जे न देखे रवी...
चक्रव्युह....
ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा
जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा
सापळे इथे माणसाचे माणसाला पकडावया
वैखरीतून पेरती मोहाचे दाणे सावज घेरावया
अठरा औक्षहिणी सेना यांची,चक्रव्युह मांडला
घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला
जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले
कपटींनी कपट करून भ्रमणध्वनीतुन चोरले
गजानन
निसर्ग बरसला
सुखाचा पाऊस,
आनंदाचा कंद
घरी आला.
भक्तीचा उत्सव
आनंदले रोम
गणपतीचा सण
आला आला.
सुखकर्ता आला
विघ्नहर्ता आला,
आयुष्याचा कर्ता
घरी आला.
वर्षभर ज्याची
पाहतो मी वाट,
तो दु:खहर्ता
घरी आला.
फुलला पारिजात
उंचबळे सुवास,
सुगंधाचा दाता
घरी आला.
अंतर !
अंतर !
आज तो परत तेच म्हणाला,
"तुझ्या आणि माझ्या विचारांमध्ये
बरंच अंतर आहे "
.
.
.
.
.
.
.
" हो , कदाचित ....
समजून घेणे ,
आणि
सहन करणे ,
यामधे जितकं अंतर .....मोजून तितकंच !"
डोळ्यांतल्या नीरओळीमध्ये मावेल
....एव्हढंच ती उत्तरली !
बाई मी फुकट घेतला आराम!
प्रायोजित मधूचंद्र (?!)
https://www.esakal.com/manoranjan/nayanthara-vignesh-shivan-honeymoon-sp...
No pain
No Spain
मधूचंद्र, विघ्नेश व नयनतारा
नेटफ्लिक्स करणार खर्च सारा
ना काही खर्च
ना काम घरचं
ना घेतलं कर्ज
मधूचंद्री
खेला होबे
शिक्षक भरती घोटाळा: कुलगुरूंच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा
PUBLISHED ON : 24 AUGUST 2022 AT 8:14 PM
https://www.esakal.com/desh/school-recruitment-scam-cbi-raids-nbu-univer...
शे बोल से खेला होबे,
भाजपा बोल से एटा ना चोलबे ....
आठवण....
https://www.misalpav.com/node/50568/backlinks
आमची बी एक आठवण...
कविवर्यांची क्षमा मागीतली आहे.
खिशातल्या रूमालाला
घामाचा वास
मनाला लागला
तूझाच की ग ध्यास
चार कप्प्यातला
एक कप्पा होता खाली
तू येणार म्हणून
साफसफाई केली
आठवण
जपला खिशात मी तुझा रुमाल होता
गुलाबी पाकळ्यांचा देही गुलाल होता.
आठवणीच्या खजिना उरात साठलेला
स्वप्नांच्या वाटेवरचा तो हमाल होता.
बांधलेला तुझ्यासाठी शब्दांचा महाल होता
शब्दांनीच उभा केला पुढती सवाल होता.
चढला होता रंग तुझ्या ही गालावरती
की तुझा अभिनय तेव्हा कमाल होता.
---- अभय बापट
जाणिवांची बाराखडी
कशी पुरी पडावी शब्दांच्या भाषेची बाराखडी आभाळाएवढी चिमुकली दुःख कागदावर पेलताना ????.....
कोसळणाऱ्या पावसात गळक्या छताखाली चिंब भिजल्या मनामधून पाझरणारं काळंभोरं दुःखी आभाळ आणि गालावर ओघळून सुकलेल्या आसवांच्या मागे लपून डोळ्यांच्या कडांमधून उसळणारा चिमुरड्या पोटातील भुकेचा आगडोंब.....
कसा शमवता येईल शब्दांतून ???
श्रावणही आला फिरूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी
शालू हिरवा नेसूनी
ओली मेंदी रेखूनी
उभी ही सृष्टी अंगणी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|
पायवाट मृदगंधी भिजूनी
इंद्रधनू कमान बांधूनी
डोळी श्रावण सरी भरूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|
नकोस विसरू
नकोस विसरू-
कोसळणार्या
प्रपातातल्या
जलबिंदूच्या
खोल आतवर
कल्लोळाच्या
अब्जांशाचा
निनाद असतो
नकोस विसरू-
माथ्यावरती
ओणवलेल्या
निळ्यासावळ्या
घुमटावरल्या
नक्षत्रांच्या
दंतकथांना
शेवट नसतो
पानात लपलेल्या फुलाला पाहून...
मला झाडावरची फुले तोडावयास आवडत नाही. मी दुसर्यान्या पण तोडू देत नाही. बागेतली फुले सगळ्याची,कुणा एकाचि नाही,हवी आसतील तर विकत आणा तेव्हढेच शेतकर्यान चार पैसे मिळतील.
श्रावण
काळ्याशार पाटीवर
पांढरी शुभ्र रेघ
ग्रीष्माच्या पाठीवर
काळे काळे मेघ
खरपुस ताबुंस मातीवर
हिरवी चंद्रकळा
प्राजक्ताच्या झाडाखाली
मोतीयाचा सडा
सुखावली धरती
सुखावली मने
इवल्या इवल्या रोपानी
डुलती हिरवी राने
चिंब झाले मन
रुंजी घालतो साजण
उभा भाऊ दारी म्हणे
आला पंचमीचा सण
तुला काय ठाऊक सजणी, तुझ्यावर कोण कोण मरतंय ...
तुला काय ठाऊक सजणी
तुझ्यावर कोण कोण मरतंय
आख्खं गाव तुझ्यासाठी
रात्रंदिवस झुरतंय
माळावरचा दगडू पैलवान
भल्या-भल्यांना भरवतो हीव
तुझ्यासाठी त्याचा सजणी
टांगणीला गं लागलाय जीव
सुताराचा चकणा म्हादू
तुझ्यावर लईच मरतो
तुला बघत पटाशीचं काम
कानशीनं की करतो
भरु आज पेला ( गटारी स्पेशल)
मला ते विचारी भरु आज पेला
तसा मी म्हणालो कशाला कशाला
विजय कासवाचा पुन्हा का असावा
कशी झोप येते भिणा-या सशाला
तिला बोलण्याचे खरे टाळले मी
उगा दोष देतो रिकाम्या खिशाला
जरा दोन घटका चला घोट घेवू
किती चांदण्या या विचारु निशेला
जरासे पिल्याने कुठे काय होते
किती थंड वाटे बिचा-या घशाला
- किरण कुमार
तू.....
तू समोरून अलवार चालत यायचीस
मी उगाचंच रानफुलं वेचत रेंगाळायचो
पैंजणांची रुणझुण पुढे निघून जायची
मागे खच पडायचा पाऊलभर स्वप्नांचा
तू पावसात आडोसा पाहून थांबायचीस
मी मुद्दामचं भिजत पुढे निघून जायचो
काकणांची किणकिण कानाआड व्हायची
मागे ढीग पडायचा सकवार निःश्वासांचा
एकदा
अक्षयाचा डोह भरुनी
वाहतो जेथे सदा
सांडवा तिथला कुठे ते
सांगशिल का एकदा?
अद्भुताचा ढग निळा
ओथंबतो जेथे सदा
बरसतो केव्हा, कुठे ते
सांगशिल का एकदा?
नीरवाचा घुंगरू
बघ रुणझुणे येथे सदा
सातही स्वर वर्ज्य तरिही
ऐकशिल ना एकदा!
आठवणींचा पाऊस
रात्रभर पडणारा पाऊस
सकाळी नकोसा होतो
कितीही हलका का असेना
जेव्हा सतत बरसतो
संध्याकाळी उदास वातावरणात
मुसळधार कोसळतो
तेव्हा नको त्या आठवणींचा
पूर मात्र मनात येऊन जातो
रात्र उदास जाण्याची चाहूल लागते
मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो.
- पाभे
१३/०७/२०२२
चारोळया: ताज्या घटनांवर
ब्रूटस
सीजर कुणीच नव्हता
सारेच ब्रूटस होते.
खंजीरीच्या पात्यांना
रक्ताची तहान होती.
जो पळतो तो जिंकतो
बाजीरावाने घुडदौड केली
निजामचा पराभव केला.
शिंदेंनी विमानदौड केली
उद्धवचा पराभव केला.
दैवयोग
(सन्तूर)
पेरणा आमचे परम मित्र श्री श्री १०८ अनन्त्_यात्री यांची ही कविता http://misalpav.com/node/50404
(सन्तूर)
झटपट छनछन तुषार अगणित
भवतालाला व्यापत उडले
रोमरोम पुलकित करुनी त्यांनी
वरुणावरती गारूड केले
स्वरचित्रातील अवकाशात
अचूक तिचे आगमन झाले
सुंदरीचे त्या चिमुरडीशी
निगूढ नाते पुनश्च कळले
- ‹ previous
- 18 of 468
- next ›