ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे निधन

खडूस's picture
खडूस in जनातलं, मनातलं
16 Sep 2009 - 9:40 am

ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे आज सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी आत्ताच वाचली.

या थोर कलाकारास आमची विनम्र श्रध्दांजली .

संगीतबातमी

प्रतिक्रिया

या थोर कलाकारास आमची विनम्र श्रध्दांजली .

घाटावरचे भट's picture

16 Sep 2009 - 9:48 am | घाटावरचे भट

एक खूप मोठा कलाकार गेला. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2009 - 10:17 am | बिपिन कार्यकर्ते

_/\_

खूप नाव ऐकलं होतं.

बिपिन कार्यकर्ते

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Sep 2009 - 9:52 am | llपुण्याचे पेशवेll

अरेरे. एक मोठा कलाकार हरपला. माझीही विनम्र श्रद्धांजली.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

विसोबा खेचर's picture

16 Sep 2009 - 9:55 am | विसोबा खेचर

माझीही विनम्र श्रद्धांजली.

विष्णुसूत's picture

16 Sep 2009 - 10:05 am | विष्णुसूत

भावपूर्ण आदरांजली.

जे.पी.मॉर्गन's picture

16 Sep 2009 - 10:14 am | जे.पी.मॉर्गन

हार्मोनियमला प्रतिष्ठा मिळवून देणारा महान कलाकार !

विनम्र श्रद्धांजली.

प्रमोद देव's picture

16 Sep 2009 - 10:19 am | प्रमोद देव

इथे ऐका पंडीत वसंतराव देशपांड्यांना पेटीवर साथ करणारे अप्पा जळगावकर.
वसंतराव आणि श्रोत्यांकडून अप्पांच्या वादनाला मिळालेली उस्फुर्त दादही इथे ऐकता येईल.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

पहिले ७-८ सेकंद काही ऐकू आले नाही तरी घाबरू नका. ;)

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

नंदन's picture

16 Sep 2009 - 12:49 pm | नंदन

माझीही नम्र आदरांजली. प्रमोदकाका, दुव्याबद्दल अनेक धन्यवाद. वसंतरावांनी रंगवलेलं गाणं (अधूनमधून घेतलेल्या फिरक्यांसह) आणि त्याला अप्पा जळगावकरांनी दिलेली समर्थ साथ श्रवणीय अशीच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

गणपा's picture

16 Sep 2009 - 3:11 pm | गणपा

माझीही नम्र आदरांजली
काका दुव्याबद्दल धन्यवाद, बाकी नंदन सारखेच म्हणतो.

लवंगी's picture

16 Sep 2009 - 7:03 pm | लवंगी

माझीहि श्रद्धांजली

स्वाती२'s picture

16 Sep 2009 - 6:03 pm | स्वाती२

विनम्र आदरांजली.
देवकाका दुव्याबद्दल धन्यवाद.

संदीप चित्रे's picture

16 Sep 2009 - 7:29 pm | संदीप चित्रे

मनापासून धन्स काका !

चतुरंग's picture

16 Sep 2009 - 8:28 pm | चतुरंग

प्रमोदकाका अतिशय सुरेख दुवा. शतशः धन्यवाद!
वसंतरावांच्या तानांमधली फिरत सहीसही पेटीतून बोलवणारे अप्पासाहेब महान होते. गायकाचा गळा कसा फिरुन पुढे ती तान कुठे जाणार आहे ह्याबद्दलचा अभ्यास किती दांडगा असेल! धन्य झालो! :)

(नतमस्तक)चतुरंग

केशवराव's picture

16 Sep 2009 - 12:06 pm | केशवराव

अनेक सवाई महोत्सव गाजवलेले अप्पा सतत डोळ्यासमोर येतात.
आश्रुपुर्ण श्रध्दांजली !!

दत्ता काळे's picture

16 Sep 2009 - 1:15 pm | दत्ता काळे

कै. अप्पासाहेब जळगावकरांसारख्या खूप मोठ्या कलाकाराला माझी विनम्र श्रध्दांजली.

प्रशांत उदय मनोहर's picture

16 Sep 2009 - 2:37 pm | प्रशांत उदय मनोहर

पं. अप्पा जळगावकरांना अर्धांगवायुचा आजार झाल्यापासून त्यांचा डावा हात निकामी झाला होता. पण त्या परिस्थितीतही (शिष्यांच्या हातून भाता हलवून) संवादिनीची उत्कृष्ठ साथ त्यांनी केली. अगदी अत्ताअतापर्यंत सवाई गंधर्व संगीत समारोहात पं. जसराज, बेग़म परवीण सुलताना, इत्यादि आघाडीच्या गायकांना साथ केली.
पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे, पं. फ़िरोज़ दस्तूर, गंगुबाई हनगळ, गानसरस्वती किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे अशा मातब्बर मंडळींना त्यांनी केलेली साथ लोकप्रिय आहेच.
शास्त्रीय गायकाला स्वरवाद्याची साथ करताना त्या कलाकाराच्या शैलीनुसार वादनतंत्रांमध्ये बदल कसे करावे हा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. आजच्या पिढीतल्या साथीदारांनी आदर्श ठेवावा अशा साथीदारांची यादी पं. अप्पा जळगांवकरांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

या थोर कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.

सुधीर काळे's picture

16 Sep 2009 - 2:56 pm | सुधीर काळे

मी थोडी-फार पेटी (सिंथेसायजर) वाजवतो, पण शास्त्रीय संगीत नाही. फक्त हिंदी सिनेमातल्या गाण्यांना मी साथ करू शकतो.. आमच्या जकार्तातल्या धमाल ग्रुपमध्ये (ज्याचा मी एके काळी सभासद होतो) मी हिंदी गाणी गाणार्‍याना साथ करतो. (त्यात माझी पत्नीपण गाते.) माझी एक तीव्र इच्छा होती अप्पा जळगावकरांचा गंडा बांधायची. त्यांचे पेटीवादन मी सवाईगंधर्वांच्या स्मरणार्थ होणार्‍या वार्षिक कार्यक्रमात ऐकले होते व 'समे'वर आल्यावर बोट करून दाखवायची त्यांची खास लकब मला अद्याप आठवते.
पण पुण्यात सलग रहाणेच अजून जमलेले नाहीं. त्यामुळे ते स्वप्न आता स्वप्नच रहाणार.
त्यांना माझी मनापासून श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना मी ओळखत नाहीं, पण त्यांच्या दु:खात मी सहभागी होऊ इच्छितो.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

अरुण वडुलेकर's picture

16 Sep 2009 - 5:17 pm | अरुण वडुलेकर

अप्पांचे आणि पं तुळशीदास बोरकर यांचे पेटीवाद समक्ष ऐकण्या अविस्मरणीय लाभ मला झाला होता. अप्पांच्या हातात तर जादूच होती. वास्तविक हार्मोनियमला टेम्पर्ड स्केलचे वाद्य म्हणून पूर्वी कांहिंशी अवहेलनाच लाभलेलीहोती. आकाशवाणीवर तर बरीच वर्षे संगीताच्या कार्यक्रमांना पेटीच्या साथीला बंदी होती. पण पेटीला ज्या धुरिणांनी मान मिळवून दिला त्यात सर्वश्री गोविंदराव पटवर्धन, पु.ल. देशपांडे या प्रभावळीत अप्पांची जागा फार वरची आहे. अप्पा जसे सर्व श्रुतिंसकट वाजवायचे ती केवळ जादूच. अप्पा जेंव्हा वाजवायचे तेंव्हा ते वाजणे खरंतर त्यांच्या बोटातूनच उतरायचे. पेटीचा तो 'लाकडी खोका' केवळ अ‍ॅम्प्लिफायरचे काम करीत असे.
त्या किमयागाराला माझी श्रद्धांजली

असेच म्हणतो.
कै. अप्पांना विनम्र श्रद्धांजली .

सुधीर काळे's picture

16 Sep 2009 - 8:02 pm | सुधीर काळे

व्वा वडुलेकर-जी!
आपण निवडलेले शब्द व वाक्यरचना वाचून मी खूष झालो. छान लिहिलं आहेत आपण!
अप्पा खरंच पेटीचे जादूगार होते व स्वभावानं अगदी साधे होते. त्यांना कधीही Temper Tantrum फेकताना मी पाहिलेलं नाहीं. अगदी निर्व्याज मन, नम्र स्वभाव व 'गालातल्या गाला'तले हास्य यामुळे ते सर्वांना जिंकून घेत.
धन्यवाद!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

मिसळभोक्ता's picture

16 Sep 2009 - 10:53 pm | मिसळभोक्ता

अप्पा, तुळशीदास बोरकर ह्या दोघांचीही साथ ही वेगळी साथ कधीच वाटली नाही, गाण्यात विरघळलेली पेटी, हेच त्यांचे मोठेपण. आज तीच परंपरा डॉ. अरविंद थत्ते आणि आदित्य ओक सारखी गुणी मंडळी पुढे चालवताहेत.

-- मिसळभोक्ता

गायकाच्या गळ्यातल्या जागा हुबेहुब घेणे हे तर जाणवायचेच पण अतिशय संयत साथ हे फार मोठे वैशिष्ठ्य होते असं वाटतं. गायकाला कुठेही ओवरपॉवर करायचा प्रयत्न नसे. गायकाकडून आणि ऐकणार्‍यांकडून"क्या बात है!" "वा, वा बहोत अच्छे!" अशी दाद ते वारंवार घेत.
महान कलाकाराला माझी आदरांजली! _/\_

चतुरंग

अरुण वडुलेकर's picture

17 Sep 2009 - 3:54 pm | अरुण वडुलेकर

पुण्याला एकदा सरस्वती क्रीडामंदिरात अप्पांचे पेटीवादन ऐकण्याचा योग आला होता.त्यावेळी मुख्य कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीची वाद्यांची साफ सफाई (सराव) चालली होता. कांही जिज्ञासू अप्पांना आपल्या शंका विचारीत होते. आप्पा त्यांच्या दिलखुलास मिश्किल वाणीत समाधान करीत होते. एकाने श्रुतींचा विषय छेडला. सतारीची तार हवी तशी ताणून हवी ती श्रुती आणि मींड काढता येते तसे पेटीवर करता येत नाही असे त्या गृहस्थांचे मत होते. उत्तरादाखल अप्पांनी "नीट ऐका" म्हणून पेटीचा एक स्वर दाबून धरला आणि भात्याचा हात सोडून दिला. हवा कमी झाल्याने स्वराचा ध्वनि कमी होत गेला पण शेवटी तो स्वर आपोआप थोडासा चढा झाला. (आम्ही ऐकणारांनी तो चमत्कार पाहून आ वासला हे निराळे सांगायला नको). अप्पा कधी कधी मध्येच भात्याचा हात काढून कां घेतात ते रहस्य तेंव्हा समजले. रागाच्या कायद्यात न बसणार्‍या वर्ज्य स्वरांनाही एक हळुवार पुसटता स्पर्श करीत श्रुतींचा आभास बेमालूम निर्माण करण्यात अप्पांचा हातखंडा होता.