तुरीची डाळ १ वाटी
हळद, तिखट, मीठ चवी नुसार, (ओल खोबरं एक तुकडा, २ चमचे दाणे, २ कांदे, ४ लसुण पाकळया, १ इंच आले), हे साहित्य मिक्सर मधुन बरिक करून घ्यावे. कोथिंबिर, मिरच्या ४,हिंग, २ बारिक चिरलेला टोमटो फोडणीला तेल
जाड दळलेली गव्हाचे पीठ, मोहनासाठी,तेल, साय्,मीठ, चिमुट्भर हळद, आणि सगळे भिजवायला पाणी.
तुरीची डाळ कुकर मधे चांगली शुजवून घ्यावी. रगडून घ्यावी. आता कढईत तेल घालून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हिंग टाकून त्यावर मिक्सर मधून काढलेला मसाला घालावा.तो शिजत आला की बारिक चिरलेले टॉमटॉ टाकावे. तेल सुटायला लागले कीतिखट टाकुन शिजवलेली डाळ टाकावी,मीठ हळद चवी नुसार घालून एकजीव करून वरून पाणी घालावे. उकळले की कोथिंबीर घालावी. ही दाल थोड्या वेळाने घट्ट होते त्यामुळे पाण्याचे प्रमाण जास्त राहु द्यावे.
आता जाड कणकीत मुठ बांध्ल्या जाईल इतपत तेल घालावे, २ चमचे साय घालावी, चिमुट्भर हळद घालावी. चवी नुसार मीठ घालावे आणि पाण्याने घट्ट्सर भिजवून घ्यावे, त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे, आता एका जाड तळाच्या भांड्यात पाणी घालुन वर चाळणी ठेवून हे गोळे वाफवून घ्यावेत. आणि थंड झाल्यावर तुपात तळूण घ्यावेत.
प्रतिक्रिया
26 Oct 2009 - 3:22 pm | पर्नल नेने मराठे
आणी मग हे तुपात तळलेले गोळे डाळीत सोडावेत ... राइट :-? ;)
चुचु
26 Oct 2009 - 3:27 pm | प्रभो
फोटो???
त्याशिवाय प्रतिसाद नाही.
--प्रभो
26 Oct 2009 - 3:30 pm | नेहमी आनंदी
नाही काकू, गोळे डाळीत सोडण्या ऐवजी पानात गोळे फोडूण त्यावर डाळ घालावी
26 Oct 2009 - 3:32 pm | पर्नल नेने मराठे
एकच ते ....वाटीत काय न ताटात काय :D
चुचु
26 Oct 2009 - 3:34 pm | नेहमी आनंदी
वाटीत टाकले तर दाल कमी पडेल ना? ;) त्यापेक्शा ताटातच भरपूर दाल घेऊन खावेत.
26 Oct 2009 - 3:35 pm | प्राजक्ता पवार
प्राजक्तापवार![]()
फोटो ?
26 Oct 2009 - 3:37 pm | नेहमी आनंदी
त्याशिवाय पण कल्पनेत जा की जरा.... :?
26 Oct 2009 - 4:05 pm | प्रभो
जास्त कल्पना केल्या की वल्गना होतात..जाउ द्या....कल्पने विशयी टार्याला जास्त माहिती आहे.कॉलेजात या नावच्या पोरीवर तो लाईन मारायचा.
चुचु चे बघितले ना... फोटो नाहीतर कसं झालं ते....असा गोंधळ होतो
(सावळा गोंधळ म्हणायचा का??? नाहीतर मला वर्णभेदी म्हटले जायचं)
--प्रभो
26 Oct 2009 - 3:40 pm | पर्नल नेने मराठे
चुचु
26 Oct 2009 - 4:06 pm | सुबक ठेंगणी
दाल बाटी म्हणतात ते हेच का? :?
चुचु फोटो मस्त!
26 Oct 2009 - 4:09 pm | भाग्यश्री कुलकर्णी
खुप दिवसांपासुन ही पा.कृ हवी होती.ती दिल्याबद्दल धन्यु.
26 Oct 2009 - 9:10 pm | प्राजु
दाल बाटीच हि बहुधा..
चुचु.. धन्यवाद गं फोटोसाठी.
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/
28 Oct 2009 - 7:33 pm | अजुन कच्चाच आहे
नाही ग प्राजुतै
दाल बाटीत कणकेचे गोळे तळत नाहीत, ते निखाऱ्यात भाजतात
.................
अजून कच्चाच आहे.