उबुंटू/लिनक्सवर गमभन प्रणाली वापरून मराठी लेखन कसे करावे?

उपाशी बोका's picture
उपाशी बोका in तंत्रजगत
25 Jan 2022 - 11:42 am

उबंटूवर ऑफलाइन (म्हणजे ब्राउजर न वापरता) मराठी लिहायचे असेल तर मला त्रास झाला आहे.
iTrans (m17n) ही प्रणाली त्यातल्या त्यात "गमभन"च्या जवळ जाणारी आहे. बाकी इतर KaGaPa phonetic, inscript (m17n), phonetic (m17n)आणि हिंदी बोलनागरी वापरून मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे, विशेषतः मायबोली आणि मिसळपावसारखी "गमभन"ची सवय असेल तर.

गमभन आता लिनक्सवर कसे आणायचे ते आता कळले आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे.
$cd /usr/share/m17n
$sudo cp mr-itrans.mim mr-gamabhana.mim

मग mr-gamabhana.mim ही फाइल एडिट करा.
$sudo edit mr-gamabhana.mim (सूडो वापरणे महत्वाचे आहे. File must be owned by root.)
महत्वाचे म्हणजे पुढील बदल हवेत. (पहिली ओळ ही फक्त कॉमेंट आहे)
;; mr-gamabhana.mim -- Marathi input method with ITRANS method
(input-method mr gamabhana)

तुम्हाला जमत नसेल तर मी माझी फाईल पाठवू शकेन. (अजून १००% टेस्ट केलेली नाही, पण बर्‍यापैकी बदल केले आहेत ते व्यवस्थित वाटले)
नंतर रिबूट करा.
सेटिंग्ज => रिजन्/लँग्वेज मध्ये जाऊन Marathi (gamabhana(m17n)) इंस्टॉल करा आणि मग LibreOffice Writer मध्ये लिहून बघा.
ही माहिती उपयोगी पडेल असे वाटले, म्हणून इथे देत आहे.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

25 Jan 2022 - 1:22 pm | वामन देशमुख

उपयुक्त माहिती.

उबंटूवर ऑफलाइन (म्हणजे ब्राउजर न वापरता) मराठी लिहायचे असेल तर मला त्रास झाला आहे.

धाग्याच्या मुख्य विषयाशी कदाचित विसंगत वाटणारा भाग पुढे लिहित आहे -

मी शक्यतो ब्राउझर आधारित प्रणाल्या वापरतो.

१. थोडेसे काही लिहायचे असेल तर गूगल इनपुट टूल्स -

२. दीर्घ आणि एका बैठकीत ना होणारे लिखाण करायचे असेल तर गूगल डॉक

(एकेकाळचा उबुंटू चाहता)
वामन

निनाद's picture

25 Mar 2022 - 8:55 am | निनाद

चांगली माहिती आणि तुम्हाला जमत नसेल तर मी माझी फाईल पाठवू शकेन. म्हणजे मार्ग काढून लगेच कृती करून शिवाय मदतीची तयारी केली हे खास आवडले आहे.

गामा पैलवान's picture

25 Mar 2022 - 7:15 pm | गामा पैलवान

उपाशी बोका,

माझ्या कुबुण्टु कृतकयंत्रावर टाकून पहातो. धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

शशिकांत ओक's picture

16 Jun 2022 - 7:35 am | शशिकांत ओक

मराठी भाषा स्पेल चेकर ची सुविधा ऑफिस सूट, गूगल ड्राईव्ह वर उपलब्ध आहे का?

श्रीरंग_जोशी's picture

17 Jun 2022 - 1:06 am | श्रीरंग_जोशी

मनोगत.कॉमवरचा शुद्धीचिकित्सक या बाबतीत उपयुक्त आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2022 - 10:47 am | अत्रुप्त आत्मा

येस . तो एक नंबर आहे .

कर्नलतपस्वी's picture

25 Jun 2022 - 7:53 pm | कर्नलतपस्वी

जरा उलगडून सांगता का!
माझे मराठी लेखन खूप अशुद्ध आहे.

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2022 - 8:19 pm | श्रीरंग_जोशी

मनोगत.कॉम हे २००४ साली सुरू झालेले व एकेकाळचे आघाडीचे मराठी संस्थळ आहे. मिपाचे संस्थापक व सुरुवातीच्या काळातले बहुतांश सक्रिय मिपाकर हे पूर्वीचे मनोगतीच होते.

मनोगत.कॉमवर किमान १६-१७ वर्षांपासून ऑनलाईन शुद्धिचिकित्सक (स्पेलचेकर) उपलब्ध आहे. त्यासाठी मनोगतचे सदस्य असावे लागते. त्यावर सदस्य होण्याची प्रक्रिया मिपासारखीच आहे. माझ्यासह अनेक मिपाकर मिपावर लेख किंवा मोठ्या प्रतिक्रिया प्रकाशित करण्यापूर्वी त्या मनोगत.कॉम व टंकून व तिथल्या शुद्धिचिकित्सकाद्वारे तपासून व गरज असल्यास दुरुस्त्या करून इथे प्रकाशित करतात.

तुम्ही तिथे सदस्यत्व घेऊन पहा. काही तांत्रिक अडचण आल्यास इथे लिहा.

कंजूस's picture

25 Jun 2022 - 9:30 pm | कंजूस

मोठ्या प्रतिक्रिया प्रकाशित करण्यापूर्वी त्या मनोगत.कॉम व टंकून व तिथल्या शुद्धिचिकित्सकाद्वारे तपासून व गरज असल्यास दुरुस्त्या करून इथे प्रकाशित करतात.

लेखन कुठे द्यायचे? कुणाला प्रतिसाद लिहायचा आणि पूर्वावलोकन करायचे? 'शुद्ध लेखन चिकित्सा' असे बटण येत नाही/ दिसत नाही./ त्याचा चौकोन सापडला नाही. (सभासद लॉगिन करून शोधले. )

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2022 - 9:44 am | श्रीरंग_जोशी

मनोगतवर लॉगिन केल्यावर लेखन करावे पर्याय वापरल्यास मिपा सारखेच विविध प्रकारचे लेखन करता येत आहे. ते करताना टेक्स्ट एडिटरच्या वर ग म भ असे लिहिलेला व त्याखाली टिकमार्क चे चिन्ह असलेल्या आयकॉनवर क्लिक केल्यास शुद्धिचिकित्सक उघडत आहे. हाच पर्याय इतर कुणाच्या लेखनावर प्रतिक्रिया देतानाही उपलब्ध दिसत आहे.

कदाचित तुमचे मनोगत सदस्यत्व अर्धवट असावे. हरकत नसल्यास कृपया नव्याने सदस्यत्वाचा अर्ज करुन पहा.

कंजूस's picture

26 Jun 2022 - 11:02 am | कंजूस

टेक्स्ट एडिटरच्यावर कोणतेही फॉरमँटिंग आईकॉन येत नाहीत.
मोबाईल डेस्कटॉप पेज, सर्व ब्राउजर वापरून पाहिले.
एकूण माझे शुद्ध मनोगत इतरांना सांगण्याचा योग दिसत नाही.
शिवाय लेखांचे प्रतिसाद उघडलेले दिसत नाहीत ही मोठी उणीव आहे.
मनोगतचे अपग्रेडेशन बरोबर झालेले नाही.

कर्नलतपस्वी's picture

25 Jun 2022 - 8:24 pm | कर्नलतपस्वी

त्वरीत प्रतीउत्तर दिल्याबद्दल आभार

संगणक प्रणालीतील उबंटू मराठी टाइपिंग.
अवांतर आहे पण मोबाईलवर नोटमध्ये लिहितो त्याची फाईल कशी बनवायची शोधताना दोन text editor Android apps सापडले होते.
१) Text Editor plain notepad by the simple apps (( https://play.google.com/store/apps/details?id=dev.tuantv.android.texteditor ))
२) QuickEdit text editor by Rhythm Software ((https://play.google.com/store/apps/details?id=com.rhmsoft.edit ))

यांचे संगणक सॉफ्टवेर आहेत का माहिती नाही.

ऑफलाईन मराठी टायपींगसाठी अनेक पद्धती आहेत. उपाशी बोकाने वर सांगितल्याप्रमाणे मिसळपावसारखी "गमभन"ची सवय असेल तर मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे. वरील धाग्यात बोकाने कळफलकचा कोड बदल केला असावा असे दिसते. मराठीबोला.कॉम च्या वेळी मराठी टायपींगसाठी मला असले अनेक प्रकार करावे लागले होते.

तर मंडळी, मी त्यातल्या त्यात ऑफलाईन टाईप करण्यासाठी दोन सोप्या पद्धती कोणत्या ते आपण पाहू.

तिसरी पद्धत ही मोबाईलवर टायपिंग करणे हे गमभनच्या जवळपास जाणारी प्रणाली आहे. त्यात "मराठी- अक्षरांतरण" हा कळफलक निवडल्यास तुम्ही मोबाईलमध्ये गमभनसारखे टाईप करू शकाल. फक्त अर्धा "र" म्हणजे वा"-या"ने सारखी अचूकता ज्यांना अपेक्षित आहे त्यांनी इग्नोर मारावे. (किंवा तो अर्धा र दुसरीकडून कॉपी पेस्ट करावा.)

पद्धत १)...
(मराठी टायपिंगचा बरेच जण कंटाळा करतात. ते सोपे आहे हे समजण्यासाठी निराळा धागा काढला आहे. तसेच त्या धागात एचटीएमल कोड असल्याने तो प्लेन टेक्स्ट मध्ये काढावा लागला. पुढील माहिती तेथे वाचावी.)