" आता २७ दिवस ICUत झाले आहेत. गेले ७ दिवस व्हेंटीलेटरवर. तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या."
"अस कस म्हणतोस तू. परवा किडनी काम करत नाही म्हणालास , आणि सकाळी परत सुरु झाली न."
"मी उपचार सुरू ठेवतो, तुम्हीच बघा. घरचाच पेशंट म्हणून सांगतोय. चांगले ९५ वर्षे आयुष्य जगले आहे. "
आईची नजर मिटींग सुरू झाल्यापासून शुन्यात.
ताईच्या डोळ्यातले पाणी खळत नव्हते.
"किती लागले रे आत्ता पर्यंत?"
"११ लाख"
"बंड्या, स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतात" अण्णांचे नेहमीचे वाक्य आठवले आणि तिरीमिरीतच उठून ICUत त्यांच्या जवळ गेलो.
नेहमीसारखा हाक मारुन अण्णांच्या डोक्यावरुन हात फिरवला. थंडगार स्पर्शाने चर्र झाले.
मॉनिटरवरची सरळ रेष अण्णांचा निर्णय सांगत होती .
वाचने
5862
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
" आणि सकाळी परत सुरु झाली न."
+1
+ 1
+१.
+१
+१
किडणीच्या कामाचं तंत्र असं
+१
+१
छान
+१
या कथेला पहिला नंबर मिळावा +1
+१
+1
१
+१
+१