मिपावर "ट्विटर"

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जनातलं, मनातलं
7 Aug 2009 - 1:55 am

मित्रानो ,
एक काळ असा होता की मिपावर पडीक असणे शक्य होते. पण आयुष्याच्या इतर पैलूंबद्दल जे झाले ते , दुर्दैवाने येथेही झाले आहे : सगळ्याचीच घाई नि कशालाही वेळ नाही. आता पूर्वीसारखे बत्तीस कोर्सेस चे इच्छाभोजन शक्य नाही. आता घुटक्याघुटक्यानेच आस्वाद शक्य आहे. (सध्यातरी).
मनात विचार आला की, सद्यस्थितीला अनुरूप असे काहीतरी नेमके आणि छोटेसे काहीतरी लिहिता आले - आणि इतरांकडून ऐकता आले तर मजा येईल. आजमितीला, करोडो लोक वापरत असलेल्या "ट्विटर" नावाच्या संकेतस्थळामधे लोक नेमके हेच करतात. मग हीच संकल्पना इथे राबवून पहायला काय हरकत आहे ?

म्हणून हा धागा. या धाग्यामधे एकाच विषयाला उद्देशून असे लिखाण न करता , आजच्या दिवसात , आताच्या घडीला तुम्हाला जे लिहावेसे वाटते आहे ते एखाद्-दोन वाक्यात आपण लिहू शकतो. पहा, आवडले तर हा धागा आपण चालू ठेवू.

माझ्या "ट्वीट" पासून सुरवात करतो.

३० ऑगस्ट ला आमच्या शहरात "ब्लॅक अँड व्हाईट" नावाच्या , सध्या अमेरिका दौर्‍यावर असलेल्या मराठी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. कॅलिफोर्नियाच्या एका शहरी आयोजित केलेल्या याच कार्यक्रमाची एक झलक त्यांच्या स्थळावर आहे : http://www.calaaonline.com/

वावर

प्रतिक्रिया

Nile's picture

7 Aug 2009 - 2:51 am | Nile

वा! कल्पना चांगली आहे. सोशल नेटवर्कींगच्या यशाचं रहस्य यातच आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती होउ नये. :)

थोड्सं अवांतरः याच धर्तीवर मिपावर, कार्टुन धागा, विडिओ धागा इ. काढायला हरकत नाही असे वाटते. यात अडचण म्हणजे ५० प्रतिसादानंतर उघडणारं दुसरं पान. जर उपप्रतिसाद दिले नाहीत तर मात्र अडचण येणार नाही. असो.
आमचं ट्वीटः

गेल्या विकांताला अमेरीकन तीर्थयात्रा-१ पुर्ण केली, सॅन डिएगो! नंदनशेठ बरोबर रविवार मस्त-मजेत घालवला!
देवदत्त, मी आणि नंदन यांच्या भेटीतला मुख्य दुवा मिपा, आणि मी मिपावर आलो मुक्तसुनीत यांच्यामुळे. दोन्हीचे मनःपुर्वक आभार. :)

बेसनलाडू's picture

7 Aug 2009 - 2:40 am | बेसनलाडू

आजच डी-डॉस् करून ट्विटर बंद पाडले गेले आहे. मिपावरही ट्विटर(सम काही) चालू झाले की तथाकथित मिपाद्वेष्ट्यांच्या आनंदाला पारावार रहायचा नाही! ;)
(कुंपणस्थित)बेसनलाडू

Nile's picture

7 Aug 2009 - 2:52 am | Nile

ट्वीटर बंद पडल्यामुळे सगळ्यात मोठी झालेली पंचाईत म्हणजे. 'ट्वीटर इज डाउन' अशी ट्वीट कुठे करावी? :)

झालं! आम्हीच पहीला उपप्रतिसाद दिला. (:

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2009 - 11:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ट्वीटर अजूनही मरतमरतच चालू आहे.

अवांतरः मिपा बंद पडल्यावर तक्रार कुठे करायची याचंही उत्तर याच धाग्यावर मिळतंय! ;-)

अदिती

Nile's picture

7 Aug 2009 - 10:39 pm | Nile

@ दुर्बिटणे बाई: http://mashable.com/2009/08/07/twitter-facebook-2/

कीती खरंय वगैरे सोडा, पण 'आम्ही नसु एकले' ही भावना सुखावुन गेली. ;)

अमृतांजन's picture

7 Aug 2009 - 2:54 am | अमृतांजन

कल्पना चांगली आहे. आमच्या रात्री मिपावर अनिवासी ट्वीट-ट्वीट कुजन होईल ती मात्र आम्ह्ला ऐकू येणार नाही.

शाहरुख's picture

7 Aug 2009 - 3:29 am | शाहरुख

" माझं काम संपवून मी घरी कधी जाणार ? :-( "

आशिष सुर्वे's picture

7 Aug 2009 - 3:34 am | आशिष सुर्वे

साडेतीन वाजलेत शाहरुख भाऊ!
एवढे काम करताय!!!!
@!@
तुम्ही आमचे डोले उघडलेत!
म्या पण आता धडाडीने कामाला लागतो... झोपायच्या!!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

नीधप's picture

7 Aug 2009 - 8:46 am | नीधप

आज बिकांची भेट होणार.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

टारझन's picture

7 Aug 2009 - 12:06 pm | टारझन

बिका .... अमर रहे .... !!

कोण प्रतिसाद उडवतो रे ? ह.घ्या. लिहूनही उडतो म्हणजे काय ? आम्ही बिकांची एवढी थट्टा करू शकतो ...

-(बिकाश्रीचा मित्र) टार्‍या भयंकर

सहज's picture

7 Aug 2009 - 8:55 am | सहज

आत्ताच दोन जगप्रसिद्ध उच्च अभिरुची मंडळ आद्य संस्थापक मिपाकरांचे फोटो पाहीले. दोघांचे केस उडलेले.

सावधानतेचा इशारा - जास्त पुस्तके वाचाल तर केस गमवाल ;-)

आनंदयात्री's picture

7 Aug 2009 - 9:21 am | आनंदयात्री

चामारी आज स्वयंघोषित पुरोगाम्यांना फोडायला विषय काय शोधावा ?

दशानन's picture

7 Aug 2009 - 9:24 am | दशानन

" माझे सर्व क्रमशः लेख आपोआप कसे पुर्ण होणार :? "

***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)

आनंदयात्री's picture

7 Aug 2009 - 9:48 am | आनंदयात्री

मुसुराव धाग्याएवजी ट्वीटर खरडफळ्यावर हलवावा का ?

धनंजय's picture

7 Aug 2009 - 10:38 am | धनंजय

म्हणजे ५० प्रतिसादांच्या Y1Lची भीतीसुद्धा राहाणार नाही.

अजय भागवत's picture

7 Aug 2009 - 9:53 am | अजय भागवत

ट्वीटर आणि ड्रुपलचे जोडकाम करता येते. ट्वीटरच्या सुक्ष्मकोट्या मिपावर दिसू शकतील- http://drupal.org/project/twitter

अजय भागवत's picture

7 Aug 2009 - 9:54 am | अजय भागवत

सुक्ष्मकोट्या- ओळकोट्या- एकोळकोट्या- micro blogs

बहुगुणी's picture

7 Aug 2009 - 10:13 am | बहुगुणी

दिल हूं हूं करे - भूपेन हजारिका (रुदाली चित्रपटात)

आणि त्याचं मूळ असलेलं हे गाणं: मेघो थोम थोम कोरे, जोलो थुइ थुइ गिरे

आणि हे लताच्या आवाजात

ब्रिटिश टिंग्या's picture

7 Aug 2009 - 10:20 am | ब्रिटिश टिंग्या

वीकांत वीकांत

आनंदयात्री's picture

7 Aug 2009 - 10:25 am | आनंदयात्री

हि & हि ट्विट आहे ही !

सुनील's picture

7 Aug 2009 - 11:23 am | सुनील

रौद्रकल्लोळ
धूम्रकेशरी
सनातन वेदनेचा तप्तशीतल झुळूकवर्षाव
धुबुक-धुबुक
हुर्रर्र

कविता पाडण्यासाठी कच्चा माल जमवतोय!

टीप - वरील सर्व शब्दांचे स्वामित्वहक्क सुरक्षित.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

Nile's picture

7 Aug 2009 - 11:23 am | Nile

@मुसुशेठः http://www.youtube.com/watch?v=PN2HAroA12w काय म्हणता? :)

Nile's picture

7 Aug 2009 - 11:39 am | Nile

@ 'कटर': यु आर फास्टर दॅन ट्वीटर(र्स). :)

ओबामाने भर मुलाखतीत माशी मारली त्यावर ट्वीट

Somewhere there's a baby fly without a father. Thanks OBAMA!

;-)

विसोबा खेचर's picture

7 Aug 2009 - 11:52 am | विसोबा खेचर

या धाग्यातील सर्व अवांतर प्रतिसाद उडवून लावले आहेत. अवांतर गप्पा मारण्यासाठी खरडफळा, खरडवहीचा उपयोग करावा.

हे आधीही अनेकदा सांगितले आहे. तरीही काही मंडळी ऐकत नाहीत असे दिसते. या पुढे मात्र अवांतर प्रतिसाद लिहिणार्‍या सभासदाचे सभासदत्व त्वरीत रद्द केले जाईल.

तात्या.

विसोबा खेचर's picture

7 Aug 2009 - 12:07 pm | विसोबा खेचर

माझं ट्विट -

"मिपावर अवांतराचे रान फार माज आहे असे दिसते. या पुढे अवांतर प्रतिसाद देणार्‍यांचे सभासदत्व रद्द करायचे. दोन चार मंडळींचे सभासदत्व रद्द झाल्यास ज्यांना मिपावर राहायचे आहे आणि लिहायचे आहे, निदान ती मंडळी तरी अवांतर लेखन करणार नाहीत. 'अवांतर प्रतिसाद दिला म्हणून एखाद्याचे सभासदत्व रद्द झाले' हे ज्यांना आवडणार नाही त्यांच्याकरताही 'मिपाची दारं सताड उघडी आहेत' असे सांगायचे ठरवले आहे!"

मदनबाण's picture

7 Aug 2009 - 7:18 pm | मदनबाण

गुगल अर्थ इन्स्टॉल न करुन देखील आपण सॅटेलाईट इमेजेस पाहु शकता.
http://www.wikimapia.org

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

Nile's picture

7 Aug 2009 - 10:24 pm | Nile

@ पुरोगामी नेटीझन्स [ ;) ] http://www.youtube.com/watch?v=c_iN_QubRs0

उत्तम दर्जाची गुलाबजाम, बर्फी वगैरे तयार करुन विकणारा हलवाई हल्ली पाणीदार दुध आणि पांचट दही विकत आहे.

श्रावण मोडक's picture

8 Sep 2010 - 7:18 pm | श्रावण मोडक

टाळी!!!

मुक्तसुनीत's picture

8 Sep 2010 - 7:42 pm | मुक्तसुनीत

काल परवा एका संभाषणात "मुंबई डि-इंटलेक्चुलाइज्ड" या पुस्तकाचा उल्लेख ऐकला. कुणी हे पुस्तक वाचले आहे काय ?
लेखक : "लोकसत्ताचे" माजी संपादक अरुण टिकेकर.
http://www.tribuneindia.com/2009/20090719/spectrum/book3.htm

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2010 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिल अवचट यांच्या 'वनात...जनात' या पुस्तकात असलेली 'शाळा' नावाची सुंदर गोष्ट 'स्पंदन' नावाच्या मासिकात वाचली. जब्रा गोष्ट आहे. लवकरच 'वनात-जनात ' पुस्तक विकत घेतोय.

-दिलीप बिरुटे

शेखर's picture

8 Sep 2010 - 7:54 pm | शेखर

कंटाळा आला आहे