डार्क फॅन्टसी - सुपरनॅचरल

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
9 Jul 2019 - 10:38 pm

सुपरनॅचरल मध्ये डेमन कसा निर्माण होतो ही कल्पना उत्तम दाखवली आहे .... जे माणसांचे आत्मे वाईट कर्मांमुळे नरकात जातात , त्यांना तिथे वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर केलं जातं ... इतक्या वेदना दिल्या जातात की त्यांचं माणूसपण गळून जातं आणि त्या आत्म्याचं डेमनमध्ये रूपांतर होतं . ज्याला शरीर नसतं फक्त काळ्या धुराच्या स्वरूपात त्याचं अस्तित्व असतं . डेमनमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया फार वेदनादायी असते पण एकदा डेमन झाल्यावर काही शक्ती प्राप्त होतात , अमानवी शक्ती , माणसाच्या शरीरात शिरून ते वापरणं , स्पर्श न करता वस्तू इकडच्या तिकडे करणं आणि आणखी बऱ्याच .... डेमन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत ... बहुसंख्य डेमन्स जेव्हा मानवी शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्याचे डोळे पूर्ण काळे होतात ...

सुपरनॅचरल मालिकेमध्ये क्रॉसरोड्स डेमन डील ही संकल्पना बऱ्याचवेळा वापरली आहे ... क्रॉसरोड्स डेमन्स हे हेल / नरकाचे कर्मचारी दाखवले आहेत .. त्यांचे वरचे अधिकारी म्हणजे पुरातन अधिक शक्तिशाली असे डेमन्स , त्यात प्रिन्सेस ऑफ हेल , क्नाईट्स ऑफ हेल वगैरे श्रेणी आहेत .. क्रॉसरोडस डेमन्सचे डोळे लाल असतात तर पिवळे डोळे असलेले फक्त 4 डेमन्स आहेत - प्रिन्सेस ऑफ हेल - नरकाचे राजकुमार , त्यांचं बाकीच्या सगळ्या डेमन्सवर नियंत्रण असतं ...

क्रॉसरोड्स डील म्हणजे ज्या माणसांना या प्लँचेट , स्पिरिटना आवाहन करणे , जुनी चेटूक , तंत्रमंत्र शिकवणारी पुस्तकं किंवा ऐकीव माहितीवरून या सैतानी गोष्टींमध्ये गती आहे ते लोक यश / एखादी इच्छित वस्तू मिळवा आहे 2 - 3 रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी जाऊन डेमनला आवाहन करू शकतात ... त्याची पद्धत म्हणजे अशा 2 -3 रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी मध्यभागी ( अर्थातच अशी जागा शहरी भागात नाही तर जिथे अजून काँक्रीटचे रस्ते झाले नाहीत अशाच ठिकाणी असते ) एक लहान खड्डा खणून त्यात एका लहान पेटीत आपला फोटो , काही नाणी , इतर काही वस्तू उदा . विशिष्ट झाडाची फुलं किंवा विशिष्ट प्राण्याचं विशिष्ट हाड आदी घालून त्या खड्ड्यात पुरतात ..... काहीवेळा आवाहनाचा ठराविक मंत्र उच्चारावा लागतो .

हे केलं की क्रॉसरोड्स डेमन तिथे हजर होतो ... हे डेमन्स बहुधा तरुण सुंदर मुलींची शरीरं वापरतात ( म्हणजे पझेस करतात ) .... डीलमध्ये अमाप पैसा , टॅलेंट किंवा काहीही एक गोष्ट मागता येऊ शकते . डील / करार पक्का करण्यासाठी त्या डेमनचं चुंबन घेणं हीच पद्धत आहे .... एखादेवेळी मुलगी नसली आणि पुरूषाचं शरीर असेल तरीही त्याशिवाय पर्याय नाही .

पण हा करार करून मिळवलेली ती गोष्ट उपभोगण्यासाठी फक्त 10 वर्षं मिळतात . आणि त्या बदल्यात त्या व्यक्तीला आपला आत्मा विकावा लागतो . म्हणजे ती गोष्ट मिळाल्यानंतर 10 वर्षांनी त्या व्यक्तीचा मृत्यू होणार .... त्या व्यक्तीला मारण्यासाठी नरकातले क्रूर राक्षसी कुत्रे / हेलहाऊन्ड्स पाठवले जातात ... आणि ते शरीर रक्तबंबाळ करून मृत्यू झाल्यानंतर आत्म्याला / सूक्ष्मशरीराला धरून नरकात नेतात ...

डीलची 10 वर्षं संपल्यानंतर काय होणार याबद्दल डील करणाऱ्यांना माहीती नसेल तर ती माहिती द्यायला क्रॉसरोड्स डेमन्स बांधील नसतात ... एखादा डेमन अशी जितकी डील्स महिन्याला करेल त्यावर त्याला मिळणाऱ्या सवलती वगैरे असतात ... त्यासाठी हे डेमन्स असं डील करण्यासाठी उत्सुक / डेस्परेट असणारी माणसं शोधून त्यांना मोहात पाडतात ..

उदा . या मालिकेत काहींनी केलेली डील्स म्हणजे -

एका सामान्य डॉक्टरने सर्वाधिक यशस्वी सर्जन बनण्यासाठी डील केलं , तो रातोरात टॅलेंटेड झाला . तसंच एका सामान्य आर्किटेक्टने यशासाठी डील केलं तो नावाजलेला कुशल श्रीमंत आर्किटेक्ट बनला .... एका चित्रकाराने मागताना चूक केली आणि श्रीमंतीऐवजी टॅलेंट मागितलं , तो उत्कृष्ट चित्रं काढू लागला पण ती खरेदी करण्यात कोणाला रस नव्हता त्यामुळे तो गरिबीतच राहिला ... एकीने आपली आजारी आई मृत्यू पावू नये म्हणून तर एकाने आपली प्रिय पत्नी कँसरमधून बरी व्हावी म्हणून 10 वर्षांचं डील करून आत्मा विकला .

हा असा विकलेला आत्मा हेलच्या राज्यकर्त्यांच्या प्रॉपर्टीखाली येतो ... जितके आत्मे अधिक तेवढी त्यांची शक्ती वाढते .... यातल्या बहुतेक आत्म्यांना टॉर्चर करून डेमन्स बनवलं जातं ...

या मालिकेत पत्नीच्या मृत्यूनंतर जॉन सुपरनॅचरल गोष्टींना शोधून मारणारा हंटर बनतो ... त्यात डेमन्सही येतात ... डेमन्सना ठार मारण्याचा मार्ग जॉनला माहीत नाही , पण त्यांना डेमन ट्रॅपमध्ये अडकवता येतं आणि लॅटिनमधला एक्सॉर्सिजम वाचून परत नरकात पाठवता येतं , जिथून परत यायला त्यांना बराच वेळ आणि कष्ट पडतात ...

त्याच्या पत्नीला मारणारा नरकाच्या चार प्रिन्सेसपैकी एक असलेला अतिशय शक्तिशाली असा डेमन आहे ... त्याचं नाव समजेपर्यंत त्याला यलो आईड डेमन या नावाने संबोधलं जातं ... त्याच्यावर एक्सॉर्सिजमचा काही परिणाम होणार नाही ..... जॉन त्याला मारण्याचा मार्ग शोधण्याच्या बराच जवळ पोहोचला आहे ... त्याला पूर्ण ठार मारू शकेल अशी एकमेव गन जी काही शतकांपूर्वी बनवली गेली होती आणि त्यानंतर बराच काळ बेपत्ता होती ती शोधून काढण्यात तो यशस्वी झाला आहे ...... अशा वेळी डेमन्स जॉन आणि त्याची मुलं सॅम आणि डीन यांच्या गाडीचा अपघात घडवून आणतात ... डीनला गंभीर इजा होते ... त्याला वाचवण्यासाठी जॉन स्वतः त्याच यलो आईड डेमनला आवाहन करून त्याच्याशी डील करतो ... डीनला वाचवण्याच्या बदल्यात गन त्या डेमनला द्यावी लागते शिवाय जॉनचा आत्मासुद्धा . त्याला 10 वर्षंपण मिळणार नाहीत ... डीन बरा झाला की लगेच जॉनचा मृत्यू होणार .... पण जॉन ते डील स्वीकारतो ....

तिकडे जबरदस्त दुखापत झालेला डीन आऊट ऑफ बॉडी एक्सपेरिएन्स घेत असतो ....

https://youtu.be/1ic1AvlP1bo

त्याला मृत्यू स्वीकारण्यासाठी तयार करायला आलेली रिपर / मृत्यूनंतर आत्म्याला न्यायला आलेली कर्मचारी एंजल त्याला समजावत असते .... त्याचवेळी यलो आईड डेमन म्हणजे तिने धारण केलेल्या शरीराचा ताबा घेऊन डीनला परत आपल्या शरीरात पाठवतो ,

https://youtu.be/h5j2JF_6Abg

त्याच्या सर्व इंटर्नल जखमा भरून आलेल्या असतात .. त्यानंतर डीनशी बोलून झाल्यानंतर काही वेळाने जॉन मृत अवस्थेत सॅमला आढळतो ....

https://youtu.be/xQSKQFz_MQw

कलानाट्यप्रकटनसमीक्षा

प्रतिक्रिया

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 11:08 pm | गड्डा झब्बू

रोचक परिचय

nishapari's picture

9 Jul 2019 - 11:29 pm | nishapari

धन्यवाद ....

हा आधीचा भाग आहे -

https://www.misalpav.com/node/44619

तुषार काळभोर's picture

10 Jul 2019 - 7:57 am | तुषार काळभोर

डेमन्स म्हटलं की मला पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेला रिंग आठवतो. मग काही वर्षांनी पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी पाहिला होता, तो आठवतो. मग काही वर्षांनी पॅऍ2 पाहिला होता तो आठवतो.
मग पॅऍ चे पुढचे भाग पाहायची डेरिंग नाय झाली.
म्हणजे तसं आपण घाबरत नाही, पण कशाला उगाच भुताखेताला भेटायला जायचं, म्हणून टाळतो, एवढंच!

पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी पाहिलेला नाही ... थोडे भयचित्रपट पाहिले आहेत पण भीती वाटलीच नाही ... फक्त पेट सिमेटरी मधल्या झेल्डाने पाचावर धारण बसवली ... खरं तर ते पात्र साकारलेला पुरुष अभिनेता आहे ... ज्या मेकअप आर्टिस्टने त्याचा मेकअप केला आहे तो जबरदस्त असला पाहिजे .. आजही तो सिन युट्यूब वर बघण्याचा धीर होत नाही

तुषार काळभोर's picture

10 Jul 2019 - 6:08 pm | तुषार काळभोर

पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी जरूर पाहा.
भूत, राक्षस, डेमन असलं काही दिसत नाही, त्याचं अस्तित्व दिसत राहतं.
अन भीती वाटत राहते.

सोन्या बागलाणकर's picture

11 Jul 2019 - 4:31 am | सोन्या बागलाणकर

पॅ ऍ १ चांगला होता पण बाकीचे भाग टुकार होते. पॅ ऍ १ चांगला वाटला कारण नवीन संकल्पना होती. तीच गोष्ट रिंग ची.
पण डेमन म्हटलं कि अजूनही आपला फेव्हरेट "द कॉन्जुरिंग" आणि त्यातली बेथशीबा (वलक). लय म्हणजे लयच भारी!

गामा पैलवान's picture

10 Jul 2019 - 12:47 pm | गामा पैलवान

निशापरी,

परिचय आवडला. अमेरिकेतली चौरस्त्यावरची भानामती पाहून नरेंद्र दाभोलकरांचा आत्मा सुन्न झाला असेल असेल ! की नसेल ? ! :-)

माझ्या मते दाभोलकरांनी कीर्ती मिळवण्यासाठी असंच काहीसं डील केलं असणार. ;-)

आ.न.,
-गा.पै.

टोमणा नाही ना मारत आहात ? दाभोलकरांचे इंटरव्ह्यू , भाषणं मला खूप आवडतात ... त्यांचे विचार 90 % पटतात ... वैयक्तिक आयुष्यात मी अंधश्रद्धा न मानण्याचा प्रयत्न करते .. एखाददुसरी आहे , ती जात नाही ... बाकी भूत वगैरे जोवर स्वतःच्या डोळ्याने पाहत नाही तोवर त्याचं अस्तित्व मी मान्य करत नाही .... पण लाईफ आफ्टर डेथची शक्यता पूर्ण नाकारतही नाही ... पण दुसऱ्यांच्या अनुभवांवर विश्वास बसत नाही ... जर कधी स्वतःला अनुभव आला तरच उघडपणे मान्य करेन ...

ते जाऊ द्या . सगळ्या साहित्य नाट्य यांमधल्या नऊ रसांमधले भयरस आणि अद्भुतरस हे दोन रस आहेत ... त्याची ओढ असणं यात काही वावगं नक्कीच नाही ... खऱ्या आयुष्यातल्या वास्तवापासून काही घटकांची सुटका मिळवण्यासाठीच लोक चित्रपट , कादंबरी , नाटक यांचा आश्रय घेतात .. मनोरंजनाच्या गोष्टी आणि वास्तव यातला फरक आपल्याला माहीत असला की काल्पनिक साहित्य / नाट्याचा आनंद घेण्यात काही गैर नाही .

मी धारपांच्या साहित्याची चाहती आहे . पण त्यांची पुस्तकं
वाचून भूत किंवा दुष्ट शक्तींवर माझा विश्वास बसलेला नाही ... पण काहीजण ती पुस्तकं वाचून किंवा अशा मालिका बघून या सगळ्यावर विश्वास ठेवू लागले तर ती अंधश्रद्धा होईल ...

ही मालिका शुद्ध मनोरंजनपर आहे ... युरोपियन देशांमध्ये फॅन्टसी हे जेनर इथल्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहे ... आणि त्याची अंधश्रद्धेशी कुणी गल्लत करत नाहीत ... म्हणजे वॅम्पायरचा चित्रपट पाहून कोणी घरावर क्रॉस आणि लसणाच्या माळा लावत नाहीत किंवा खिशात होली वॉटरच्या बाटल्या ठेवत नाहीत .... मनोरंजनाचा आनंद घेतात आणि टीव्ही बंद केल्यावर परत वास्तवाच्या जगाकडे वळतात ... आपल्याकडे सुद्धा सुज्ञ वाचक - प्रेक्षक ज्यांना भयकथा किंवा भयचित्रपट - मालिका आवडतात तेही मनोरंजनाच्या दृष्टीनेच पाहतात , ते सगळं खरं मानण्याएवढे बालिश / अंधश्रद्धाळू फारसे कुणी असत नाहीत .

जॉनविक्क's picture

10 Jul 2019 - 6:16 pm | जॉनविक्क

विनोदाने का असेना पण डॉक्टरसाहेबांबाबतचे विधान पचले नाही. अर्थात नो हार्ड फिलींग्स येट.

मंथळ्याच्या ष्टोर्‍या असायच्या. वाचुन ते आठवले.

गामा पैलवान's picture

10 Jul 2019 - 8:51 pm | गामा पैलवान

निशापरी,

टोमणा नाही ना मारत आहात ?

हाहाहा! टोमणाच मारतोय हो! जे 'आम्ही सारे दाभोलकर' म्हणतात त्यांना उद्देशून मारलाय.

कारण की लोकांनी देवाधर्माचं काही केलं की अनिसवाले लगेच हात धुवून मागे लागायचे. देवबिव झूट असून अंधश्रद्धा आहे. तर मग भुताराक्षसाचं काही दाखवलं ( ते ही पैसे वाजवून घेऊन ) तर ती अंधश्रद्धा नव्हे काय? का अमेरिकेतनं आलीये म्हणून ती अंधश्रद्धाच नाही?

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

10 Jul 2019 - 9:53 pm | जॉनविक्क

वा आपण देवाला मनोरंजन समजत आहात होय, मग हरकत नाही. अशा व्यक्ती कडून दाभोलकर सोडा कोणालाच काही म्हटले जात असेल तर फार मनावर घ्यायची गरजच न्हवती, असो.

गामा पैलवान's picture

11 Jul 2019 - 4:57 pm | गामा पैलवान

जॉनविक्क,

माझं सोडून द्या. दाभोलकर जर देवाला मनोरंजन समजत असते तर किती बरं पडलं असतं. उगीचंच जादूटोणा विरोधी विधेयक वगैरे आणण्याची खटपट करावी लागली नसती.

आ.न.,
-गा.पै.

आणि आपण दैवी कल्पनांच्या समाजावरील गारुडाची तुलना पाश्चिमात्यांच्या फँटसी प्रेमाशी केली म्हणून.

फॉर द रेकॉर्ड जादूटोणा विरोधी विधेयक आपण तपासले तर लक्षात येईल की किती नेमकं आहे ते.

ते विधेयक तुम्ही मुलाला हनुमान चालीसा म्हणायला लावली म्हणून गुन्हेगार ठरवत नाही तर त्याने ती म्हणावी म्हणून तुम्ही त्याला मारले , दरडवले अथवा थोडक्यात श्रध्देच्या नावाखाली समाजिक, शारीरिक वा आर्थिक शोषण केले गेले तर तो गुन्हा ठरवते. स्वतःच्या श्रद्धा जोपासायची इतकी व्यवस्थित परवानगी ज्या हुशार संताने दिली त्याने सैतानाशी डील केलं वगैरे वाचणे विनोदाने असले तरी हीन रुचीचे वाटले.

याउप्पर आणखी काही विषद करायला मलाच मर्यादा आहेत. आपले त्यात समाधान झाले नाही तर ती संपूर्णपणे माझी चूक व त्याबद्दल क्षमा.

आपणास जे वाटते ते आपण प्रतिसादावेच, ते नक्कीच वाचेन, व अप्रिशिएटही करेन.

इथेच थांबतो, धन्यवाद.

nishapari's picture

10 Jul 2019 - 10:05 pm | nishapari

जोवर लोक या गोष्टी मनोरंजनासाठी बनवलेल्या आहेत हे समजून घेऊन तेवढ्यापुरत्याच ठेवतात आणि त्या प्रत्यक्ष आयुष्यात आणत नाहीत तोवर त्याला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही असं मला वाटतं ... तसं झालं तर स्पायडरमॅन , सुपरमॅन ,ऍव्हेंजर्स , जंगल बुक बोलणारे प्राणी आदी चित्रपट आवडीने बघायला जाणाऱ्या सगळ्यांनाही अंधश्रद्धाळू म्हणावं लागेल ...

अंनिस करत असलेली कामं किंवा देत असलेले संदेश तुम्हाला आगाऊपणाचे किंवा अनावश्यक वगैरे वाटू शकतात ... पण दाभोलकरांची पुस्तकं वाचलीत तर त्यांनी खेड्यापाड्यात जाऊन तिथे अंधश्रद्धांमुळे उध्वस्त झालेली कुटुंबं पाहिली आहेत हे कळेल ... ह्या सगळ्यांचं मूळ जर देव मानणं आहे असा त्यांचा पक्का विश्वास बनला असेल आणि त्याविरुद्ध जागृती करताना जर त्यांनी काहीसा अतिरेक केला तर ते दोषी ठरतात का ? त्यांना तो अतिरेक वाटत नसेल , काळाची गरज वगैरे वाटत असेल . शिवाय दाभोलकरांनी देव मानण्यावर हल्ला चढवलेला नसून कर्मकांडाना विरोध केला आहे .. तेही समजावण्याच्या मार्गाने ... सभा - व्याख्यानं - चर्चा - बाबाबुवांना चमत्कार करून दाखवण्याचं आव्हान इत्यादी अतिशय शांततापूर्ण मार्गांनी .... कोणाच्या घरासमोर धरणी धरून विरोध केलेला नाही ... तरीही अंनिसवरचा लोकांचा क्षोभ आश्चर्यचकित करण्यासारखा आहे .. म्हणजे वेगळे विचार मांडू पाहणाऱ्या , लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिणाऱ्या लोकांना आक्रमक होऊन समोर जाणं हे परिपक्व नागरिकाचं उदाहरण नाही .... तुमच्याबद्दल नाही म्हणत आहे , युट्यूब वर दाभोलकरांना शिवीगाळ करणारी लोक दिसली आहेत , त्यांच्याबद्दल म्हणत आहे ....

दाभोलकरांचे विचार काळाच्या पुढचे असल्याने त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं . पण किमान ज्या माणसाने समाजसुधारणेच्या भानगडीत न पडता फक्त डॉक्टरीची प्रॅक्टीस
करून लाखो कमावणं शक्य असताना , महाराष्ट्र फिरून लोकांत जागृती निर्माण करण्यात हयात घालवली त्या माणसाचा हेतू स्वच्छ निर्मळ आणि निःस्वार्थी होता याबाबत तरी शंका असू नये ...

भीती वाटतीये आता एवढं डेंजर लिहिलंय तै तुम्ही. :)

गामा पैलवान's picture

11 Jul 2019 - 4:50 pm | गामा पैलवान

निशापरी,

तरीही अंनिसवरचा लोकांचा क्षोभ आश्चर्यचकित करण्यासारखा आहे

दाभोलकरांचं जादूटोणा विरोधी विधेयक इतकं भोंगळ आहे/होतं की सत्यनारायण पूजेवरही बंदी घालता आली असती. शिवाय दक्षता अधिकारी वगैरे बरेच विवादास्पद मामले होते ते वेगळेच.

म्हणून माझा प्रश्न थोड्या वेगळ्या शब्दांत मांडतो. समजा जर हे विधेयक कायद्यात रूपांतरित झालं असतं, तर उपरोक्त चित्रपटावर कारवाई झाली असती का? उत्तर होकारार्थी असेल तर हा चित्रपट निशितंच अंधश्रद्धा प्रसारक आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

13 Jul 2019 - 1:16 pm | गामा पैलवान

जॉनविक्क,

आपणास जे वाटते ते आपण प्रतिसादावेच, ते नक्कीच वाचेन, व अप्रिशिएटही करेन.

तुमच्या समजूतदारपणाबद्दल आभार! :-) माझा मुद्दा थोड्या वेगळ्या शब्दांत मांडतो.

त्याचं काय आहे की जादूटोणाविरोधी अध्यादेशात अलौकिक शक्ती, चमत्कार आणि जादूटोणा, भूतबाधा असे शब्द वारंवार येतात. मात्र त्यांच्या व्याख्या कुठेही स्पष्ट केलेल्या नाहीत. सगळा मोघम मामला आहे. जेव्हा एखादा खटला या कायद्यान्वये न्यायालयासमोर येईल तेव्हा या शब्दांचे अर्थ न्यायालयाला ठरवावे लागतील. हे अर्थ न्यायाधीशापरत्वे वेगवेगळे असू शकतात. याचसोबत त्रयस्थ व्यक्तीलाही तक्रार करायचा अधिकार दिला आहे. तसंच दक्षता अधिकारी नेमण्याची तरतूदही आहे.

आता यातनं एक पेचप्रसंग उत्पन्न होऊ शकतो. एक काल्पनिक उदाहरण देतो. या कायद्यातल्या तरतुदींच्या आधारे श्राद्धविधीमध्ये फसवणूक झाली म्हणून पुरोहितावर खटला दाखल होऊ शकतो. हा विधी न केल्यास पूर्वजांचा त्रास होईल अशी दहशत गुरुजींनी निर्माण केली असा युक्तिवाद करता येईल.

मग हाच युक्तिवाद निशापरी यांना लागू करावा काय? चित्रपटाचं परीक्षण करून त्या दहशत फैलावंत आहेत. म्हणून त्यांना दक्षता अधिकाऱ्याने अटक करावी का? विशेषत: ही वाक्ये दहशत निर्माण करणारी वाटतात :

जे माणसांचे आत्मे वाईट कर्मांमुळे नरकात जातात , त्यांना तिथे वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर केलं जातं ... इतक्या वेदना दिल्या जातात की त्यांचं माणूसपण गळून जातं आणि त्या आत्म्याचं डेमनमध्ये रूपांतर होतं

कायद्याच्या नजरेतून पाहू जाता प्रस्तुत लेखिका निशापरी आणि पुरोहित यांच्या भूमिकांत नेमका फरक काय?

आ.न.,
-गा.पै.

खरे तर प्रतिसाद देणार न्हवतो पण, आता पॉपकॉर्न घेऊनच गफ्फा हाणायच्या आहेत तर आम्हीही मैत्रीत कमी नाही.

असो, केस (मुद्दा) सुरु करूयात.

  1. तुम्हाला निशापरी यांचा धागावाचणे बंधनकारक आहे का ?

नाही, हि गोष्ट पूर्ण ऐच्छिक आहे, इथेच आपले शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक शोषण होत नाही हे सुस्पष्ट आहे.
तुम्ही त्या जे सांगतात ते सत्य माना अथवा दुर्लक्ष करा हा संपूर्णपणे आपल्या अभिव्यक्ती चा भाग आहे, शोषण नाही. शोषण = अंधश्रद्धा as simple as it is.

याधाग्यात कुठेही आपला अपमान तर सोडाच निदान तुमच्या परवानगी शिवाय तुमचा सुस्पष्ट उल्लेख तरी आहे का ? मग कायद्याचा विषयच संपला... कोर्ट एंटरटेनही करणार नाही.

हयात काही शंका नसतील तर पुढे चर्चा चालू ठेवू...

...फक्त डॉक्टरांनी सैतानाशी करार केला होता हे जरी विनोदाने केलेले विधान असले तरी त्याचा मॅग्नेट्युड त्यांच्या अंतापर्यंत पोचतो म्हणून ते विधान मनाला व्यथित करते हे समजून घ्यावे.

गामा पैलवान's picture

13 Jul 2019 - 10:56 pm | गामा पैलवान

जॉनविक्क,


याधाग्यात कुठेही आपला अपमान तर सोडाच निदान तुमच्या परवानगी शिवाय तुमचा सुस्पष्ट उल्लेख तरी आहे का ? मग कायद्याचा विषयच संपला... कोर्ट एंटरटेनही करणार नाही.

मी त्रयस्थ व्यक्ती असून लेख व/वा लेखिकेशी माझा कसलाही संबंध नाहीये, हे मान्य. पण जादूटोणा विधेयकात त्रयस्थाने कुठलाही संबंध नसतांनासुद्धा तक्रार करायची सोय होती. त्या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं नाही ही बाब वेगळी.

जर हा कायदा अस्तित्वात आला असता तर या कल्पनारंजक लेखावारही पोलिसी कारवाई मात्र खरीखुरी झाली असती. इतकंच सांगायचंय.

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

13 Jul 2019 - 11:05 pm | जॉनविक्क

"आपला" हा शब्द केवळ फक्त तुम्ही न्हवे तर कोणीही वाचक अथवा एखाद्याचा व्यक्तिगत उल्लेख अशा अर्थाने केला आहे.

आपण प्रयत्न करून पहा न्यायालय मी दिलेली करणे देऊनच धागालेखिकेवर केस एंटरटेनच करणार नाही.

तुषार काळभोर's picture

14 Jul 2019 - 10:40 am | तुषार काळभोर

आजच्या लोकसत्तात Conjuring Universe वरचा लेख आलाय.