अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग - ४ (मुलभूत घटक)

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
5 Mar 2019 - 11:50 am

अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ० - भाग - १ - भाग - २ - भाग - ३ - माझे लेखन

मागील लेखात कलनिर्मिती (Trend Formation) कशी होते? त्याबाबत थोडी माहिती आपण घेतली त्याचे चित्ररूप खाली दिले आहे.

कलनिर्मिती

वरील चित्रात दाखवलेले Accumulation आणि Distribution हे स्मार्ट लोकांकडून केले जाते असे नेहमी म्हंटले जाते हि स्मार्ट मंडळी म्हणजे कुणी अज्ञात माणसे नसतात कधी कधी आपण हि त्या स्मार्ट मंडळीमध्ये येऊ शकतो. फक्त त्यांच्या आणि आपल्यातला फरक इतकाच कि आपण अनावधानाने येतो तर ती मंडळी अभ्यासपूर्वक येतात. पार्टीसिपेशन ह्या भागात मात्र आपण असंख्य वेळा येतो कारण तिथे प्रवाहपतित झालेले बरेचजण हेलकावे खात असतात. हि माणसे प्रवाह पतित होण्यामागची कारणे अनेक असू शकतात पण मूळ कारण विनाकष्ट झटपट पैसा हे नक्कीच असू शकते. (म्हणूनच ते फारसे स्मार्ट नसतात.) मागील भागात म्हंटल्या प्रमाणे शेजाऱ्याचा बाळ्या आयटी तर माझा पण आयटीत हे अंधानुकरण पार्टीसिपेशन ह्या प्रकारात मोडते. थोडक्यात वरील चित्रात दाखवलेले Accumulation आणि Distribution आपणास फायदा करून देण्यास फार महत्त्वाचे ठरू शकते.

तांत्रिक विश्लेषण : मुलभूत गोष्टी.

मागणी आणि पुरवठा : अर्थशास्त्रीय नियमानुसार एखाद्या वस्तूचा भाव हा त्या वस्तूची बाजारातली मागणी आणि त्याचा बाजारात होणारा पुरवठा ह्यावर अवलंबून असतो. मागणी जास्त आणि पुरवठा कमी तर भाव चढे असतात आणि उलट परिस्थितीत भाव पडेल राहतात हे आपण सर्व जाणतोच. पण हा मागणी आणि पुरवठा दरवेळेस नैसर्गिक असतो का? बरेचदा तो मानवनिर्मितच असतो का ? कलनिर्मितीचा अर्थच मुळी मागणी आणि पुरवठ्याला कंट्रोल करणे आहे, म्हणजे कधी मागणी वाढवणे आणि कधी पुरवठा वाढवणे. ह्यासाठी केल्या गेलेल्या सर्व युक्त्या आणि त्याचा कंट्रोल मानवाच्याच हातात आहे.
पण कलनिर्मिती हि जशी मार्केटमध्ये दिसून येते तशी ती आपल्या मानसिकतेत पण दिसून येते. संपूर्ण जग हाव आणि भीती ह्या दोन भावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असते. आपल्या मानसिकतेवर पण ह्याच भावनांचे राज्य असते त्यामुळे मार्केटमध्ये भाव चढू लागले कि आपल्या मनात हाव निर्माण होऊन आपण खरेदी करण्यास उत्सुक नव्हे उतावीळ होतो. त्या उलट जर भाव पडू लागले तर नुकसान होण्याची भीती आपल्याला विक्रीला अधीर करते. हे आपल्या मनाचे हिंदोळे आपला वैयक्तिक कल खरेदीचा कि विक्रीचा ते ठरवायला मदत करतात पण हि मानसिक रस्सीखेच, ताणतणाव कमी करण्याचे एक साधन म्हणून टेक्निकल अॅनालिसिस मदतीला येऊ शकतो.

तर, ह्या मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे तीन प्रकारची कल निर्मिती होते.
१. अप ट्रेंड (मुख्य किंवा प्राथमिक कल )
१.१ करेक्शन (दुय्यम कल)
२. डाउन ट्रेंड (मुख्य किंवा प्राथमिक कल)
२.१ पूल बॅक (दुय्यम कल)
३. साईडवेज

१) अप ट्रेंड : बाजारातील दोन मुख्य ट्रेंडपैकी एक. ह्यात कंपनीचा, रोजचा अथवा साप्ताहिक अथवा मासिक, ज्या कुठल्या वेळेच्या चौकटीतले भाव आपण पहात असू तो भाव त्या वेळेच्या चौकटीत वरील बाजूने (१००-१०५-११०-११५ वगैरे) आणि खालील बाजूने (८०-८५-९०-९५-१०० वगैरे) उच्चतम पातळ्या तयार करताना दिसतो. करेक्शन हा ह्या मुख्य ट्रेंडमधला दुय्यम ट्रेंड म्हणून ओळखला जातो. जेव्हा नवीन उच्चतम पातळीला शिवून भाव खाली सरकतो आणि परत मुख्य ट्रेंड बरोबर प्रवास सुरु करतो तेव्हा त्या खाली सरकण्याला करेक्शन असे म्हणतात.
खालील आकृतीत दिल्या प्रमाणे

अप ट्रेंड

२) डाऊन ट्रेंड : बाजारातील दोन मुख्य ट्रेंडपैकी एक. ह्यात कंपनीचा, रोजचा अथवा साप्ताहिक अथवा मासिक, ज्या कुठल्या वेळेच्या चौकटीतले भाव आपण पहात असू तो भाव त्या वेळेच्या चौकटीत वरील बाजूने (१००-९५-९०-८५-८० वगैरे) आणि खालील बाजूने (८०-७५-७०-६५-६० वगैरे) निच्चतम पातळ्या तयार करताना दिसतो. पूलबॅक हा ह्या मुख्य ट्रेंडमधला दुय्यम ट्रेंड म्हणून ओळखला जातो. जेव्हा नवीन निच्चतम पातळीला शिवून भाव वर खेचला जातो आणि परत मुख्य ट्रेंड बरोबर प्रवास सुरु करतो तेव्हा त्या खाली सरकण्याला पूलबॅक असे म्हणतात.
खालील आकृतीत दिल्या प्रमाणे
डाऊन ट्रेंड

३) साईडवेज : एका समतोल पातळीवर भाव स्थिर राहतो त्यामुळे ट्रेंड किंवा कल तयार होत नाही. भावात वरील किंवा खालील बाजूस फारसा फरक नसतो. एकाच रेंजमध्ये भाव फिरत राहतो.
खालील आकृतीत दिल्या प्रमाणे
साईडवेज

नम्र विनंती : प्रत्येक भागात येणारी परिभाषा हि इंग्रजीतच किंवा मार्केटमधील प्रचलित शब्दांनुसार इथे वापरतो आहे. प्रत्येक शब्द मराठीत बुचकळून इथे लिहिणे केवळ अशक्य आहे. तसेच, वरील सर्व लेखांचे एक सविस्तर पुस्तक (अर्थक्षेत्र : शेअर मार्केट ) लवकरच प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे. पुस्तक अधिकाधिक योग्य आणि माहिती पूर्ण बनवण्यासाठी वरील लेखांवर आपले प्रतिसाद मला मार्गदर्शक ठरतील.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

5 Mar 2019 - 12:08 pm | मराठी_माणूस

छान समजावले आहे.

तेजस आठवले's picture

5 Mar 2019 - 9:46 pm | तेजस आठवले

चारही भाग चांगले वाटत आहेत. कृपया असेच छोटे छोटे भाग येउद्या आणि महत्वाचे म्हणजे सातत्य सोडू नका तसेच ही मालिका सुफळ संपूर्ण करा, कुठल्याही कारणाने अर्धवट सोडू नका ही विनंती.
धन्यवाद.

यशोधरा's picture

5 Mar 2019 - 10:40 pm | यशोधरा

लेख आवडला.

गोंधळी's picture

6 Mar 2019 - 7:19 pm | गोंधळी

सोप्प करुन सांगत आहात.

सोत्रि's picture

7 Mar 2019 - 11:13 am | सोत्रि

झक्कास, पुढचे लेख पटापट येऊदेत!

पुस्तकाचे मनावर घ्याच!

- (इन्व्हेस्टर) सोकाजी

मार्केट मध्ये निवडणूकीच्या अगोदरच बुल पुन्हा परत आलाय वाटतंय !!!!
ट्रम्प चे नार्थ कोरिया बद्दल धमकी चे ट्वीट , भारतातुन आयात होणाऱ्या वस्तुनां भरमसाठ टैक्स लावण्या ची धमकी या कुठलाही गोष्टिनां न घाबरता
मिडकैप सुसाट सुटले आहेत , याला घेवू का त्याला घेवू समजेनास झाले आहे !!!
FDI आणि DI वाले रोज करोडोंनी बाजारात पैसा ओतत आहेत , मोदीं पुन्हा येणार हे गृहीत धरून बाजारात पुन्हा तेजी आली आहे

हे माझे बालमत = )
जाणकार अजुन काही प्रकाश पाडतील का ?

सुबोध खरे's picture

8 Mar 2019 - 12:24 pm | सुबोध खरे

संपूर्ण जग हाव आणि भीती ह्या दोन भावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असते. आपल्या मानसिकतेवर पण ह्याच भावनांचे राज्य असते त्यामुळे मार्केटमध्ये भाव चढू लागले कि आपल्या मनात हाव निर्माण होऊन आपण खरेदी करण्यास उत्सुक नव्हे उतावीळ होतो. त्या उलट जर भाव पडू लागले तर नुकसान होण्याची भीती आपल्याला विक्रीला अधीर करते. हे आपल्या मनाचे हिंदोळे आपला वैयक्तिक कल खरेदीचा कि विक्रीचा ते ठरवायला मदत करतात पण हि मानसिक रस्सीखेच, ताणतणाव कमी करण्याचे एक साधन म्हणून टेक्निकल अॅनालिसिस मदतीला येऊ शकतो.

सोळा आणे सत्य गोष्ट

इथे खरे तर बेसिकमध्ये मोठ्ठा लोच्या आहे. technical analysis चा उपयोग guesswork कमी करण्यासाठी, ट्रेडींगला शिस्त आणण्यासाठी करतात. "ताणतणाव कमी करण्याचे एक साधन म्हणून टेक्निकल अॅनालिसिस मदतीला येऊ शकतो." हे वाचून करमणूक झाली!

सुबोध खरे's picture

8 Mar 2019 - 6:57 pm | सुबोध खरे

इथे खरे तर बेसिकमध्ये मोठ्ठा लोच्या आहे

किती जळजळ ती? उगी उगी

मानवी भावना हि सहजासहजी ना समजता येणारी गोष्ट आहे.मानवी मनाचे तांत्रिक विश्लेषण सहजासहजी करता येत नाही

हाव आणि भीती या दोन भावनामुळेच बाजार हेलकावे खात असतो आणि फडतूस बातमीमुळे बाजार एवढा का पडतो याचे कोणतेही विश्लेषण कित्येक वेळेस देता येत नाही.

यामुळेच तांत्रिक विश्लेषणावर एवढे सांगता येते कि बाजार पाडण्यासाठी भयगंड सोडला तर इतर कोणेतेही कारण नाही त्यामुळे उगाच चांगले समभाग विकून होणारे नुकसान नक्कीच थांबवता येते.

हीच स्थिती सटोडियांनी चढवत नेलेल्या समभागाबद्दल सांगता येते

शाम भागवत's picture

8 Mar 2019 - 9:01 pm | शाम भागवत

@युयुत्सु,
टेक्निकल अॅनॅलिसीस हे प्रकारचे ज्ञान आहे. ज्ञान नेहमीच मनाला आधार देते. त्याची दिशा निश्चित करते. मनाशी दिशा नक्की होणे म्हणजे एका अर्थाने ताणतणाव कमी होण्यासारखेच आहे. त्यामुळे मला तरी खूप काही वावगे लिहिल्यासारखे वाटले नाही.

इथे मी तुम्हाला विरोध करतोय असं समजू नका. मी फक्त माझे मत मांडले.

ज्ञान नेहमीच मनाला आधार देते.

हे वाक्य मला अर्धसत्य वाटते.

उदा० घेऊन स्पष्ट करतो. अतिवृष्टीचा इशारा, वाढलेला रक्तदाब, रक्तमेद किंवा रक्तशर्करा यांचे तपासणी नंतर होणारे ज्ञान, दहशतवादी हल्ल्याचा गुप्तचर यंत्रणेने दिलेला इशारा, उद्या पाणी-वीज पुरवठा बंद ही सूचना, अशी अनेक "ज्ञाने" ताणतणाव कमी न करता वाढवु शकतात. तेव्हा ज्ञानाने ताणतणाव कमी होतो असे मानणे ही एक भ्रामक कल्पना आहे. एखाद्या ज्ञानाला व्यक्ती कसा प्रतिसाद देते हे त्या व्यक्तीच्या जैविक घटनेवर (pfc आणि amygdala) अवलंबुन असते, हे त्या १% वाल्याना तरी ठाऊक असणे अपेक्षित आहे.

विषयांतर - १. अति ज्ञानाने analysis-paralysis होतो असे या क्षेत्रातील तज्ञ म्हणतात हे ठाऊक असेलच. २. हे संशोधन मला खूप महत्त्वाचे वाटते.

सुबोध खरे's picture

9 Mar 2019 - 12:24 pm | सुबोध खरे

किती तो इगो दुखावला आहे तुमचा?

जेंव्हा केंव्हा "१ %" किंवा "खरे" यावरच टिप्पणी चालू आहे.

मला वाटलं होतं कि तुम्ही प्रगल्भ पणा दाखवाल. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

अजूनही त्याच धाग्यावर आज ८.५ % मिळवले आज ९ .५ % मिळवले या सारखे बालिश प्रतिसाद देत आहात.

आपल्यासारख्या हुशार आणि उच्च शिक्षित व्यक्ती कडून समाजाची अशी अपेक्षा असते.

तेव्हा ज्ञानाने ताणतणाव कमी होतो असे मानणे ही एक भ्रामक कल्पना आहे

आपल्या वरील प्रतिसादात पण भंपक युक्तिवाद आहे.

पण त्याच्यावर चर्चा करण्याची मला मुळीच इच्छा नाही.

आपल्याला शुभेच्छा.

युयुत्सु's picture

9 Mar 2019 - 12:40 pm | युयुत्सु

अजूनही त्याच धाग्यावर आज ८.५ % मिळवले आज ९ .५ % मिळवले या सारखे बालिश प्रतिसाद देत आहात.

लोक हो,

८-१०% परताव्याचा धागा "हा सूर्य हा जयद्रथ" करण्यासाठी चालु ठेवला आहे. हे मी केलेले खरे व्यवहार आहेत. गमतीचा भाग असा की डमी व्यवहारात अजुन असा फायदा होत नाहीये.

सुबोध खरे's picture

9 Mar 2019 - 12:43 pm | सुबोध खरे

आपले कुठलेच समभाग खाली गेले नाही का?

युयुत्सु's picture

9 Mar 2019 - 3:01 pm | युयुत्सु

आपले कुठलेच समभाग खाली गेले नाही का?

माझ्याकडुन अपेक्षित असलेली "प्रगल्भता" मला जेव्हा तुमच्यामध्ये दिसेल तेव्हा या प्रश्नाचे उत्तर द्यायला मला आनंद वाटेल.

सुबोध खरे's picture

9 Mar 2019 - 6:31 pm | सुबोध खरे

हि ही हॉ हॉ हॉ हॉ

heat seeking missile

सुबोध खरे's picture

9 Mar 2019 - 12:51 pm | सुबोध खरे

२. हे संशोधन मला खूप महत्त्वाचे वाटते.

एक संशोधन तुमचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी मिळाले तर तेवढेच पुढे ढकलायचे सारखा बालिशपणा सोडून द्या.

त्याच्या विरुद्ध असणारे संशोधन ढिगाने मिळेल. एक मासला म्हणून देतो आहे.

one study of approximately 126,000 people that found that the people who frequently attended services increased their odds of living by 29 percent. Another study conducted by the National Institute for Health Care Research (NIHR) illustrated that the Canadian college students who were connected to their campus ministries visited doctors less often and were less stressed during difficult times than the other students. The students who had strong religious correlations also had higher positive feelings, lower levels of depression, and were better equipped at handling stress.
https://psychcentral.com/blog/spirituality-and-prayer-relieve-stress/

श्याम भागवत संत माणूस आणि ज्ञान नेहमीच मनाला आधार देते हे संत वचनच आहे. कारण अॅनालिसीस केल्याशिवाय, विषय समजल्याशिवाय, संदर्भहीन असं ते कधीच बोलत नाहीत असा माझा अनुभव आहे. आता संतवचनाचे निरूपण :-
रक्तदाब, रक्तशर्करा, दहशतवादी हल्ला, ऊद्या पाणी येणार नाही, दुपारी शेजारची सविता घरात एकटीच असते. हे ज्ञान ह्या सदरात मोडत नसून माहीती ह्या सदरात मोडते.
माहीती अर्धवट असू शकते, माहीती ही तणाव निर्माण करणारी असू शकते, माहीती देणारा अर्धवट असू शकतो वगैरे कारणांमुळे माहीती ही आधारयोग्य आहे का हे तपासण्यासाठी जे ज्ञान लागते ते म्हणजे टेक्निकल अॅनालिसीस असा संदर्भ होता.
तुम्हाला रक्तशर्करा रोग असणं डाॅक्टर जमातीसाठी दुग्धशर्करा योग ठरतो.
तुम्हाला रक्तशर्करा रोग झालाय हा तुमचे रक्ताचे नमुने घेऊन त्याचे विश्लेषण करून काढलेला निष्कर्ष आहे. तो निष्कर्ष काढण्यासाठी वापरलेले विश्लेषणाचे टूल हे ज्ञान आहे.
आणि त्याही पुढे जाऊन पेशंटनामक युनीटकडून एक रकमी फी घेऊन पुढचे युनीटकडे वळायचे की स्टाॅपलाॅस हीट न होऊ देता म्हणजे पेशंटला मरू न देता हळूहळू ट्रेलिंग स्टाॅप लाॅसच्या जोरावर पैसे ऊकळत रहायचे ही झाली विश्लेषकाची स्ट्रॅटेजी.
शेअरचा भाव पडलाय किंवा चढलाय ही माहीती आहे. माहीती ताणतणाव निर्माण करते कारण त्या माहीतीचे विश्लेषण कसे करायचे ह्याचे ज्ञानच आपल्याला नसते जर ते असेल तर त्याच्या आधारे आपण ताणतणाव कमी करू शकतो असा त्याचा संदर्भ होता. पण संदर्भ दुर्लक्षित करून एखाद्या वाक्यातील शब्दांचा किंवा त्या वाक्याचाच किस पाडणं ह्याला मी बौद्धिक कुंटणखाना चालवणं म्हणतो.

@युयुत्सू
तुम्ही मार्केट ह्या विषयातले डाॅक्टर (पिएचडी) आहात पण
आपण आपले आणि डाॅक्टरांचे वैयक्तिक पोटशूळ कृपया माझ्या धाग्यावर काढू नयेत ही नम्र विनंती आहे. हल्ली ज्याला कि-बोर्ड वाॅर्स म्हणतात त्याला आम्ही लहानपणापासून बौध्दिक कुंटणखाना म्हणत आलोय तो कृपा करून माझ्या धाग्यावर नका चालवू.

युयुत्सु's picture

9 Mar 2019 - 2:36 pm | युयुत्सु

"आपण आपले आणि डाॅक्टरांचे वैयक्तिक पोटशूळ कृपया माझ्या धाग्यावर काढू नयेत ही नम्र विनंती आहे."

तशी माझी पण इच्छा आहे. पण मला सैल विधाने अस्वस्थ करतात. अलिकडेच मी आमच्या आय०आय०टी० मुंबई मधल्या प्राध्यापकांना पण सोडले नव्हते.

तरी पण मी शक्य तेव्हढ्या संयमाने प्रतिसाद दिला आहे, हे आपल्या लक्षात आले असेलच. बायदवे तुम्ही ज्याला कुंटणखाना म्हणता त्याला मी शब्दमैथुन म्हणतो.

सुबोध खरे's picture

9 Mar 2019 - 6:38 pm | सुबोध खरे

माहिती, ज्ञान आणि शहाणपण यात फरक असतो हे मी माझ्या रुग्णांना नेहमीच सांगत असतो.

"ऊद्या पाणी येणार नाही, दुपारी शेजारची सविता घरात एकटीच असते" -- हि माहिती आहे

टोमॅटो किंवा भोपळा हे फळ आहे -- हे ज्ञान आहे.

परंतु ते फ्रुटसॅलड मध्ये वापरू नये -- हे शहाणपण आहे.

हे "शहाणपण" आपल्याला नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

उगाच आपल्या alma mater ची शेखी मिरवू नये.

ट्रम्प's picture

9 Mar 2019 - 9:53 pm | ट्रम्प

तुम्हा कोणा कडूनही ही अपेक्षा मुळीच नव्हती !!!
तुम्हाला क़ाय भेटते हो धाग्याच्या चिंध्या करून ? वाद घालण्या साठी चालू घडामोडी आहे ना !!! वापरा ना तिथे तुमचा शब्दसंग्रह !!!
तुमच्या सारख्या आदरणीय व्यक्तीनीं छोट्या छोट्या वादात पडून आदरणीय स्थान घालवु नये ही विनंती
/\ /\

मुळात हे पक्के लक्षात ठेवायला हवे की "कल" म्हणजे भावी कामगिरीची हमी नव्हे.

शाम भागवत's picture

9 Mar 2019 - 6:11 am | शाम भागवत

हे वाक्य एकदम बरोबर.

अनिंद्य's picture

8 Mar 2019 - 12:42 pm | अनिंद्य

लेखनाची हातोटी आवडते आहे.
अर्थक्षेत्र : शेअर मार्केट - या विषयावर पुस्तकाची कल्पना बेस्ट, माझ्या शुभेच्छा.

ट्रम्प's picture

9 Mar 2019 - 4:01 pm | ट्रम्प

ज्यांना शेअर मार्केट या विषयावर चर्चा करायची आहे त्यांनीच मते मांडावीत ना !!!! विनाकारण पाय खेचण्यात काही अर्थ नाही अस मला तरी वाटतंय .
मिपावरिल प्रत्येक धागा कुस्तीचे मैदान बनवू नका राव !!!!

टीपीके's picture

9 Mar 2019 - 8:16 pm | टीपीके

+११११११

उत्तम विषय आणि छान मांडणी. चुका नक्की दाखवून द्या आणि शंका नक्की विचारा पण प्रत्येक धागा कुस्तीचे मैदान बनवू नका !!!

युयुत्सु's picture

10 Mar 2019 - 4:21 pm | युयुत्सु

तर मंडळी

निवडणुकपूर्व रॅलीसाठी तयार आहात ना?

गेले आठ ट्रेडिंग सेशन मध्ये मी रोज सकाळी 9.15 ला intra day मध्ये अवंती फीड्स बाय करून दुपारी 2 च्या आसपास सेल करतो . मार्केट मध्ये सध्या तेजी असल्या मुळे इन्वेस्टमेंटच्या 20 % प्रॉफिट आता पर्यंत झाला आहे .

अजय देशपांडे's picture

6 Jan 2021 - 4:44 pm | अजय देशपांडे

मि उद्य खरेदि करेन

ट्रम्प's picture

10 Mar 2019 - 11:01 pm | ट्रम्प

मल्टीपल बाय / सेल आणि सेक्युरिटीज तर्फे 2.
1.5 पट अधिक रक्कम गुंतवायला भेटल्या मुळे खर म्हणजे 20 % च्या पुढे गेलो आहे .

bhagwatblog's picture

21 Aug 2019 - 6:32 pm | bhagwatblog

संपूर्ण जग हाव आणि भीती ह्या दोन भावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असते. >> जबरदस्त

अजय देशपांडे's picture

6 Jan 2021 - 4:41 pm | अजय देशपांडे

मी आत्ताच icici चे demat ac खूप दिवसांनी लोगिन केले आणि तुमचे लेख ऐकून बरे वाटले
मी आज स्टेट बँक ऑफ इंडिया चे १० शहरे घेत्तले २८२.०० ने , कृपया मला मार्गदर्शन कराल अशी आशा करतोय