[शशक' १९] - निर्णय

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
8 Feb 2019 - 12:46 am

" आता २७ दिवस ICUत झाले आहेत. गेले ७ दिवस व्हेंटीलेटरवर. तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या."
"अस कस म्हणतोस तू. परवा किडनी काम करत नाही म्हणालास , आणि सकाळी परत सुरु झाली न."
"मी उपचार सुरू ठेवतो, तुम्हीच बघा. घरचाच पेशंट म्हणून सांगतोय. चांगले ९५ वर्षे आयुष्य जगले आहे. "
आईची नजर मिटींग सुरू झाल्यापासून शुन्यात.
ताईच्या डोळ्यातले पाणी खळत नव्हते.
"किती लागले रे आत्ता पर्यंत?"
"११ लाख"
"बंड्या, स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतात" अण्णांचे नेहमीचे वाक्य आठवले आणि तिरीमिरीतच उठून ICUत त्यांच्या जवळ गेलो.
नेहमीसारखा हाक मारुन अण्णांच्या डोक्यावरुन हात फिरवला. थंडगार स्पर्शाने चर्र झाले.
मॉनिटरवरची सरळ रेष अण्णांचा निर्णय सांगत होती .

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

8 Feb 2019 - 5:25 am | प्रमोद देर्देकर

" आणि सकाळी परत सुरु झाली न." याचा अर्थ लागत नाहीये
बाकी कथा आवडली
+१

हरवलेला's picture

8 Feb 2019 - 6:35 am | हरवलेला

+1

श्वेता२४'s picture

8 Feb 2019 - 8:16 am | श्वेता२४

आवडली

पलाश's picture

8 Feb 2019 - 9:30 am | पलाश

+१.

राजाभाउ's picture

8 Feb 2019 - 10:52 am | राजाभाउ

+१

सिद्धार्थ ४'s picture

8 Feb 2019 - 11:17 am | सिद्धार्थ ४

+१

किडणीच्या कामाचं तंत्र असं चालतं का, ह्याबाबत संभ्रम आहे - कथास्वातंत्र्य मान्य करूनही - त्यामुळे ते सोडता, कथा आवडली पण मत ग्राह्य धरू नये.

ज्योति अळवणी's picture

9 Feb 2019 - 5:22 pm | ज्योति अळवणी

आवडली

तुषार काळभोर's picture

9 Feb 2019 - 7:35 pm | तुषार काळभोर

मागच्या महिन्यात एक खूप जवळच्या कुटुंबात असा प्रसंग पाहिलाय. एक नातेवाईक ( ७२ वय),
तीन आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवून ६-८ लाख घालवून मग घरी नेण्यात आले. तीन दिवसांनी वारले. तीन आठवडे व्हेंटिलेटरवर आशा कमी जास्त होण्याचा खेळ चालला होता. रोज घरातलं कोणीतरी भेटायला जायचं. रुग्णाच्या मुलाचा चेहरा रोज उत्साही असायचा. 'आज हाकेला प्रतिसाद दिला', 'आज डोळे उघडले होते', उत्साहात सांगायचा. तोच तीन आठवडे सर्व काम सोडून जवळ थांबलेला. शेवटी त्यानेच निर्णय घेतला.
दुसरा भाऊ, बहीण घरी नेण्याच्या विरोधात होते. 'नाही न्यायचं, उपचार नाही थांबवायचे, अजून प्रयत्न करू'. पण पहिला भाऊ निर्णयावर ठाम राहिला.

नूतन's picture

10 Feb 2019 - 10:00 am | नूतन

+1

असहकार's picture

13 Feb 2019 - 4:39 pm | असहकार

+१

या कथेला पहिला नंबर मिळावा
+1

नँक्स's picture

16 Feb 2019 - 5:51 pm | नँक्स

+१

Ganes Gaitonde's picture

16 Feb 2019 - 7:06 pm | Ganes Gaitonde

+1

भीमराव's picture

16 Feb 2019 - 10:20 pm | भीमराव

रांचो's picture

19 Feb 2019 - 9:35 pm | रांचो

+१

उपाशी बोका's picture

23 Feb 2019 - 7:08 am | उपाशी बोका

+१