Skip to main content

[शशक' १९] - 'आई......' नावाची हाक

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 02/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
"तुमच्या शेजारचं घर घेतलंय. थोडी माहिती हवी होती?" "मी एकटीच असते. चौकशा दुसरीकडे करा." "आई....... मी या गावातच नवीन आहे. कुठे जाणार?" "आई?!!! हम्म! कोण बरं हाक मारायचं ही??? कुठचा तू? घरी कोण असतं?" "मुंबई. घरी फक्त आई. आता इथे सेट झालो की आणीन तिला." "अरे? एकटाच आहेस इथे? ये आत!" ….........."रामभाऊ, परवा जानकीआक्का गेल्या. मुलगा परदेशात गेल्यानंतर आक्का खुळावल्या. गावाचं नाव टाकलं. आण्णा गेल्यानंतर त्यांना पोहोचवून आलेल्या मंडळींना देखील दार उघडलं नव्हतं. परवा तिथून जाताना दार उघडं बघून आत डोकावलं; आक्का जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या होत्या. काही नातं नसूनही अंतिम विधी आम्हीच केले. लेकाला कसं कळवणार? कुठे असतो कोणास ठाऊक?"

वाचने 8397
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

ठीकय. नो मार्क्स. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

+१

आवडली

कथेत आई असल्याने , भावना मी जश्या घेतल्या तश्याच साठवल्या ..

+१ Sandy

मला या कथेचा वेगळाच अर्थ उमगला आणि तो असा की, हा कथानायक अपरिचित ठिकाणी (परदेशात )अपरिचित स्त्रीला आई म्हणतोय. पण त्याच्या घरी (मुंबईत) त्याची सख्खी आई त्याच्या आठवणीत मरण पावते याची त्याला खबरही नाही.

In reply to by वकील साहेब

हा अर्थदेखील रोचक आहे. पण > ….........."रामभाऊ, परवा जानकीआक्का गेल्या. मुलगा परदेशात गेल्यानंतर आक्का खुळावल्या. गावाचं नाव टाकलं. आण्णा गेल्यानंतर त्यांना पोहोचवून आलेल्या मंडळींना देखील दार उघडलं नव्हतं. परवा तिथून जाताना दार उघडं बघून आत डोकावलं; आक्का जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या होत्या. काही नातं नसूनही अंतिम विधी आम्हीच केले. लेकाला कसं कळवणार? कुठे असतो कोणास ठाऊक?" > हे बोलणं, वर्णन मुंबईतले, परदेशात मुलगा जाऊ शकेल अशा घरातले वाटत नाहीय. बघू स्पर्धेचा निकाल लागल्यावर लेखक स्वतःच सांगतील त्यांना काय अपेक्षीत होतं.

हा हे बरोबर. पण खून केला वगैरे असे काही वाटत नाही. मुलगा कुठे असतो हे पटतय

+१

आक्का खुळावल्या म्हणजे त्यांना फक्त मुलाचा ध्यास लागला , त्यामुळे मुलगा सोडून कुणाला घरातही घेत नव्हत्या अगदी गावतले -ओळखीचे असले तरी. नवीन आलेल्या शेजारच्याने सहजच 'आई' म्हणून हाक मारली तर त्याला मात्र मायेने घरात घेतले , विचारपूस केली... हेच ते खुळावणं बाकी खून झाला असेल असं वाटत नाही. विमनस्क अवस्थेत मृत्यु झाला असावा इतकंच. माझा +१

आवडली!