उद्योग/व्यापार : प्रस्तावना

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
24 Nov 2018 - 8:33 pm

मराठी माणूस उद्योग/व्यापारात मागे का? ह्या विषयावर आजपर्यंत शेकडो-हजारो लेख, व्याख्याने आणि भाषणे झाली आहेत. असे लेख लिहिणारे आणि व्याख्याने-भाषणे देणाऱ्यांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता प्रामुख्याने ज्यांनी आयुष्यात कधीच उद्योग/व्यापार केला नाही असे लोकं तसेच व्याख्याने किंवा भाषणे देणे हाच ज्यांचा उद्योग आहे असे “लोकां सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या सदरातील लोकं आणि पु.ल. देशपांडेंनी 'पुणेकर,मुंबईकर कि नागपूरकर?' मध्ये म्हंटल्या प्रमाणे " दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्‍हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते. पुढे ते सिंध्या-बिंध्याला विकावे. जागेच्या पागडीत उरलेल्या आयुष्याची सोय होते, आणि आपण , "महाराष्ट्र व्यापारात मागे का?" या विषयावर भाषण द्यायला मोकळे!" अशा मनोवृत्तीची माणसे आघाडीवर होती.

काही दशकांपूर्वीची परिस्थितीही वेगळी होती. अनेक अपत्ये असलेल्या सर्वसामान्य मराठी कुटुंबांमध्ये, मुलाचे शालेय/कॉलेज शिक्षण पूर्ण झाले कि त्याने मिळेल ती नोकरी पत्करून कुटुंबास आर्थिक हातभार लावावा आणि स्थिरस्थावर होऊन स्वतःच्या संसारात रमावे असा मतप्रवाह होता. अनेकांनी त्या काळीही प्रवाहाच्या विरुध्द पोहण्याचा प्रयत्न केला, त्यातले काही जण तरले तर बरेचसे बुडाले. दुर्दैवाने यशस्वी लोकांची गाथा सांगून मुलाबाळांना उद्योग धंद्यासाठी प्रेरित करण्या ऐवजी अपयशी लोकांची उदाहरणे देऊन उद्योग/व्यापारात पडण्यापेक्षा ठराविक तारखेला पगाराची रक्कम हाती पडणारी नोकरी बरी हे त्यांच्या मनावर बिंबवण्याची मानसिकता प्रबळ होती.
अर्थात ह्याचा अर्थ नोकरी करणे वाईट असा अजिबात नाही. पिढीजात उद्योग/व्यापारात आघाडीवर असलेल्या गुजराथी, मारवाडी, सिंधी, पंजाबी/शिख, पारशी समाजातली लोकही नोकरी करतातच, पण त्यांचे आणि मराठी समाजाचे उद्योग/व्यापारातील प्रमाण ह्यात प्रचंड तफावत आहे.

सुदैवाने आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. कुटुंबांचा आकार लहान झाल्याने आणि आई-वडील दोघेही कमवत असल्याने शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या लगेच मुला/मुलीं वर कमावते होण्यासाठीचा दबाव पूर्णपणे नसला तरी बऱ्याच अंशी कमी झाला आहे. अनेकांना हवे तेवढे शिकण्याची मुभा मिळत आहे, तर कित्येकांना स्वतःच्या उद्योग व्यवसायात स्थिरावण्याची संधी मिळत आहे. नवरा बायको दोघेही नोकरी करत असतील तर परस्पर सामंजस्याने त्यापैकी कोणी एक नोकरी सोडून शेती वा उद्योग धंद्याकडे वळत आहेत, तर प्रेमविवाह करणारे आधीच सर्व नियोजन करून विवाहबंधनात अडकत असल्याने मुलगा/मुलगी सरकारी वा खाजगी नोकरी करणारीच हवी अशा अटीही शिथिल होत आहेत. आणि उद्योग धंद्याकडे वळण्यात मराठी कुटुंबांतील पुरुषांचेच नव्हे तर स्त्रियांचे वाढते प्रमाणही आशादायक आहे. ई-कॉमर्सचा (ऑनलाईन शॉपिंग) पायाही दिवसेंदिवस भक्कम होऊन त्याची व्याप्ती वाढत असल्याने ब्रॅंडेड वस्तूंप्रमाणेच गृहोद्योगात/ कुटीरोद्योगात तयार होणाऱ्या वस्तूंनाही देशभराची बाजारपेठ खुणावत आहे.

व्यापार/ उद्योग लहान असो कि मोठा तो कायदेशीरपणे करण्यासाठी काही औपचारिकता पूर्ण करणे गरजेचे असते, तसेच सरकार दरबारी त्याची नोंदणी अनेक स्वरूपांत करता येते. कोणत्या स्वरुपात उद्योग/व्यापाराची नोंदणी करायची हे त्याचा आकार, त्यात सहभागी लोकांची संख्या, भांडवलाची आवश्यकता अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

भारतात सर्वसाधारणपणे खालील स्वरुपात उद्योग/व्यापाराची नोंदणी करता येते:

  • प्रोप्रायटरशीप (Proprietorship / Sole Proprietorship)
  • पार्टनरशीप (Partnership)
  • वन पर्सन कंपनी (One Person Company / OPC)
  • लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशीप (Limited Liability Partnership / LLP)
  • प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Private Limited Company)
  • पब्लिक लिमिटेड कंपनी (Public Limited Company)

याव्यतिरिक्त काही विशेष स्वरुपात देखील नोंदणी करता येते जसे कि:

  • निधी कंपनी (Nidhi Company)
  • प्रोड्युसर कंपनी (Producer Company)
  • सेक्शन ८ कंपनी (Section 8 Company)

ह्या लेख मालिकेतील पुढच्या भागांमध्ये वर उल्लेख केलेल्या स्वरूपांत उद्योग/व्यापाराची नोंदणी प्रक्रिया, त्यांची वैशिष्ठे, फायदे-तोटे तसेच आवश्यक नोंदणी प्रमाणपत्रे (MSME), जी.एस.टी. (GST / Goods & Services Tax) वगैरेंची विस्ताराने माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.

टर्मीनेटर

मांडणीअर्थकारणप्रकटन

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

24 Nov 2018 - 8:51 pm | बाबा योगिराज

पुढिल भागांची वाट बघतोय.

कुमार१'s picture

24 Nov 2018 - 9:10 pm | कुमार१

पु भा प्र

अनन्त अवधुत's picture

24 Nov 2018 - 9:11 pm | अनन्त अवधुत

पुढील भागाची वाट बघतोय. पु ले शु!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2018 - 9:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

फार महत्वाचा विषय निवडला आहात. ही मालिका फार माहितीपूर्ण असेल याची झलक या भागातच दिसली. या विषयातील अनेक समज-गैरसमज व शंका-कुशंका दूर होतील अश्या प्रकारे अगदी विस्ताराने पुढचे भाग लिहावे.

अभ्या..'s picture

24 Nov 2018 - 9:18 pm | अभ्या..

एक नंबर विषय,
येउंद्या जोरात.

बाबा योगिराज, कुमार१, अनन्त अवधुत आपले मनःपूर्वक आभार.

डॉ सुहास म्हात्रे, अभ्या.. धन्यवाद _/\_
डॉक्टर साहेब तुमच्या सुचनेप्रमाणे लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन.

उगा काहितरीच's picture

24 Nov 2018 - 9:41 pm | उगा काहितरीच

वा ! अतिशय चांगला विषय. लेख माहितीपुर्ण झाला . आगामी मालिकाही चांगली होईल अशी आशा ठेवतो. शुभेच्छा !

डँबिस००७'s picture

24 Nov 2018 - 9:45 pm | डँबिस००७

टर्मिनेटर ,

धन्यवाद एका चांगला धागा काढल्या बद्दल !

भारतात माईक्रो लेव्ललला जबरदस्त ट्रांस्फॉर्मेशन होत आहे . समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या बदलाला सामोर जाताना स्वतःला बदलणे अपेक्षित आहे ! सुशिक्षित लोकांनी ह्या संधी फायदा उचलला पाहिजे.

भारतात नविन नोकर्या निर्माण होत
नाही म्हणुन सरकारला बोल लावणे सोडायला पाहिजे कारण ते सरकारचे काम नाही ! कोणत्याही प्रकारची कंपनी चालवणे सरकारचे काम नाही कारण कंपनी नफ्यात चालण्यासाठी कॉस्ट कंट्रोल महत्वाचा , नफ्यात नसलेली कंपनी नाहीशी होते !

सतिश गावडे's picture

24 Nov 2018 - 10:40 pm | सतिश गावडे

भारतात माईक्रो लेव्ललला जबरदस्त ट्रांस्फॉर्मेशन होत आहे . समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या बदलाला सामोर जाताना स्वतःला बदलणे अपेक्षित आहे ! सुशिक्षित लोकांनी ह्या संधी फायदा उचलला पाहिजे.

कोणते ट्रांस्फॉर्मेशन? कोणते बदल? कोणती संधी? जरा सविस्तर लिहाल का?

भारतात माईक्रो लेव्ललला जबरदस्त ट्रांस्फॉर्मेशन होत आहे . समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या बदलाला सामोर जाताना स्वतःला बदलणे अपेक्षित आहे ! सुशिक्षित लोकांनी ह्या संधी फायदा उचलला पाहिजे.

खरं आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून बदलांना सामोरं गेलं तर स्वयंरोजगारा बरोबरच रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण करण्या साठी खूप स्कोप आहे.

श्वेता२४'s picture

25 Nov 2018 - 12:07 am | श्वेता२४

नोकरिसोबतच एक छोटा उद्योग सुरु केला आहे. आता जरा स्थिरस्थवर होतोयत त्यात. त्यामुळे याच्याशी सम्बंधित कायदेशीर बाबी समजल्या तर बरंच आहे. पु. भा. प्र

टवाळ कार्टा's picture

25 Nov 2018 - 2:34 am | टवाळ कार्टा

उत्तम

कंजूस's picture

25 Nov 2018 - 5:46 am | कंजूस

छान!

वरुण मोहिते's picture

25 Nov 2018 - 9:45 am | वरुण मोहिते

वाचत आहे.

श्वेता २४, टवाळ कार्टा, कंजुस, वरूण मोहिते - धन्यवाद.

पिंगू's picture

25 Nov 2018 - 10:31 am | पिंगू

वाह. खूपच छान सुरुवात. मी सुद्धा या प्रक्रियेतून गेलेलो आहेच आणि आता नविन काही करण्याच्या प्रयत्नात आहे.

धन्यवाद पिंगू, तुमच्या प्रयत्नाला सुयश लाभो ही सदीच्छा...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Nov 2018 - 12:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ऊत्तम रे टर्मिनेटरा.
विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून असणे (नेट्वर्क बनवणे) हे धंदा करण्याचा मुख्य पाया आहे असे आमचे मत. बीकानेर्/जैसलमेरमधील एखाद्या मारवड्याला कोथरूडमध्ये कोणता गाळा रिकामा आहे हे कसे कळते? कारण एकच- नेटवर्क. गुजराती/मारवाडी व्यापार्यांचे देशभर जबरदस्त नेटवर्क असते. विविध माध्यमांतर्फे
फक्त आणी फक्त आपल्याच समाजातील लोकाना ही माहिती हे लोक पुरवतात. मग अगदी कमी व्याजावर कर्ज देणे पासून स्थानिक पोलिस्/सरकारी अधिकार्यांशी भेट घडवून आणणे.. हे सोप्स्कार पार पाडले जातात.
"गुणवत्ता असेल तर टिकेल् " ह्या गोष्टी फक्त बोलायच्या असतात. तेव्हा हे नेटवर्क कसे बनवता येईल ह्याचाही विचार व्हावा.

टर्मीनेटर's picture

27 Nov 2018 - 11:12 am | टर्मीनेटर

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.

मार्मिक गोडसे's picture

25 Nov 2018 - 1:59 pm | मार्मिक गोडसे

तेव्हा हे नेटवर्क कसे बनवता येईल ह्याचाही विचार व्हावा.
सर्वात महत्त्वाचे,परंतू सर्वात कठीण काम.

टर्मीनेटर's picture

27 Nov 2018 - 11:22 am | टर्मीनेटर

नेटवर्क बनवणे हे महत्वाचे आहेच. आता सोशल मिडिया तळागाळापर्यंत पोचल्याने ते बनवणे तसे कठीणही राहिले नाहीये, प्रश्न आहे तो समाजातील प्रत्येक घटकाच्या ईच्छाशक्तीचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा.

कंजूस's picture

25 Nov 2018 - 2:42 pm | कंजूस

माहितीचा स्रोत ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Nov 2018 - 3:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

माहिती घेउन थेवतो , पुढे कामाला येईल :)

खुप छान माहिती, पुढील भागाची वाट पाहत आहे

पद्मावति's picture

25 Nov 2018 - 9:40 pm | पद्मावति

मस्तच. पु.भा.प्र.

गामा पैलवान's picture

26 Nov 2018 - 1:11 am | गामा पैलवान

सतिश गावडे,

कोणते ट्रांस्फॉर्मेशन? कोणते बदल? कोणती संधी? जरा सविस्तर लिहाल का?

मी जे सांगतोय त्याचा संदर्भ माझ्याकडे नाही. भाऊ तोरसेकरांनी याचा उल्लेख केला होता.

ते कुठल्याशा वाहिनीवरील एक चर्चासत्र पहात होते. त्यात एक प्रशासकीय उच्चपदस्थ (निवृत्त?) अधिकारी महिला होती. ती आजच्या प्रशासनासमोरील सर्वात मोठ्या आव्हानाविषयी सांगत होती. ती म्हणाली की लोकं आपणहून पुढे येताहेत, पण प्रशासन त्यांची मागणी पुरी करतांना तोकडं पडतंय. People are coming forward to volunteer, but the administration does not know how to handle great surge in demand.

हेच ते स्थित्यंतर आहे. याचा एक परिणाम म्हणजे मोदींची फेरनिवड. जो माणूस आपणहून पुढाकार घेतोय, त्याचं मत मोदींकडेच जाणार आहे. अन्यथा त्यानं घेतलेला पुढाकार कचऱ्याच्या डब्यात जाईल.

आ.न.,
-गा.पै.

कागदपत्रे, परवानग्या, संभाव्य करआकारणी, फॅाम्स भरणे हासुद्धा व्यापा उदीमाचा एक महत्त्वाचा भाग आहेच आणि लेखाचा उद्देश तो आहे. पण एकदा तो धंधा सुरू झाला की कोळ्यासारखं भक्ष आणि भक्षक दोघांवर लक्ष ठेवावं लागतं ( गिऱ्हाइक आणि स्पर्धक.) शिवाय बदलते हवामान. या दुसऱ्या बाबतीत नवशिके कमी पडू शकतात पण तो एक वेगळा विषय आहे.

मेधा..'s picture

26 Nov 2018 - 10:32 am | मेधा..

व्यापार अथवा उद्योग यासाठी लागणारी अधिकृत माहिती आता याठिकाणी मिळेल.याशिवाय अनेकांना उद्योगाची प्रेरणा मिळेल असे वाटतेय.

अनिंद्य's picture

26 Nov 2018 - 11:03 am | अनिंद्य

मालिका वाचणार !

सुंदर विषय आणि विषयाला अनुरूप सुरुवात .. आता पुढील लेखमालिकेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तेव्हा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा ...

अथांग आकाश's picture

26 Nov 2018 - 1:38 pm | अथांग आकाश

वाचतोय! चांगला विषय! पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे!

दुर्गविहारी's picture

26 Nov 2018 - 6:32 pm | दुर्गविहारी

उत्तम विषय घेतला आहे. पु.भा.प्र.

रघुनाथ.केरकर's picture

27 Nov 2018 - 10:28 am | रघुनाथ.केरकर

खुप नविन महिति मिळाली.

राजेंद्र मेहेंदळे, जेडी, पद्मावति, मेधा.., अनिंद्य, खिलजि, अथांग आकाश, दुर्गविहारी आणि रघुनाथ.केरकर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

पुढच्या भागांचे सत्वर मनावर घ्या बंधो !

माफी असावी, पण काही समस्यांमुळे पुढचे भाग लिहिण्यास खूप उशीर झाला आहे.
नुकतेच कुमार१ सरांनी लिहिल्या प्रमाणे पुढचा भाग टाकत नाही तर प्रकाशित करतो...
कळावे, लोभ असुद्या...