[शशक' १९] - 'आई......' नावाची हाक

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
2 Feb 2019 - 12:07 pm

"तुमच्या शेजारचं घर घेतलंय. थोडी माहिती हवी होती?"

"मी एकटीच असते. चौकशा दुसरीकडे करा."

"आई....... मी या गावातच नवीन आहे. कुठे जाणार?"

"आई?!!! हम्म! कोण बरं हाक मारायचं ही??? कुठचा तू? घरी कोण असतं?"

"मुंबई. घरी फक्त आई. आता इथे सेट झालो की आणीन तिला."

"अरे? एकटाच आहेस इथे? ये आत!"

….........."रामभाऊ, परवा जानकीआक्का गेल्या. मुलगा परदेशात गेल्यानंतर आक्का खुळावल्या. गावाचं नाव टाकलं. आण्णा गेल्यानंतर त्यांना पोहोचवून आलेल्या मंडळींना देखील दार उघडलं नव्हतं. परवा तिथून जाताना दार उघडं बघून आत डोकावलं; आक्का जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या होत्या. काही नातं नसूनही अंतिम विधी आम्हीच केले. लेकाला कसं कळवणार? कुठे असतो कोणास ठाऊक?"

प्रतिक्रिया

एमी's picture

2 Feb 2019 - 12:28 pm | एमी

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2019 - 2:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ठीकय. नो मार्क्स. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

मोहन's picture

2 Feb 2019 - 2:54 pm | मोहन

+१

ज्योति अळवणी's picture

2 Feb 2019 - 6:35 pm | ज्योति अळवणी

आवडली

जव्हेरगंज's picture

2 Feb 2019 - 7:07 pm | जव्हेरगंज

+१ जमलीये!!

खिलजि's picture

2 Feb 2019 - 7:49 pm | खिलजि

कथेत आई असल्याने , भावना मी जश्या घेतल्या तश्याच साठवल्या ..

किसन शिंदे's picture

3 Feb 2019 - 12:04 am | किसन शिंदे

नीटशी कळाली नाही दोनदा वाचूनही.

दारावर आलेल्या अनोळखी व्यक्तीने खून केला आहे त्या वृद्धेचा.

प्रचेतस's picture

4 Feb 2019 - 10:27 am | प्रचेतस

हेच वाटतंय.

चांदणे संदीप's picture

3 Feb 2019 - 8:28 am | चांदणे संदीप

+१

Sandy

वकील साहेब's picture

3 Feb 2019 - 1:13 pm | वकील साहेब

मला या कथेचा वेगळाच अर्थ उमगला आणि तो असा की,
हा कथानायक अपरिचित ठिकाणी (परदेशात )अपरिचित स्त्रीला आई म्हणतोय. पण त्याच्या घरी (मुंबईत) त्याची सख्खी आई त्याच्या आठवणीत मरण पावते याची त्याला खबरही नाही.

हा अर्थदेखील रोचक आहे. पण
> ….........."रामभाऊ, परवा जानकीआक्का गेल्या. मुलगा परदेशात गेल्यानंतर आक्का खुळावल्या. गावाचं नाव टाकलं. आण्णा गेल्यानंतर त्यांना पोहोचवून आलेल्या मंडळींना देखील दार उघडलं नव्हतं. परवा तिथून जाताना दार उघडं बघून आत डोकावलं; आक्का जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या होत्या. काही नातं नसूनही अंतिम विधी आम्हीच केले. लेकाला कसं कळवणार? कुठे असतो कोणास ठाऊक?" >
हे बोलणं, वर्णन मुंबईतले, परदेशात मुलगा जाऊ शकेल अशा घरातले वाटत नाहीय.
बघू स्पर्धेचा निकाल लागल्यावर लेखक स्वतःच सांगतील त्यांना काय अपेक्षीत होतं.

विजुभाऊ's picture

4 Feb 2019 - 9:48 am | विजुभाऊ

हा हे बरोबर.
पण खून केला वगैरे असे काही वाटत नाही.
मुलगा कुठे असतो हे पटतय

प्रचेतस's picture

4 Feb 2019 - 10:27 am | प्रचेतस

+१

विनिता००२'s picture

4 Feb 2019 - 11:03 am | विनिता००२

मला वाटते की शेजारच्या नवीन भाडेकरुने अंतिमसंस्कार केले.

श्वेता२४'s picture

5 Feb 2019 - 4:46 pm | श्वेता२४

.

मराठी कथालेखक's picture

5 Feb 2019 - 7:39 pm | मराठी कथालेखक

आक्का खुळावल्या म्हणजे त्यांना फक्त मुलाचा ध्यास लागला , त्यामुळे मुलगा सोडून कुणाला घरातही घेत नव्हत्या अगदी गावतले -ओळखीचे असले तरी.
नवीन आलेल्या शेजारच्याने सहजच 'आई' म्हणून हाक मारली तर त्याला मात्र मायेने घरात घेतले , विचारपूस केली... हेच ते खुळावणं
बाकी खून झाला असेल असं वाटत नाही. विमनस्क अवस्थेत मृत्यु झाला असावा इतकंच.
माझा +१

लौंगी मिरची's picture

5 Feb 2019 - 10:06 pm | लौंगी मिरची

कळली नाहि :(

टर्मीनेटर's picture

8 Feb 2019 - 8:19 pm | टर्मीनेटर

आवडली!

विजुभाऊ's picture

12 Feb 2019 - 12:48 pm | विजुभाऊ

+१ असे न लिहिले नसेल तर तो प्रतिसाद स्पर्धेसाठी ग्रुहीत धरला जाईल का

लेखिकेने कथा एक्सप्लेन करावी किंवा कोणत्या प्रतिसादातला अर्थ बरोबर आहे सांगावे.