहॅन्ड रिटर्न्स आणि पासिंग शॉट्स हीच त्याची बलस्थाने होती. साम्प्रासला तो कधी विंबल्डनमध्ये हरवू शकेलसे वाटले नव्हते. पण अमली पदार्थाच्या प्रकरणातून बाहेर आल्यावर त्याच्या सर्व्हिसचा वेग बर्‍यापैकी वाढला होता. साम्प्रासला त्याने हरवले तेव्हा त्याच्या फक्त ४ एसेस म्हणजे बिनतोड सर्व्हिसेस होत्या तर अगासीच्या २०-२२. माझ्या मते केवळ गुढग्याच्या दुखापतीमुळे त्या मॅचमध्ये साम्प्रास हरला.

काही असले तरी अगासीची गणना प्रतिभावंतात कोणी करीत नाहीच. मॅकेन्रो, बेकर, एडबर्गना जे वलय लाभले ते त्याला त्यामुळेच. लाभले नाही.

पण काही असले तरी पुस्तकाचे सुरेख रसग्रहण. आवडले. धन्यवाद.

गामा पैलवान's picture

29 Oct 2019 - 6:31 pm | गामा पैलवान

सुधीर कांदळकर,

काही असले तरी अगासीची गणना प्रतिभावंतात कोणी करीत नाहीच, हे तुमचं विधान बरोबर आहे. पण त्याला तशी गरजही नव्हती. कारण की तो एक उत्कृष्ट परावर्तक होता. सेवा अचूक वाचणे व परतवणे यात अतिशय पारंगत होता. He was the most accurate service reader and the best returner. नेमक्या याच जुळवून घ्यायच्या प्रवृत्तीमुळे व्यवच्छेदक प्रतिभा नसतांनाही तो चौपृष्ठी विजेता होऊ शकला.

नादाल थोडाफार अगासीसारखा चौपृष्ठी विजेता असून साधारण तसाच आगम ( = approach ) राखून आहे. नादालही काही विशेष प्रतिभावान नाही. परंतु फेडरर मात्र प्रतिभावान असूनही चौपृष्ठी विजेता आहे. फेडररचा पराक्रम अतिशय म्हणजे कल्पनातीत रीत्या खडतर प्रकार आहे.

आ.न.,
-गा.पै.

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 9:27 pm | मीअपर्णा

गामा पैलवान, अतिशय सुंदर मुद्दा मांडलात. पुस्तकातही जेव्हा त्याने त्याच्या काही मॅचेसबद्द्ल लिहिलं आहे त्यात हा समोरच्याची सर्व्हिस वाचण्याचा मुद्दा आहेच. तसेच समोरचाही प्रतिस्पर्धी कुठच्या बाजुला झुकतो आहे हे सर्व्हिस करणारा पाहात असतो. म्हणून फेडरर रॅकेट घुमवत राहात असतो असा आमचा एक अंदाज आहे.
>>फेडररचा पराक्रम अतिशय म्हणजे कल्पनातीत रीत्या खडतर प्रकार आहे. याला अनुमोदन :)

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 9:21 pm | मीअपर्णा

सुधीरजी, मुद्दे योग्यच आहेत. मला वाटतं बरेचदा खेळण्याची सक्ती केली जाते. अमेरिकेतही असे पालक आहेत जे इकडच्या पैसे कमऊ म्हणजे बास्केटबॉल, अमेरिकन फुटबॉल सारख्या गेममध्ये मुलाने थोडा रस दाखवला की फार जोर मारतात आणि मग अशा मुलांची स्वतःचीच इच्छा मरुन जाते. भारतातही आपल्या मुलाने सचिन किंवा सानिया व्हावं म्हणून कोचिंगला घालणारे पालकही असतात. यावर काही पालकांच्या मते तुम्ही फार थांबलात तर मुलांना कळेपर्यंत त्यांचा तो डेव्हलपमेंट पिरियड निघून जातो आणि स्पर्धा तर खूप आहे हा एक दुसरा विचारही ऐकुन आहे. या विषयावर एक अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी पाहिली होती आता नाव आठवत नाही.
असो. अग्गासीला हे पुस्तक वाचल्यानंतर तो आमच्या शहरात लिजेंड सिरिज खेळायला आला होता तेव्हा पाहिला आहे. अर्थात तिथे जान की बाजी लावून नाही पण छान खेळला. आता एकदा फेडररला खेळताना पाहिलं की मग नवे चेहरे (टेनिसमधले) फॉलो करायला मोकळे होऊ :)

धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

31 Oct 2019 - 3:53 pm | सुधीर कांदळकर


परंतु फेडरर मात्र प्रतिभावान असूनही चौपृष्ठी विजेता आहे. फेडररचा पराक्रम अतिशय म्हणजे कल्पनातीत रीत्या खडतर प्रकार आहे.

हे वाक्य फारच आवडले. फेडररचे आणखी दोन म्हणजे शिस्तबद्ध वागणे आणि नीटनेटकी राहणी. नेहमी स्व्च्छ गुळगुळीत दाढी आणि घट्ट मापाचे इस्त्री केलेले स्वच्छ कपडे. शिवीगाळ, लाईन्समन निर्णयाविरुद्ध खोटी अपिले, पंचांशी हुज्जत घालणे नाहींच.

गामा पैलवान's picture

1 Nov 2019 - 1:29 am | गामा पैलवान

प्रशंसेबद्दल सुधीर कांदळकर व मीअपर्णा यांचे आभार! :-)
-गा.पै.

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 8:23 pm | गुल्लू दादा

खूप छान लिहिलंय...नक्की वाचणार..धन्यवाद

मीअपर्णा's picture

16 Nov 2019 - 8:22 am | मीअपर्णा

आणि कळवा आपल्याला कसं वाटलं ते. आभार गुल्लू दादा.

पण तुम्ही लिहिलेलं रसग्रहण आवडले

मीअपर्णा's picture

16 Nov 2019 - 8:23 am | मीअपर्णा

प्रतिसादाबद्दल आभार श्वेता२४

वाघमारेरोहिनी's picture

6 Nov 2019 - 7:52 pm | वाघमारेरोहिनी

ह्या पुस्तकाविषयी ऐकले होते. कधीच वाचायचं आहे. आता हे पुस्तक परीक्षण वाचून खूप इच्छा होत आहे.

मीअपर्णा's picture

16 Nov 2019 - 8:24 am | मीअपर्णा

आशा आहे तुम्हाला आवडेल. प्रतिक्रियेबद्दल आभार, वाघमारेरोहिनी.

सुमो's picture

7 Nov 2019 - 7:13 am | सुमो

करून दिली आहे टेनिस विश्वातील एका कलंदर व्यक्तिमत्वाची.
ePub आवृत्ती मिळवली आहे. घेईन वाचायला.

मीअपर्णा's picture

16 Nov 2019 - 8:25 am | मीअपर्णा

धन्यवाद सुमो. नक्की वाचा आणि आपला अनुभव कळवा.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 4:26 pm | मुक्त विहारि

मराठीत अनुवाद केला असेल तर वाचायला आवडेल.

मीअपर्णा's picture

14 Dec 2019 - 10:48 pm | मीअपर्णा

आभारी मुक्तविहारी

मराठी अनुवाद असेल असे वाटत नाही.

चौथा कोनाडा's picture

19 Nov 2019 - 5:23 pm | चौथा कोनाडा

वॉव ! खुप सुंदर लेख, सुरुवात केली वाचायला अन शेवटापर्यंत आलो. आन्द्रेची अतिशय ओघवती ओळ्ख !
निराशा होउन सर्व रॅकेटस वाटतो ही गोष्ट विचारात पाडते. त्याचे पुस्तकाबद्दलचे उदगार तर खासच !

मीअपर्णा _/\_

मीअपर्णा's picture

14 Dec 2019 - 10:49 pm | मीअपर्णा

प्रतिक्रियेबद्दल आभार, चौथा कोनाडा.

पुस्तकही तुम्हाला आवडेल.

ऋतु हिरवा's picture

27 Mar 2020 - 5:58 pm | ऋतु हिरवा

चांगले परीक्षण. याचा कुणी मराठी अनुवाद केला आहे का?

तुषार काळभोर's picture

28 Mar 2020 - 6:36 am | तुषार काळभोर

परीक्षण मराठीतच आहे की!

मीअपर्णा's picture

28 Mar 2020 - 8:40 am | मीअपर्णा

पैलवान यु मेड माय डे आणि सध्याच्या कोविद१९ च्या परिस्थितीत तर नक्कीच :)

बरं ऋहि, तुम्ही वरचा मराठीतलं परीक्षण वाचलंय असं धरून सांगते आणि वरच्या एका प्रतिक्रियेत आलंय की पुस्तकाचा मराठी अनुवाद नसावा. ह्या महिन्यात एखादं पुस्तक स्वत:हून अनुवाद करावं असा विचार करत होते सिरियसली. छापणार नाही कुणी पण एक अनुभव म्हणून स्वत:साठी :) आभार :)

नमकिन's picture

28 Mar 2020 - 6:08 pm | नमकिन

जसं आपले कधी कविता ऐकणार कोण याचा विचार न करता मनीं चे गूज शब्दात व्यक्त करतात, लिहिताना लेखकाने हा विचार मनात आणला तर मग कशी नितळ भावना बहरणार.
तुमच्या अनुवाद प्रयत्नांना यश हमखास येवो हीच शुभेच्छा व प्रार्थना.