शिंडलर्स लिस्ट

प्रमोद मदाल's picture
प्रमोद मदाल in जनातलं, मनातलं
11 Sep 2019 - 2:46 pm

संध्याकाळच्या वेळी एका उच्चभ्रू वस्तीतून कर्फ्यू मोडून फिरणारी लांबलचक, चकचकीत अॅडलर लिमोझिन गाडी सरकारी अधिकाऱ्यांना ओळखीची झाली होती. एका अलिशान हॉटेल समोर येवून थांबताच दारावरचा पहारेकरी अभिवादन करत पुढे येतो. आपला महागडा ओव्हरकोट व्यव्यस्थित करत साधारण पस्तीशीतला, उंच देखणा तरुण गाडीतून उतरतो. कोटावरचे सोनेरी स्वस्तिक चिंन्ह हाताने ठीक करून आत जातो. नेहमीप्रमाणे महागडे मद्य मागवतो, जवळच बसलेल्या सैनिकी अधिकाऱ्याकडे त्याचे काहीतरी महत्वाचे काम असते. त्या कामासाठी वाट्टेल तेवढे पैसे द्यायला तो तयार होता. किमती गाड्या, उंची वस्त्रे, मद्य आणि सुंदर तरुणींच्या गराड्यात राहणारा हा तरुण होता तरी कोण ?. तशी त्याची ओळख एक मोठा उद्योगपती म्हणून होती.....पण त्याची दुसरी ओळख जी संपूर्ण जगाने आजही जिवंत ठेवली ती म्हणजे त्याच्यावर लिहिलेल्या पुस्तकाने आणि चित्रपटाने... त्याबद्दल काहीसे...

शिंडलर्स लिस्ट [ Schindler's List]
© - प्रमोद मदाल ✒

पार्श्वभूमी :
१९३९ ते १९४५ मध्ये संपूर्ण युरोप बेचिराख होणारी घटना घडली आहे ती म्हणजे दुसरे महायुद्ध. एका विकृत राजवटीच्या हट्टापायी सगळं जग वेठीला धरलं गेलं होतं. नाझी भस्मासुराने ज्यूं वर सर्वत्र अत्याचाराचे सत्र चालू ठेवले होते. या आगीत सर्वात जास्त होरपळून निघालेला देश म्हणजे पोलंड. 1939, सप्टेंबरचा महिना. अवघ्या दोन आठवड्यात जर्मन फौजांनी पोलंड ताब्यात घेतला होता आणि आपले वर्चस्व सिद्ध केले होते. नाझींनी उभारलेल्या ३२० छळ छावण्यांपैकी ३०० फक्त पोलंड मधेच होत्या. अत्याचाराला सीमा नसते हे नाझींनी जगाला दाखवून दिले आहे. सैतानी वृतीने कळस गाठलेल्या या काळात काही देव माणसेही होती. त्यातलाच एक म्हणजे “ऑस्कर शिंडलर".

क्राकोव हे एक ज्यू बहुल शहर होते. आजूबाजूच्या गावांमधून निर्वासितांचे जत्थे च्या जत्थे इथे आश्रय घेण्यासाठी येत असतं. रोज सुमारे १०,००० लोकं स्थलांतर करून येत होती. स्थानिक लोकांची नोंदणी करण्याचे काम चालू होते.
ज्यूंनी लवकरात लवकर शहर सोडून जाण्याच्या ऑर्डर्स नाझींनी दिल्या होत्या. शरीराने धडधाकट आणि जे कामाचे आहेत ते गुलाम म्हणून ठेवले जात असत आणि बाकीच्यांना अत्यंत क्रूरपणे, यातना देत मारले जात असे.

उद्योगपती शिंडलर :

ऑस्कर शिंडलर हा चेकोस्लोव्हाकियन यशस्वी उद्योगपती होता. वडीलही उद्योगपती. अर्धवट शिक्षण सोडून त्याने वडिलांच्या मार्गावर जायचे ठरवलेले होते. १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. युद्धजन्य परिस्थितीचा फायदा शिंडलरला होणार होता. आपले नशीब अजमावण्यासाठी तो पोलंड मधील क्राकोव शहरात येतो. एक बंद पडलेली फॅक्टरी विकत घेऊन आपला उद्योग सुरु करतो.

शिंडलर नाझी यंत्रणेचा सदस्य होता. अनेक वर्ष त्याने हिटलर च्या SS साठी गुप्तहेर म्हणून काम केले होते. अनेक जर्मन अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी त्याने हाताशी धरले होते.

स्वभावाने शांत असणाऱ्या शिंडलरला सतत एेयाशी मध्ये राहायची त्याला सवय होती. अनेक जर्मन अधिकारी त्याचे मित्र होते. त्याला त्याच्या फॅक्टरीसाठी कामगार पाहिजे असतात. उघड उघड काही करता येत नसल्याने आईझेक स्टर्न या पोलिश-इस्त्राईली अकाऊंटटला तो आपला हेतू सांगतो. ज्यु लोकांना कमी मोबदला देऊन त्यांना कामावर ठेवण्याचा विचार असतो. त्यानुसार सुरुवातीला ३५० लोकांना धातूची भांडी बनविण्याचे प्रशिक्षण देऊन तो फॅक्टरी सुरु करतो. हळू हळू सैन्यात उपयोगी युद्ध सामग्री पुरविण्याचे कंत्राट त्याला मिळते. त्यातून त्याला खूप नफा होत असतो. जर्मन अधिकाऱ्यांना लाच देऊन, त्यांना खुश ठेऊन तो आपली कामे चालू ठेवत होता.

देवदूत शिंडलर :

फॅक्टरीमध्ये काम मिळाल्यामुळे नाझींपासून जीव वाचवणाऱ्या लोकांमध्ये एक उत्साहाचे वातावरण तयार होते. देवदूताच्या नजरेतून लोकं शिंडलरला बघू लागले. पण लवकरच यावर सरकारची वक्र दृष्टी जाते. नव्यानेच नेमलेला अमोन गॉथ ह्या अधिकाऱ्याची क्रकोव्ह मध्ये नेमणूक होते. ज्यूंचे घेटो संपवण्याचे काम याच्याकडे होते. हा अतिशय क्रूर अधिकारी होता. वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे तो ज्यूंचे मुडदे पाडत असे. कधी कधी हा आपल्या गच्चीमधून बसल्या बसल्या गम्मत म्हणून लोकांना गोळ्या घालत असे. गॉथची आणि ऑस्करची एका पार्टीत ओळख झाली होती. तसे सर्वच पोलीस अधिकारार्याना आणि स्वतः गॉथ ला ऑस्कर आवडत होता. ऑस्करनेही गॉथशी चांगली मैत्री केली होती. पण गॉथ च्या अमानुष कृत्यामुळे ऑस्करच्या मनात ज्यूं बद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. तो नेहमी चिंतेत होता.

शिंडलरचा उद्योग तेजीत चाललेला असतानाच सरकारचा आदेश येतो आणि कारखान्यातील सर्व कामगार सरकारी कामासाठी पाठवले जातात. यामध्ये शिंडलरचे खूप नुकसान होते. गॉथ बरोबर बोलणी करून तो पुन्हा कामगारांना बोलाबून घेतो. आता ती सर्व लोकं त्याची झालेली असतात. त्यांच्यावर होणारे अत्याचार त्याला असह्य होत असतात. ट्रक च्या ट्रक भरून लोकांना गॅस चेंबर मध्ये मारले जात असे. यामध्ये लहान मुलांनाचाही समावेश होता. काहीही करून या लोकांना आपण वाचवायचे हे त्याने ठरवले होते. यामध्ये जर पकडलो गेलो तर याचे परिणाम त्याला माहित असतात त्याला फासावरही जावे लागले असते. पण त्याची परवा तो करत नाही. सरकारी त्रासामुळे वैतागून आपली फॅक्टरी तो दुसरीकडे हलवण्याचे ठरवतो. त्यानुसार प्रत्येक कामगारामागे गॉथला एक ठराविक रक्कम देऊन सुमारे १२०० लोकांची यादी बनवतो. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुले यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे लहान मुले हि शिंडलरच्या फॅक्टरी साठी खूप उपयोगी असतात. यंत्र दुरुस्तीसाठी जिथे मोठ्यांचा हाथ जाऊ शकत नाही तिथे तो या 13-१४ वर्ष्यांच्या मुलांचा वापर करत असे. दोन रेल्वे गाड्या भरून लोकांचे स्थलांतर केले जाते.

७ ऑस्कर पटकावलेला शिंडलर्स लिस्ट :

दुसऱ्या महायुद्धावर आणि नाझींनी केलेल्या अत्याचारावर आधारित आत्तापर्यंत खूप चित्रपट बनले आहेत, त्यामध्ये ‘शिंडलर्स लिस्ट’ चे एक वेगळे स्थान आहे. स्वतः ज्यु असणाऱ्या दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग च्या कार्कीर्दीतला हा सर्वोत्तम चित्रपट आहे.

१९८२ साली शिंडलर वर आधारित 'शिंडलर्स आर्क' ही कादंबरी प्रसिद्ध झाली. हा चित्रपट त्याचाच आधार घेऊन बनवन्यात आला आहे.

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची सुरुवात दोन मेणबत्त्या प्रज्वलित करणाऱ्या एका रंगीत दृश्याने होते. थोड्याच वेळात मेणबत्त्या विझतात आणि सुरु होते एक अंधारमय कहाणी. इथून पुढे संपूर्ण चित्रपट कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) आहे. पन्नासच्या दशकात रंगीत चित्रपटांचे युग सुरु झाले असतानाही ‘शिंडलर्स लिस्ट’ ने ब्लॅक अँड व्हाईटमधेच सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. एक दोन नाही तर तब्बल सात ऑस्कर या चित्रपटाने पटकावले आहेत.
नाझी सेनेकडून ज्यूंवर होणाऱ्या अत्याचारातून, ज्यांचा मृत्यू निश्चित होता अश्या सुमारे १२०० लोकांचे प्राण वाचवणाऱ्या ऑस्कर शिंडलरच्या सत्य कथेवर आधारित हा चित्रपट आहे. ३ तास १५ मिनिटांचा चित्रपट सुन्न करून करून टाकतो चित्रपटाचा शेवटही हृदयद्रावक आहे.

दुसऱ्या महायुद्धाचे वाचन करत असताना मागच्या आठवड्यात हा चित्रपट पाहिला. अवश्य बघावा. शिंडलरने वाचवलेल्या ज्यूंचे आज ८,००० वंशज जगभरात रहात आहेत.

- प्रमोद मदाल ✒
११- ०९-२०१९

इतिहासलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

11 Sep 2019 - 4:28 pm | जॉनविक्क

तगडी स्टारकास्ट आणि अफलातून दिगदर्शक. याचे गारुड बराच काळ मनावर होते. माझ्यासाठी ऑल टाईम क्लासिक मधे सहभागी झालेला टायटॅनिक नन्तरचा हा दुसरा चित्रपट.

विनिता००२'s picture

12 Sep 2019 - 10:35 am | विनिता००२

बघितलाय. अंगावर काटा येतो.

मराठी_माणूस's picture

12 Sep 2019 - 4:08 pm | मराठी_माणूस

चित्रपटाची छान ओळख

धर्मराजमुटके's picture

12 Sep 2019 - 9:36 pm | धर्मराजमुटके

मी युट्युबवर बराच शोधला हा चित्रपट पण कोठेच मिळाला नाही. (मोफत वाला). तरीही माझे वैयक्तीक मत असे की चित्रपटापेक्षा कादंबरी सरस असते. कारण ती वाचताना तुम्ही कल्पनाशक्ती वापरुन ते प्रसंग मन:पटलावर आणत असता. चित्रपट पाहताना आपण दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्ती ने तो प्रसंग पाहत असतो.

जॉनविक्क's picture

13 Sep 2019 - 12:25 pm | जॉनविक्क

परंतु ही दोनही कथाकथनाची संपूर्णपणे वेगळी माध्यमे असून त्यांच्या स्ट्रेंथ आणी विकनेस पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यामुळे कादंबरी शक्य झाली नाही तरी चित्रपट अवश्य बघावा. निराशा होणार नाही.

धर्मराजमुटके's picture

13 Sep 2019 - 2:49 pm | धर्मराजमुटके

कादंबरी पैलेच वाचेलयं ! युट्युबचा मोफत दुवा असेल तर तो देऊन गरीबाची दुआ घ्या :)

प्रमोद मदाल's picture

4 Oct 2019 - 11:18 am | प्रमोद मदाल

माझ्याकडे आहे. मी देईन

विनिता००२'s picture

13 Sep 2019 - 3:51 pm | विनिता००२

हा घ्या मोफत सिनेमाचा दुवा:

https://hubflixhd.in/schindlers-list-hindi-480p-720p/

धर्मराजमुटके's picture

13 Sep 2019 - 7:54 pm | धर्मराजमुटके

अनेक धन्यवाद !

भयानक होता चित्रपट .. त्याच कथानकाचा इतकं दर्दनाक होत कि मी तो बघितल्यावर कित्येक दिवस झोपलोच नव्हतो .. हिटलर तसा आवडायचा आपल्याला , फक्त त्याचा उदयास्त वाचला होता तोही " नाझींभस्मासुराचा उदयास्त " या पुस्तकातून .. पण हा चित्रपट पहिला आणि पार नशा उतरली राव .. नको , हा लेख वाचून परत त्या भयानक आठवणी जाग्या झाल्या .. एक सिन आहे यामध्ये .. तो अघोरी क्रूरकर्मा जर्मन अधिकारी कोफी पीत असतो आणि हुक्की येते म्हणून खाली साफसफाई करणाऱ्या ज्यूवर गोळी झाडून ठार मारतो .. अरे काय हे .. हे जर असं दाखवलंय तर किती आणि कसं भयानक घडलं असेल याची जाणीव होते आणि त्या जाणिवेतूनच झोप उडते .. पुन्हा कोणी दाखवला तरी बघणार नाही असा " माणुसकीला काळिमा फासणारा " चित्रपट वाटला .. सर्वांची कामे इतकी छान झालेली आहेत कि जर्मनीमध्ये जर कुणी हा बघितला असेल तर त्याला स्वतः जर्मन म्हणवून घ्यायची लाज वाटली असेल .. धिक्कार असो तत्कालीन जर्मन अत्याचारांचा .. धिक्कार .. धिक्कार ..धिक्कार

तुषार काळभोर's picture

15 Sep 2019 - 5:20 pm | तुषार काळभोर

असलं काही आपल्याला झेपत नाही. उगाच त्रास होतो.

बबन ताम्बे's picture

15 Sep 2019 - 7:49 pm | बबन ताम्बे

शिंडलर कादंबरीचा मराठी अनुवाद आहे का उपलब्ध ?

प्रमोद मदाल's picture

4 Oct 2019 - 11:21 am | प्रमोद मदाल

हो आहे.

प्रमोद मदाल's picture

28 Aug 2020 - 7:56 am | प्रमोद मदाल

हो आहे

स्वलेकर's picture

16 Sep 2019 - 5:26 pm | स्वलेकर
बबन ताम्बे's picture

19 Sep 2019 - 12:35 pm | बबन ताम्बे

पुस्तकांचा खजीनाच आहे इथे ऑनलाईन शॉपिंगसाठी
https://www.akshardhara.com/en/

शशिकांत ओक's picture

19 Sep 2019 - 7:55 am | शशिकांत ओक

अनन्वित छळ करून मारले गेले. यावर वाईट वाटले असे फारसे कोणी म्हणत नाही! तो सिनेमा गाजला इतकी पारितोषिके देण्यात आली वगैरेमधून सिनेमा, कादंबरी वगैरे कलाकृतीला नावाजले गेले.
मला प्रश्न पडतो की या जूंनी ख्रिश्चन लोकांचे काय वाकडे केले होते कि त्यामुळे त्यांचे जीव धोक्यात आले? ज्यू नी ना तलवारीच्या बळावर धर्मांतरण केले ना पैशाच्या बळावर.

जॉनविक्क's picture

19 Sep 2019 - 12:43 pm | जॉनविक्क

ज्यू नी ना तलवारीच्या बळावर धर्मांतरण केले ना पैशाच्या बळावर.

तुम्ही ज्यू फक्त जन्मानेच असू शकता. इतर मार्गच उपलब्ध नाही ज्यू बनायचा असे माझी अल्पमती सांगते, जाणकारांनी उजेड टाकावा.

जॉनविक्क's picture

19 Sep 2019 - 1:58 pm | जॉनविक्क

व परशुरामानी 21 वेळ ही पृथ्वी नि:क्षत्रिय करणे या दोन कृती एकाच तराजूत तोलता येतील काय ?

टीप: पुराणातील उल्लेखामुळे जरी यात तत्कालीन जात धर्माचा यात उल्लेख जरी करावा लागला तरी मला यात निव्वळ मानवी स्वभावाचे विश्लेषण व फक्त त्याच अनुषंगाने मते जाणून घ्यायची आहेत की वर वर दोन समान भासणाऱ्या कृती लोकं कोणत्या नजरेने बघतात. यामधे कोणतेही जातीय संदर्भ टाळूनच शक्य असेल तर व्यक्त व्हावे.

वीसवेळा निःक्षत्रिय करायची वेळ आली नसती हा एक मुद्दा, आणी हिंदु धर्मात तेंव्हा वर्ण व्यवस्था होती आणी जन्मापेक्षा कर्मावर वर्ण ठरत होता. जाती व्यवस्था नंतर आलेल्या मुसलमानी आणी ख्रिश्चन राजवटीत रुढ झाल्या. जगात फक्त सनातन, झोराष्ट्रियन, आणी यहुदी ह्या सध्या अस्तित्वात असलेल्या धर्मांमधे जन्माने देवांचे पुजारीपण येते.

वीसवेळा निःक्षत्रिय करायची वेळ आली नसती हा एक मुद्दा

मला वाटते लहान मुले आणि स्त्रीया यांना जीवदान दिले गेले असावे. आणी हे जर उल्लेख असतील तर इथेच फरक स्पष्ट होतो जास्त विचार करायचीच गरज नाही.

आणी हिंदु धर्मात तेंव्हा वर्ण व्यवस्था होती आणी जन्मापेक्षा कर्मावर वर्ण ठरत होता. जाती व्यवस्था नंतर आलेल्या मुसलमानी आणी ख्रिश्चन राजवटीत रुढ झाल्या. जगात फक्त सनातन, झोराष्ट्रियन, आणी यहुदी ह्या सध्या अस्तित्वात असलेल्या धर्मांमधे जन्माने देवांचे पुजारीपण येते.

आपण व्हॅट्सअप ग्रुपच्या पेक्षा जास्त दर्जेदार प्लॅटफॉर्मवर चर्चा करत आहोत सध्या धर्म जात वर्ण वगैरे बाजूला ठेऊन फक्त ऍक्ट ऑफ होलोकास्ट इतपतच चर्चा मर्यादित ठेवूया. _/\_

जालिम लोशन's picture

19 Sep 2019 - 10:50 pm | जालिम लोशन

जेंव्हा तुम्हाला मास हिस्टेरिआवर चर्चा करायची असते तेंव्हा त्या मागच्या वैचारिक बैठकी मधे वरिल मुद्दे टाळता येत नाहित ते अभिन्न असे त्याचे अंग असते त्यांचा ऊल्लेख अपरिहार्य असतो. अगदी अलिकडचे उदाहरण सिरिया व इराक मधील ड्रुझ लोकांचा नरसंहार, त्याच्या आधीचा स्लोवाक, अल्बानियन नरसंहार त्या आधीचा भारतिय फाळणीच्या वेळेचा बंगाल व पंजाब मधील नरसंहार त्या आधीचा तुर्की लोकांनी केलेला अर्मेनिअन नरसंहार लिस्ट बरिच मोठी आहे. तुम्ही ह्यांचे विश्लेषण कसे करणार?

जॉनविक्क's picture

20 Sep 2019 - 1:07 am | जॉनविक्क

त्याकाळच्या ज्यु लोकांनी तक्रार करुन येशुला सुळावर चढवण्यास भाग पाडले या द्वेषातुन ख्रिश्चन ज्युंकडे बघतात.

जॉनविक्क's picture

19 Sep 2019 - 5:44 pm | जॉनविक्क

हिटलर हा इतका कर्मठ ख्रिश्चन होता यावरच विश्वास ठेवायला जागा नाही त्यामुळे...

राजे १०७'s picture

19 Sep 2019 - 8:08 pm | राजे १०७

हिटलर स्वत:ला आणि जर्मन लोकांना आर्य म्हणवून घेत होता व जगातील सर्वात श्रेष्ठ वंश असल्याचे प्रतिपादन करत होता. स्वस्तिक चिन्ह वापरत होता तो.

या जूंनी ख्रिश्चन लोकांचे काय वाकडे केले होते ते माहित नाही पण त्यांच्या पिढ्यान पिढ्या मारल्या गेल्या तरी ज्यु आज क्रिश्चन सोडून शांतिप्रिय धर्मालाच आपला क्र. १ चा शत्रू मानतात .
बर्‍याच दिवसापुर्वी इस्त्रायल मधे राहण्यार्‍या नवीन पिढीच्या तरुणांना भारताबद्दल काय वाटते ते विचारणारा एक व्हिडीयो पाहण्यात आला. त्यात बर्‍याच जणांना भारत म्हणजे एक मागासलेला देश, घाणेरडा देश इतकेच माहित होते. मात्र एकानेही असे सांगीतले नाही की "बाबांनो सगळी दुनिया जेव्हा आमच्या जीवावर उठली होती तेव्हा भारत हा एकमेव देश होता की जिथे ज्यु सुखाने नांदले.
असो. आपण मात्र इस्त्रायल आपल्या शेजार्‍यांची कशी ठासतात यावरच खुश असतो.

चित्रपट पाहिला. फक्त शेवट रडवून गेला. बाकी मुळ कादंबरी आणि त्याचा मराठी अनुवाद हा या चित्रपटापेक्षा कैक पटीने सरस आहे असे मत नोंदवतो.

भंकस बाबा's picture

30 Sep 2019 - 6:34 pm | भंकस बाबा

माझे काही मित्र आहेत ज्यू!
इथे भारतात वाढले , नंतर इस्राएलमधे गेले, काही अजुन आहेत इथे! एकच ध्येय इस्राएलला जायचे!
तिथे स्थाईक झालेल्या एक मित्र भारतात आला होता तेव्हा सांगत होता कि इजराइली ज्यू कधीही सोशल मिडियावर प्रमाणाच्या बाहेर व्यक्त होत नाही. जेव्हा एखादा परकीय इजरायलच्या भूमिवर येतो तेव्हा त्याचे सोशल मीडिया अकाउंट व्यवस्थित तपासण्यात येते , जऱ काही आक्षेपार्ह आढळले तर विमानतळावर अजुन कसुन चौकशी होते. याच कारणास्तव जेरूसलम हे मुस्लिमासाठीदेखिल पवित्र क्षेत्र असताना भारतातून फार कमी लोक तिकडे जातात , आपली खानावळ मक्केला जाऊन फोटो सोशल मिडियावर टाकत असतात, कधी बघितले यांना जेरुसलेमच्या पवित्र भूमिवर फिरताना?

भंकस बाबा's picture

30 Sep 2019 - 6:35 pm | भंकस बाबा

माझे काही मित्र आहेत ज्यू!
इथे भारतात वाढले , नंतर इस्राएलमधे गेले, काही अजुन आहेत इथे! एकच ध्येय इस्राएलला जायचे!
तिथे स्थाईक झालेल्या एक मित्र भारतात आला होता तेव्हा सांगत होता कि इजराइली ज्यू कधीही सोशल मिडियावर प्रमाणाच्या बाहेर व्यक्त होत नाही. जेव्हा एखादा परकीय इजरायलच्या भूमिवर येतो तेव्हा त्याचे सोशल मीडिया अकाउंट व्यवस्थित तपासण्यात येते , जऱ काही आक्षेपार्ह आढळले तर विमानतळावर अजुन कसुन चौकशी होते. याच कारणास्तव जेरूसलम हे मुस्लिमासाठीदेखिल पवित्र क्षेत्र असताना भारतातून फार कमी लोक तिकडे जातात , आपली खानावळ मक्केला जाऊन फोटो सोशल मिडियावर टाकत असतात, कधी बघितले यांना जेरुसलेमच्या पवित्र भूमिवर फिरताना?

हो. ते ठीकच आहे. सोशल मिडिया म्हणजेच सर्वस्व नव्हे पण आपल्या उपकारकर्त्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले तर ते वावगे समजले जाणार नाही बहुधा !
असो. आपल्याला कोणाच्या प्रशस्तीपत्रकाची आवश्यकता नाही पण विषय निघाला म्हणून मत मांडले इतकेच.
तीच गत बांगलादेशीयांची आहे. त्यांच्या नवीन पिढीला भारतापेक्षा पाकीस्तान सांस्कृतिक रीत्या जवळचा वाटतो म्हणे.

जॉनविक्क's picture

30 Sep 2019 - 7:49 pm | जॉनविक्क

तीच गत बांगलादेशीयांची आहे. त्यांच्या नवीन पिढीला भारतापेक्षा पाकीस्तान सांस्कृतिक रीत्या जवळचा वाटतो म्हणे.

ते तर होणारच की म्हणूनच तर भारतापासून विलग झाले.


सोशल मिडिया म्हणजेच सर्वस्व नव्हे पण आपल्या उपकारकर्त्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले तर ते वावगे समजले जाणार नाही बहुधा !

अगदी. सक्तीचे सैनिकी प्रशिक्षण चुकवायला आणि सैन्यातील सक्तीच्या नोकरीचा काळ संपल्यावर बरीच इज्रायली जनता हिमाचलात कसौलमध्ये येऊन मुक्काम ठोकून असतात. मध्यंतरी पोलीस कम्प्लेन्ट्स झाल्या होत्या की भारतीय भूमीवर, तिथे कसौलमध्ये काही हॉटेल्समध्ये भारतीयांनाच सेवा द्यायला नकार मिळाला होता, फक्त इज्रायलींसाठी प्रवेश होता.

उगा माज करत असतात.

मलाही हे कधीच कळलं नाही कि सैनिक सोडा पण सामान्य जर्मन नागरिकानी कधीच विरोध केलेला ऐकलं नाही. हिटलर चा काही खास उद्देश असेल कदाचित. पण जर्मन सैनिकांना, किंवा जे लोक ह्या छळ छावण्या चालवत होते त्यांना एवढी क्रूरता बघून काहीच वाटलं नाही. जशी शिंडलर ने केली तेवढीं नसेल, पण थोडीफार मदत पण नाही करता अली. माझं वाचन मर्यादित आहे, पण कधी कधी असं वाटतं कि जर्मन लोकांमध्ये ज्यू द्वेष होताच हिटलर ने त्याचा वापर करून घेतला. ज्यू द्वेष का होता हे मात्र कधीच कळलं नाही. 

ह्या चित्रपटातली ती एकच लहान मुलगी लाल रंगाचा  फ्रॉक घालून फिरताना दाखवली. आणि नंतर प्रेतांचा सडा सगळा कृष्ण-धवल रंगात, आणि लांब कुठेतरी हातगाडीवर एक लाल रंगाचा ठिपका दाखवतो कि ती गोड छोटी मुलगी पण मेली :(. खूप दिवस अस्वस्थ होते हा चित्रपट बघून. 

तुर्रमखान's picture

30 Sep 2019 - 7:34 pm | तुर्रमखान

पण कधी कधी असं वाटतं कि जर्मन लोकांमध्ये ज्यू द्वेष होताच हिटलर ने त्याचा वापर करून घेतला.

हे असतंच. काही वाईट लोक आक्खी जात, धर्म, वगैरे बदनाम करतात हे वाक्य सांगून गुळगुळीत झालंय. जमल्यास हा विडिओ बघा. मला काय म्हणायचं आहे ते ४:०५ मिनिटानी त्या बाई सांगतात.

राजे १०७'s picture

19 Sep 2019 - 9:41 pm | राजे १०७

ज्यू हे तगडं व्याज आकारणी करुन सावकारी करत. सर्वसामान्य जर्मन व सगळेच जर्मन पहिल्या महायुद्धाच्या तहातील जाचक अटींमुळे भयंकर गांजले होते. भाकरीसाठी ओढाताण होत असताना ज्यू आरामात जगत होते. मुळात कष्टाळू व्यापारी वृत्तीच्या ज्यू लोकांची सांपत्तिक स्थिती चांगली होती.

बेकार तरुण's picture

30 Sep 2019 - 2:15 pm | बेकार तरुण

माझ्या अल्पमाहिती नुसार, ईतर धार्मिक वगैरे कारणांबरोबरच आर्थिक कारणेही असु शकतील -
ज्यु हे पक्के धंदा करणारे श्रीमंत लोक होते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या बर्‍यापैकी सधन.
तसेच पहिल्या महायुद्धात ज्यु लोकांनी अमेरिकेस मोठी कर्जे देउन मदत केलेली होती (गोल्डमन, रॉथमन, मॉर्गन.. ज्या आता मोठाल्या आर्थिक संस्था आहेत)...
यामुळे ज्युंविषयी राग होताच, आणी त्याचा फायदा करुन घेतला गेला.

कुठल्याही अतिटोकाच्या विचारसरणीला द्वेष करण्यासाठी एक सोपं लक्ष्य हवं असतं. त्या द्वेषातूनच ती विचारसरणी अधिक बळकट होत असते. हिटलरचा ज्यूद्वेष हा धार्मिक आधारावर नसून जर्मनी ह्या त्याच्या कल्पनेतल्या महान राष्ट्राच्या त्याच्या मते झालेल्या तत्कालीन अधोगतीस ज्यू जबाबदार होते. ज्यूंचा द्वेष संपूर्ण युरोपात आधीपासूनच केला जात असे. त्याला इतके टोकाचे आणि विखारी स्वरूप नाझींनी दिले. पण त्यांच्या काँसंट्रेशन कॅम्पनाही लाजवतील असे हाल ज्यूंचे रशियात होत होते. ज्यूंकडून तितका प्रखर प्रतिकार झाला नाही याचे एक कारण असे असू शकते की काँसंट्रेशन कॅम्पच्या आत काय चालत असे ह्याची कल्पना अगदी तिथे जाऊन खितपत पडलेल्यांनाही येत नसे. त्यांना प्रत्यक्ष गॅस चेंबरमध्ये नेल्यानंतरच काय होणार हे कळत असे. त्यामुळे अगदी कॅम्पमध्ये नेऊन बंदिस्त केलेल्यांनाही इथून आपण कधी ना कधी सुटू असा थोडासा आशावाद असावा.

बाकी 'शिंडलर्स लिस्ट' व 'द पियानिस्ट' ह्या दोन्ही चित्रपटांवरील तुमचे लेख वाचले. ठीक आहेत. पण त्या चित्रपटांना ते पुरेसा न्याय देत नाहीत असे वाटले. खूप काही लिहिता आले असते. क्षमस्व.

प्रमोद मदाल's picture

30 Aug 2020 - 11:22 pm | प्रमोद मदाल

प्रतिक्रिया वाचली. तुम्ही माझे लेख वचले. धन्यवाद. काही गोष्टींचा उलगडा व्हावा म्हणून ....
काँसंट्रेशन कॅम्पनाही लाजवतील असे हाल ज्यूंचे रशियात होत होते असे तुम्ही म्हणता तर त्याबद्दल थोडे अधिक सांगू शकता का ...?
आणि असे असेल तर त्याचा उल्लेख सगळीकडे यायला पाहिजे ना ?

माझ्या वाचनात तर असे आले आहे की SS चे अत्याचार खुद्द स्टॅलिन च्या रेड आर्मी चा सुद्धा थरकाप उडत असे.

आणि पुढं पोलंड मुक्त झाल्यानंतर रशिया ने ज्युंवर अत्याचार केले असावेत ना ? पण तसे कूठे वाचनात आले नाही. अर्थातच छोट्या मोठ्या गोष्टी सोडून.

मी बर्नार्ड मालमुड यांची फिक्सर वाचली आहे त्यामध्ये ज्यू गुलामांची रशियन कडून होणारी हेळसांड आहे पण याची तुलना नाझी, हिटलर ....नाही वाटत.
कृपया जमल्यास अधिक माहिती द्यावी.

डीप डाईव्हर's picture

30 Aug 2020 - 11:55 pm | डीप डाईव्हर

इतिहास जेते लिहितात असे वाचून आहे आणि हिटलर युध्द हारला होता. स्टॅलिनने फक्त ज्यूच नाही तर स्लोव्हाक लोकांवर पण खूप अत्याचार केल्याचे वाचून आहे. हिटलर १९४५ साली मेला पण स्टॅलिन १९५३ साली मरेपर्यंत सोविएत रशियाचा सर्वेसर्वा होता. त्याच्या मृत्युनंतर निकिता कृस्चेव्ह यांनी त्याच्ने केलेले अत्याचार उघडकीस आणले होते.

मराठी_माणूस's picture

31 Aug 2020 - 9:54 am | मराठी_माणूस

हिटलर ज्यु द्वेष्टा होता. पण ज्युंचा छ्ळ करणारे असंख्य होते . इतक्या सार्‍यांच्यात एव्हढा पराकोटीचा क्रुरपणा कसा आला असेल ?
नंतर काहीजणांना विचारल्यावर त्यांनी "आम्ही फक्त आज्ञेचे पालन करत होतो " असा स्वतःचा बचाव केला. हे न पटण्याजोगे आहे. आज्ञेचे पालन करत असतांना
समोरच्याच्या वेदना दिसत नव्हत्या का ?