अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग - ४ (मुलभूत घटक)
अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ० - भाग - १ - भाग - २ - भाग - ३ - माझे लेखन
मागील लेखात कलनिर्मिती (Trend Formation) कशी होते? त्याबाबत थोडी माहिती आपण घेतली त्याचे चित्ररूप खाली दिले आहे.
वरील चित्रात दाखवलेले Accumulation आणि Distribution हे स्मार्ट लोकांकडून केले जाते असे नेहमी म्हंटले जाते हि स्मार्ट मंडळी म्हणजे कुणी अज्ञात माणसे नसतात कधी कधी आपण हि त्या स्मार्ट मंडळीमध्ये येऊ शकतो. फक्त त्यांच्या आणि आपल्यातला फरक इतकाच कि आपण अनावधानाने येतो तर ती मंडळी अभ्यासपूर्वक येतात. पार्टीसिपेशन ह्या भागात मात्र आपण असंख्य वेळा येतो कारण तिथे प्रवाहपतित झालेले बरेचजण हेलकावे खात असतात. हि माणसे प्रवाह पतित होण्यामागची कारणे अनेक असू शकतात पण मूळ कारण विनाकष्ट झटपट पैसा हे नक्कीच असू शकते. (म्हणूनच ते फारसे स्मार्ट नसतात.) मागील भागात म्हंटल्या प्रमाणे शेजाऱ्याचा बाळ्या आयटी तर माझा पण आयटीत हे अंधानुकरण पार्टीसिपेशन ह्या प्रकारात मोडते. थोडक्यात वरील चित्रात दाखवलेले Accumulation आणि Distribution आपणास फायदा करून देण्यास फार महत्त्वाचे ठरू शकते.
२) डाऊन ट्रेंड : बाजारातील दोन मुख्य ट्रेंडपैकी एक. ह्यात कंपनीचा, रोजचा अथवा साप्ताहिक अथवा मासिक, ज्या कुठल्या वेळेच्या चौकटीतले भाव आपण पहात असू तो भाव त्या वेळेच्या चौकटीत वरील बाजूने (१००-९५-९०-८५-८० वगैरे) आणि खालील बाजूने (८०-७५-७०-६५-६० वगैरे) निच्चतम पातळ्या तयार करताना दिसतो. पूलबॅक हा ह्या मुख्य ट्रेंडमधला दुय्यम ट्रेंड म्हणून ओळखला जातो. जेव्हा नवीन निच्चतम पातळीला शिवून भाव वर खेचला जातो आणि परत मुख्य ट्रेंड बरोबर प्रवास सुरु करतो तेव्हा त्या खाली सरकण्याला पूलबॅक असे म्हणतात.
खालील आकृतीत दिल्या प्रमाणे
३) साईडवेज : एका समतोल पातळीवर भाव स्थिर राहतो त्यामुळे ट्रेंड किंवा कल तयार होत नाही. भावात वरील किंवा खालील बाजूस फारसा फरक नसतो. एकाच रेंजमध्ये भाव फिरत राहतो.
खालील आकृतीत दिल्या प्रमाणे
नम्र विनंती : प्रत्येक भागात येणारी परिभाषा हि इंग्रजीतच किंवा मार्केटमधील प्रचलित शब्दांनुसार इथे वापरतो आहे. प्रत्येक शब्द मराठीत बुचकळून इथे लिहिणे केवळ अशक्य आहे. तसेच, वरील सर्व लेखांचे एक सविस्तर पुस्तक (अर्थक्षेत्र : शेअर मार्केट ) लवकरच प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे. पुस्तक अधिकाधिक योग्य आणि माहिती पूर्ण बनवण्यासाठी वरील लेखांवर आपले प्रतिसाद मला मार्गदर्शक ठरतील.
तांत्रिक विश्लेषण : मुलभूत गोष्टी.
मागणी आणि पुरवठा : अर्थशास्त्रीय नियमानुसार एखाद्या वस्तूचा भाव हा त्या वस्तूची बाजारातली मागणी आणि त्याचा बाजारात होणारा पुरवठा ह्यावर अवलंबून असतो. मागणी जास्त आणि पुरवठा कमी तर भाव चढे असतात आणि उलट परिस्थितीत भाव पडेल राहतात हे आपण सर्व जाणतोच. पण हा मागणी आणि पुरवठा दरवेळेस नैसर्गिक असतो का? बरेचदा तो मानवनिर्मितच असतो का ? कलनिर्मितीचा अर्थच मुळी मागणी आणि पुरवठ्याला कंट्रोल करणे आहे, म्हणजे कधी मागणी वाढवणे आणि कधी पुरवठा वाढवणे. ह्यासाठी केल्या गेलेल्या सर्व युक्त्या आणि त्याचा कंट्रोल मानवाच्याच हातात आहे. पण कलनिर्मिती हि जशी मार्केटमध्ये दिसून येते तशी ती आपल्या मानसिकतेत पण दिसून येते. संपूर्ण जग हाव आणि भीती ह्या दोन भावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असते. आपल्या मानसिकतेवर पण ह्याच भावनांचे राज्य असते त्यामुळे मार्केटमध्ये भाव चढू लागले कि आपल्या मनात हाव निर्माण होऊन आपण खरेदी करण्यास उत्सुक नव्हे उतावीळ होतो. त्या उलट जर भाव पडू लागले तर नुकसान होण्याची भीती आपल्याला विक्रीला अधीर करते. हे आपल्या मनाचे हिंदोळे आपला वैयक्तिक कल खरेदीचा कि विक्रीचा ते ठरवायला मदत करतात पण हि मानसिक रस्सीखेच, ताणतणाव कमी करण्याचे एक साधन म्हणून टेक्निकल अॅनालिसिस मदतीला येऊ शकतो. तर, ह्या मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे तीन प्रकारची कल निर्मिती होते. १. अप ट्रेंड (मुख्य किंवा प्राथमिक कल ) १.१ करेक्शन (दुय्यम कल) २. डाउन ट्रेंड (मुख्य किंवा प्राथमिक कल) २.१ पूल बॅक (दुय्यम कल) ३. साईडवेज १) अप ट्रेंड : बाजारातील दोन मुख्य ट्रेंडपैकी एक. ह्यात कंपनीचा, रोजचा अथवा साप्ताहिक अथवा मासिक, ज्या कुठल्या वेळेच्या चौकटीतले भाव आपण पहात असू तो भाव त्या वेळेच्या चौकटीत वरील बाजूने (१००-१०५-११०-११५ वगैरे) आणि खालील बाजूने (८०-८५-९०-९५-१०० वगैरे) उच्चतम पातळ्या तयार करताना दिसतो. करेक्शन हा ह्या मुख्य ट्रेंडमधला दुय्यम ट्रेंड म्हणून ओळखला जातो. जेव्हा नवीन उच्चतम पातळीला शिवून भाव खाली सरकतो आणि परत मुख्य ट्रेंड बरोबर प्रवास सुरु करतो तेव्हा त्या खाली सरकण्याला करेक्शन असे म्हणतात. खालील आकृतीत दिल्या प्रमाणे
याद्या
41733
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
छान समजावले आहे.
चारही भाग चांगले वाटत आहेत.
लेख आवडला.
पु. भा. प्र.
झक्कास, पुढचे लेख पटापट
एकदम छान !!!! येवूद्या लवकर !! लवकर !!!
संपूर्ण जग हाव आणि भीती ह्या
इथे खरे तर बेसिकमध्ये मोठ्ठा
In reply to संपूर्ण जग हाव आणि भीती ह्या by सुबोध खरे
इथे खरे तर बेसिकमध्ये मोठ्ठा
In reply to इथे खरे तर बेसिकमध्ये मोठ्ठा by युयुत्सु
@युयुत्सु,
In reply to इथे खरे तर बेसिकमध्ये मोठ्ठा by युयुत्सु
ज्ञान नेहमीच मनाला आधार देते.
In reply to @युयुत्सु, by शाम भागवत
किती तो इगो दुखावला आहे तुमचा
In reply to ज्ञान नेहमीच मनाला आधार देते. by युयुत्सु
अजूनही त्याच धाग्यावर आज ८.५
In reply to किती तो इगो दुखावला आहे तुमचा by सुबोध खरे
आपले कुठलेच समभाग खाली गेले
In reply to अजूनही त्याच धाग्यावर आज ८.५ by युयुत्सु
आपले कुठलेच समभाग खाली गेले
In reply to आपले कुठलेच समभाग खाली गेले by सुबोध खरे
हि ही हॉ हॉ हॉ हॉ
In reply to आपले कुठलेच समभाग खाली गेले by युयुत्सु
हि ही हॉ हॉ हॉ हॉ
heat seeking missile२. हे संशोधन मला खूप
In reply to ज्ञान नेहमीच मनाला आधार देते. by युयुत्सु
ज्ञान नेहमीच मनाला आधार देते
In reply to ज्ञान नेहमीच मनाला आधार देते. by युयुत्सु
"आपण आपले आणि डाॅक्टरांचे
In reply to ज्ञान नेहमीच मनाला आधार देते by ज्ञानव
माहिती, ज्ञान आणि शहाणपण यात
In reply to ज्ञान नेहमीच मनाला आधार देते by ज्ञानव
बस करा राव आता !!!!
In reply to माहिती, ज्ञान आणि शहाणपण यात by सुबोध खरे
मुळात हे पक्के लक्षात ठेवायला
In reply to @युयुत्सु, by शाम भागवत
हे वाक्य एकदम बरोबर.
In reply to मुळात हे पक्के लक्षात ठेवायला by युयुत्सु
लेखनाची हातोटी आवडते आहे.
साधा आणि सोपा विषय !!!!!
+११११११
In reply to साधा आणि सोपा विषय !!!!! by ट्रम्प
तर मंडळी
गेले आठ ट्रेडिंग सेशन मध्ये
मि पन उद्या प्र्यत्न करेन
In reply to गेले आठ ट्रेडिंग सेशन मध्ये by ट्रम्प
मल्टीपल बाय / सेल आणि
जबरदस्त
धागा आवडला अजून माहिती येवूदे