इझी, पिझी! नारळाची बर्फी!

पद्मावति's picture
पद्मावति in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H
इझी, पिझी! नारळाची बर्फी!

चिवडा, चकली, करंज्या, अनरसे, लाडू ... फराळातली ही मातबर मंडळी खमंग भाजून, सारणाने भरून आणि तेलातुपात तळून आता सज्ज झाली असतील, हो ना? घरोघरी खरेदीची धांदल, पै-पाहुण्यांची गडबड सुरू झाली असेल. उटण्याचा सुगंध, रांगोळीचे रंग, पणत्यांची आरास आणि भरगच्च भरलेले फराळाचे ताट! या फराळात भर म्हणून एक अतिशय सोपी आणि पटकन होणारी पाककृती आज आपण पाहणार आहोत. आपली नेहमीचीच नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी!

साहित्य -
२ वाट्या खोवलेला नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट
१ वाटी साखर
१ चमचा तूप
वेलची पूड किंवा जायफळाची पूड

.

कढईत तूप गरम करून खोबरे थोडे भाजून घ्या. मी डेसिकेटेड कोकोनट वापरला होता. वडीचा ज्यांना रंग पांढरा शुभ्र आवडतो, त्यांनी खोबरे भाजताना रंग बदलणार नाही याची काळजी घ्यावी. मला जरा सोनेरी रंग आवडतो, त्यामुळे मी जरा जास्त भाजते.

.

त्यात साखर आणि किंचित पाणी टाकून शिजवत ठेवा. साधारण पाव वाटीच्याही कमीच पाणी टाकावे सुरुवातीला. मग वाटले तर थोडे टाकता येईल आणखी.
साधारणपणे १० ते १५ मिनिटातच मिश्रण कोरडे व्हायला लागेल.

.

मिश्रणात आता जायफळ पूड किंवा वेलची पूड टाका. केशरही टाकू शकता. एका थाळीला आता तुपाचा हात लावून घ्या. नारळ आणि साखरेच्या मिश्रणाचा गोळा त्या थाळीत चांगला थापून घ्या. हे करताना हाताला तूप लावावे आणि गरम असतानाच थापावे.

.

एखाद तासात सुरीने वड्या कापून घ्या. कमीत कमी वेळात आणि कमीत कमी गोष्टींमध्ये बनणाऱ्या या वड्या आहेत. येता-जाता अगदी सहज पटकन करण्यासारखा हा प्रकार आहे.

.

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा __/\__

.

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

6 Nov 2018 - 11:38 am | सविता००१

प्रचंड आवडणारा पदार्थ. कधीही, कुठेही खाउ शकते

पाककृती आवडली. फोटोज पण छान.

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 3:50 pm | तुषार काळभोर

किसलेल्या नारळाची नेहमीच असते, एकदा खोवलेल्या नारळाची करायला सांगून बघतो.

मस्त दिसते आहे नारळाची बर्फी!

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2018 - 9:29 am | प्राची अश्विनी

करून बघेन नक्की.

स्वाती दिनेश's picture

7 Nov 2018 - 3:46 pm | स्वाती दिनेश

वडी उचलून तोंडात टाकावीशी वाटते आहे. ही एकदम आवडती वडी..
स्वाती

मुक्त विहारि's picture

7 Nov 2018 - 3:56 pm | मुक्त विहारि

तोंपासू...

टर्मीनेटर's picture

7 Nov 2018 - 5:15 pm | टर्मीनेटर

आवडता पदार्थ.
माझी मावशी त्यात बीट पण किसून घालते. रंग मस्त येतो पण टिकाऊ नसल्याने लगेच संपवावी लागते

खूप सुंदर व सोपी रेसिपी व त्याचे फोटो पण. नाहीतरी प्रत्येक घरात या ना त्या कारणाने अनेक नारळ फोडले जातात व फोडलेल्या नारळाची रवानगी मात्र शेंडी सहित फ्रिज मध्ये केली जाते आणि अडचणीत आणखीन भर....., असेना का, या रेसीपी मुळे ही बर्फी मात्र वारंवार करायला व खायला आवडेल.

नूतन सावंत's picture

8 Nov 2018 - 10:48 pm | नूतन सावंत

मस्त,मस्त

शैलेन्द्र's picture

9 Nov 2018 - 8:47 pm | शैलेन्द्र

एकदम सुरेख,

फोटोला 100 पैकी 220 मार्क

जुइ's picture

10 Nov 2018 - 11:35 pm | जुइ

झटपट होणार्‍या वड्या आवडल्या. करून बघायच्या यादीत आणखीन एक भर. फोटो खूप छान आलेत!

मित्रहो's picture

11 Nov 2018 - 6:36 pm | मित्रहो

मला नारळाची बर्फी आवडते नेहमी विकतच घ्यावी लागते.

पाककृती आवडली. तोंडाला पाणी सुटले आहे....
मस्त.

कुमार१'s picture

15 Nov 2018 - 7:34 pm | कुमार१

नारळाची बर्फी!

नँक्स's picture

17 Nov 2018 - 12:37 pm | नँक्स

पाककृती आवडली

पियुशा's picture

30 Nov 2018 - 1:12 pm | पियुशा

वाह वाह !

मदनबाण's picture

1 Dec 2018 - 4:17 pm | मदनबाण

आवडेश...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chogada... :- Loveyatri

पद्मावति's picture

1 Dec 2018 - 4:28 pm | पद्मावति

अनेक धन्यवाद सर्वांना __/\__