अताशा असे हे मला काय होते

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
30 Sep 2009 - 4:34 pm

(संदीप-सलिलच्या चाहत्यांची क्षमा मागून)

अताशा असे हे मला काय होते.
कुण्या बारचे मद्य ओठात येते.
कसा पाहता पाहता तर्र होतो.
नशा केवढी 'एक' पेगात येते.

कधी वीट येतो तुझ्या श्रावणाचा.
कसा तांबडा रंग हो लोचनांचा.
नको ड्राय डे रोज यावी गटारी,
असा योग यावा सुरा प्राशण्याचा.

असा ऐकु येतो सायरनचा इशारा.
क्षणी बंद होतो कॅब्रेचा नजारा.
गटारात ज्या रोज जातो बुडोनी,
गटारास त्या मागु जातो उतारे.

अताशा असे हे मला काय होते
कुण्या बारचे मद्य ओठात येते

न बुधवार सुटले, न गुरुवार काही.
चकणे खायचे प्यायचे, फार नाही.
नको गंध निघण्या हवेच्या प्रवासा.
बडीशेप सोबत असे बारमाही.

अशी ही अवस्था कुणाला कळावी.
कुणाला पुसावी कुणी उत्तरावी.
किती बोल खातो, कारण तोल जातो.
असा तोल जाता कुणाला धरावे.

अताशा असे हे मला काय होते
कुण्या बारचे मद्य ओठात येते

-- उपटसुंभ

मूळ गीत - अताशा असे हे मला काय होते
कवी - संदीप खरे

हास्यविनोदविडंबन

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

30 Sep 2009 - 4:52 pm | Dhananjay Borgaonkar

आवडलं विडंबन :)

धमाल मुलगा's picture

30 Sep 2009 - 4:58 pm | धमाल मुलगा

आत्ताऽऽऽ....अंमळ हिलेडुले हाय आपन...
चला दोस्तहो उतरल्यावर बोलु काही...
;)

प्रभो's picture

30 Sep 2009 - 5:13 pm | प्रभो

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल....भल्या पहाटे छातीमध्ये जळजळणारे अल्कोहोल...... =)) (लोळत नाही ये बे आपून....समज्या)

प्राजु's picture

1 Oct 2009 - 12:12 am | प्राजु

विडंबन चांगले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

इंटरनेटस्नेही's picture

19 Jun 2010 - 12:47 am | इंटरनेटस्नेही

विडंबन मुळ कवितेपेक्षाही सुंदर आहे..
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

शुचि's picture

19 Jun 2010 - 12:52 am | शुचि

मस्त!

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अविनाशकुलकर्णी's picture

19 Jun 2010 - 1:10 am | अविनाशकुलकर्णी

आवडले.............=))