Skip to main content

[शशक' १९] - ते दोघे

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/02/2019 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्ती १ - रोज सराईतपणे दोघातीघांना "कापणे" हे त्याचे काम होते व्यक्ती २ - रोज दोघातीघांवर "संस्कार" करणे हे त्याचे काम होते व्यक्ती १ - थंड डोक्याने थंड वातावरणात नित्यनेमाने आपले कर्म करत होता व्यक्ती २ - निरपेक्ष भावाने अग्नीच्या सान्निध्यात नित्यनेमाने आपले धर्मपालन करत होता व्यक्ती १ - एखाद्या कसायाला लाजवेल इतक्या सराईतपणे तो कलेजी काढत असे व्यक्ती २ - एखाद्या आचाऱ्यास लाजवेल इतक्या सराईतपणे तो गोळे बनवत असे एकाच समाजातील दोन व्यक्ती ,एक धर्मीय , एक जातीय , आडनाव बंधुसुद्धा ! पण एकास समाजात मानमरातब नि प्रतिष्ठा आणि दुसऱ्यास भीतीयुक्त आदर नि हेटाळणी एक होता किरवंत - पं(पी)डित गुरुजी दुसरा होता शवविच्छेदनतज्ञ - डॉ पंडित @ भारतीय समाज # उच्चवर्णीय अस्पृश्यता

वाचने 4690
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

+१

-१ काथ्याकूट म्हणून ठीक आहे. पण कथा म्हणून काहीच सांगितलेले नाहिय्ये कथेसाठी कथानक आवश्यक असायला हवे

खरंच नाही जमलीय ...काहीतरी वेगळं मांडण्याच्या आग्रहास्तव धक्कातंत्र राहून गेले आहे . मी काही यातील तज्ञ् नाही पण माझं मत मांडत आहे ..

न्यूट्रल हे कथेच्या स्वरूपात नक्की मांडता येईल. शब्द जरा कमी जास्त होतील, पण बघा एकदा. मस्त कथा पोटेनशियल आहे.

विषय चांगला आहे

लाडू कशाचे वळतो कळले नाही. जोड्या लावल्या असे वाटले. चर्मकार टाके घालतो, सर्जन टाके घालतो. सुरात स्क्रू पिळतो - ऑर्थोपेडीक सर्जनही स्क्रू पिळतो. वडार छिनी चालवतो - शिल्पकार्/सोनार छिन्नी चालवतो अशा बर्‍याच जोड्या लावता येतील.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. निकाल जाहीर झाला असल्यामुळे आता कथेचा उलगडा करतोय , जो मी या पूर्वी करणे जाणीवपूर्वक टाळले . पहिल्या तीन प्रसंगातून पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती हि कथा आहे एक कसाई व एका ब्राह्मणाची , त्या तीन प्रसंगानंतर घृणा कोणाच्या नशिबी आणि मान कोणाच्या नशिबी याचा वाचकांनी अंदाज बांधला असेल , शव विच्छेदन नि किरवंत हि ओळख हा या कथेचा पंच होता जो काहींना समजला तर काहींना नाही वा मी पंच ताकदवान करण्यात पडलो. असो जर नि तर ला अर्थ नाही . गोळे करण्यात कुशल होता म्हणजे पिंड बनवण्यात !!!!! नि किरवंत हा मर्तिकाचे काम करणाऱ्या ब्राह्मणास म्हणतात ....