प्रजासत्ताक दिन परेड - दिल्ली - २६ जानेवारी २०१८

मोदक's picture
मोदक in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H
प्रजासत्ताक दिन परेड - दिल्ली - २६ जानेवारी २०१८

डिसेंबरमधल्या मॅरेथॉन भटकंतीचे प्लॅन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कधीतरी बनवून झाल्यावर 'आता पुढे काय?' हा विचार सुरू होता. अगदी काहीच प्लॅन झाले नाही, तर बडोद्याला जाऊन उत्तरायण बघायचे, असे ठरवले. तितक्यात लक्षात आले की २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन परेड असते.. ती बघता येईल.

मग परेडला लागणार्‍या तिकिटाच्या अनुषंगाने शोधाशोध सुरू झाली. दिल्लीच्या एक-दोन ठिकाणांचा पत्ता मिळाला, पण नक्की माहिती मिळत नव्हती. बरीच फोनाफोनी केल्यावर नेमका माणूस सापडला. त्याने काहीही खळखळ न करता संपूर्ण माहिती दिली व "आपको यहां आके ही टिकिट लेना पडेगा", "ऑनलाइन कुछ नहीं होता है" वगैरे वगैरे माहिती दिली. फक्त तिकीट घेण्यासाठी दिल्लीला जाणे म्हणजे आणखी ४ दिवस फुकट गेले असते. एक बॅडमिंटन पार्टनर आणि नंतर UPSC पास करून दिल्लीत असलेला एक मित्र नेमका तिकीट वगैरे मिळवण्याच्या दरम्यान दिल्लीबाहेर होता. मग चुपचाप डिफेन्स मिनिस्ट्रीतल्या मित्रांना शरण गेलो. त्यांनी सगळे ऐकून घेतले आणि हसत हसत "आप दिल्ली आनेका टिकीट बुक कराइये, हम पास का इंतजाम कर देंगे" असे सांगितले.

मिपाकर सुकामेव्याला विचारले, तर तोही लगेचच तयार झाला.

यथावकाश सुकामेव्यानेच तिकिटे वगैरे बुक केली.

निघण्यापूर्वी कळले की मिपाकर नाजुक पाटीलही परेडसाठी दिल्लीला जाणार आहेत. आमची विमाने एकाच वेळी सुटणार होती. मग सकाळी विमानतळावर नाजुकरावांची भेट घेतली.

दिल्लीला पोहोचलो आणि सर्वप्रथम ऑफिसमध्ये जाऊन पास ताब्यात घेतले.

.

एन्ट्री पासबरोबर एक त्रिकोणी पास दिला होता, जो गाडीच्या विंडस्क्रीनवर लावण्यासाठी होता. सोबत सरकारी हिंदीत छापलेले एक माहितीपत्रकही होते.

चाणक्यपुरी, लोककल्याण मार्ग आणि संपूर्ण दूतावासवाल्या भागात चौकाचौकात अशी सजावट केली होती.

.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठून ५ वाजता बाहेर पडलो, कारण जितके लवकर परेडच्या ठिकाणी पोहोचू, त्यावर पुढची जागा मिळणे अवलंबून असणार होते.

चाणक्यपुरीतल्या रस्त्यावरील थंडी आणि धुके..

.
.

'बैठने की व्यवस्था'चे बोर्ड जागोजागी लावलेले होते.

.

आम्हाला बसण्यासाठी दुसर्‍याच रांगेत जागा मिळाली. खुर्च्या आणि कुंपण यात भरपूर जागा शिल्लक होती - नंतर गर्दी वाढल्यानंतर तेथे भारतीय बैठक व्यवस्थेत प्रेक्षकांना बसू दिले गेले.

राजपथावर दोन्ही बाजूंनी मोठमोठे झेंडे आणि देशप्रेम व्यक्त करणारी गाणी मोठ्या आवाजात लावली होती. सकाळी थंडीत अनेक ट्रूप राजपथावर इकडून तिकडे वावरत होते.

.

घोडे, उंट वगैरे प्राणी मार्च करत गेले की त्यांनी टाकलेली लीद गोळा करण्यासाठी सफाई कामगारांची एक तुकडीही त्या त्या ट्रूपमागे चालत लगेच राजपथाची साफसफाई करत होती.

परेड सुरू होण्यास भरपूर वेळ होता, म्हणून मी खुर्चीवर बसल्या बसल्या त्या कोलाहलातच झोप काढली.

तासाभराने डोळे उघडले, तेव्हा लख्ख उजाडले होते आणि आजूबाजूला भरपूर गर्दी जमली होती.

आमच्या स्टँडमध्ये अशी गर्दी जमली होती.

.

पंतप्रधानांचा ताफा आला आणि वातावरण बदलले.

राष्ट्रपतींच्या तैनातीत असलेली ६१ कॅव्हलरीची एक तुकडी राजपथावर आली. आंम्ही मेन डायसपासून डाव्या बाजूला असल्याने कॉमेंट्री ऐकत ऐकत काय सुरू असेल याचा अंदाज घेत होतो.

.

लगेचच राष्ट्रपती आले. त्यांचा शानदार ताफा आणि पुढे-मागे असलेल्या गाड्या बघून फोटो काढण्याऐवजी तो नजारा बघणेच जास्त आवडले.

आसियान देशांचे राष्ट्रपती / पंतप्रधान हे या परेडचे पाहुणे होते. त्यामुळे भारतीय सेनेचे एक बँडपथक आसियान देशांचे झेंडे घेऊन आले.

यानंतर परेडचा मुख्य भाग.. वेगवेगळे ट्रूप येण्यास सुरुवात झाली.

टँक टी ९० - भीष्म.

.

बॉलवे मशीन पिकेट

.

ब्राह्मोस मिसाइल

.

.

वेपन लोकेटिंग रडार - स्वाथी

.

.

ब्रिज लेयिंग टँक - टी ७२

.

.

ब्रिज लेयर नक्की कसे काम करतात, हे या फोटोतून लक्षात येईल..

.

मोबाइल बेस ट्रान्सरिसीव्हर स्टेशन

.

ट्रूप लेव्हल रडार

.

ट्रूप लेव्हल रडार (आणि मागे आकाश मिसाइल)

.

निर्भय मिसाइल

.

.

अश्विनी रडार

.
.
आकाश मिसाइल

.

आकाश मिसाइलचा आणखी एक फोटो (जालावरून)

.

यानंतर अनेक वेगवेगळे ट्रूप येऊन तालासुरात पावले टाकत जात होते. लहान मुलांची (बहुधा NSSची) एक तुकडी होती.

त्यांपैकी कांही निवडक ट्रूप..

.
.

.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

उंटांचे एक मोठे पथक एकदम छान सजवलेले होते.

.
.
.
.
.
.
.

.

याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रदेशांचे आणि संस्थांचे सजावट केलेले रथ संचलनात सामील झाले होते.

महाराष्ट्राचा रथ

.

आपल्या रथाबद्दल माहितीपुस्तिकेत पहिल्याच ओळीत शासनाने 'शिवरायांचा राज्याभिषेक राजगडावर झाला' असे लिहून घोळ केला होता. आपला रथ आल्यावर आम्ही मराठीत घोषणा द्यायला सुरुवात केली. अनपेक्षितपणे त्याला आजूबाजूने प्रतिसाद मिळाला. चमकून मागे बघितले, तर तिथे असलेले १०-१२ मराठी लोक आम्हाला हात दाखवून प्रोत्साहन देत होते.

असे आणखी बरेच रथ होते..

.
.
.

परेड संपल्यावर भरपूर प्रमाणात फुगे आकाशात सोडले गेले. नंतर आसियान देशांचे प्रतिनिधी व आपले राष्ट्रपती ज्या क्रमाने आले, त्या क्रमाने निघून गेले.

सर्वात शेवटी माननीय पंतप्रधान मोदीजी लोकांना अभिवादन करत गाडीतून निघाले.

.

जवळच ब्लॅक कॅट्स कमांडो जय्यत तयारीत उभे होते.. उत्साही लोक त्यांच्याशी हात मिळवत होते.

.

आंम्ही राजपथापासून बाहेर पडलो. प्रचंड भूक आणि तहान लागली होती. सकाळी ४पासून काहीही खाल्ले नव्हते. एक पापडवाला भेटला, त्याच्याकडून कसलातरी चटपटीत मसाला भुरभुरून पापड घेतले आणि ते खात खात कॅनॉट प्लेसकडे निघालो. तेथे एका उंच पोलवर आपला तिरंगा दिमाखाने फडकत होता.

.

दुसर्‍या दिवशी पहाडगंजमधील आणि चाणक्यपुरीतील वेगवेगळ्या भवनांमध्ये खादाडी केली आणि संध्याकाळच्या विमानाने घरी परतलो... आयुष्यात एकदा तरी घ्यावाच असा अविस्मरणीय अनुभव पोतडीत जमा झाल्याचे समाधान घेऊन..!!!

*****************************************************

(क्षेपणांस्त्राचे आणि रडारचे काही फोटो जालावरून साभार घेतले आहेत.)

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

देशपांडेमामा's picture

6 Nov 2018 - 11:57 am | देशपांडेमामा

हापिसात बसून (परत एकदा) परेड बघितली ह्या लेखामुळे ! आपली वेपनरी TV वर बघताना सुध्दा अभिमान वाटतो. प्रत्यक्ष बघताना तर अजूनच भारी वाटेल

बाकी ह्या लेखाला पुरवणी म्हणून दिल्ली खादाडीचे वर्णन पण येऊ द्या

देश

सुकामेवा's picture

6 Nov 2018 - 4:20 pm | सुकामेवा

तुम्ही असा प्रश्न विचारून जख्मेवर मीठ चोळले, मला पित्ताचा त्रास चालू झाल्यामुळे माझी तब्येत बिघडली आणि मोदकच्या सगळ्या खाण्याचा जो बेत होता त्याला पूर्ण करता आला नाही...

नाही रे.. असे कांही नाही.

मामा - डिट्टेल मध्ये लिहितो सवडीने. या लेखात पण बर्‍याच अ‍ॅडिशन करायच्या होत्या पण जमले नाही. :(

भाग दुसरा टाकलात तर उत्तम...

लेख आणि फोटो आवडले...

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 4:21 pm | तुषार काळभोर

पास मिळवणे, प्रत्यक्ष जागेवर पोचणे, सुरक्षा रक्षक, चेकिंग, इत्यादी गोष्टीत काही अडचणी आल्या का? काय करावे, काय करू नये इ बरेच प्रश्न आहेत.

वरुण मोहिते's picture

7 Nov 2018 - 4:20 pm | वरुण मोहिते

हा अनुभव घ्यायला हवा कधीतरी.

टर्मीनेटर's picture

7 Nov 2018 - 4:49 pm | टर्मीनेटर

जय हिंद!

छान, आवडले. जय हिंद.

रच्याकने भारतीय नौदल देखील मुंबईत हॅरिटेज वॉक आयोजित करीत असे. मी एकदा गेलो आहे. पण फोटो वगैरे काढले नाहीत. अजूनही करीत असल्यास जरूर भेट द्या आणि मुख्य म्हणजे मिपावर सचित्र अहवाल टाका.

माझीही शॅम्पेन's picture

8 Nov 2018 - 12:52 pm | माझीही शॅम्पेन

चला मोदींनी धावती का होईना मोदकची भेट घेतली हे बेस्ट झालं ,
लेख उत्तम पण घाईत उरकला असं का वाटतय
अर्थात मिपाकरांचे फोटो न टाकल्याने निषेध !!

मित्रहो's picture

8 Nov 2018 - 6:56 pm | मित्रहो

लेख मस्त आहे. हे सारे एकदा अनुभवायलाच हवे पण त्यासाठी जानेवारीतली दिल्लीची थंडी आणि प्रदूषण सहन करावे लागेल.

सविता००१'s picture

9 Nov 2018 - 10:28 am | सविता००१

लेख आणि फोटो.

जुइ's picture

14 Nov 2018 - 6:17 am | जुइ

एकदा तरी घ्यावाच असा अविस्मरणीय अनुभव पोतडीत जमा झाल्याचे समाधान घेऊन..!!!

अगदी अगदी.
प्रजासत्ताक दिन परेड अनेक वर्ष न चुकता पाहिली आहे. किंबहुना २६ जानेवारीचे प्रमुख आकर्षण तेच. लेख आवडला.

पद्मावति's picture

14 Nov 2018 - 7:01 pm | पद्मावति

वाह! मस्तं लेख आणि फोटोज.

पहिल्या प्रथम लेखकाचे अत्यंत सुंदर लेखासाठी आभार... खूप छान लेख लिहिलंय ... अशाच लेखांमुळे खूप माहिती मिळते
२६ जानेवारीला परेड होते हे आपल्याला माहिती आहे पण २६ जानेवारीच प्रजासत्ताक दिवस म्हणून का निवडला गेला यावर प्रकाश टाकणारा एक लेख वाचला अन मग स्वतःच्या अज्ञानाच मडक फुटलं