"मिलर ऑफ द डी"

युयुत्सु's picture
युयुत्सु in जे न देखे रवी...
19 Sep 2009 - 7:34 pm

Miller of The Dee या सुप्रसिद्ध इंग्लिश कवितेचे मी केलेले मराठी स्वैर रुपांतर.

कुण्या नदीच्या तीरावरती एक पिठाची गिरणी वसे
मालक त्या हो पिठगिरणीचा स्वछंदी आनंदी असे
जात्याच्या तो सुरात मिसळी स्वानंदाचे गीत कसे
ना हेवा मी करी कुणाचा, कुणी न माझा करीतसे

कुशल प्रजेचे बघण्या राजा येई एकदा नदीतीरी
श्रमपरिहारक सुरावटी त्या राजहृदयी मात्सर्य भरी
"चुकसी मित्रा" राजा वदला "हेवा वाटे तव मजला,
वैभव सारे भोगत असुनी कष्टी कसा मी? सांग मला"

चकित होउनी गिरणीवाला टोपी काढत घाम पुसे
"खाई भाकरी मम कष्टांची" वदूनी असे मिष्किल हसे
"कधी न मजला कर्ज कुणाचे, साथ नदीची या जन्मी,
ओघावर त्या गिरणी चाले ऐसे असता काय कमी"

उत्तर त्याचे ऐकुन राजा निजांतरी तो सुखावला
सद्गगद हृदये पुन: पुन: हे स्वत:शीच तो पुटपुटला
"ऐशा तुजसम प्रजाननांचे कौतुक वाटे मज मोठे,
पीठमंडित तव टोपी पुढती रत्नजडित मम मुकुट कुठे"

नीज सदनी मग येई राजा, मनात त्याच्या हेच असे
"ना हेवा तो करी कुणाचा कुणी न त्याचा करीतसे"

शांतरसकविता

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

19 Sep 2009 - 7:49 pm | कानडाऊ योगेशु

सुंदर अनुवाद..
बहुतेक ९ वी युवकभारतीमध्ये ही कविता होती.

सहज's picture

19 Sep 2009 - 7:49 pm | सहज

कविता छानच आहे पण आजकाल शक्य आहे तसे? जास्त काही न करता प्राईम रियल इस्टेट असेल व असुन कोणी हेवा न करेल किंवा शांत झोप लागेल?

गुंडोपंत's picture

20 Sep 2009 - 8:34 am | गुंडोपंत

हम्म!
हल्ली गुंड कांदे गजाआड झाल्यामुळे नाशकात तरी बरे आहे.

बाकी बिल्डर कुठे डोळा ठेवून असतील सांगता येत नाही!

आता आली नाशिकला नवी रेझर्वेशन काढायची नोटीस - आहे मलिदा खायची पर्वणी - ज्यांना काही मिळत नाहीये ते पाटिल चाललेत कोर्टात!

पैसा कमावायचा असेल तर नाशकात बिल्डर आणि नगरसेवक व्हा!

आपला
गुंडोपंत

कानडाऊ योगेशु's picture

19 Sep 2009 - 7:53 pm | कानडाऊ योगेशु

मूळ कवितेत
The miller smiled and doffed his cap
I earned my bread quoth he..
I love my wife,I love my friend,I love my childrean three..
अश्याही ओळी आहेत.
युयुत्सुंनी wife चा उल्लेख शिताफीने टाळला आहे.(उगाच सप्तपदीचे झंझट नको.) :D
ह.घ्या.

sujay's picture

19 Sep 2009 - 8:22 pm | sujay

सुंदर स्वैरअनुवाद !!
असेच लिखाण येऊ द्या अजून.

सुजय

मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?

श्रावण मोडक's picture

19 Sep 2009 - 8:50 pm | श्रावण मोडक

चांगला स्वैरानुवाद. गाळलेल्या ओळींचा अपवाद. त्याही घ्यायला काही हरकत नाही.
जुन्या धाटणीची कविता साकारली या अनुवादात. छान.
स्वगत: हे असे चांगले करता येते तर हा गृहस्थ एरवी त्या विषयांमध्ये का अडकलेला असतो कळत नाही!!!

चतुरंग's picture

19 Sep 2009 - 10:41 pm | चतुरंग

सुरेख अनुवाद! अजून येऊदेत. :)

चतुरंग

अवलिया's picture

19 Sep 2009 - 11:07 pm | अवलिया

उत्तम.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्राजु's picture

20 Sep 2009 - 4:19 am | प्राजु

चांगला जमला आहे अनुवाद.
कवितेला एक लयही आहे. वाचताना छान वाटली. अजूनही येउद्यात असे अनुवाद. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

20 Sep 2009 - 10:19 am | नंदन
सुबक ठेंगणी's picture

20 Sep 2009 - 10:26 am | सुबक ठेंगणी

असंच म्हणते.
चांगला गेय अनुवाद. तितकेच चांगले "मराठीकरण"

चित्रा's picture

20 Sep 2009 - 10:10 pm | चित्रा

असेच म्हणते.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Sep 2009 - 10:10 am | प्रकाश घाटपांडे

पीठमंडित तव टोपी पुढती रत्नजडित मम मुकुट कुठे"

वा क्या बात है| गावाकडच्या गिरणीत गांधी टोपी घालणारा वसंत नंतर पीठाची टोपी झटकुन गप्पा मारत असे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

धनंजय's picture

22 Sep 2009 - 11:06 pm | धनंजय

भाषांतर.

एक अवांतर विचार मनात आला - युरोपात धान्य दळायला गावातल्या दळण-वाल्याकडे नेत असत, तसा कोणी व्यावसायिक मध्ययुगीन भारतात मात्र नाही. धान्याचे दळण-कांडण घरच्या घरीच होई. (बाकी लोहार-कुंभार-कोष्टी वगैरे मध्ययुगीन भारतात होते - म्हणजे प्रत्येक गोष्ट घरीच केली पाहिजे असा काही नियम नव्हता...)