[शशक' १९] - ते दोघे

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 Feb 2019 - 12:22 pm

व्यक्ती १ - रोज सराईतपणे दोघातीघांना "कापणे" हे त्याचे काम होते
व्यक्ती २ - रोज दोघातीघांवर "संस्कार" करणे हे त्याचे काम होते

व्यक्ती १ - थंड डोक्याने थंड वातावरणात नित्यनेमाने आपले कर्म करत होता
व्यक्ती २ - निरपेक्ष भावाने अग्नीच्या सान्निध्यात नित्यनेमाने आपले धर्मपालन करत होता

व्यक्ती १ - एखाद्या कसायाला लाजवेल इतक्या सराईतपणे तो कलेजी काढत असे
व्यक्ती २ - एखाद्या आचाऱ्यास लाजवेल इतक्या सराईतपणे तो गोळे बनवत असे

एकाच समाजातील दोन व्यक्ती ,एक धर्मीय , एक जातीय , आडनाव बंधुसुद्धा ! पण एकास समाजात मानमरातब नि प्रतिष्ठा आणि दुसऱ्यास भीतीयुक्त आदर नि हेटाळणी

एक होता किरवंत - पं(पी)डित गुरुजी

दुसरा होता शवविच्छेदनतज्ञ - डॉ पंडित

@ भारतीय समाज

# उच्चवर्णीय अस्पृश्यता

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

11 Feb 2019 - 12:32 pm | विनिता००२

+१

विजुभाऊ's picture

11 Feb 2019 - 1:39 pm | विजुभाऊ

-१
काथ्याकूट म्हणून ठीक आहे.
पण कथा म्हणून काहीच सांगितलेले नाहिय्ये
कथेसाठी कथानक आवश्यक असायला हवे

जव्हेरगंज's picture

11 Feb 2019 - 8:34 pm | जव्हेरगंज

-१

कथा वाटलीच नाही.

खिलजि's picture

11 Feb 2019 - 8:45 pm | खिलजि

खरंच नाही जमलीय ...काहीतरी वेगळं मांडण्याच्या आग्रहास्तव धक्कातंत्र राहून गेले आहे . मी काही यातील तज्ञ् नाही पण माझं मत मांडत आहे ..

तुषार काळभोर's picture

11 Feb 2019 - 9:25 pm | तुषार काळभोर

न्यूट्रल
हे कथेच्या स्वरूपात नक्की मांडता येईल. शब्द जरा कमी जास्त होतील, पण बघा एकदा. मस्त कथा पोटेनशियल आहे.

ज्योति अळवणी's picture

12 Feb 2019 - 5:10 pm | ज्योति अळवणी

विषय चांगला आहे

वन's picture

13 Feb 2019 - 10:12 am | वन

+१.

स्वधर्म's picture

13 Feb 2019 - 12:12 pm | स्वधर्म

कथा नाही.

सुधीर कांदळकर's picture

13 Feb 2019 - 8:42 pm | सुधीर कांदळकर

लाडू कशाचे वळतो कळले नाही. जोड्या लावल्या असे वाटले. चर्मकार टाके घालतो, सर्जन टाके घालतो. सुरात स्क्रू पिळतो - ऑर्थोपेडीक सर्जनही स्क्रू पिळतो. वडार छिनी चालवतो - शिल्पकार्/सोनार छिन्नी चालवतो अशा बर्‍याच जोड्या लावता येतील.

सुधीर कांदळकर's picture

13 Feb 2019 - 8:44 pm | सुधीर कांदळकर

पिळतो

विअर्ड विक्स's picture

28 Feb 2019 - 11:10 am | विअर्ड विक्स

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. निकाल जाहीर झाला असल्यामुळे आता कथेचा उलगडा करतोय , जो मी या पूर्वी करणे जाणीवपूर्वक टाळले .

पहिल्या तीन प्रसंगातून पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती हि कथा आहे एक कसाई व एका ब्राह्मणाची , त्या तीन प्रसंगानंतर घृणा कोणाच्या नशिबी आणि मान कोणाच्या नशिबी याचा वाचकांनी अंदाज बांधला असेल , शव विच्छेदन नि किरवंत हि ओळख हा या कथेचा पंच होता जो काहींना समजला तर काहींना नाही वा मी पंच ताकदवान करण्यात पडलो. असो जर नि तर ला अर्थ नाही .

गोळे करण्यात कुशल होता म्हणजे पिंड बनवण्यात !!!!! नि किरवंत हा मर्तिकाचे काम करणाऱ्या ब्राह्मणास म्हणतात ....