उद्योग/व्यापार : प्रस्तावना
लेखनप्रकार (Writing Type)
मराठी माणूस उद्योग/व्यापारात मागे का? ह्या विषयावर आजपर्यंत शेकडो-हजारो लेख, व्याख्याने आणि भाषणे झाली आहेत. असे लेख लिहिणारे आणि व्याख्याने-भाषणे देणाऱ्यांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता प्रामुख्याने ज्यांनी आयुष्यात कधीच उद्योग/व्यापार केला नाही असे लोकं तसेच व्याख्याने किंवा भाषणे देणे हाच ज्यांचा उद्योग आहे असे “लोकां सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या सदरातील लोकं आणि पु.ल. देशपांडेंनी 'पुणेकर,मुंबईकर कि नागपूरकर?' मध्ये म्हंटल्या प्रमाणे " दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते. पुढे ते सिंध्या-बिंध्याला विकावे. जागेच्या पागडीत उरलेल्या आयुष्याची सोय होते, आणि आपण , "महाराष्ट्र व्यापारात मागे का?" या विषयावर भाषण द्यायला मोकळे!" अशा मनोवृत्तीची माणसे आघाडीवर होती.
काही दशकांपूर्वीची परिस्थितीही वेगळी होती. अनेक अपत्ये असलेल्या सर्वसामान्य मराठी कुटुंबांमध्ये, मुलाचे शालेय/कॉलेज शिक्षण पूर्ण झाले कि त्याने मिळेल ती नोकरी पत्करून कुटुंबास आर्थिक हातभार लावावा आणि स्थिरस्थावर होऊन स्वतःच्या संसारात रमावे असा मतप्रवाह होता. अनेकांनी त्या काळीही प्रवाहाच्या विरुध्द पोहण्याचा प्रयत्न केला, त्यातले काही जण तरले तर बरेचसे बुडाले. दुर्दैवाने यशस्वी लोकांची गाथा सांगून मुलाबाळांना उद्योग धंद्यासाठी प्रेरित करण्या ऐवजी अपयशी लोकांची उदाहरणे देऊन उद्योग/व्यापारात पडण्यापेक्षा ठराविक तारखेला पगाराची रक्कम हाती पडणारी नोकरी बरी हे त्यांच्या मनावर बिंबवण्याची मानसिकता प्रबळ होती.
अर्थात ह्याचा अर्थ नोकरी करणे वाईट असा अजिबात नाही. पिढीजात उद्योग/व्यापारात आघाडीवर असलेल्या गुजराथी, मारवाडी, सिंधी, पंजाबी/शिख, पारशी समाजातली लोकही नोकरी करतातच, पण त्यांचे आणि मराठी समाजाचे उद्योग/व्यापारातील प्रमाण ह्यात प्रचंड तफावत आहे.
सुदैवाने आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. कुटुंबांचा आकार लहान झाल्याने आणि आई-वडील दोघेही कमवत असल्याने शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या लगेच मुला/मुलीं वर कमावते होण्यासाठीचा दबाव पूर्णपणे नसला तरी बऱ्याच अंशी कमी झाला आहे. अनेकांना हवे तेवढे शिकण्याची मुभा मिळत आहे, तर कित्येकांना स्वतःच्या उद्योग व्यवसायात स्थिरावण्याची संधी मिळत आहे. नवरा बायको दोघेही नोकरी करत असतील तर परस्पर सामंजस्याने त्यापैकी कोणी एक नोकरी सोडून शेती वा उद्योग धंद्याकडे वळत आहेत, तर प्रेमविवाह करणारे आधीच सर्व नियोजन करून विवाहबंधनात अडकत असल्याने मुलगा/मुलगी सरकारी वा खाजगी नोकरी करणारीच हवी अशा अटीही शिथिल होत आहेत. आणि उद्योग धंद्याकडे वळण्यात मराठी कुटुंबांतील पुरुषांचेच नव्हे तर स्त्रियांचे वाढते प्रमाणही आशादायक आहे. ई-कॉमर्सचा (ऑनलाईन शॉपिंग) पायाही दिवसेंदिवस भक्कम होऊन त्याची व्याप्ती वाढत असल्याने ब्रॅंडेड वस्तूंप्रमाणेच गृहोद्योगात/ कुटीरोद्योगात तयार होणाऱ्या वस्तूंनाही देशभराची बाजारपेठ खुणावत आहे.
व्यापार/ उद्योग लहान असो कि मोठा तो कायदेशीरपणे करण्यासाठी काही औपचारिकता पूर्ण करणे गरजेचे असते, तसेच सरकार दरबारी त्याची नोंदणी अनेक स्वरूपांत करता येते. कोणत्या स्वरुपात उद्योग/व्यापाराची नोंदणी करायची हे त्याचा आकार, त्यात सहभागी लोकांची संख्या, भांडवलाची आवश्यकता अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते.
भारतात सर्वसाधारणपणे खालील स्वरुपात उद्योग/व्यापाराची नोंदणी करता येते:
- प्रोप्रायटरशीप (Proprietorship / Sole Proprietorship)
- पार्टनरशीप (Partnership)
- वन पर्सन कंपनी (One Person Company / OPC)
- लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशीप (Limited Liability Partnership / LLP)
- प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Private Limited Company)
- पब्लिक लिमिटेड कंपनी (Public Limited Company)
- निधी कंपनी (Nidhi Company)
- प्रोड्युसर कंपनी (Producer Company)
- सेक्शन ८ कंपनी (Section 8 Company)
प्रतिक्रिया
आवडिचा विशय
चांगला उपक्रम
चांगल्या विषयावरील लेखमाला
फार महत्वाचा विषय निवडला आहात
ब्येस्टच अगदी
बाबा योगिराज, कुमार१, अनन्त अवधुत आपले मनःपूर्वक आभार.
डॉ सुहास म्हात्रे, अभ्या.. धन्यवाद _/\_
वा ! अतिशय चांगला विषय. लेख
टर्मिनेटर ,
भारतात माईक्रो लेव्ललला
उगा काहितरीच, डँबिस००७ धन्यवाद _/\_
अत्यन्त उपयुक्त लेख
उत्तम
छान!
चांगला विषय.
श्वेता २४, टवाळ कार्टा, कंजुस, वरूण मोहिते - धन्यवाद.
वाह. खूपच छान सुरुवात. मी
धन्यवाद पिंगू, तुमच्या प्रयत्नाला सुयश लाभो ही सदीच्छा...
उत्तम
धन्यवाद माईसाहेब _/\_
तेव्हा हे नेटवर्क कसे बनवता
@ मार्मिक गोडसे
माहितीचा स्रोत ?
मस्त विषय
खुप छान माहिती, पुढील भागाची
मस्तच. पु.भा.प्र.
बदलता भारत
कागदपत्रे, परवानग्या, संभाव्य
मस्त विषय आहे
मालिका वाचणार !
सुंदर विषय आणि विषयाला अनुरूप
वाचतोय!
उत्तम विषय घेतला आहे. पु.भा
खुप छान
राजेंद्र मेहेंदळे, जेडी, पद्मावति, मेधा.., अनिंद्य, खिलजि,
पुढच्या भागांचे सत्वर मनावर
माफी असावी, पण काही समस्यांमुळे पुढचे भाग लिहिण्यास