मन काहूर...

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
26 Aug 2009 - 10:40 pm

काहूरले मन सांजवेळ होता होता
हूरहूर लागे जीवा रात गूढ होता
क्षितिजास पहुडली कंटाळली वीज
डोळ्यातून परतूनी गेली आज नीज

तळपता रवी थकलेला संध्याकाळी
जळताना दिन सारा साचली काजळी
रेखले या काजळास अवनीच्या डोळा
सोनसळी आसमंत झाला गं सावळा

सावळ्या नभाची चढे चांदव्याला धुंदी
दूर दाट सावलीने थरारली फ़ांदी
इवल्याशा घरट्यात इवलासा श्वास
चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास

दूरदूर डोंगराचे शिखरही नीजे
काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे
काळोखाचा आवाजही किर्रर्र दाटे असा
रात्रीवर उमटतो खोल खोल ठसा

नटलेली निशा पण मन हे काहूर
उदासच वाटे आज पावरीचा सूर
खोल अंतरात जसा अडकला स्पंद
गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??

- प्राजु

करुणकविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

26 Aug 2009 - 10:44 pm | अवलिया

नटलेली निशा पण मन हे काहूर
उदासच वाटे आज पावरीचा सूर
खोल अंतरात जसा अडकला स्पंद
गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??

+१

मस्त :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मदनबाण's picture

26 Aug 2009 - 10:46 pm | मदनबाण

मस्त... :)

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

अनामिक's picture

26 Aug 2009 - 10:50 pm | अनामिक

+३
जबरदस्त!!

-अनामिक

गोगट्यांचा समीर's picture

26 Aug 2009 - 11:05 pm | गोगट्यांचा समीर

+४
बेफाट!! खुप आवडली...

दिपाली पाटिल's picture

27 Aug 2009 - 1:43 am | दिपाली पाटिल

छान कविता..

दिपाली :)

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Aug 2009 - 2:33 am | llपुण्याचे पेशवेll

मस्त...
काळ्याकादवरची चांदण्याची नक्षीची कल्पना भावली..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मन's picture

26 Aug 2009 - 10:46 pm | मन

...इवल्याशा घरट्यात इवलासा श्वास
चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास

या सरर्वाधिक आवडलेल्या ओळि.

आपलाच,
मनोबा

मीनल's picture

26 Aug 2009 - 10:49 pm | मीनल

निशा, काहुर मन यांचा मेळ उत्तम आहे.
मीनल.

शैलेन्द्र's picture

26 Aug 2009 - 11:21 pm | शैलेन्द्र

"नटलेली निशा पण मन हे काहूर
उदासच वाटे आज पावरीचा सूर
खोल अंतरात जसा अडकला स्पंद
गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??"

वा.. सुंदर..

लवंगी's picture

27 Aug 2009 - 12:52 am | लवंगी

खूप आवडली

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Aug 2009 - 1:19 am | बिपिन कार्यकर्ते

आवडलीच... "क्षितिजास पहुडली कंटाळली वीज" ... मस्त.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

27 Aug 2009 - 1:29 am | चतुरंग

मस्त कल्पना आहे! :) अतिशय चित्रदर्शी कविता आवडली.
(प्राजू, तुझ्या पूर्वीच्या काही कवितातल्या प्रतिमांचा तोचतोचपणा जाऊन कविता आता एका वेगळ्या उंचीवर जाऊ लागली आहे असे वाटते.)

चतुरंग

रेवती's picture

27 Aug 2009 - 1:28 am | रेवती

एक चांगली कविता वाचल्याचा आनंद मिळाला.
शेवटचे कडवे जास्त आवडले.

रेवती

शाल्मली's picture

27 Aug 2009 - 3:32 pm | शाल्मली

एक चांगली कविता वाचल्याचा आनंद मिळाला.

असंच म्हणते.
खूप छान कविता.
पहिलं आणि शेवटचं कडवं खूप आवडले.

--शाल्मली.

नंदन's picture

27 Aug 2009 - 2:41 am | नंदन

सुरेख, चित्रदर्शी कविता

रेखले या काजळास अवनीच्या डोळा
सोनसळी आसमंत झाला गं सावळा

- क्या बात है!

शेवटचे कडवेही अप्रतिम.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुबक ठेंगणी's picture

27 Aug 2009 - 7:39 am | सुबक ठेंगणी

मलाही शेवटचे कडवेच भावले...
लिखते रहो...

हृषीकेश पतकी's picture

27 Aug 2009 - 8:12 am | हृषीकेश पतकी

तोडलंय राव...
लई भारी!!

आपला हृषी !!

क्रान्ति's picture

27 Aug 2009 - 11:51 am | क्रान्ति

सुरेख कविता, सुंदर प्रतिमा!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

फ्रॅक्चर बंड्या's picture

27 Aug 2009 - 3:02 pm | फ्रॅक्चर बंड्या

सुरेख कविता

प्रभो's picture

27 Aug 2009 - 3:05 pm | प्रभो

अप्रतिम झालीय कविता......

जास्त बोलायला शब्दच नाहीत.. :)

ज्ञानेश...'s picture

27 Aug 2009 - 3:26 pm | ज्ञानेश...

प्राजुताईंची मला आजपर्यंतची सर्वाधिक आवडलेली कविता.


क्षितिजास पहुडली कंटाळली वीज

जळताना दिन सारा साचली काजळी

सोनसळी आसमंत झाला गं सावळा

दूर दाट सावलीने थरारली फ़ांदी

काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे

गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??

अगदी मनाला भिडणार्‍या ओळी.

"Great Power Comes With Great Responsibilities"

विमुक्त's picture

27 Aug 2009 - 3:28 pm | विमुक्त

मस्त एकदम....

लिखाळ's picture

27 Aug 2009 - 4:23 pm | लिखाळ

वा ! कविता आवडली.
क्षितिजास पहुडली कंटाळली वीज
रेखले या काजळास अवनीच्या डोळा
काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे
या कल्पना फार छान वाटल्या.

चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास
हे तितकेसे आवडले नाही. चेतनगुणोक्ती जरा जास्तच होते आहे असे वाटले :) आणि ते तर्काला धरूनही वाटले नाही. असो.

-- लिखाळ.
चालतं एकवेळ चालते पण चाल मात्र चालत नाही ;)

दत्ता काळे's picture

27 Aug 2009 - 4:50 pm | दत्ता काळे

तळपता रवी थकलेला संध्याकाळी
जळताना दिन सारा साचली काजळी
रेखले या काजळास अवनीच्या डोळा
सोनसळी आसमंत झाला गं सावळा

. . हे कडवं तर फार आवडलं

मनीषा's picture

27 Aug 2009 - 6:28 pm | मनीषा

नटलेली निशा पण मन हे काहूर
उदासच वाटे आज पावरीचा सूर
खोल अंतरात जसा अडकला स्पंद
गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध?? ------ मस्त !!!