दिवाळी अंक २०१८
ट्रायोपॉनिक्स : स्वयंपूर्ण अन्ननिर्मितीची गुरुकिल्ली
अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात. अन्नपाण्यावाचून जीवन नाही आणि निर्जिवांना वस्त्र आणि निवारा यांची गरज नसल्याने मानवाच्या उत्पत्तीपासून त्यांत अन्नाचा क्रमांक सर्वात पहिलाच राहिला आहे.
जॉर्जची कहाणी - George - Be Who you Are
"यंदाचं आपल्या स्कूल डिस्ट्रिक्टचं OBOB बहुतेक रद्द होईल..." जेनी, माझ्या मुलाच्या मित्राची आई शाळांना सुट्ट्या लागताना भेटली तेव्हा सांगत होती. "तुला त्या वादग्रस्त पुस्तकाबद्दल माहीत असेलच." "नाही अजून" मी पुटपुटले. हे एक मॉरमॉन कुटुंब असल्याने काय वादग्रस्त असू शकेल याचा मला साधारण अंदाज आलाच.
क्र क्रोएशियाचा!
भारत-पाक हॉकी सामन्याचा थरार
डियर ममा..
डियर ममा,
आज बर्याच दिवसांनी मी तुला हे पत्र लिहीत आहे. जरासं खुट्ट वाजलं की फोन करणार्या आपल्या लेकीकडून चक्क पत्र आलंय, हे पाहून तुझ्या वर जाणार्या भुवया आताच मला दिसल्या आणि त्यांच्या खालच्या डोळ्यांत एक काळजीची लहरसुद्धा तरळताना दिसली मला! आहेच मुळी माझी मम्मी अशी... कशी? ते नाही नक्की सांगता येणार, पण नक्कीच 'वर्ल्ड्स बेस्ट'! ही ही ही!
गुळपापडीच्या वड्या
नमस्कार मिपाकर मंडळी,
बघता बघता दिवाळी आलीसुद्धा! घरोघरी फराळाचा खमंग सुगंध दरवळत असेल ना! गोड-तिखट फराळाच्या यादीत मी आज आणखी एका गोडाची भर टाकतेय. म्हटली तर सोपी, म्हटली तर कठीण अशी एक पाककृती आपण बघणार आहोत. सोपी यासाठी की घरात हमखास असलेल्या पदार्थांमधून ही पाककृती बनवता येते. कठीण यासाठी की ही पाककृती बर्याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही.
ग्राहकहिताय सद्रक्षणाय
आमचे पहिले, स्वतःचे घर बुक केले ते ७ जुलै १९८६ला. माझ्या नावावर. तोपर्यंत आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. विरारला, पार्ल्याच्या परांजपे बिल्डर्सच्या, सेंट्रल पार्क या प्रोजेक्टमध्ये. अर्थात वन रूम किचन. किंमत कागदोपत्री रुपये ८७,०००/- + आणि ब्लॅकचे रुपये १८०००/- फक्त.
खाली डोकं वर पाय!
चकली
दिवाळीच्या फराळात चकली ही अगदी हवीच हवी. पण हवी तेव्हा चकलीची भाजणी उपलब्ध न होणार्या ठिकाणी राहिल्यावर कुठली चकली नि काय..
एकदा असाच चकलीचा खमंग विषय चालला असता माझ्या भावजयीने तिच्या आईच्या - डॉ. दीपा कोल्हटकरांच्या ह्या रेसिपीने केलेल्या चकल्या खाल्ल्यावर भाजणीचा हा प्रश्न सुटला.
तर ह्या बिनभाजणीच्या चकल्यांसाठीचे साहित्य -
१ वाटी तेल, १ वाटी मैदा, १ वाटी बेसन किवा फुटाण्याचे डा़ळे, ४ वाट्या तांदळाचे पीठ.
ओवा, मीठ, तिखट, तीळ - चवीनुसार