युलीप व म्युचल फंड

सदानंद ठाकूर's picture
सदानंद ठाकूर in जनातलं, मनातलं
4 Aug 2009 - 6:31 pm

देशात विमा व्यवसायाचे खाजगीकरण झाल्यापासून अनेक विमा कंपन्या अस्तित्वात आल्या असून त्यांनी जागोजागी त्यांच्या शाखा उघडलेल्या आहेत. सर्वच विमा कंपन्यांनी युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन अर्थात युलिप हे प्रॉडक्ट बाजारात आणले आहे. इन्शुअरन्स कंपन्यांनी गावोगावी त्यांचे एजंट नेमले असून ते लोकांच्या गळ्यात युलिप हे महागडे प्रॉडक्ट, विमा प्रॉडक्ट म्हणून न विकता, गुंतवणुकीचे एक चांगले माध्यम म्हणूनच विकत असतात. तीन वर्ष पैसे भरा, मग भरावयाची गरज नाही, त्याचे एवढे पैसे होतील, तेवढे पैसे होतील अशा बाता मारतात. प्रत्यक्षात युलिपमध्ये पहिल्या वर्षी 20 ते 60 टक्के एवढी रक्कम चार्जेस म्हणून कापली जाते व उर्वरित रक्कमच गुंतवणुकीला वापरली जाते. यामधून एजंटला 12% ते 40%पर्यंत कमिशन दिले जाते. म्हणजेच युलिप हे गुंतवणुकदारापेक्षा एजंटलाच फायदेशीर आहे.

आपले जर ह्या जगातून अकाली जाणे झाले तर आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा हा प्रत्येकालाच अत्यावश्यक आहे. मात्र तो टर्म इन्शुअरन्स स्वरूपात घेणे हे फायदेशीर असते. टर्म इन्शुअरन्समध्ये 30 वर्षे वयाच्या व्यक्तीला वार्षिक सुमारे रु० 3000 प्रीमियममध्ये रु० 10 लाख व रु० 7500 मध्ये रु० 25 लाखाचा विमा मिळतो. असा टर्म इन्शुअरन्स घेऊन बाकी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणे हेच ग्राहकाच्या हिताचे असते.

म्युचल फंड हे पूर्णतः गुंतवणूकीचे साधन आहे.

युलिप (Unit Link Insurance Plan) हे इंशुरन्स कंपन्याचे प्रॉडक्ट आहे.

म्युचल फंडाला एंट्री लोड अजीबात नसतो त्यामुळे सर्व रक्कम गुंतवणूकिला जाते.

युलिप मध्ये पहिल्या वर्षी एंट्री चार्जेस २०% ते ६०% एवढे भारी असतात.

म्युचल फंडात नंतर कितीही वेळा गुंतवणूक केली तरी वरिल प्रमा़णेच एंट्री लोड लागत नाही व सर्व रक्कम गुंतवणूकिला जाते.

युलिप मध्ये दुस-या वर्षी एंट्री चार्जेस १% ते १०% एवढे असतात तर तिस-या वर्षापासून १% ते ४% एवढे असतात

म्युचल फंडाचे एंजटला कमिशन 0.5% ते 0.75% एवढेच मिळते

युलीप विक्रीत एंजटला कमिशन १५% ते ४०% एवढे मिळते

वार्षीक १०% गुंतवणूकी वार्षीक चक्रवाढ पध्दतिने परतावा मिळाला तर ३ -या वर्षी एकूण निव्वळ परतावा सुमारे 33% पेंक्षा जास्त होतो

युलीप मध्ये वार्षीक १०% गुंतवणूकी वार्षीक चक्रवाढ पध्दतिने NAV वर परतावा मिळाला तरI ३ -या वर्षी एकूण एकूण गुंतवणूकी एवढेसुध्दा गुंतवणूक मुल्य होत तर नाहीच पण गुंतवणूकदार नुकसानीतच असतो.

म्युचल फंड गुंतवणूक म्हणूनच विकले जाते आणि गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय.

इंशुरन्स प्रॉडक्ट असूनही गुंतवणूकदारांची दिशाभूल करुन एजंट लोकं हे गुंतवणूक प्रॉडक्ट म्हणूनच विकतात

म्युचल फंडात गुंतवणू करणे गुंतवणूकदाराला फायदेशीर

गुंतवणूकदाराचे नुकसान व फक्त एजंट साठी फायदेशीर.

गुंतवणूकदाराने म्युचल फंडात गुंतवणूक करावी

जीवन विमा हा अत्यावश्यक आहे यात काही संशय नाही मात्र तो टर्म इंशुरन्स स्वरुपातच घ्यावा

गुंतवणूकसंदर्भ

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

5 Aug 2009 - 4:03 am | पाषाणभेद

"युलिप हे गुंतवणुकदारापेक्षा एजंटलाच फायदेशीर आहे.
" असाच अनुभव आहे.

युलिप चे प्रिमीयम मिनीमम ३ वर्षे भरावे लागतात. त्या काळात आपल्या फंडात जमा केलेली रक्कम व मार्केट नुसार झालेली रक्कम ही ५० ते ६० टक्क्यांनी कमी झालेली असते.

थोडक्यात युलीप हा भुलभूल्लय्या आहे. एलाआयसी मध्ये काम करणार्‍या सुपीक डोक्यातून पिकलेली व सामान्य/ नसमजणार्‍या लोकांना लुबाडायची एक सोय आहे.

सबब: "जीवन विमा हा अत्यावश्यक आहे यात काही संशय नाही मात्र तो टर्म इंशुरन्स स्वरुपातच घ्यावा"

एकदम मान्य. आणि हो,
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या