दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा भाग ३

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
29 Jul 2018 - 10:28 pm

भाग १

भाग २
खरर.. असा एक ब्रेकचा आवाज ऐकू आला आणि आठवणीतून मी एकदम भानावर आलो

घराबाहेर एक दुसरी पोलिस व्हॅन आली होती. त्यातून दोघे तिघेजण जवळपास पळतच सावंताकडे आले. त्यांची ती लगबग बघून सावंतांनी अोळखले की या टीमला काही नवीन माहिती मिळाली आाहे.

"सर एक न्यूज आहे. " त्या टीममधला एकजण बोलला. पण ती न्यूज सांगण्याआधी त्यांनी बाबांकडे पाहिले आणि ही न्यूज त्यांच्यासमोर कशी सांगावी असा काहीसा भाव चेह-यावर आला. सावंतांनी ते अोळखले ," खुशाल सांगा हो न्यूज. देशमुख साहेब आपलेच आहेत."

त्या पोलिसाने परत एकदा विचार केला आणि तो बोलू लागला ," सर एक बॉडी मिळाली आहे आपल्याच एरियात. जिथं त्या प्रवीणला मारल होत ना त्या बिल्डींगपासून अर्धा किलोमिटरवर एका अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला सापडली. आम्ही शोधाशोध केली आणि आज आम्हाला कळालं की ती बॉडी कोणत्या तरी बोधले नावाच्या माणसाची आहे."

तो पोलिस बोलायचा थांबला. इकडे एकदम बाबांना धक्का बसल्यासारखे वाटत होते. ते मटकन सोफ्यावर बसले.
सावंत आणि मलाही एकूणच हा धक्का अनपेक्षितच होता. त्यातून सावंतांनी स्वताःला लगेच सावरले , " तुम्ही पुढचा तपास केला का मग काही ? घरी त्यांच्या जरा शोधाशोध करायची.

"ती करूनच आलो आहे सर. काही विचित्र फाईली सापडल्या आहेत घरात. ते एक सोडल तर दुसर काही नाही संशयास्पद. कॉल रेकॉर्डही मागवले आहे. मला कंपनी रेकॉर्ड मेल करते म्हणाली आहे.

"वा वा... तुम्ही अगदी तयार झाला की तपास कार्यात..." हे सगळ बोलताना सावंतांची नजर बाबांकडे गेली. बाबा आता भलतेच घाबरलेले दिसत होते. कदाचित सावंतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. " त्या फाईली आणा बर आत इथेच बघून टाकू. " इति सावंत

त्या पोलिसाने गाडीतून सगळ्या फाईलचा गठ्ठा आणून टाकला. ते सगळ्या फाईल सरांच्या नोटसने भरल्या होत्या. कसला तरी अॅटोमीक लेव्हलच्या संशोधन असावे असे वरवर बघून मला वाटले.

सगळ्यात खाली एक मोठी डायरी होती. सावंतांनी ती उघडली. डायरीवर नाव होते "शिल्डस अॉफ न्यूक्लिअर व्हेइकल" . सावंत पुढे वाचत गेले. त्यातले त्यांना काही समजण्याइतके काहीही नव्हते. फक्त सावंतांना इतपतच कळाले की बोधले सर अणूशक्तीवर चालू शकणारे एखादे वाहन बनवत होते.

" बराच हुशार दिसतोय हा माणूस. एखद्या इंजिनियकडून समजवून घ्यायला पाहिजे. "

तेवढ्यात तो पोलिस बोलला ," सर त्या बोधले सरांचे कॉल रेकॉर्डचा मेल आला आहे. " सावंत आता तो मेल बघू लागले. ज्या नंबरवरून सावंतांना शेवटचा फोन आला होता त्या नंबरला सावंतांनी फोन केला

आणि बाबांच्या खिशातला फोन वाजला ! बाबांनी तो कट केला. सावंतांची शंका खरी ठरली होती. "देशमुख साहेब आपण सगळ खर सांगाल अशी अपेक्षा करतो .."

बाबा बोलू लागले ," तुम्हाला कल्पनाही नाही की त्या डायरीची किंमत काय आहे ते. आईस्टाईनचा हा माणूस म्हणजे एक मोठा भक्तच आहे. अणुशक्तीवर चालणारी एखादी गाडी बनवण्याच्या मागे सावंत पडले होते. या वाहनाचा मुख्य प्रश्न असतो तो अणूशक्तीला नियंत्रित करण्याचा. यासाठी काही स्पेशल शिल्डस बोधलेंनी बनवले होते आणि त्यांना त्यात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं होतं.

या सगळ्याला आमची टिम फडींग करत होती. सावंत साहेब तुम्ही विचारही करु शकत नाही की या संशोधनाचा काय परिणाम होऊ शकतो ते. अहो पुर्ण वल्ड इकोनॉमी तेलावर अवलंबून असते आणि अशी गाडी जर खरोखरीच रस्त्यावर आली असती तर.. "

थोड थांबून बाबा पुन्हा बोलू लागले ,"हा एक गुप्त प्रोजेक्ट होता. आम्ही युरेनियमही पैदा केले होतं. सरकारी संरक्षण यंत्रणेच्या फार मोठ्या पदावरच्या अधिका-यांना आम्ही गुप्तपणे सामील केले आहे. माझ्याबरोबर अोळखीचे अनेक बिझनेसमनी यात पैसा टाकला आहे. पण ही बातमी कशी कोणास टाऊक आमच्या टीममधून बाहेर पडली. पेट्रोल लॉबीपर्यंत ही बातमी पोहचली. अशी गाडी आली असती तर तेच नव्हे तर तेलावर चालणारे कित्येक देश उध्वस्थ झाले असते. त्यांची माणसे इथपर्यंत पोहचली असणार आणि त्यांनीच बोधलेला मारलेले असणार "

" सावंतसाहेब ही डायरी जर बाहेर गेली तर जगाच्या अर्थकारणाची दिशाच बदलेल. हा शोध भारताच्याच नावावर असायला हवा. ह्या एकाच शोधातून भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरेल. तुम्ही ही केस वर सी. आय. डी.कडे सोपवलीत तर तिथून ह्या डायरीतली माहिती नक्की बाहेर फूटेल. पेट्रोल लॉबीचे हात तिथपर्यंत नक्कीच पोहचलेले असणार. अजून ह्या संशोधनाचे कॉपी राईटस आलेले नाहित. त्यासाठी तुम्ही थोडी कळ सोसा. लगेच ही डायरी जमा करू नका ."

सावंत आता विचारात पडले होते. डायरीला केवळ पुरावा म्हणून जप्त करणे आता तेवढे सोपे राहिले नव्हते. आणि बोधलेंच्या खुनाच्या शोधाची व्याप्ती तर आंतरराष्ट्रीय पातळीवर करावी लागणार होती. सावंत डोक्याला हात लावून बसले होते.

पण एक प्रश्न अजूनही माझ्या डोक्यात घुमत होता की यात माझा खून कसा काय झाला ?

कथालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

30 Jul 2018 - 2:40 pm | आनन्दा

बाकी ठीक आहे. पण इतक्या महत्वाची डायरी अशी उघडयावर?

बाकी छान चाललंय.

Mak Mohan's picture

30 Jul 2018 - 5:51 pm | Mak Mohan

खुप सुंदर....
जरा लवकर येवू द्या..

कपिलमुनी's picture

30 Jul 2018 - 7:26 pm | कपिलमुनी

उत्कंठावर्धक आहे .
पुढील भागाच्या प्रतीक्षेत....

pawar.sujit's picture

31 Jul 2018 - 3:42 am | pawar.sujit

Sarv bhag lihun zale ki ekdach taka, hi namra vinanti