शिंडलर्स लिस्ट
संध्याकाळच्या वेळी एका उच्चभ्रू वस्तीतून कर्फ्यू मोडून फिरणारी लांबलचक, चकचकीत अॅडलर लिमोझिन गाडी सरकारी अधिकाऱ्यांना ओळखीची झाली होती. एका अलिशान हॉटेल समोर येवून थांबताच दारावरचा पहारेकरी अभिवादन करत पुढे येतो. आपला महागडा ओव्हरकोट व्यव्यस्थित करत साधारण पस्तीशीतला, उंच देखणा तरुण गाडीतून उतरतो. कोटावरचे सोनेरी स्वस्तिक चिंन्ह हाताने ठीक करून आत जातो. नेहमीप्रमाणे महागडे मद्य मागवतो, जवळच बसलेल्या सैनिकी अधिकाऱ्याकडे त्याचे काहीतरी महत्वाचे काम असते. त्या कामासाठी वाट्टेल तेवढे पैसे द्यायला तो तयार होता. किमती गाड्या, उंची वस्त्रे, मद्य आणि सुंदर तरुणींच्या गराड्यात राहणारा हा तरुण होता तरी कोण ?. तशी त्याची ओळख एक मोठा उद्योगपती म्हणून होती.....पण त्याची दुसरी ओळख जी संपूर्ण जगाने आजही जिवंत ठेवली ती म्हणजे त्याच्यावर लिहिलेल्या पुस्तकाने आणि चित्रपटाने... त्याबद्दल काहीसे...
शिंडलर्स लिस्ट [ Schindler's List]
© - प्रमोद मदाल ✒
पार्श्वभूमी :
१९३९ ते १९४५ मध्ये संपूर्ण युरोप बेचिराख होणारी घटना घडली आहे ती म्हणजे दुसरे महायुद्ध. एका विकृत राजवटीच्या हट्टापायी सगळं जग वेठीला धरलं गेलं होतं. नाझी भस्मासुराने ज्यूं वर सर्वत्र अत्याचाराचे सत्र चालू ठेवले होते. या आगीत सर्वात जास्त होरपळून निघालेला देश म्हणजे पोलंड. 1939, सप्टेंबरचा महिना. अवघ्या दोन आठवड्यात जर्मन फौजांनी पोलंड ताब्यात घेतला होता आणि आपले वर्चस्व सिद्ध केले होते. नाझींनी उभारलेल्या ३२० छळ छावण्यांपैकी ३०० फक्त पोलंड मधेच होत्या. अत्याचाराला सीमा नसते हे नाझींनी जगाला दाखवून दिले आहे. सैतानी वृतीने कळस गाठलेल्या या काळात काही देव माणसेही होती. त्यातलाच एक म्हणजे “ऑस्कर शिंडलर".
क्राकोव हे एक ज्यू बहुल शहर होते. आजूबाजूच्या गावांमधून निर्वासितांचे जत्थे च्या जत्थे इथे आश्रय घेण्यासाठी येत असतं. रोज सुमारे १०,००० लोकं स्थलांतर करून येत होती. स्थानिक लोकांची नोंदणी करण्याचे काम चालू होते.
ज्यूंनी लवकरात लवकर शहर सोडून जाण्याच्या ऑर्डर्स नाझींनी दिल्या होत्या. शरीराने धडधाकट आणि जे कामाचे आहेत ते गुलाम म्हणून ठेवले जात असत आणि बाकीच्यांना अत्यंत क्रूरपणे, यातना देत मारले जात असे.
उद्योगपती शिंडलर :
ऑस्कर शिंडलर हा चेकोस्लोव्हाकियन यशस्वी उद्योगपती होता. वडीलही उद्योगपती. अर्धवट शिक्षण सोडून त्याने वडिलांच्या मार्गावर जायचे ठरवलेले होते. १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. युद्धजन्य परिस्थितीचा फायदा शिंडलरला होणार होता. आपले नशीब अजमावण्यासाठी तो पोलंड मधील क्राकोव शहरात येतो. एक बंद पडलेली फॅक्टरी विकत घेऊन आपला उद्योग सुरु करतो.
शिंडलर नाझी यंत्रणेचा सदस्य होता. अनेक वर्ष त्याने हिटलर च्या SS साठी गुप्तहेर म्हणून काम केले होते. अनेक जर्मन अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी त्याने हाताशी धरले होते.
स्वभावाने शांत असणाऱ्या शिंडलरला सतत एेयाशी मध्ये राहायची त्याला सवय होती. अनेक जर्मन अधिकारी त्याचे मित्र होते. त्याला त्याच्या फॅक्टरीसाठी कामगार पाहिजे असतात. उघड उघड काही करता येत नसल्याने आईझेक स्टर्न या पोलिश-इस्त्राईली अकाऊंटटला तो आपला हेतू सांगतो. ज्यु लोकांना कमी मोबदला देऊन त्यांना कामावर ठेवण्याचा विचार असतो. त्यानुसार सुरुवातीला ३५० लोकांना धातूची भांडी बनविण्याचे प्रशिक्षण देऊन तो फॅक्टरी सुरु करतो. हळू हळू सैन्यात उपयोगी युद्ध सामग्री पुरविण्याचे कंत्राट त्याला मिळते. त्यातून त्याला खूप नफा होत असतो. जर्मन अधिकाऱ्यांना लाच देऊन, त्यांना खुश ठेऊन तो आपली कामे चालू ठेवत होता.
देवदूत शिंडलर :
फॅक्टरीमध्ये काम मिळाल्यामुळे नाझींपासून जीव वाचवणाऱ्या लोकांमध्ये एक उत्साहाचे वातावरण तयार होते. देवदूताच्या नजरेतून लोकं शिंडलरला बघू लागले. पण लवकरच यावर सरकारची वक्र दृष्टी जाते. नव्यानेच नेमलेला अमोन गॉथ ह्या अधिकाऱ्याची क्रकोव्ह मध्ये नेमणूक होते. ज्यूंचे घेटो संपवण्याचे काम याच्याकडे होते. हा अतिशय क्रूर अधिकारी होता. वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे तो ज्यूंचे मुडदे पाडत असे. कधी कधी हा आपल्या गच्चीमधून बसल्या बसल्या गम्मत म्हणून लोकांना गोळ्या घालत असे. गॉथची आणि ऑस्करची एका पार्टीत ओळख झाली होती. तसे सर्वच पोलीस अधिकारार्याना आणि स्वतः गॉथ ला ऑस्कर आवडत होता. ऑस्करनेही गॉथशी चांगली मैत्री केली होती. पण गॉथ च्या अमानुष कृत्यामुळे ऑस्करच्या मनात ज्यूं बद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. तो नेहमी चिंतेत होता.
शिंडलरचा उद्योग तेजीत चाललेला असतानाच सरकारचा आदेश येतो आणि कारखान्यातील सर्व कामगार सरकारी कामासाठी पाठवले जातात. यामध्ये शिंडलरचे खूप नुकसान होते. गॉथ बरोबर बोलणी करून तो पुन्हा कामगारांना बोलाबून घेतो. आता ती सर्व लोकं त्याची झालेली असतात. त्यांच्यावर होणारे अत्याचार त्याला असह्य होत असतात. ट्रक च्या ट्रक भरून लोकांना गॅस चेंबर मध्ये मारले जात असे. यामध्ये लहान मुलांनाचाही समावेश होता. काहीही करून या लोकांना आपण वाचवायचे हे त्याने ठरवले होते. यामध्ये जर पकडलो गेलो तर याचे परिणाम त्याला माहित असतात त्याला फासावरही जावे लागले असते. पण त्याची परवा तो करत नाही. सरकारी त्रासामुळे वैतागून आपली फॅक्टरी तो दुसरीकडे हलवण्याचे ठरवतो. त्यानुसार प्रत्येक कामगारामागे गॉथला एक ठराविक रक्कम देऊन सुमारे १२०० लोकांची यादी बनवतो. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुले यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे लहान मुले हि शिंडलरच्या फॅक्टरी साठी खूप उपयोगी असतात. यंत्र दुरुस्तीसाठी जिथे मोठ्यांचा हाथ जाऊ शकत नाही तिथे तो या 13-१४ वर्ष्यांच्या मुलांचा वापर करत असे. दोन रेल्वे गाड्या भरून लोकांचे स्थलांतर केले जाते.
७ ऑस्कर पटकावलेला शिंडलर्स लिस्ट :
दुसऱ्या महायुद्धावर आणि नाझींनी केलेल्या अत्याचारावर आधारित आत्तापर्यंत खूप चित्रपट बनले आहेत, त्यामध्ये ‘शिंडलर्स लिस्ट’ चे एक वेगळे स्थान आहे. स्वतः ज्यु असणाऱ्या दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग च्या कार्कीर्दीतला हा सर्वोत्तम चित्रपट आहे.
१९८२ साली शिंडलर वर आधारित 'शिंडलर्स आर्क' ही कादंबरी प्रसिद्ध झाली. हा चित्रपट त्याचाच आधार घेऊन बनवन्यात आला आहे.
१९९३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची सुरुवात दोन मेणबत्त्या प्रज्वलित करणाऱ्या एका रंगीत दृश्याने होते. थोड्याच वेळात मेणबत्त्या विझतात आणि सुरु होते एक अंधारमय कहाणी. इथून पुढे संपूर्ण चित्रपट कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) आहे. पन्नासच्या दशकात रंगीत चित्रपटांचे युग सुरु झाले असतानाही ‘शिंडलर्स लिस्ट’ ने ब्लॅक अँड व्हाईटमधेच सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. एक दोन नाही तर तब्बल सात ऑस्कर या चित्रपटाने पटकावले आहेत.
नाझी सेनेकडून ज्यूंवर होणाऱ्या अत्याचारातून, ज्यांचा मृत्यू निश्चित होता अश्या सुमारे १२०० लोकांचे प्राण वाचवणाऱ्या ऑस्कर शिंडलरच्या सत्य कथेवर आधारित हा चित्रपट आहे. ३ तास १५ मिनिटांचा चित्रपट सुन्न करून करून टाकतो चित्रपटाचा शेवटही हृदयद्रावक आहे.
दुसऱ्या महायुद्धाचे वाचन करत असताना मागच्या आठवड्यात हा चित्रपट पाहिला. अवश्य बघावा. शिंडलरने वाचवलेल्या ज्यूंचे आज ८,००० वंशज जगभरात रहात आहेत.
- प्रमोद मदाल ✒
११- ०९-२०१९
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अप्रतिम चित्रपट.
बघितलाय. अंगावर काटा येतो.
चित्रपटाची छान ओळख
मी युट्युबवर
नक्कीच
कादंबरी पैलेच
माझ्याकडे आहे. मी देईन
हा घ्या मोफत सिनेमाचा दुवा:
अनेक धन्यवाद !
भयानक होता चित्रपट .. त्याच
पिच्चर पहायची इच्छा नाही.
मराठी अनुवाद आहे का कादंबरीचा ?
हो आहे.
हो आहे
हो आहे.
धन्यवाद !
ज्युंवर अत्याचार
ज्यू नी ना तलवारीच्या बळावर
बाकी ही हिटलरी पध्द्ती
पहिल्या वेळेस जर पृथ्वी निःक्षत्रिय केली असली तर ऊरलेल्या
उपकार करा चर्चा सामुदायिक शिरकाणाची मानसिकता यावर फोकस असुदे
भावना पोहचली नाही!
+1
त्या साठी बायबलचा संर्दभ घ्यावा. रोमन राज्यकर्त्यांकडे
हिटलर हा इतका कर्मठ ख्रिश्चन
हिटलर स्वत:ला आणि जर्मन
या जूंनी ख्रिश्चन लोकांचे काय वाकडे केले होते
धर्मराज साहेब
धर्मराज साहेब
सोशल मिडियावर प्रमाणाच्या बाहेर व्यक्त होत नाही.
तीच गत बांगलादेशीयांची आहे.
सोशल मिडिया म्हणजेच सर्वस्व
अगदी. सक्तीचे सैनिकी प्रशिक्षण चुकवायला आणि सैन्यातील सक्तीच्या नोकरीचा काळ संपल्यावर बरीच इज्रायली जनता हिमाचलात कसौलमध्ये येऊन मुक्काम ठोकून असतात. मध्यंतरी पोलीस कम्प्लेन्ट्स झाल्या होत्या की भारतीय भूमीवर, तिथे कसौलमध्ये काही हॉटेल्समध्ये भारतीयांनाच सेवा द्यायला नकार मिळाला होता, फक्त इज्रायलींसाठी प्रवेश होता. उगा माज करत असतात.मलाही हे कधीच कळलं नाही कि
.
ज्यू हे तगडं व्याज आकारणी
माझ्या अल्पमाहिती नुसार, ईतर
कुठल्याही अतिटोकाच्या
प्रतिक्रिया वाचली. तुम्ही
इतिहास जेते लिहितात असे वाचून
हिटलर ज्यु द्वेष्टा होता. पण